आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाशकात काही ठिकाणी १ लाख रुपये तोळा दराने सध्या म्हणजे काल सोनं घेतलेले लोक मला माहितियेत. जेव्हा मार्केट स्थिरावेल तेव्हा ३०-३५००० वगैरे जो असेल त्या दराने ते परतावा घेणार. म्हणजे लाखाचे निदान ३०-३५००० तरी व्हाईट येतील असा हिशोब. अगदीच नसण्यापेक्षा चोराची लंगोटी म्हणतात त्यातली गत. हे सगळे महाभाग आजी/माजी आमदारांचे सुपुत्र, उच्चशिक्षित असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करून शिवाय पिढीजाद मालमत्ता बाळगून असलेले असे आहेत. ब्यागाच्या ब्ग्यागा आहेत घरात नोटांच्या. कुठे जाऊन सोनं घेतले ते सराफ कोण ते मात्र समजलं नाही.

चिनूक्स, what is your take on the news? Just a smiley and a sarcastic remark doesn't really say what exactly you think or understand about the news.
मुद्दे, शंका बरोबर आहेत काही पण म्हणून लगेच हास्यास्पद निर्णय आहे हा असं काही ताबडतोब प्रुव होत नाही. मला वाटतं ५०,००० ची लिमिट ठेवली असती २.५ लाखा एवेजी तर जास्त सामन्य लोकं भरडले गेले असते कारण कुठल्या न कुठल्या योग्य कारणाने बर्याच मोठ्या पॉप्युलेशन कडे ५०,००० पेक्षा जास्त कॅश असू शकते घरात आणि त्या लोकांना ला उगाच खुपच खेपा घालत बसाव्या लागल्या असत्या. ह्या स्कीमचे टार्गेट मोठे मासे आहेत, ज्यांच्याकडे खुप कॅश पडून आहे. ही लोकं जमेल तेवढी खटपट करुन, नातेवाईक मित्र वगैरेंना हाताशी धरुन एक्सचेंज करुन घेत आहेत पण परत ते सोपं नाहीये. एखाद्या माण्साकडे जर ५० लाख पडून असतील तर त्यांना २० जणं शोधून हे काम करुन घ्यावं लागेल. थोडेफार व्हाईट करुन होतील पण बरेच होणार पण नाहीत. आता कळेलच पुढे.
2.5 लाखाच्या वर डिपॉझिट केल्यावर नेमकं ते टॅक्सेबल इन्कम कसं काढतील आणि त्याही पेक्षा ज्यांचं टॅक्सेबल इन्कम मॅच होणार नाही रकमेशी त्यांना कसं हँडल केलं जाईल ते ही कळेलच पण मला तरी वाटतं की लोक ही हिंमतच करणार नाहीत.

फायनली जे काही बातमीत लिहिलय त्यानी लगेच हजारच्या नवीन नोटाच लोकांच्या हाती लागल्यागत मोठ्ठी पळ्वाट निघाली हा नवीन शोध हाती लागल्या सारखं का लिहिलय ते वाक्य? Wasn't that the deal from day 1? The government had to come up with a respectable limit which will be big enough for a majority of the population to get their monies exchanged but not so big to let all the targeted bigger fish use the same window to get their cash out. There will be some leakage, by that I mean, some bigger fish will siphon some of their cash through this window but it's going to be a very hard process given the amounts of cash people hoard. The recovery of 62.5 thousand Crores of cash just via voluntary disclosure should give you an idea of how much cash are people capable of stuffing in their pillow cases.

वेडं केलय लोकांना मोदिंनी.. खुप पैसे असलेले खरच वेड लागल्यासारखे करताहेत... जेवुन आमच्या ऑफिसमधल्या खाली गेल्या होत्या राऊंड मारुन यायला .. एक गाडी त्यांच्याकडे थांबली अन एक माणुस विचारतोय त्यांना बँकमध्ये पैसे आहेत ना चेंज करुन द्यायला? खुप पैश्याच्या बॅगज होत्या त्याच्याकडे.. एकजण म्हणाली.. बँकमध्ये जावुन विचारा ना रस्त्यावर आंम्ही काय सांगणार Happy

>>> वेडं केलय लोकांना मोदिंनी.. खुप पैसे असलेले खरच वेड लागल्यासारखे करताहेत... <<<
अगदी अगदी... भले भले वेडे झालेत... काही मुळातच "अर्धवट होते" आता पूर्ण वेडे झालेत.... !
मोदींचा निर्णय कसा चूक आहे हे सांगण्याच्या नादात ते वेडेपण जाहिररित्या सिद्धही करीत आहेत Biggrin
कालचा लोकसत्तेतील पहिल्यापानावरचा "संपादकीय" नमुना वाचून तर लोकसत्तेच्या संपादका बाबत हसावे की रडावे ते ही कळेना...

मी नेहेमी म्हणत असतो की आख्खी मिडिया(वृत्तपत्रांसहित) डाव्या लालबावट्यांनी भरलेली आहे, काही चूकार कॉन्गी देखिल आहेत ज्यांना आता "उजवे" म्हणायचे धाडस माझ्यात नाही. तर गेले दोन दिवस आख्खी मिडीया "सर्वसामान्य जनांचे" कसे कसे हाल होताहेत हे सांगण्यात/दाखविण्यात मश्गुल आहे, तर दुसर्‍याबाजुला वरील २.५ लाखाच्या मर्यादेवर वेड पांघरुन पेडगावला जात आचरट शंका विचारीत वाचकांच्या मनात स्लोपॉयजनिंग सारखे शकांचे काहुर माजविण्याच्याही प्रयत्नात आहेत. किती ती आदळ आपट?

अर्थात, मोदींनी दिलेला झटका चांगलाच "जिव्हारी" बसलेला आहे बर्‍याच जणांच्या हे नक्की !

लिंब्या , काळा पैसा हा एका पक्षाशी संबंधित नाही ... राज ठाक्रेही बोल्ले ... अआता निवडणुकीत आपट्याची पाने वाटायची काय ?

लोक उगाचच काँग्रेसची वाट लागलि असे बडबडत बसलेत

राज ठाक्रेही बोल्ले ... अआता निवडणुकीत आपट्याची पाने वाटायची काय ? >>>>>> राज ठाकरे बोलले आता भाजपा निवडणुकीत आपट्याची पाने वाटणार काय? कदाचित त्यांचा रोख उत्तर प्रदेश निवडणुकी संदर्भात असेल.

लोक इतका आरडाओरडा का करतायत? मोदींना काही कळत न्सल्यासारखं बोलतायत लोक. एका दिवसात निर्णय वगैरे.... असं एका दिवसात काही होत नसतं. आधे जनधन योजनेअंतर्गत लोकांना बँकेत खाती उघडायला लावली, मग काळ्या पैशावर दंड आकारला, मग "अजूनही वेळ आहे, दंड भरा. मग कठोर पावलं उचलली जातील" वगैरेही सांगून झालं. मगच हे अ‍ॅक्शन घेतलिये ना! आणि अगदी गरीब लोकांचे/ प्रवासी लोकांचे/ रुग्णांचे वगैरे हाल होतायत हे काही टक्के खरंही असलं तरी ते अगदी तात्पुरतं आहे. किंबहुना हॉस्पिटल्समधे वगैरेही सूट दिलेली आहेच ना.

जे लोक कार्ड वापरून व्यवहार करतात त्यांना अडचण फारशी नाही आणि कार्ड न वापरणारे कष्टकरी लोक आहेत त्यांच्यासाठी पोस्टात किंवा बँकेत खातं नसूनही ४००० पर्यंतची रक्कम बदली मिळणार आहे. त्याहून जास्त रकमेसाठी मात्र खातं असणं अनिवार्य आहे. आता जे कष्टकरी लोक आहेत त्यांचा ४००० पेक्षा खूप जास्त व्यवहार असलाच तर तो कितिशा प्रमाणात आसेल? आणि तसं असेल तर आजकाल निदाल स्थानिक बँकेत तरी खातं उघडणं फार अवघड नाहीच. शिवाय याच वर्गातल्या अनेकांनी जनधन योजनेत खातं उघडलं असेल तर तोही प्रश्न मिटतोच ना. ग्रमीण भागात राहणर्‍या, बँकेत खातं नसणार्‍या, कार्ड न वापरणर्‍या आणि प्रामाणीकपणे पैसा कमवणार्‍या लोकांची संख्या किती असेल? हेही गृहीत धरू की हे प्रमाण नगण्य नाही, मोठं आहे. पण मग जर कष्टाचा पैसा आहे तर त्याचा इनकम सोर्स लपवायची गरज नाही. त्यापेक्षा बँ़एत खातं उघडणं सोपंच ना!

२००० च्या नवीन नोटा छापण्यामागे काहीतरी विचार असू शकतो आणि त्याबद्दल सध्यातरी वेट अँड वॉच असंच करायला हवंय. मोठे मासे सुटतील एकवेळ पण मध्यम आकाराचे आणि छोटे मासे तरी गळाला लागतायत ना! आणि सीमेपलिकडून जो बनावट नोटांचा पुरवठा होतोय त्यावरही वचक बसेल. हा मोठा फायदा लक्षात घेत नाहीत लोक. एक मोठा दहशतवादी हल्ला झाला की "सरकार काय करतंय!" म्हणायचं नि इतर उपायांबरोबर (आंतरराष्ट्रिय पातळीवर पाक ला एकटं पाडण्याचं तंत्र, सिंधुपाणीकराराचा पुनर्विचार, बलुचिस्तानचा मुद्दा, सर्जिकल स्ट्राईक वगैरे) नोटा रद्द केल्या की नावं ठ्वायची हे बरंय! जे शॉर्‍ट टर्म तोटे होतायत, अ‍ॅटीएम बंद, नोटांचा तुटवडा, सोन्याचा भाव वधारणं वगैरे, त्यापेक्षा लाँग टर्म फायदे जास्त महत्त्वाचे असतील तर काय वाईट?

मोदीभक्त किंवा काँग्रेसभक्त असण्याचा काहीही संबंध जोडायची गरज नाही. आणि अशा निर्ण्यांचे परिणाम लगेच दिसत नाहीत.

बाकी अधिक काही लिहावं इतका अभ्यास आणि डोकं नाही त्यामुळे "कॉमन सेन्स" ने जे काय वाटलं ते आहे! Proud

ते चिप वगैरे वाचून मला हॅ पॉ मधला मॅरॅडर्स म्याप आठवला होता.

सटेलाइटातील इमेजवर नोटा मूव्ह होताना दिसणार म्हणे ...

पण सगळं खोटंच निघालं ते !

नाशकात काही ठिकाणी १ लाख रुपये तोळा दराने सध्या म्हणजे काल सोनं घेतलेले लोक मला माहितियेत. जेव्हा मार्केट स्थिरावेल तेव्हा ३०-३५००० वगैरे जो असेल त्या दराने ते परतावा घेणार. म्हणजे लाखाचे निदान ३०-३५००० तरी व्हाईट येतील असा हिशोब.>> मुळात तेच पैसे आधी जाहीर केले असते तर ४५% टॅक्स पडला असता.

मला तरी ही बातमी खोटी वाटत आहे. काल ३४ हजार सोने झाले असे कळल्यावर खरच चेक केले तर ३०५०० चालु होता भाव. ३५ ते ४० मधे सोने विकत घेत असतील तर, जवळचे सर्व दागीने विकुन तेव्हढ्या रकमेचे लोन फेडुन टकावे. Proud

रेलवे स्टेशन जवळ सकाळी ९-१०/११ पर्यंत बरेच मजूर रोजंदारीच्या शोधात उभे असतात आणि मग कुणी मुकादम येऊन कुठल्या कुठल्या कामावर घेऊन जातात. ह्या सगळ्या व्यवहाराची तशी काहीच माहित नाही. पण राहून राहून विचार येतोय, त्यांना कामावर घेणाऱ्या मुकादमांकडे रोजाचे पैसे द्यायला पुरेसे वैध चलन उपलब्ध असेल का? नसल्यास त्या मजुरांचे कसे होईल...

जळागावात ३८००० दर होता तोळ्यामागे. अता माझ्यापर्यंत बातमी येईस्तोवर १०-२०००० मागेपुढे झाले असतील, कदाचित लाखापेक्षा जरासा कमी असेल भाव तोळ्याचा (८०-९०००० वगैरे), पण बातमी खरी होती. कारण बेनामी व्यवहार करायचा तर सराफांनाही घसघशीत फायदा मिळेल असाच व्यवहार ते करणार. त्या नोटा कशा खपवायच्या याची त्यांची गणितं वेगळी आहेत.
आणि नाशकात देवस्थानं आहेत, पर्यायाने लाखांची उलाढाल एरवीही होत असते हा मुद्दा अर्थशास्त्रात पटकन लक्षात येत नसला तरी खूप मोठ्या व्यवहारांची पेठ आहे ती. असो चर्चा भरकटेल, तेव्हा जास्त लिहीत नाही.

प्रज्ञा९ >> कॉमन सेन्सवाल्या पोस्टशी सहमत.

बाकी कोणाचा काळा पैसा बाहेर आला की नाही माहित नाही पण आमच्या घरात मात्र साबांनी दडवुन ठेवलेले (आमचा व्हाईट पण नंतर काळा झालेला पैसा Proud ) रोख ५० हजार बाहेर आले Wink

रात्री ८:३० ला मध्यरात्रीपासून चलन अवैध होईल अशी घोषणा करण्याऐवजी लोकांना दोन दिवस पुरेश्या पैशांची सोय करायला वेळ दिला असता तर योजनेच्या परिणामकारकतेत काही फरक पडला असता का? सध्या जे २/४ हजारांचे exchange/withdrawal चे लिमिट आहे तसेच आधीही घालता आले असते...

Now it is unnecessarily panic creation...

त्याही पेक्षा,
ज्या दिवशी घोषणा झाली अगदी त्या संध्याकाळ पर्यंत ATMs 500 च्या नोटा देत होते.
एक दिवस आरही पासून atm मध्ये फक्त 100 च्या नोटा येत असत्या तर लोकांना थोडा कमी त्रास झाला असता.

यात लोकांना संशय येणाची हि गरज नव्हती, एखाद्या दिवशी atm मधून येतात फक्त 100 च्या नोटा. कोणी 10 atm फिरून क्रॉस चेक कारनार नव्हते.

. पूर्ण देश भरात 1-2 करोड 500/1000 च्या नोटा अशाच सरकार कडे आल्या असत्या. बँकांना पण जरा कमी ताण पडला असता

ज्या दिवशी घोषणा झाली अगदी त्या संध्याकाळ पर्यंत ATMs 500 च्या नोटा देत होते.
एक दिवस आरही पासून atm मध्ये फक्त 100 च्या नोटा येत असत्या तर लोकांना थोडा कमी त्रास झाला असता.>> हा चांगला उपाय होता. +१०१

फक्त इथे किंवा सगळीकडेच जी गरिबांवर अन्याय, सामान्या माणुस, शेतकरी हातावरचे पोट असलेला कामगारवर्ग भरडला गेला अशी बोंब मारलीच असती की. कारण त्यांच्याकडे ATM किंवा बँक खातेच नाहीये.

जर या निर्णयामुळे २५% काळा पैसा जरी बाहेर येत असेल तर ज्या लोकांकडे पुरेसे पैसे आहेत त्यांनी १ २ दिवस कळ काढायला काही हरकत नाही. असे आपले माझे मत.

आज सकाळ पासुन नविन नोटा मिळणे देखिल सुरु झाले आहे पण लोक उगाच गर्दी करत आहेत. असो. जुन्या नोटा बंद करताना आडचणीला उपयोगी पडतील अशा नविन नोटा लगेच (काही अटींचे पूर्तता) करुन मिळणे शक्य असते तर ती पण आडचण झाली नसती.

असो

सरकारला बँकेत ऑलरेडी असलेल्या नोटा कुठे जमा करायच्या होत्या?>> तसे नाही लोकांना आज १०० च्या नोटा नसल्याने ज्या अडचणींना तोंड द्यायला लागत असेल (मला तरी नाही लागल्या) त्या लागल्या नसत्या कदाचीत.

>>> (आमचा व्हाईट पण नंतर काळा झालेला पैसा फिदीफिदी ) रोख ५० हजार बाहेर आले डोळा मारा <<< Lol

>>> हा चांगला उपाय होता. +१०१ <<< चांगला काय कप्पाळ? असे काही करा असे देशभरातील काही हजार गाड्यांच्या एजन्सीजना काही लाख एटीएम्स करता करायला सांगणे म्हणजे बातमी "लीक" करणे झाले नसते का? कैच्च्याकैच..!
असले फटके आमनधपक्याच मारायचे असतात.....
तरी बातमी लिक झाली असे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहेच अजुनही......

>>>. मला तरी ही बातमी खोटी वाटत आहे. <<<< तेच मी वर म्हणलय, मिडियातले डावे/कॉन्गी उलटसुलटा बातम्या पेरू लागलेत.... अगदी लोकसत्ताचे कालचे "संपादकीयही" यास अपवाद नाही.

ज्या दिवशी घोषणा झाली अगदी त्या संध्याकाळ पर्यंत ATMs 500 च्या नोटा देत होते.
एक दिवस आरही पासून atm मध्ये फक्त 100 च्या नोटा येत असत्या तर लोकांना थोडा कमी त्रास झाला असता.

यात लोकांना संशय येणाची हि गरज नव्हती, एखाद्या दिवशी atm मधून येतात फक्त 100 च्या नोटा. कोणी 10 atm फिरून क्रॉस चेक कारनार नव्हते. >>>> पण जे एटीम मध्ये पैसे भरणार्या एजन्सीज आहेत, ICMC चेस्ट मध्ये काम करतात त्यांना अंदाज आलाच असता की.... मे बी त्यामुळे प्रोपर ईफेक्ट नसता आला जो अपेक्शीत आहे

नवीन १०००/२००० ची नोट येणार हे ऐकून सगळा आनंद आज मावळला आहे Sad
I really wish and pray की आपल्या सरकार ने १०० च्या पुढच्या नोटा रद्द कराव्या. खूप क्रांतिकारी नोर्णय असेल तो.

अ चे

लोक उगाचच काँग्रेसची वाट लागलि असे बडबडत बसलेत !!

Biggrin

15 लाख मोदीजींकडे मागत होतात. आता तेल गेल तुपही !!

Rofl

खरं आहे, अगदी आदल्या दिवशी पर्यंत ५०० च्या नोटा देत होते त्यामुळे खुप अडचण झाली लोकांची पण गोपनीयता राखणे खुपच गरजेचे होते नाहीतर मूळ उद्देशालाच धक्का बसला असता.
मला वाटतं वाजपेयी असताना अणू चाचणी केली त्यानंतर येवढा जबरी इम्पॅक्ट असलेलं काम इतकं सिक्रेटली करणं ह्याचं हे पहिलच उदाहरण आहे.

बुवा ,तुम्ही या धाग्यावर बरीच चांगली माहीती देत आहात,जरी आम्रविकेत असला तरी देसी प्रश्नांची तुम्हाला कळकळ आहे हे दिसते.

परवा रात्री हजार पाचशेच्या नोटा बंद झाल्या तेव्हा माझ्या खिशात हजाराची एक, पाचशेची एक आणि शंभराच्या चारच नोटा शिल्लक होत्या. काल संध्याकाळी कामावरून सुटल्यावर मला डेंटिस्टकडे जायचे होते. म्हणून दुपारी सौ.ना फोन केला. "तू संध्याकाळी स्टेशनवर मला भेट. आपण बाजारात जरा फिरू. आपल्याला दोन प्लास्टिक मोल्डिंगच्या खुर्च्या घ्यायच्या आहेत ना, त्या घेऊ. मस्तपैकी मिसळ खाऊ. मग जाऊ डॉक्टरकडे". ती येते म्हणाली. पुढे मला विचारलं. "पैसे आहेत ना जवळ, खुर्च्या घ्यायला?" मी म्हटलं "हो आहेत ना, दीड दोन हजार माझ्याकडे!!" आणि मला आठवून मी ओरडलो "अरे देवा!!! त्या नोटा आता काही चालायच्या नाहीत." आणि आमच्या तोंडून हास्याचे स्फोट बाहेर पडले. आता काय करायचं? मी म्हटलं, " तू ये तर खरी! दोन 'मिसळ'ला तर काय शंभर सव्वाशे लागतील. तेव्हढे तर आहेत माझ्याकडे. मस्तपैकी मिसळ खाऊ. खुर्च्यांंचं नंतर पाहू, नवीन नोटा आल्यावर" आणि आम्ही दोघं हसायला लागलो. इतरवेळी खर्च करताना भसाभस नोटा काढणारा मी, दोन मिसळचा होणारा खर्च बोटांवर मोजत होतो. हो ना! त्याच चारशेच्या रूपयांवर अजून दोन चार दिवस काढायचेत ना! Rofl

महाराष्ट्रात कर, वीज बील, पाणीपट्टी यांना जुन्या पाचशे/हजारच्या नोटा चालणार आहेत.
कित्ती गोड आहेत तुमचे मुख्यमंत्री.

आमचे काय करतात बघायला हवे.

Pages