माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चटणीत थोडे ओले खोबरे किंवा डाळे किंवा थोडे दाण्याच कूट असे काहीच वापरत नाही का? मग एकजीव कशी होते?? मी थोडे खोबरे वापरते नेहमी, उग्र होत नाही एकजीव होते.

सूनटून्या, आपल्याकडे दुर्गभ्रमण पूर्वतयारी असा एक बीबी आहे. त्यावर ट्रेकवर नेण्यासाठी बरेच पदार्थ मी लिहिले आहेत.
चिकन ट्रेकवर करण्यासाठी योग्य नाही. स्थानिक घरात करून मिळाले तर ठिक, नपेक्षा घरूनच सुके चिकन वा चिकन लोणचे न्यावे. कडधान्यापैकी मूग सोडले तर बाकीची कडधान्ये लवकर शिजत नाहीत. मूगही भिजवून, मोड काढून शिजवले तर चांगले.

चिकन करायचेच असेल तर एक उपाय आहे. चिकन एका पक्क्या म्डक्यात किंवा फॉइलमधे गुंडाळून त्याभोवती सागाची पाने बांधावीत आणि बराच वेळ शेकोटीत शिजवावे.

अल्पना, आंबटपणासाठी काहीच घालत नाही. साखरही घालत नाही. पुढच्यावेळी तसे करुन बघते.
सीमंतिनी, नुसत्या पुदिन्याची, कोथिंबिरीची चटणी वेगळी. मला नाही वाटत चाटच्या चटणीमध्ये दुसरे काही असते. डाळं / खोबरं घातलेली वेगळी. त्याची चव त्यातल्या अ‍ॅडिशनमुळे कधीच उग्र लागत नाही.

अल्पना +१.

नुसत्या पुदिन्याची, कोथिंबिरीची चटणी वेगळी >>> +१

मी केलेली कोथिंबीर + पुदिना चटणी कडसर लागते आणि एक कच्चट टेस्ट जाणवते.>>>>>>>>सँडविचसाठीच्या चटणीसाठी थोडीशी कोथिंबीर + पुदिना+ डाळे (चिवड्यात घालतो ते) + हि.मिरची + थोडेसेच आले,मिक्सरमधे वाटून घ्यायचे.लिंबू पिळायचे.

८-१० जणांना पुरेल अस, खोबऱ्याच्या वाटणाशिवाय चिकन बनवण्याची पद्धत कोणी सांगू शकेल का? तसेच कडधान्याची उसळ वगैरे. >>>>>>>> चिकनला मीठ,हळद,लिंबूरस लावून ठेवा.१ किलो चिकनसाठी लवंग१ ,दालचिनी १ तुकडा, मसाला वेलची१, मिरी ६-७, साधी वेलची १ यांची फोडणी करा.जास्त कांंदा त्यात टाकून आले+लसूण +कोथिंबीर यांचे वाटण घाला .चांगले परतल्यावर मालवणी मसाला घाला.चिकन त्यात घाला.झाकण ठेवून शिजू द्या.शिजत आल्यावर कसुरी मेथी घाला.जास्त ग्रेव्ही हवी असेल तर टोमेटोपण कांद्यावर घाला.(मी वापरत नाही.) मातीच्या मडक्यात कराल तर एकदम टेस्टी होते म्हणे.

मी, साधी मेथी चिरून +लसूण पात कांद्यावर टाकली होती.टेस्टी झाले म्हणून खाणार्‍याने सांगितले.

उसळीसाठी : सुके खोबरे पाणी न घालता मिक्सरमधून काढा.रवाळ पूड होईल्,ती भाजून घ्या.ती तुम्ही ५-६ दिवस वापरू शकता.तेलावर फोडणी करा,कांदा घाला ,कडधान्य घाला.पाणी घालून शिजल्यानंतर मीठ, साखर(काही उसळींत) +तिखट घाला.खोबर्‍याची पूड घाला.

कोणाला सरसोंका साग' माहित आहे का? मला आज माझ्या शेजारणीने साग आणि मकईकी रोटी दिली होती. एकदम टेस्टी होती.तिला विचारणार आहेच.पण इथे लिहिलेली असेल तर मला फायद्याचे होईल.

अगो, मी को+पु+हिमि+आलं+लसूण्+लिंबू+मीठ+साखर+जिर्‍याची पावडर अशी करते चटणी. कोथिंबीरीच्या दुप्पट पुदिना घेते.

साती
काही वेळेस घरूनच नेतो, कधी जागेवरच बनवतो. पण हा 'पटाखा' प्रकार करून पाहायला हरकत नाही. घरून सर्व तयारी करून नेऊ शकतो अस वाटतंय. शिजवणे जागेवर गेल्यावर.

नंदिनी
हो, कडधान्य शिजत नाहीत लवकर, कंटाळा येतो अक्षरशः. हे सुंदल काय आहे? कधी ऐकल नाही.

दिनेशदा,
धागा सापडला आहे, नजर टाकतो.
जेवण/चिकन स्वतःच करण्यामागचा एकमेव उद्देश पैसे वाचवणे, बस. त्यासाठी सर्व संसार बरोबर असतो. अगदी हिरव्या मसाल्यापासून लाल मसाल्यापर्यंत, चपातीसाठी लागणारे साहित्यसुद्धा.
ओल जेवणच पसंत करतात सर्वजण, त्यामुळे कडधाण्याच्या उसळीचा प्रकार विचारला.

मंजूडी, कोथिंबीर-पुदिन्याचं माझंही प्रमाण साधारण तेच होतं पण लिंबू आणि साखरेची अ‍ॅडिशन नक्की करुन बघते. आत्ता जी चटणी तयार आहे त्यातच थोडे लिंबू आणि पिठीसाखर घालते आधी.

सूनटून्या,
मी नगरसाईडच्या काही लोकांना चिकनला दाटपणा येण्यासाठी खोबर्याऐवजी फुटाणे (दाळवे)भाजताना त्यावरची जी टरफले निघतात ती भडभुंज्याच्या दुकानातून नेऊन त्यांची पूड करून घालताना पाहिलंय.
असं चिकन मी खाऊन पाहिलं नाही.
तुम्ही छोट्या प्रमाणावर घरी ट्राय करा.
आवडलं तर हे घालून ओल्या रस्सेदार उसळीही करू शकता.

सून टुन्या, एक आटा चिकन म्हणून रेसीपी आहे. ती गुगल करा. पूर्वी पंजाबात प्रवासाला जाताना अश्याप्रकारचे चिकन नेत असत. स्टफ्ड चिकन पूर्ण पणे कणिकेच्या आवरणात गुंडाळून भाजायचे का शिजवायचे असे काहीतरी आहे. हैद्राबादेत एका रेस्टॉ. मध्ये मिळत असे. तुम्ही चिकन करी ऐवजी कोल्ड सलाड( चिकन बॉइल किंवा ग्रिल करून प्रत्येक माणसाचे एक असे डबे बनवूनही नेउ शकाल. चिकन, उकडलेल्या भाज्या, पास्ता असे सलाड मस्त लागते.

चिकन ६५ सारखे तळीव पदार्थ पण चांगले लागतील. तळलेले चिकन घरी न्यायचे. सॉस आयत्यावेळी बनवायचा. आंबट तिखट असते. एक दह्याचा डबा न्यावा लागेल. मिरची लसूण नेहमीचेच.

चिकन पीसेस मॅरेनेट मध्ये टाकून डब्यातून नेता येतील व आयत्यावेळी शेकोटीवर भाजायचे. कल्पनेनेच
मस्त वाटते आहे. बेस्ट लक टू यू. ह्या गार हवेत गरम भाजके चिकन खाण्याचे सूख ग्रेट!

सूनटून्या, वजनाला हलके, शिजायला लवकर आणि ट्रेकसाठी उत्तम असे काही पदार्थ आहेत तिथे.

चिकनपेक्षा, सुकट ( जवळा, गोलिम, झिंगे ) न्यायला उत्तम. आयत्यावेळी जे मिळेल ( वांगी, कैर्‍या, करवंदे, बटाटे, कांदे ) ते घालून शिजवता येते. भाकरीबरोबर खाता येते.

सुकटची आयडिया मस्तं आहे.
पण जवळा, सुकट सगळ्यांनाच पचत नाही.
ट्रेकच्या ऐनठिकाणी प्रॉब्लेम. मग माकाचु माकाचु!

पण सुका कोलिम नुसता भाजून त्यात कांदा तिखट घालून कोशिंबीर आणि भाकरी. आणि भाकरीचाच प्लेटसारखा वापर करून त्यात तो कोलिम. अहहा! तोंपासु!
Wink

पण जवळा, सुकट सगळ्यांनाच पचत नाही.
<<<<

ट्रीप यादगार होवु शकते. Proud
बटाट्याची कोरडी भाजी होते की नाहितर नुसते उकडलेले बटाटे व वरून मसाला पेरून चाट सारखे आणि दह्यात घालून.
भाज्या ग्रिल करण्यासाठी कापून मसाल लावून.

माझी कांद्याची ग्रेव्हि आत्तापर्यंत ४/५वेळा कडु झाली आहे . मी अंडा करी किंवा छोले केले होते . काय चुकतेय नक्कि .

तुम्ही कांदा कच्चा वाटून घेता का? त्याने कांद्याला पाणी सुटते आणि नीट परतला जात नाही. कांदा नीट परतला / शिजला नसल्यास कडू होते ग्रेव्ही. कांदा चॉप करा अन मग परता. किंवा परतल्यावर मग वाटा. किंवा कच्चाच वाटून घातला तर खूप शिजवा /उकळा. मग नाही होत कडू.

हाय्ला!
ट्रेकिंगला चिकन फिकन करून खाणार हे ऐकूनच जीव निवला माझा.

आमची मजल बिस्किटे, खिचडी अन अती झालं तर पिठलं भाकरी इतपत होती. हे आयटम बिघडायची शक्यता जवळपास शून्य. भाकरी घरून बांधून नेणे. पिठले तिथे शिजवणे.

गेले काही वेळा (सतत) माझा मायक्रोवेव्हला भाजला जाणारा पापड मध्यभागी रुपयाच्या नाण्याएवढा गोल भाग कच्चा राहिला जातोय. आधी मायक्रोच्या प्लेटवर डायरेक्ट मग घरातल्या वेगवेगळ्या माय्क्रोसेफ बशा वगैरे बेस बदलून पाहिले. माय्क्रोची डिश फिरतेय आणि आधी असं मध्यभाग कच्चा राहणं वगैरे नव्हतं. अचानक असं का होतंय? बरं हे काही पापडाचे नमुने खास सासरहून आल्याने काही बोलायची बिशाद नाहीये (विकतचेच आहे. ब्रँड आठवत नाहीये) आता सध्या नेहमी इथे घेते ते पापड नाहीयेत. पण हा कच्चा गोल सध्यातरी काढून टाकून देतेय. काही सुधारणा करता येतील का?

नेहमीच्या पापडापेक्षा ह्या पापडाचा डायमीटर मोठा आहे का? असल्यास पापड कापून (अर्धा/ चतकोर) ट्राय मारू शकतेस.

सासरहून आलेत मग काय Problem आहे.. माहेरचे असले तर अपमान, मानहानी वगैरेला सामोरे जावे लागेल. Proud

प्लेटच्या मधोमध न ठेवता off-center ठेऊन बघा. मावेचा Problem का पापडाचा ते तरी कळेल... Happy

धनि +१
मात्र माझा मावे मध्ये न उलटता पापड १० से (३० से मध्ये जळतो) मध्ये होतो. तेव्हा उलट पालट करताना तुमच्या मा वे चे जे सेटींग असेल ते बघून करा.

धनि ३० सेकंद एका बाजुमध्ये माझा नॉर्मली पूर्ण पापड भाजला जातो. पलटून पंधरा सेकंद ट्राय केलं होतं एकदा पण हा मधला गोल अभेद्य असल्यासारखा वागतोय Happy जास्त सेकंद भाजल्यास चांगला भाजलेला भाग जळेल असं वाटतंय.

आभार्स दोघांचेही.

Pages