माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळ्या वातड / चिवट होण्याची शंभर कारणे कुठे नोंदलेली आहेत का?
तीच कणिक, तोच तव, तेच पोळपाट लाटणे आणि पोळी भाजणारी तीच असताना फक्त लाटणारी बदलल्याने काय फरक पडतो?

Kanik koni ani kashi bhijavali gunhegaar asu shakel jar laatanarich bhijavnari asel tar

सशल यांच्या पद्ध्तीने मी आज रवा-बेसन लाडू केले. केशरमुळे चव व रंग अप्रतीम. पण पाकाचे शेपूट आलेच नाही. अंदजाने २० मिनीटानीं गॅस बंद केला. पाकात मिश्रण घातल्यावर आळायला हवे. पण आळायला काही शिल्लकच नव्ह्ते. सगळा भगरा झाला. रेसिपीत म्हणल्याप्रमाणे २२ लाडू झाले. शेवटी दूध शिंपडून कसेतरी वळले. आता प्रोब्लेम हा आहे की लाडू पाणीपुरीप्रमाणे आ़खखा तोंडात घालून खावा लागतो. नाहीतर फुटून चुरा होतोय. पाकात काहीतरी चुकले हे कळ्तेय.पण नक्की काय चुकले? २ वाट्या साखर आणि १ वाटी पाणी याचा शेपूट्पाक व्हायला अंदाजे किती वेळ लागेल? मंद गॅसवर?

घरी पाव करावयास घेतला. यिस्टचे पिठ फुलून वर आले. मग गोळे करून परत झाकून ठेवले पण ते काही केल्या फुलून येत नाहीत. आता त्या अर्ध्या किलो मैद्या च्या गोळ्याचे काय करता येईल?

हे पिठ एक दिवस फ्रिज मधे ठेवा. उद्या बाहेर काढुन रुम टेंपरेचरला आले की गोळे करुन साधारण २-३ तास गरम जागी रेज व्हायल ठेवा. ओवन जरासे गरम करुन तिथे ठेवता येईल.

पाव करायचे नसतील तर पिझ्झाबेस करता येईल.

ननि, पाकाला वेळ असा नाही सांगता येणार. तूम्हाला तो दोन बोटात धरूनच परिक्षा करावी लागेल.
वरच्या पोस्ट वरून बहुतेक रवा बेसन जास्ती झाले असे वाटतेय. अश्या पाकात रवा बेसन टाकल्यावर पिठल्यासारखे मिश्रण व्हायला हवे. ( तेवढे पातळ / घट्ट ) मग ते घट्ट होत जाते.

मेधावि, नलिनीच्या उपायानेही नाहीच जमले तर पिठात आणखी पाणी घालून जिलेबी आणि तिही नाही जमली तर मालपुवा करता येईल.. ( विनोदाने नाही, खरंच सांगतोय )

धन्यवाद. पाकात रवा बेसन टाकल्यावर पिठल्यासारखे मिश्रण व्हायला हवे. ( तेवढे पातळ / घट्ट ) हे अगदी सोप्या रितीने कळले.
प्रमाण मी २ वाट्या रवा, १ वाटी बेसन, १ वाटी तूप, २ वाट्या साखर, १ वाटी पाणी असे घेतलेले. पाकाची दोन बोटात धरून परिक्षा कशी करायची? लाडू आतापर्यंत बेसनाचेच केलेत. पाकाच्या वाट्याला कधी गेले नव्हते.

दिनेश, नलिनी.... २-३ तासांनी फुलून आले पिठ म्हणून मग पावच केले. सुचवलेल्या पर्यायांसाठी धन्यवाद

पाकाची परीक्षा ह्या व्हिडीयो मध्ये आहे -

https://www.youtube.com/watch?v=zMwmCAgZVY0

(पाक परीक्षेत नापास झाला तर ग्रेस मार्क/ ए.टी. के.टी इ देवू नये!! अक्ख्हा पदार्थ बिघडेल. पाक परीक्षा पास होईपर्यंत उकळू दे.)

चांगला आहे तो व्हीडीओ ( नव्याने शिकणार्‍यांसाठी ) माझी आई पाक असा बशीत वगैरे न टाकता झार्‍यावर घेऊन थेट बोटानेच बघते. तिच्यामते बशीत टाकून थंड व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढ्यात पाक आणखी पुढची पायरी गाठतो. अगदी गोळीबंद पाक हवा असेल फक्त त्याचवेळी पाण्यात टाकून परीक्षा ( अश्या पाकाची पाण्यात लगेच गोळी होते आणि ती गोळी पाण्यातून बाहेर काढून ताटात आपटली तर टण्णकन आवाज येतो. )

मी परदेशातून येताना काही चॉकोलेट्स आणली आहेत. मुंबईवरुन पुण्याला येताना उन्हामुळे खुपशी वितळली. Sad
जी रॅपर मध्ये आहेत, ती फ्रीजमध्ये ठेवल्यावर पुन्हा घट्ट झाली. पण काही अर्धी रॅपड होती. ती वितळून त्यांचा गोळा झाला आहे. त्यातच ते रॅपर सुद्धा आहेत. Sad बरीच महागाची तीन पॅकेट्स असल्यामुळे टाकून द्याविशी वाटत नाहीयेत.
फ्रीजबाहेर काढलं की, लगेच वितळत आहेत. मी त्यात मिल्क पावडर आणि कोको पावडर घालुन घट्ट केले आहे.
अजुन काही आयडिया माहित असेल तर नक्की सांगा.

पीनी, मागे अशीच परदेशातून आणलेली मुंबई-पुणे प्रवासात वितळून परत सेट झालेली चॉकलेट ट्रफल्स मला भयंकर बाधली होती. अजूनही त्या ट्रफल्सची आठवण नको वाटते. तेव्हा विचार करुन खा Sad

ती हँडमेड ट्रफल्स होती. त्यातले दूध, क्रीम पाश्चराईज्ड नसेल तर माहीत नाही.

पीनी, सरळ फेकून द्या.

विषबाधा नाही झाली तरी पोटाचे त्रास होतात सुरु व कळत नाही का ते ते वितळलेले गोळे संपेपर्यंत.

हॉस्टेलच्या चिक्कू मैत्रीण बरेच दिवस आजारे होती अशीच तिच्या काकांनी पाठवलेली चॉकलेटी ती खात होती. तिचे पोट चढायचे.
आणि मग तिचे धूमशान आणि आमची बाहेर पळापळ. Proud

कंजूषने आम्हाला दिलीच नाहीत बरे झाले एका परीने. Wink

माझ काय चुकतंय ते कळत नाहीये.

माहेरी पोळ्या करायचे तर सगळ ठीक असायचं.. सासरी आल्यावर ज्या पोळ्या करते त्या दुपारच्या जेवण पर्यंत काळ्या दिसायला लागतात. मी पीठ तेच वापरतीये तरीही

यू ट्युबवर पाहून रवा केकची कुकर मध्ये रेसिपी करून पाहिली काल Sad पण जरा ओमफस झालं. वाईट वाटलं.
काही ठळक घटना Proud

१. केक कुकर मध्ये पाणि घालून वर स्टँड ठेवून वर कुकरचे भांडे ठेवून केला होता. भांड्याला ग्रीसिंग फक्त तुपाचे होते.
२. केक मध्ये शिजला नाही, बाजुने फुलला.
३. बॅटर मध्ये घातलेली टुटि फ्रुटी आणि इतर मालमसाला सगळा तळाला गेला.
४. केक एक सलग निघाला नाही Sad तुकडे करून काढावा लागला...
५. केक हलका झाला नाही, गिचगिचित झाला.
६. केक मध्ये तेल वापरायला सांगितलं होतं, जे प्रमाण दिलं होतं तेच घालून सुद्धा तो जरासा तेलकट वाटला.
७. मध्ये शिजला नाही म्हणून मग मेधा चक्रदेवने सांगितल्याप्रमाणे करून पाहिलं (कुकर मध्येच केक जास्ती वेळ ठेवणं, आणि इतर नाना खटाटोप, पण पठ्ठ्या मध्ये शिजला नाही म्हणजे नाहीच :()
माझं काय चुकलं? Sad
तुमच्या माहितीसाठी काही फोटो देते आहे.

हा पहा पहिल्या फोटोत, केक मध्ये शिजला नाही.
IMG.20160703.WA0012.jpg

केकमध्ये घातलेला सगळा मालमसाला तळाला चिकटून राहिला Sad
IMG.20160703.WA0014.jpg

केक एक सलग निघाला नाही. तुकडे करून काढावा लागला. Sad
IMG.20160703.WA0016.jpg

पण एक गोष्ट बरी म्हणजे, चव चांगली, आणि गोडीला एकदम व्यवस्थित झालाय केक.

टुटी-फ्रुटी, नट्स केक शिजतांना तळाला जाऊ नये म्हणून हे जिन्नस कोरड्या मैद्यामधे घोळवून/डस्ट करून मग हलक्या हातानी केकच्या बॅटरमधे फोल्ड करावे. हे असंच कुठेतरी वाचलेलं.

दक्षिणा, जर केक मध्ये ड्रायफ्रुटस घालायचे असतील तर ते कोरड्या मैद्यात घोळवुन केकच्या कच्च्या ( बेक करण्या आधी ) मिश्रणात घालावेत, म्हणजे ते तळाला जात नाहीत.

२. ग्रिसिंग करतांना तुप वा लोण्याचा हात लावुन त्यावर कोरडा मैदा भुरभुरवुन टाकायचा, म्हणजे केक तळाला चिकटत नाही.

३. केकचे मिश्रण ठेवण्या आधी शेवटी बे. पावडर / खायचा सोडा घालुन फेटुन मग ठेवायचा म्हणजे फुलतो.

४. तो भाजला गेला नाही कारण त्याला फक्त खालच्या पाण्याची वाफ बसल्याने तो उकडला गेला, भाजला गेला नाही. त्या पेक्षा तो केकच्या भांड्यात ( जे वेगळे मिळते, व तव्यावर ठेऊन झाकल्यावर अजून एक गरम तवा वर ठेऊन केक भाजता येतो असे ) करायला हवा होता. जर ते नसेल तर आण. त्यात खरच मस्त होतो ओव्हनपेक्षा सुद्धा.

दक्षिणा, कुकरात पाणी अजिबात घालायचे नाही. मीठाचा एक थर द्यायचा, शिट्टी काधली असशीलच. दीड वाटीचा केक एकदम मंदाग्नीवर( सिम) अर्ध्या तासात छान फुलुन येतो.

पण त्या यु ट्युब वालीने तर मस्त दोन ग्लास पाणी घातलं होतं Uhoh
तिथंच आमच्या घोड्याने पेंड खाल्ली बहुधा.
मी बारिक रवा न भाजता फक्त मिक्सर मधुन काढून अधिक बारिक करून घेतला होता, त्यात साखर, तेल, दही आणि अर्धा कप दुध घालून १५ मिनिटं ठेवला, दरम्यान कुकर गरम करायला ठेवला, त्यात २ ग्लास पाणी त्यात कुकरची जाळी, वर स्टँड.. आणि वर कुकरचं भांडं , १० मिनिटं कुकर प्रिहिट करायला सांगितला होता,

माझ्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन पण आहे, पण ती प्रिहिट करण्याची नक्की पद्धत मला माहित नसल्याने मी केलं नाही, मेधा चक्रदेवने मला सांगितलं ते कसं प्रिहिट करायचं ते, पण २०-२० मिनिटं ओव्हन सुरू ठेवला तर स्फोट होईल असं वाटतं मला Proud Rofl

मुलीन्नो, केक कुकरमध्ये करु नका, कुकर खराब होतो. पहिल्या फटक्यात खराब नाही होणार पण असे नेहमी केल्यास त्याची वाट लागते. याचे कारण कुकरमधले आतले तापमान काय प्रकाराचे असावे आणि किती असावे याचे नियम आहेत, त्या नियमांची वाट लागते. कुकरमध्ये वाफ कोंडली जाऊन त्यावर पदार्थ शिजणे अपेक्षित असते. कुकरमध्ये केक करायला ठेवताना आत पाणी ठेवत नाहीत त्यामुळे वाफेच्या जागी आत ड्राय हिट तयार होते ज्यामुळॅ कुकर लवकरच अपेक्षित काम करेनासा होतो.

मी हल्लीच हॉकिन्सचा फ्युच्युरा कुकर घेतला, त्याच्या पुस्तकात ठळक अक्षरात केक करण्यासाठी वापरु नका असे लिहिलेय.

आणि वर कुकरचं भांडं , १० मिनिटं कुकर प्रिहिट करायला सांगितला होता,

अगं कुकर प्रिहीट केल्यानंअर आत भांडे कसे ठेवलेस? कारण पुर्ण वाफ गेल्याशिवाय कुकर उघडणे शक्य नाही.

तु जे करतेयस त्यात नक्की धोका नाहीये ना? मला तर वाचुनच भिती वाटतेय.

मायक्रोवेव जेव्हा केकसाठी वापरतात तेव्हा तो साध्या ओवनसारखाच १० मिनिटे प्रिहीट करावा लागतो. त्याचे सेटींङ बदलले की काही स्फोट बिट होणार नाही. उलट तु कुकरमध्ये जे करतेयस ते वाचुन तिथे काहीतर स्फोट होईल अशी मला भिती वाटतेय Happy

Pages