माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताकातल्या पालकाला ताक जर कवकवीत दह्याचे केले असेल तर चव येणे अवघड आहे. दही / ताकाच्या चवीवरही ताकातल्या पालकाची चव अवलंबून असते. परवाच मी ही भाजी केली होती. घरातल्या मेंबरांच्या मागणीवरून शेंगदाणे, हरभरा डाळ वगळून केली होती. तसेच ताकाला एरवी बेसन लावते पण घरातल्या पथ्यकरींमुळे मुगाचे पीठ लावले होते. चवीत अजिबात फरक जाणवला नाही.

योकू, ताक चांगलच होतं, फोडणी दिल्यानंतरही शिजवायला हवे होते का? >> हो. नाहीतर बेसन कच्चे रहाते

ताकातला पालक आणि शेपु फार यम्मी लागतो.

कृती
पालेभाजी धूवून, बारीक चिरुन घ्यावी. थोड्याश्या तेलावर परतावी. घालणार असाल तर शिजवलेल्या डाळीचे घोटलेले वरण टाकावे. मग त्यात ताक+ बेसन यांचे गुठळ्याविरहीत मिश्रण टाकावे. एक उकळी येऊ द्यावी. वरुन हिंग+ मोहरी+ लाल मिरच्या+ लसणाची चरचरीत फोडणी द्यावी आणि एका उकळीनंतर गॅस बंद करावा. गरम गरम ओरपावी.

मी http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/89572.html?1125412669 ही केली होती, ताक आणि बेसन वेगवेगळे घातले, गुठळ्या राहिल्या होत्या पण त्यानंतर उकळले होते की Sad
आता रैनाच्या पद्धतीने करून पहावे लागेल. थँक्स रैना.

ताक आणि बेसन वेगवेगळे घातले, गुठळ्या राहिल्या होत्या पण त्यानंतर उकळले होते की - कदाचित ताक नुसतेच उकळले गेले असेल त्यामुळं चोथा पाणी वेगळे झाले असेल . बेसनाच्या गुठळ्या पण निट शिजल्या नसतील

बेचव म्हणजे काय नक्की झालं होतं ते विचारायचं होतं. ताकाचाही दोष असू शकतो. किंवा मृणाल १ म्हणताहेत तसंही झालं असू शकेल. ताक फाटलं असेल.
रैना + १.
फक्त आम्ही वरण नाही घालत. पालक/ चाकवत बारीक चिरून कूकरमधे भाताबरोबर शिजवून घेतलास तरी चालेल. शिजवलेली पालेभाजी चांगली घोटायची. बेसन घालून परत नीट घोटायची. बेसनाच्या गुठळ्या मोडल्या गेल्या की दही/ ताक घालून घोटायची. मग पाणी घालून उकळायला ठेवायची. ताक घातलं तरी बेसन शिजण्यासाठी पाणी घालावं लागतंच. शिजवलेले डाळदाणे, मीठ साखर घालून रैनाने लिहिली आहे तशी फोडणी घालायची.

मृणाल, बेसन हे ताक फुटू नये म्हणूनच मुख्यत्वाने त्यात मिसळून घालतात. ----- ते तिने न मिसळताच टाकले ना म्हणून फुटले असेल अस वाटतय

शिजवलेला पालक, डाळीच पीठ घोटून लसणाच्या फोडणीत घालून शिजत आल्यावर वरून ताक (किंवा दही घोटून) घातले तर जास्त चांगली चव येते असा माझा अनुभव आहे.

शिजवलेला पालक, डाळीच पीठ घोटून लसणाच्या फोडणीत घालून शिजत आल्यावर वरून ताक (किंवा दही घोटून) घातलेच नाही तर भाजी फारच ऑस्सम होते Happy ताक हवं तर वेगळं प्यावं.

मी पालक तूरडाळ दाणे शिजवून घेते कुकर मध्ये. बेसन घालतच नाही. ताक पन नाही. घोटून घेउन चिंचेचा कोळ घालते. वरून आपली लसनाची फोडणी. मिळून येइस्तो उकळते. मुद्दा भाजी. ताकाची चाकवताची भाजी खाल्ली आहे. पर्वाच केलेली लगेच इथे वाचून गंमत वाटली.

आम्हीपण मंजुडीने सांगितले तसेच करतो. त्यात अजुन एक भर म्हणजे ही भाजी मंद गॅसच्या आचेवर करायची, जोरात नाही, नाहीतर ताक फाटते. मी तर फारच कमी आच ठेवते, मध्यम व एकदम कमी च्या मधे.. त्याने हळुहळु पण व्यवस्थित शिजते बेसन. मग आहेच वरुन लसणाची फोडणी. शेवटी भाजीवर बेसनाचे ते अगदी बारके बारके पांढरे ठिपके तयार झाले की भाजी जमलीये असे समजावेच. Happy

शेपुचीपण करतात माहित नव्हते. रैना, छान केलेस सांगितलेस. साठवुन ठेवते, सध्या शेपु मिळत नाहीये.

चीज पराठा कसा करायचा? मी ट्राय केला तर आतलं चीज वितळून बाहेर आलं आणि पराठा तव्याला चिकटून बसला. पराठे जास्त जाड असतील तर लेक खात नाही.

चैत्रगंधा, चीज थोडेफार वितळणारच. ( कुठले चीज वापरताय त्यावरही ते ठरेल . ) चीजसोबत काही कोरडे पदार्थ, ( भाजलेली कणीक, पोटॅटो फ्लेक्स वगैरे ) वापरता येतील. नाहीतर केवळ परतलेल्या कांद्याचे सारण घालून पराठा पूर्ण भाजून झाल्यावर ( तव्यावर असतानाच ) वर चीज किसून टाकायचे आणि त्याची अर्धी घडी घालायची. दोन्हीकडून काही सेकंदच गरम करायचा.

मी गाजर कीसुन् प्रोसेस्ड चीज्मधे घा लते. लेकीला तीख ट आवड त नाही. हे सारण घालुन केलेला पराठा आवडीने खाते.

माझे कटलेट अगदी नाजुक fragile होतात. मी shallow fry करते का असे व्हावे बरे फक्त बटाट्याचे केले तरी bread crumbs नाही घालत म्हणुन का

बाईंडिंगसाठी काय घालता? मी आतापर्यंत कटलेट्स करताना रवा / ब्रेडक्रंब्ज / खसखशीत ती घोळवून घेतली आहेत. शॅलो फ्राय केल्यावर तुटली नाहीत. कटलेट्सचा आकार लहानच ठेवते.

ब्रेड्क्रंब्स घालून करून पाहा एकदा. त्यानी बाईडिंग मिळतं. अंड खात असाल तर तेही फोडून घातलं तर चालेल; किंवा कटलेट फेटलेल्या अंड्यात घोळवून, क्रंब्समध्ये/ रव्यामध्ये घोळवून मग शॅलो/डीप फ्राय करून पाहा.

या विकेंड ला एक पुलाव केला. ही रिक्षा
मला भात पांढराशुभ्र राहाणं अपेक्षित होतं. सगळं घातलं होतं तांदळात शुभ्र होण्याकरता, लिंबूरस, साजूक तुपाचे २ थेंब इ. इ.
तयार भात होताही शुभ्रच पण पुलाव मात्र ऑफव्हाईट झाला असं का?
माकाचु??

अख्खा मसाला घातला की भाताला असा रंग येतोच त्यामुळे माझ्या मते तरी काहीच चुकले नाहिये. जाणकार प्रकाश टाकतीलच.

८/१० काळीमिरी
- २ तमालपत्रं (तेजपान)
- २ लहान दालचिनीचे तुकडे
- चमचाभर जिरं.......>>>>. हे सारे घातले की असा रंग येणारच.मुग्धा केदार म्हणाल्या ते बरोबर आहे.पुढल्यावेळी भात वेगळा शिजवून घ्या.पण टेस्ट बदलेल.

योकुनी भात वेगळाच शिजवुन घेतल होता ना? नंतर तो मिक्स केला, यात एक करता येईल जसं लेयर लावुन बिर्यानी करतो ना तस करायचं तर भात पांढराशुभ्र दिसेल.

काल कणकेच्या चकल्यांसाठी कणिक सर्व ईतर साहित्य घालून (कोरडे) घट्ट फडक्यात बांधून डब्यात ठेवून कूकरमधे बिना शिटीची वाफवली, नंतर गोळा मळून ठेवला, ईतर कामात गुंतून गेले, दिड का २ तासांनी चकल्या करण्यास घेतल्या, त्या चामट झाल्या. मध्यम आंचेवर तळत होते Sad
मा.का.चु??

खूप वेळ गोळा ठेवला हि चूक झाली का अजुन काही? त्या उरलेल्या पीठाचे थालीपीठ केले...

माझ्या चकल्या हसल्या सगळ्या...

गरम पाणी, तंड पानी,उअकड अस वेगवेगल्या प्र्कारे पीठ भिजवुन पाहिल...:-(

मोहन जास्त झाले की चकल्या हसतेत. Happy
चकल्या बिघडण्याची ६२ कारणे असे मला व्हॉ.अ. वर बहिणीचे फरवर्द आलेय. Happy
( मी नुकतीच - म्हणजे दस-याला स्मा.फो.धारक झालीये. Happy

बेसन लाडू केलेत. बेसन साखर मिक्स केल्यावर परत भाजता येइल का?
कैतरी गंडलय ह्यावेळी. रंग पुरेसा यल्लो ऑकर नाही ( लेकाची कमेंट ) कच्च आहे बहुतेक ( नवर्‍याची कमेंट) .

Pages