चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूल देशपांडे - भाई सिनेमा दोन भागात येणार आहे , जाने आणि फेब्रु मध्ये

ट्रेलरमध्ये कानडा राजा गाणे पूर्ण दाखवताहेत , त्यात पुल पेटीवर आहेत , गाणार्या व्यक्ती कोण , हे समजले नाही , रामू दाते आहेत का ?

ते भीमसेन व कुमार गन्धर्व व वसंत देशपांडे आहेत.
भाईंसमवेत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांच्या मैफलीत सुरू झालेला विठ्ठलाचा गजर तितकाच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे.
https://www.loksatta.com/manoranjan-news/mahesh-manjrekar-flim-bhaai-vya...

कानडा राजा पंढरीचा गाणं एकदम जबरी झालंय. नाच रे मोरा पण असेल कदाचित पिक्चर मध्ये, आणि गुळाचा गणपतीचा पण उल्लेख असेल.

ट्रेलरमध्ये कानडा राजा गाणे पूर्ण दाखवताहेत , त्यात पुल पेटीवर आहेत , गाणार्या व्यक्ती कोण , हे समजले नाही , रामू दाते आहेत का ?>>>
स्वानंद किरकिरे= कुमार गंधर्व
अजय पूरकर= भीमसेन जोशी
आणि तिसरी व्यक्ती म्हणजे वसंतराव देशपांडे. कलाकार कोण आहे माहीत नाही.
स्वानंद किरकीरेंनी देहबोली जबरदस्त पकडली आहे.
आवाजही समर्पक दिले आहेत. भीमसेन जोशी = जयतीर्थ मेवुंडी, वसंतराव = राहुल देशपांडे, कुमार गंधर्व= भुवनेश कोमकली
वीणा जामकर कोणाची भूमिका करतेय?

तिसरी व्यक्ती म्हणजे वसंतराव देशपांडे. कलाकार कोण आहे माहीत नाही.>>>> पदनाभ बिंड

वीणा जामकर कोणाची भूमिका करतेय?>>> हिराबाई बडोदेकर

कानडा राजा पंढरीचा गाण्याने त्या दिवशी सूर नवा ध्यास नवा मध्ये काय जबरदस्त माहौल बनबलेला. मी एका जागीच थिजल्यासारखे उभे राहून पुर्ण ऐकले. उत्सुकता आहे या चित्रपटाचे. घरचे जाणार आहेत रविवारी ...

सुपर ३०

https://m.youtube.com/watch?v=i1CqYGGMlpE

--

गरीब विद्यार्थ्यांना IIT-JEE साठी मोफत मार्गदर्शन करणाऱ्या एका सरांची आत्मकथा.

मध्यंतरी ते सर Fraud आहेत, पेपर लीक करतात वगैरे असं काहीतरी वाचण्यात आलं .

ट्रेलर अतिशय संथ आणि बकवास वाटला

हायला, खरंच की.
तरीच म्हटलं हृतिक चा पिच्चर अन इतका फालतू ट्रेलर?

सिम्बा पाहताना 'मणिकर्णिका' चा ट्रेलर पाहिला. एकदा पहावा असा वाटतोय ट्रेलरवरुन.
हत्तीच्या सोंडेवरुन पळत चढून वर पाठीवर येणे वगैरे साउथ इंडियन स्टाइल अ‍ॅक्शन असली आणि कंगनाची सदोष संवादफेक जाणवत असली तरी झाशीच्या राणी वर सिनेमा बेतलेला असल्याने आवर्जुन पाहणार !

Gully boy , रणवीर rocks .
इतर वेळी उथळ वाटत असला तरी जबरदस्त आहे तो माणूस!!

सस्मित Lol

रणवीर आवडतो मला Happy जबरदस्त आहेच.....
कधी कधी प्रश्न पडतो हा लहानपणी किती वांड असेल, सतत पळत असेल, आईवडीलांनी कसा सांभाळला असेल काय माहीत? Lol

चीट इन्डिया: ईमरान हाश्मीचा कम्पलीट मेकओवर झालाय.

https://www.youtube.com/watch?v=2B6vjua8aK4&t=50s

लव यू जिन्दगी: महागृचा चित्रपट:

https://www.youtube.com/watch?v=WC9q9IllkEo

धप्पा:

https://www.youtube.com/watch?v=DAvz3B2KsoI

अशी हि आशि़की: अभिनय बेर्डे चा दुसरा चित्रपट:

https://www.youtube.com/watch?v=SsyLcnQMC_c

ऊरी:

https://www.youtube.com/watch?v=VVY3do673Zc

कधी कधी प्रश्न पडतो हा लहानपणी किती वांड असेल, सतत पळत असेल, आईवडीलांनी कसा सांभाळला असेल काय माहीत? >> अगदी ! मलाही हाच प्रश्न पडतो, कपिल शर्मा शो ला केवढा तेव्हा किती ती एनर्जी.अजुनतरी डाउन टु अर्थ वाटतो, सुपरस्टार असल्याचा माज नसतो.

शीनचँन
रोहित शेट्टी ने किस्सा सांगितलेला , रसिं स्वतः च्या लग्नात अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर आले आहेत म्हणून excited होता.
लव यू जिन्दगी: महागृचा चित्रपट: >>>>> आणि
अशी हि आशि़की: अभिनय बेर्डे चा दुसरा चित्रपट: >>>> तद्दन बकवास.

Pages