चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिहू बघवत नाही. लहान मूल कशाकशाने दगाऊ शकते त्या सगळ्या शक्यता घेतल्या आहेत. आई उठत नाही तर मुलीने शेजार्यांना सांगावे, कोणालातरी फोन करायचा प्रयत्न करावा( यावेळी ९११ ची आठवण आली पण आपल्याकडे तशी सोय वा समज नाही), कमीतकमी खिडकीत जाऊन बोंबलत बसावे पण नाही ही मूलगी आत्महत्या करायला निघाल्यासारखी सगळ्या जीवघेण्या गोष्टी करते Sad
घरात लहान मूलाच्या सुरक्शिततेचा काहीच विचार केलेला दिसत नाही. केवळ सुदैवाने ती कशाकशातून वाचते ते बघण्यापेक्शा child proofing चे फायदे तरी दाखवायला हवे होते (त्याची जाहिरातही झाली असती). पण ते दाखविण्याचा उद्देश नसावा. खरया घटनेवर सिनेमा आहे असे वाचले Sad त्यामुळे अजीबात बघवणार नाही.

>>>बोंबलत बसावे पण नाही ही मूलगी आत्महत्या करायला निघाल्यासारखी सगळ्या जीवघेण्या गोष्टी करते Sad<<<
२वर्षाचे बाळ आहे ते.

घाणेकर ट्रेलर आवडला.
लोकमान्य टिळक, बालगंधर्व आणि काशिनाथ घाणेकर दिसायला सारखेच होते हे कळाले. सुबोध भावे पण तसेच दिसतात.

२.० कडून असलेल्या अपेक्षा फार कमी होत चालल्या आहेत. ट्रेलर फार खास वाटला नाही.

ट्रेलर पाहील्यावर थग्ज कडून माती खाण्याची अपेक्षा होती, रीव्ह्यूजवरून अपेक्षेला जागतोय असे दिसतेय. लोक जितक्या शिव्या देतायत ते पाहून तरी थेटरात पहाणे कॅन्सल.

घाणेकर मधे बरेच चांगले अभिनेते असल्याने चांगला असावा असे वाटतेय. कुणी पाहीला का?

माऊलीचा ट्रेलर आलाय, लय भारीची नवी सिंघम स्टाईल आवृत्ती वाटतोय.

घाणेकर ट्रेलर आवडला.
लोकमान्य टिळक, बालगंधर्व आणि काशिनाथ घाणेकर दिसायला सारखेच होते हे कळाले. सुबोध भावे पण तसेच दिसतात.
नवीन Submitted by मेरीच गिनो on 9 November, 2018 - 01:17
>>>>
अहो आता पुढील बायोपिक येतेय. सुबोध भावेवर. ते साकारणार आहे
......
......
......
आणि
सुबोध भावे

सिम्बा. बरेच मराठी कलाकार आहेत यात. वैदेही तर 'काशिनाथ घाणेकर' च्या सेटवरुन इथे आल्यासारखी वाटतेय. Lol

https://www.youtube.com/watch?v=PtFY3WHztZc&t=25s

भाई: व्यक्ति की वल्ली:

https://www.youtube.com/watch?v=FbcKVZ1IPDw

अ‍ॅवेन्जर्स एन्डगेम अर्थात अ‍ॅवेन्जर्स पार्ट ४:

https://www.youtube.com/watch?v=VtRDE5GnU2Y

व्यक्ती की वल्ली वाचले नाही त्यामुळे आवडेल बघायला. >>>>> च्रप्स, व्यक्ती की वल्ली हा पुलचा बायोपिक आहे. तो 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकावर नाही.

पुलचा बायोपिक >> पुलंचे व्यक्तीगत आयुष्य ईंटरेस्टींग हॅपनिंग हटके असे होते का? बायोपिकला तेव्हाच मजा आहे. उदाहरणार्थ धोनीवर धमाल पिक्चर बनला. तेच सचिनवर मात्र डॉक्युमेण्टरी टाईप्स बनले. खेळाडू दोन्ही मोठे आहेत यात शंका नाही.

Jr. NTR च्या temper वरून सिंम्बा बनवला आहे. पैसे घालवून simmba बघण्यापेक्षा temper बघा. चांगला आहे..

https://youtu.be/ygfTbGmKRd0
हॉटेल मुंबई

हा चित्रपट बघायचा आहे पण आणि नाही पण अशा संमिश्र भावना जागृत झाल्या.

पैसे घालवून simmba बघण्यापेक्षा temper बघा. चांगला आहे..>>>>>> सिंबा मधे रणवीर आहे. Temper मध्ये रणवीर नाही.

सिम्बाचा पहिला भाग मजेशीर वाटतोय.
हॉटेल मुंबई नाही बघवणार, ज्यात फक्त विध्वंसच आहे हे माहीत असल्यामुळे.

सिम्बा नक्कीच पाहणार आहे.अजय देवगण ची एंट्री धमाल असणार आहे.नोट : जरी रणवीर असला सिम्बा मधे, तरी अजय शिवाय ही सीरीज पुर्ण नाही.
तसा सिनेमा ट्रेलर वरुनच कळतो आहे.तरी थिएटर मधे सारा -रणवीर साठी पाहणार आहे.

Pages