माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं पण अजून तरी काही चुकलं नाहीये. पण मनःस्विनीचे कृती वर आली की गुळाच्या पोळ्या करायची खाज डोकं वर काढते Uhoh

तर गेल्या वर्षी गु पो करताना गूळ पोळीतून बाहेर येऊन तव्यावर नचत होता.
मा का चु ?
हे आता त्या धाग्यवर पण लिहून येते म्हणजे शोधायला बरं पडेल

सशल, तुझ्या पोह्याच्या ब्रँड्स ची मला काही माहिती नाही कारण मी बाहेर असताना कधीच पोहब, उपमा असले प्रकार करत नव्हते. इथले पोहे नेहेमी बरेच असतात त्यामुळे अडचण येत नाही. माझ्या नवर्‍याला स्वयंपाकाची खूप आवड आहे.. माहेरी असताना रोजचा नाश्ता प्रकार नसायचा. बहुदा सकाळी डब्यासाठी केलेली पोळीभाजीच खाऊन घराबाहेर पडायची सवय होती.. पोहे असेच कधीतरी सुटीच्या दिवशी.. त्यामुळे मलाही पोहे करण्याचा सराव नव्हता.. इथे आल्यावर रोज नाश्ता मस्ट असल्याने शिकावे लागले.. त्यासाठी कायम पोहे खात आणि करत आलेल्या नवर्‍याकडून मिळालेली टिप अशी की पोहे जाड असतील तर जास्त वेळ आणि मध्यम असतील तर कमी वेळ भिजवावे.. ( ह्यात काही नवीन नाही !) मी जाडे पोहे दोन वेळा पाण्यातून धुवून घेऊन मग चक्क साबुदाणे ताटलीने झा़कून उपडे टाकून ठेवतो तसे ठेवते. पाणी पोहे भिजवताना जास्त झालेच असेल तर ते निघून जाते. पण आदल्या दिवशीचा वाटीभर भात असेल तर तोही पोह्यांबरोबर फोडणीत घालायचा. हे सगळ्यात महत्वाचे ! (शिळा भात असेल तरच मोस्टली मी पोहे करते.. नसला तर वाटेभर भडंग चे कुरुमुरे थोड्या पाण्यात ओले करून पोह्यांबरोबर घालते. हे कुरमुरे तिथे मिळत नसतील तर जाऊदे पण भाताचा उपाय करून बघ ) -----तो घालून पोहे केल्यास पोहे न चुकता छान होतात हा स्वानुभव.. आधी थोडे करून बघ तुझ्यापुरते आणि बघ फरक पडतो का ते.

शूम्पे, वर मंजू म्हणतेय तसं सारण आणि पारी ह्याची कन्सिस्टन्सी बघ. दोन्ही सारख्याच प्रमाणात मऊ हवेत. म्हणजे लाटताना जशी पारी पसरते त्याच प्रमाणात आतलं सारण पसरतं.
(ह्या वर्षी इथे एका मैत्रिणीची आई आलीये तिच्या हाताखाली Happy केल्या.)
तो अनुभव इथे शेअर करतेय.

सारणाच्या गोळीच आकारमान आणि त्यासाठी करायच्या प्रत्येक पारीचं आकारमान सारखं हवं.
पार्‍या बंद करताना मी त्याला मुरड ( उकडीच्या करंज्यांना घालतो ना तशी) घालायचा आगाऊपणा केला... आणि तो त्यांना आवडला (पार्‍यांना नाही... त्या काकूंना). त्यानं गूळ कडेतून बाहेर येण्याची शक्यता कमीच. अर्थात मुरड नाजुक घालून लाटताना ती सपाट करायला हवी.
गुळाची पावडर मिळते आजकाल. ती वापरून आधी केल्या काकूंनि.. त्यांच्या मते सारण बिघडलं... त्यामुळे आम्ही करताना साधा गूळ किसून घेतला.

पार्‍या बंद करताना मी त्याला मुरड ( उकडीच्या करंज्यांना घालतो ना तशी) घालायचा आगाऊपणा केला... आणि तो त्यांना आवडला (पार्‍यांना नाही... त्या काकूंना).>>>>> Lol

खव्याची पोळी करायचा यत्न केला. सुपर्फ्लॉप झालाय.
पहिला लॉट. खवा गरम करून घेतला व त्यात पिठीसाखर घातली...मिश्रण पात्तळ झालं. मग परत नवा खवा आणला व गरम करून पूर्ण गार झाल्यावर पिठी साखर घातली तरी मिश्रण पात्तळच झाले. कणकेसारखा गोळा होत नाहीये. खूपच विळविळीत होतेय ते. हे कसे भरणार परीमधे? माकचु?

सुमेधा, खव्यात तुपाचे प्रमाण जास्त आहे. आता या खव्यात कोरडीच कणीक व थोडे दूध मिसळून मळून बघा. ( आधी थोड्याच प्रमाणात ) लाटता आले तर त्याच्या पोळ्या होतील.
नाहीतर त्याचे बालुशाही / डोनट सारखे काहीतरी करता येईल. गुलाबजाम / कालाजामूनही होतील.

तळताना गोळा विरघळत असेल तर आणखी थोडी कणीक मिसळायची, किंवा बेक करायचे.

सुमेधा त्यात थोडे बेसन भाजून घाल.

http://chakali.blogspot.in/2009/05/khavyachi-poli.html

हे मी चकलीच्या ब्लॉगवर आणी आधी साप्ताहीक सकाळच्या पुस्तकात वाचले होते, नाहीतर लोक म्हणतील तरला दलालला विचारले होते का?:डोमा:

हेच सांगायला आले. बेसन्/रवा भाजून घालणे. माझी आई खवा व साखर शिजवून घ्यायची त्याचा चॉकलेटी रंग यायचा ते शिजलेले पुरण थंड झाल्यावर भरायची अन आम्हालाही बिनभेसळीची :)पोळी जास्त आवडायची. मी पण तशीच करते. तर ते पुरण अजून थोडं शिजवून थंड केलं तरीही पोळी जमेल...

aaj idli keli pan soft zali nahi (method dal aani taandul bhijvun vatun kele hote)
maz kai chukle?
kiinva idli soft honysati kai karave receip milel ka?

अनेक कारणे असू शकतात. इडली करताना प्रमाण, वेळ (भिजवण्याचा आणि शिजवण्याचा) चुकला तर दगड इडली होते. तू दिलेल्या माहिती वरुन काय चुकले असेल हे सांगणे कठीण आहे.
http://www.vegrecipesofindia.com/idli-recipe-how-to-make-soft-idlis/

इथे सविस्तर माहिती आहे.

इडलीचे वाटण करताना त्यात २-३ चमचे भिजवलेले पोहे घालुन वाटायचे आणि मग हे मिश्रण नेहमीप्रमाणे आंबवुन त्याच्या इडल्या करायच्या. मऊ आणि हलक्या इडल्या होतात.

सस्मित,
"साबुदाणे ताटलीने झा़कून उपडे टाकून ठेवतो तसे ठेवते.>>>>>>>>>>> प्लीज एक्स्प्लेन. कारण माझी साखि सुटी होत नाही.--"

मलाही साबुदाण्याची खिचडी थोडी ट्रिकी वाटते.. माझ्या मावशीने मला सांगितलेली साबुदाणा भिजवण्याची पद्धत अशी - साबुदाणा जरा मोठ्या भांड्यात घेऊन तो दोन वेळा (गरजेप्रमाणे जास्त वेळा) पाण्यात धुवून घ्यावा.. कचरा व खूप पांढरे पाणी जाउ द्यावे. नंतर साबुदाणे बुडून रहातिल एवढे पाणी भांड्यात राहू द्यावे. साधारण पंधरा ते वीस मिनिटे झाल्यावर त्यातील पाणी निथळून जाउ द्यावे. त्या भांड्यावर घट्ट बसेल असे किंबहुना त्याहून थो'डे मोठे ताट त्यावर उपडे घालून भांडे तिरके/उलटे करावे जेणेकरून जास्तीचे पाणी निघून जाईल. रात्रभर ते भांडे असेच उपडे ठेवावे. सकाळी काळजीपूर्वक झाकण काढून (उपडे ठेवल्याने साबुदाणे ताटाला चिकटलेले असतात.) साबुदाणा हाताने मोकळा करून घ्यावा. साबुदाणा छान भिजतो पण चिकट, ओला रहात नाही.. उपडे करून ठेवले नाही तर किमान माझा तरी साबुदाणा चिकट होतो. माझा पाण्याचा अंदाज चुकत असेल कदाचित !

ट्रेक आणि प्रस्तरारोहणाच्या मोहिमेदरम्यान आधीचे जेवण करणारे सहकारी निवृत्त झाले असल्याने, आता जेवण करण्याची जबाबदारी अचानक माझ्यावर आली आहे. मला जेवण करण्याचा काही अनुभव नव्हता पण हळूहळू जमल्यासारखे वाटत आहे. तरीही काही चुका होतच असतात, पण जेवण टाकून द्यायची पद्धत नसल्याने, अर्धेकच्चे जेवण संपवतो.

८-१० जणांना पुरेल अस, खोबऱ्याच्या वाटणाशिवाय चिकन बनवण्याची पद्धत कोणी सांगू शकेल का? तसेच कडधान्याची उसळ वगैरे. विस्तृत माहिती हवी.

झाकण लाउन भांडे उलटे केल्यावर साबुदाणे ताटात पडतील ना म्हणजे पाणी पण त्याच्यातच राहील बाहेर कसं पड्णार पाणी?? Uhoh

हे झाकण हळुच उपडे वगैरे करणे थोडे tricky आहे...त्यापेक्षा मी झाकण म्हणुन चाळणी ठेवते चक्क
. मग भांडे उपडे करुन (चाळ्णी खाली पेला ठेवते)
This works for me.

सूनटुन्या,
चिकन नेमकं ट्रेकिंगच्या जागेवर बनवायचंय का?
की घरून करून न्यायचंय?

वाटणाशिवाय आणि तेलाशिवायही चिकनची एक रेसिपी मायबोलीवर आहे.
चिकन थोडे आंबट होते, पण मस्तं होते.

http://www.maayboli.com/node/48696

पटाखा मसाला अगोदर लावून ठेवता येईल किंवा ती सुकी पूड नेवून नंतर पाण्यात पेस्ट करता येईल.
मिरचीच्या वाटपाऐवजी आलं लसूण तयार पेस्टही वापरता येते.
अमूल किंवा इतर ब्रँडेड घट्ट दह्याचे पॅक वापरता येतात.

हे झाकण हळुच उपडे वगैरे करणे थोडे tricky आहे...त्यापेक्षा मी झाकण म्हणुन चाळणी ठेवते चक्क
. मग भांडे उपडे करुन (चाळ्णी खाली पेला ठेवते)>>>>> ह्म्म हे ठीक आहे. करुन बघते.

मी केलेली कोथिंबीर + पुदिना चटणी कडसर लागते आणि एक कच्चट टेस्ट जाणवते. एक दोन लसूणपाकळ्या,एखादी कमीतिखट मिरची आणि जिरे घालून मी कोथिंबीर आणि पुदिना मिक्सरमधून फिरवते.
म्हणजे सँडविचमध्ये लोणी लावून किंवा इतर मालमसाल्याबरोबर भेळेत ती चटणी एवढी वाईट लागत नाही पण नुसती जरा जरी चाखली तरी उग्र वाटते चव. अशीच चव असते नुसत्या चटणीची की माकाचु ?

आंबटपणासाठी काय घालतेस तू चटणीत अगो?
कोथिंबीरीचं प्रमाण जास्त असेल तर थोडीफार कडसर चव लागू शकते.
मी या चटणीत लिंबू आणि किंचीतशी साखर (चिमुटभर) पण घालते.

Pages