चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठग" वरुन आमिर "महागुरु"च्या वाटेवर जात आहे असच दिसतय, सतत माझीच लाल नि मोठी Uhoh
कंटाळा आलाय तेच ते कलाकार बघुन, आमिर ने आता बास करावं
<
महागुरु नाही, त्यांच्यापेक्षा नार्सिस्टिक अश्या सेल्फ ऑब्सेस्ड कमल हसनला फॉलो करतोय बहुदा आमिर.
सतत काहीतरी नवे गेटप करयाचा अट्टाहस. Uhoh

मनिकर्णिका टोटल बकवास ट्रेलर.
कंगना आजिबात न आवडणं एक कारण.
पण ती आजिबातच भुमिकेत नसते. इथे तर मॉर्ड्न वाटतेय.
फक्त त्या तनु वेडी मनु २ मधेच शोभली होती. तो रोल तिला सुट होता.

ठ ऑ हिं फसलेले व्हीएफेक्स. फ्लॉप होणार.
आमीर कधीच आवडला नाही मला. असेल पर्फेक्शनिस्ट वैगेरे.
मला तो जे काही करतो ते बळंच वाटतं. दिखाउपण शोऑफ वैगेरे टाईप.

शिवाजी पार्क काय आहे कळ्त नाहीये.

Thugs तुफान आवडला ट्रेलर, फर्स्ट दे फर्स्ट शो बघ बघणार.
बच्चन आमिर जुगलबंदी मजा येईल.

शिवाजी पार्क रिवेंज द्रामा वाटत आहे.

फक्त त्या तनु वेडी मनु २ मधेच शोभली होती. तो रोल तिला सुट होता>>>
सिमरन मध्ये पण रोल सुट आहे.
अजून कुठलातरी अर्धवट बघितलेला चित्रपट आहे तिचा, त्यातही चांगली वाटली.

फक्त त्या तनु वेडी मनु २ मधेच शोभली होती. तो रोल तिला सुट होता>>> मानव, हे मी वेगळ्या अर्थाने लिहिलंय. Happy
तवेम २ मधे ती थोडी सायको भयताड वैगेरे वाटतेय मला.

ओके Proud
सिमरनमध्येही विक्षिप्त मुलीचा रोल आहे.

कंगनाचे फॅशन, तनु वेड्स मनु, लाइफ इन मेट्रो, क्वीन सगळे रोल्स खूप आवडले पण मणिकर्णिकाचं ट्रेलर अजिबातच नाही Uhoh

कंगना अजिबात शोभत नाहिये. ना तिला तसा रॉयल लूक आहे ना पॉईज. लक्ष्मीबाई जशी कहाणी मधुन एकलीय आणि जी काही चित्रं व वर्णनं वाचलीत , तशी वाटत नाहीये. आता, ती चित्रं कितपत खरी होती कांदबरीतली , ती लेखकालाच माहित.

मुक्ताला नका ओ असं म्हणु च्रप्स!

मुंबई पुणे मुंबई 3 official teaser release >> आलाय वॉट्सप वर.. बघते आता

कंगना बद्दल पोस्ट साठी दिपांजली +१

ठग्जचा ट्रेलर बघण्याची घोडचूक केली,
मणिकर्णिकाच्या बाबतीत ते देखील करणार नाही. त्याचं पेपरातलं फुल-पेज पोस्टर पाहूनच `कुछ जम्या नहीं' असं वाटलं होतं Uhoh

बाजारमधला रिझवा़न अहमद म्हणजे रोहन मेहरा , विनोद मेहराचा मुलगा. रोहन मेहरासाठी सिनेमा बघितला पाहिजे. सैफचा लूक चांगला आहे पण त्याचे गुज्जू डायलॉग्ज ऐकण्यात मजा आली नाही. समहाऊ डायलॉग्ज अगदीच फालतू वाटले.

’मी शिवाजी पार्क’चा ट्रेलर आवडला. मूव्ही इंटरेस्टिंग असायला हवा तर मजा येईल. इतकी तगडी कास्ट घेऊन शेवटी फुसका नको निघायला.

ते मुळशी पॅटर्न चं आरारारा गाणं ज्यात म्हणे खरे गुंड आहेत ते ऐकायला किती भयाण आहे.हिट कसं झालं माहीत नाही.गाणं नसून गद्य आहे.
मला असा पिक्चर आणि असं गाणं आहे हे परवाच पेपर मध्ये वाचल्यावर कळलं.

अत्यंत रटाळ गाणे आहे, स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे.
यात दिसणाऱ्या 2 कलाकारांवर पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत(कदाचित या पिक्चर ला लागणारा पैसा तिथून आला असावा)
https://youtu.be/F4_La1CbFv0

पण याला गाणं का म्हणायचं?एका पुढे एक शब्द ठेवलेत.नुसत्या शांततेवर त्या गॉगल वाल्या आणि आजूबाजूच्या गर्दीला गँगनम स्टाईल आणि इतर भयंकर स्टेपस करता येणार नाहीत ना.

Pages