माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चौकार होता धनि Rofl

तळण कमी केलंय हे कळल्यामुळे मुद्दाम तळण्याचे पापड पाठवले असं असेल का Wink बादवे, ते तळण्याचे पिंटुले असतात तसा नाहीये. छोटा फुलका असतो तेवढा आहे.

पापड मधून एकदम राग काढून पातळ आणि कडा जाड ठेवल्यात का? त्यामुळे मधला भाग रिलेटिव्हली कोरडा (कमी आर्द्रता) असलेला असं आहे का? पाण्याचं प्रमाण किती आहे यावरून किती गरम होणार/ किती पटकन गरम होणार ते ठरेल.
मावे जनरलीच समान हिट करत नाही, म्हणून तर गोल फिरणारी ताटली असते ना. तुकडे करून कडेच्या बाजुला ठेवून बघ.

गॅस असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये का भाजायचे पापड? गॅसवर १० सेकंदात छान पापड भाजला जातो. जाळी ठेवून प्लेन कुकटॉप वर छान भाजला जातो.
मला ते मावे प्रकरण फक्त पापडासाठीच वेळ खावू वाटत. आणि कधीच व्यवस्थित पापड भाजला जात नाही.

मावेत पापड भनाट होतात हा माझा अनुभव .
तसेच , इथे ग्राहकचे पोह्याचे मिरगुन्ड मिळतात
( मिसगुन्ड्च ना ते .. नक्के माहित नाही .
पण पोह्याचे छोटे केनेपीसरखे तुकडे असतात , सहसा तळून खाल्ले जातात .. फेण्या , कुरडया तत्सम )
ते पण मावेत मस्त होतात .
अगदी कुर्कुरीत , तळल्यासरखेच

Happy १२७ मिलीमीटर डायमीटरच्या पापडात जर रुपया एवढं म्हणजे २५ मिमी डायमीटर वापरता येत नसेल तर ~५% अन्न वेस्ट होत आहे. गणित कच्च आहे तेव्हा क्षेत्रफळ कुणीतरी हे पडताळून बघा. Wink
( वेगळ्या भाषेत - साधारण दर २०० ग्रॅम पापडाच्या पाकिटामागे (४८ रूपये) ती ३ एक्लेयर चॉकोलेट्स (~२.५ रुपये) इतके पैसे वाया घालवत आहे. २२ पोस्टीने ते वाचत अस्तील तर बरंच की!)

पापड १२७ मीमीचा नसेल तर सगळी आकडेमोड पुन्हा करावी लागेल आणि अडीच रुपयात ३ इक्लेयर्स मिळण्याचे दिवस गेले Proud

नाही करायची पुन्हा आकडेमोड, जर डायमीटर पापडाचा मोठा असेल तर नुकसान ५% पेक्षा कमी = नगण्य आहे - सो नॉट वर्थ दि एफर्ट. मात्र जर डायमीटर लहान असेल तर नुकसान ५% हून अधिक आहे सबब जास्त एफर्ट घेउन पापड वाचवा Wink होवू द्या पोस्टी. Happy

बाकी २.५ रु मध्ये किती एकलेयर्स येतात हल्ली?

अरे वा. बरेच पापड मोडलेत आपलं ते भाजलेत की इकडे.

अमितव, तुमचं ते राग काढून लाटायचं लॉजिक बरोबर आहे :). तसेच दिसताहेत.

रच्याकने, साइडला ठेऊन एकदा १५ सेकंद आणि नंतर १५ सेकंद असा भाजल्यावर भाजला जातोय.
कच्चा राहू न द्यायचं कारण समजावायला कंटाळा आला आहे. तरीदेखील इतकी खमंग चर्चा घडवून मनोरंजन केल्याबद्दल मंडळ आभारी आहे :).

मी ओल्या नारळाची चटणी करते तेव्हा ती खूप चोथापाणी होतेय. नेहेमीच असं होतं.
छान एकजीव चटणी कशी करू?
मी फ्रोजन नारळ वापरते. पण रूम टेंप ला आला की वापरते आणि कोमट पाणी वापरते. माकाचु??

अंजली, तुम्ही मिक्सर्/ग्रायंडर कुठला वापरता?

मी मॅजिक बुलेट, Ninja KS1100, कुझीनआर्टचं फूड प्रोसेसर असे ३ प्रकार वापरून बघितलेत. दरवेळी फ्रोजन नारळाचं हे असंच चोथा-पाणी झालं.

सध्या Ninja Auto IQ वापरते आहे. खोबरं अगदी गंधासारखं बारीक होतं.

दही आणि भरपूर कोथिंबीर वापरून पहा अंजली . दुसरं म्हणजे नारळाचा चव बर्डस आय कंपनीचा (वॉलमार्ट,क्रोगर वगैरे मध्ये मिळतो) वापरून बघा. देशी दुकानातला बरेचवेळा चांगला नसतो.

मी नेहमी देशी दुकानातला फ्रोझन नारळ वापरते. साध्या ऑस्टर मिक्सरबरोबर मिळणारे छोटे अटॅचमेन्ट किंवा
भारतातून आणलेले एक अटॅचमेंट आहे ते वापरते. खोबरे थॉ झाले पाहिजे नीट. आणि एकदम गंध वाटायला हवे .

वाटताना पाणी बेताचेच घालावे.

दही किंवा दाणे किंवा कोथिंबीर घातली तर ती डोशा/ इडली ची चटणी नव्हे Happy

मृण्मयी माझ्याकडे प्रिती/थी चा मिक्सर आहे.
धार नसल्याचा प्रॉब्लेम आहे का हा म्हणजे?
मेधा सीमा धन्यवाद. आता नेक्स्ट टाईम अमेरिकन ब्रांड चा नारळ Happy

अमेरिकन ब्रँडच्या नारळाची अजिबात गरज नाही. दीपचा फ्रोजन नारळ व्यवस्थित खवलेला असतो.
अंजली, प्रॉब्लेम बहुतेक तुझ्या मिक्सरचा असावा.

फ्रोजन नारळ नीट थॉ झालेला नसेल तर चटणी चोथापाणी होते.
१. नारळ नीट थॉ करून घ्या.
२. वाटताना दूध/पाणी (जे काही घालता ते) थोडं गरम करून घ्या. कोमटपेक्षा किंचीत गरम हवं. दूध घातल्यास सुरेख चव येते.

सायो धन्स गं पण मी दीपचाच आणते:)ब्लेडचा असावा प्रॉब्लेम कारण आज लसूण पण नीट नाही वाटले गेले Sad
अंजली दुध कधी घातले नाही चटणीत. करून पाहिन Happy

मंजूडी, पुढे नीळी स्माईली आहे याचा अर्थ बेचव लागत होती.

योकू, ताक चांगलच होतं, फोडणी दिल्यानंतरही शिजवायला हवे होते का?

Pages