माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलु.. आईची आठवण येतेय का ? की घरून आणायला विसरलास !
मी तूला जी ठिकाणे सांगितली होती ( एक्स्ट्रा हॉटेल ) तिथे दाक्षिणात्य दुकाने आहेत. त्यांच्याकडे डोसा वगैरेचे रेडी मिक्सेस मिळतील.

दिनेश, आईची आठवण तर येतेच आहे. आणि घरुन आणले नाही. त्यात आपला हापुस इकडे बॅनला यावर्षी. अरे ते रेडी मिक्स आणले रे. पण आई दरवेळी घरी करते तसे लागत नाहीत म्हणुन म्हटल आपण करुन बघाव तर सगळा सत्यानाश! Angry आया ग्रेट असतात हेच खरं!

वत्सला, .....जास्त वेळ नव्हतो टीव्ही समोर , मोजुन पाच मिनिटे. तेवढ्यात किचन मधे सगळा काळा धुर पसरला आनि आंबुस वास. Sad माझी घरमाल़कीण बिचारी घाबरुन खाली आली. Proud मला वाटत पण गुळ चुकीचा होत. मी पंजाबी गुळ (दिसायला काळा) वापरला होता. आज कोल्हापुरी अस्सल मिळाला आहे ,तो वापरुन परत करुन बघतो!

kulu, हरभरा डाळीने डोसे बिघडत नाहीत. आम्ही वापरतो डोश्याच्या पीठात ह.डा. किंवा चटणीची डाळ . छान चव येते.

गॅस अगदी मंद हवा रे. इलेक्ट्रीकल वापरत असशील तर असे होते.
तिथली सफरचंदे पण वापरू शकतोस यासाठी.

दिनेश , अरे हो इलेक्ट्रीकल च आहे इकडे Sad पण साखरांबा केला होता त्यवरच मस्त झाला होता अरे. इकडे ऑफिस मधे तर सगळ्यानी बरणी चाटुन पुसुन साफ केली, म्हणुन मला वाटल कि गुळ घलुन पण चांगला होइल!

कुलू, आमच्या इथे खात्रीचा गुळ मिळत नाही म्हणून गुळा ऐवजी मी ब्राउन शुगर वापरते. हिरव्या सफरचंदाचे झटपट गोड-तिखट असे लोणचेही मस्त होते. अजून एक, झटपट पन्हे करायचे असेल तर विकतचे अ‍ॅपल सॉस वापरायचे, अतिरिक्त साखर नसलेले.

सफरचंदाची साले आणि बिया काढून पाण्यात शिजत ठेव. शिजले कि त्यात चवीप्रमाणे साखर वा गूळ घाल. साखर विरघळली कि ते मिश्रण पन्ह्यासाठी वापरू शकतोस. जास्त आटवलेस तर त्याचा मुरंबा / जॅम होतो. त्यालाच अ‍ॅपल बटर पण म्हणतात.
असे बटर, मारी सारख्या अगोड बिस्किटांच्या चुरा यांचे थरावर थर लावायचे ( एका ग्लासमधे ) आणि वर क्रीम टाकायचे. मस्त डेझर्ट होते.

डोसे करताना एक छानशी युक्ती तुम्हाला सांगावीशी वाटते ...एक कांदा कापून त्याचे दोन भाग करायचे आणि गरम तव्यावर हा कांदा फिरवायचा ...चर चर असा आवाज होतो नि तव्याचे तापमान स्थिर नि दोष्यांसाठी योग्य होते ...नंतर अगदी तळ हाता एवढा डोसा टाकायचा तव्यावर ...डोसे तव्यावर टाकल्यावर gas थोडा कमी करायचा मग कडा पाह्याच्या तव्या पासून कडा वर उचल लेल्या दिसल्या कि २ मिनिटांनी डोसा पलटी करायचा ...मी non stick तव्याची मदत न घेता कसल्या हि आणि कुठल्या हि तव्यावर बिनधास्त अगदी कमी तेलात डोसे करते ...हि युक्ती वापरून तुम्ही पण करू शकता ...try it !!!

>>सफरचंदाची साले आणि बिया काढून पाण्यात शिजत ठेव. शिजले कि त्यात चवीप्रमाणे साखर वा गूळ घाल. साखर विरघळली कि ते मिश्रण पन्ह्यासाठी वापरू शकतोस. जास्त आटवलेस तर त्याचा मुरंबा / जॅम होतो. त्यालाच अ‍ॅपल बटर पण म्हणतात.

गेल्यावर्षी नुस्तंच इंटरेनेटवर शोधून नाही तर नियमीत अ‍ॅपलबटर घरी तयार करणार्‍यांना विचारून केल्यामुळे माहिती झालं. अ‍ॅपलबटर करताना सालं (आणि काही लोक बियादेखिल) काढत नाहीत. अख्खी अ‍ॅपल्स/ सालासगट तुकडे अ‍ॅपलसायडरमधे शिजवतात. मऊ झालेले अ‍ॅपल्स वाटून, गाळून, मग त्या प्युरिमधे साखर आणि इतर मसाले घालून आटवतात. पाककृतीत थोडाफार फरक असू शकतो.

मी काल अंडा करी केली होती ़ अजिबातच छान झाली नाहि Sad मी M D H चा गरम मसाला वापरला पण त्याची काहीच चव आली नाही . कुठला मसाला वापरू ? प्लीज सांगेल का कोणी टिप्स

परंपरा ऐवजी दुसरा कुठला चांगला मसाला आहे का चिकन करी साठी? मी MDH चा meat curry masala वापरून पाहीला. पण अगदीच काहीतरी निघाला. इथे ऊसगावात मिळेल असा आहे का कुठला. आमच्या इथे दुकानात एव्हरेस्ट, MDH, शान चे मसाले मिळतात.

अंडा करीला गरम तेलावर ५-६ लवंगा, ८-१० मिरे घालून त्यात कांदे ,लाल मिरच्या , आलं लसूण आणि खोबरं ब्राउन होईपर्यन्त परतून घ्यायचं, हे सर्व मिक्सर मधे फिरवून थोड्या तेलावर हे मिश्रण ओतून परतायचं, मीठ, हळद, तिखट, थोडा गरम मसाला (गरज पडल्यास ) घालून ५ मिनिटे तरी उकळी आणायची. शेवटी उकडलेली अंडी तुकडे करून त्यात सोडायची. हे ग्रेवी बेस्ट सूट होते अंडा करीला.
नाही तर तो मराठा दरबार चा अंडा करी मसाला वापरून पण छान होते.

Maîtreyee म्हणजे बाक़ी कुठला मसाला वापरायची गरज नाहि का ? फिककी लागणार नाहि का ? कांदा खोबर्याचे प्रमाण काय हवें ?

वरून थोडा गरम मसाला घालायचा, चव बघून. प्रमाण (साधारण ) कांदा साधारण १ मोठा घेतला तर मूठ भर खोबरे (कोरडे), ते नीट परतणे महत्त्वाचं. आणि १ किंवा २ लाल सुक्या मिरच्या.

मी इथे उसगावात स्वाद ब्रन्ड च्या चना आणि मुन्ग डाळी आणल्या तर त्याला तुरट अशी चव आहे .. इतक्यात आनलेल्या डाळी मध्ये जरा जास्तच तुरट चव आहे दुसरे कुट्।ले बरे ब्रन्ड आहे का.. कुणाला असा अनुभव आहे का?

मी इथे उसगावात स्वाद ब्रन्ड च्या चना आणि मुन्ग डाळी आणल्या तर त्याला तुरट अशी चव आहे .. इतक्यात आनलेल्या डाळी मध्ये जरा जास्तच तुरट चव आहे दुसरे कुट्।ले बरे ब्रन्ड आहे का.. कुणाला असा अनुभव आहे का?>>>
शक्य असेल तेवढे 'स्वाद' वापरन बंद करा..मला आगदिच दोन नंबरी माल वाटतो...गुणवत्ता हि चांगलि नाहि.

दीप्,लक्ष्मि हे मला बरे वाटतात

अमेझोन.कॉम वर हि बघा...तिथे हि हिंग पासून ते सगळे मिळते

चुकलं काय ते कळलंय. आता गाढवपणा निस्तराय्चा आहे. भरमसाठ पालक धुवून चिरुन ठेवला गेला आहे. आता काय करु त्याचं? ब्लांच करुन २-३ (हवाबंद) डब्यांत भरुन डीप फ्रीज मध्ये टाकून देऊ का? किती दिवस टिकेल? म्हणजे एकदा पालक पनीर, एकदा पालक परोठे करता येतील.. अजुन काय करु शकते?

ब्लांच करुन २-३ (हवाबंद) डब्यांत भरुन डीप फ्रीज मध्ये टाकून देऊ का?>> हो पण डीप फ्रिज नको, फ्रिजमधे ठेवा.

दही पालक, पालक पुलाव, हराभरा कबाब असं करता येईल. पण पालक चोरटा असतो, त्यामुळे भरमसाठ पालकसुद्धा दोन पदार्थातच संपायला हवा खरंतर Happy

Pages