आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-modi-addresses-the-nation-13...

काळा पैसा आणि विदेशातून येणाऱ्या नकली नोटांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही घोषणा केली. आज रात्री मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री आठच्या सुमारास देशवासियांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात काळा पैसा आणि बोगस नोटांबाबत बोलताना त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळं देशवासियांमध्ये निर्माण होणार संभ्रम दूर केला. तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. या नोटांना बँक खाते आणि पोस्ट खात्यात जमा करू शकतात. सुरूवातीच्या काळात बँक खात्यातून ठराविक रक्कमच काढता येईल, असं त्यांनी सांगितलं. हजार आणि पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तत्काळमध्ये १० नोव्हेंबर ३० डिसेंबर या कालावधीत बँक आणि पोस्ट खात्यात ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर करून तुम्ही नोटा बदलू शकता.
९ नोव्हेंबरला सर्व बँका बंद राहणार
दरम्यान, देशभरातील सर्व बँका उद्या म्हणजेच ९ नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. आता २००० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं तसा प्रस्ताव स्वीकारला आहे. १० नोव्हेंबरलाही काही एटीएम मशीन बंद ठेवण्यात येणार आहेत.

धाडसी निर्णय.. कसा आमलात आणतात ते बघायचे. पुढचे दोन दिवस खुप कठीण आहेत.
बरेच नावाजलेले हॉस्पिटलस कॅश घेतल्या शिवाय काही करत नाहीत. त्यामुळे ह्या काळात आजारी पडलेल्या लोकाचे हाल आहेत.

नंतर काही समस्या नाहीत. बराच काळा पैसा बाहेर येईल .

बराच काळा पैसा बाहेर येईल >> असेच वाटते आहे. आणि एकमद धक्का दिल्याने हळू हळू काळ्याचा पांढरा करू या विचाराला आळा बसेल असा उद्देश दिसतो आहे.

Welcome move!
I can imagine the misery of people who regularly collect unaccounted cash from customers. The fun begins!

अत्यंत धाडसी त्याचबरोबर कौतुकास्पद निर्णय. नविन आरबीआय गवर्नर यांच्या कारकिर्दिची धडाकेबाज सुरुवात...

अत्यंत धाडसी त्याचबरोबर कौतुकास्पद निर्णय. नविन आरबीआय गवर्नर यांच्या कारकिर्दिची धडाकेबाज सुरुवात...>> +१

बाहेर मारामार्‍या सुरू झाल्यात.
लोकं पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून पाचशेच्या नोटा देत आणि आणि पेट्रोलपंप मालक घेत नाहीये. लोकं भडकलीयेत. बारा पर्यंत चालणार असे मोदी म्हणाले तर घेत का नाही म्हणून भांडत आहेत Lol

अत्यंत धाडसी त्याचबरोबर कौतुकास्पद निर्णय. नविन आरबीआय गवर्नर यांच्या कारकिर्दिची धडाकेबाज सुरुवात. >>>> + १

खरेच धाडसी निर्णय आहे. याचे परिणाम काय होतायत ते पाहणं रोचक ठरेल .
आताच जवळच्या एटीम मध्ये गेले होते. अक्षरश रांग लागली होती. एका वेळेस फक्त 1000 रुपये काढता येतात जर 100 च्या नोटा हव्या असतील तर . 1000 च्या वर रक्कम काढायची असल्यास 500 च्या नोट्स येतात. त्यामुळे स्वाइप करायला वेळ होतोय. थोड्या चकमकी देखील घडल्या पण एकंदरीत लोकं निर्णयाच्या बाजूनं बोलताना दिसत होती..

हजार/पाचशेच्या नोटा बाद होणार आहेत तर लोकं एटिएम मध्ये पैसे (१०००/५०० नोटा) डिपाॅझीट करायला जात आहेत कि विड्राॅ करायला?

अतिशय धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय. हे अशासाठी की अजूनपर्यंत कुठल्याही सरकारने हा असा निर्णय घेतला नव्हता. याचा परिणाम म्हणून थोडातरी काळ्या पैशाला लगाम बसेल. पण थोडाच.

कारण, Most of the black money is digitally laundered and/or stashed in Forex in tax havens. त्यावर या निर्णयाचा काय परिणाम होणार?

त्यामुळे ह्या काळात आजारी पडलेल्या लोकाचे हाल आहेत.हॉसपिटल मध्ये चालणार आहेत नोटा दोन दिवस>>>>> नाही, डॉ. च्या प्रिस्क्रीप्शनवर या विषयी माहिती असेल. म्हणजे डॉक्टरांची सही, हॉस्पिटलची माहिती यामुळे पेशंटच्या नातेवाईकांची अडचण होणार नाही असे पंतप्रधान श्री मोदी यांनी संदेशात सांगीतले.

हे व्हाट्स अप वर आलेय

Summary of the important announcement :

1. Black money issue, 500 rupees and 1000 rupees banned from Midnight.

2. ATM's wouldn't wouldn't work on 9th and 10th November. Rather the withdrawal limit is Rs. 2000 only.

3. All Residents have option till 30th December 2016, to deposit their existing cash balance of 500 and 1000 rupees in their bank accounts.

4. ATM withdrawal is limited post 11th Nov to 10000 per day, but initial few days it would be 2000 Rs. Only.

5. Emergency periods like hospitals and chemist, train ticket booking and airline ticket booking, petrol pumps may accept the old notes to 11th November.

6. No changes in online, card, cheque or any other plastic money transactions.

7. 9th November, banks wouldn't be available for public banking services.

8. New notes of 500 rupees and 2000 rupees would bring in circulation, mostly from 31st March 2017.

9. This one is not clear, but old notes can be exchanged with rbi till 31st March 2017. I guess post 30th December.

आमच्यासारख्या मध्यमवर्गाला थोडे दिवस नोटा बदलताना वगैरे त्रास होणार. बँकेत रांगा, भांडणे वगैरे. काउन्टरफीट करन्सी खर्‍या नोटांबरोबर आपोआपच डीमॉनेटाइझ (बाद) होईल. बाकी काळा पैसा फारसा बाहेर निघेल असे वाटत नाही. बडे मासे काळा पैसा नोटांमध्ये ठेवत नसतात.
या आधीच्या डीमॉनेटायझिंगच्या दोन्ही प्रसंगी फारसा काळा पैसा बाहेर निघाला होता असे नाही. आणि तेव्हा हजार-पाचशेच्या नोटा अगदीच थोड्या लोकांकडे असायच्या. त्या बाद केल्याने सामान्य लोकांना फारसा त्रास झाला नव्हता. आज मात्र हजारपाचशेची नोट कुणाकडेही असू शकते. कामवाल्या बाया, सफाई कर्मचारी, गवंडी, मिस्त्री, वॉच् मन, भाजीवाले, फेरीवाले वगैरे. या सगळ्यांना महिनाभर त्रास होणार. दुर्गम भागात जर ही बातमी पोचली नसेल आणि त्याचे महत्त्व समजले नसेल तर तिथल्या लोकांची नाडणूक, लुबाडणूकही होण्याची शक्यता आहे.

New notes of 500 rupees and 2000 rupees would bring in circulation, mostly from 31st March 2017 >>> हे बहुतेक ११ नोव्हेंबर २०१६ पासुन होणार आहे.

भारतीय व्यवहारातुन रु. १०० व रु. ५०० चलनातुन बाद होणार. होणार म्हणजे ""बाद झाल्यात" असे म्हणावयास अजुनही तब्बल १२० मिनिटे शिल्लक आहेत.
रविवारी सायंकाळी जवळील एटीएम मधुन आठवडाभर जो खर्च लागतो त्यासाठी सवयीनुसार रु. ३००० काढलेले. आता मात्र सरकारच्या आजच्या धोरणाने पंचाईत झाली राव.
रु. ३००० पैकी एक पाचशेची नोट खर्च केलेली. त्यातील रु. ८० आहेत. पण बाकीचे रु. २५०० पैकी एक रु. १००० ची नोट आणी रु. ५०० च्या ३ नोटा आहे. आणी नेमके ह्याच नोटा चालणार नाही.

राहिलेल्या २ तासांत हे सगळे पैसे कसे खर्च करु,हा एक प्रश्नच पडलाय. काहीही विचार न करता रात्रौ जेथे पैसे खर्च केले जातात,तिथे आपण तर बुवा कधी जाच नाही. (शनिवारचाच काय तो अपवाद)

बातमीनुसार हे पैसे मी बँकेत जमा करुन रु. १०० च्या नोटा घेऊ शकतो पण त्यासाठी पुर्ण एका दिवसाची सुट्टी घ्यावी लागणार. जे शक्य नाही. सबब,आता माझ्या डोक्यात एकच विचार घोंघावतोय "कोणी सुट्टे देता का सुट्टे"

अपरिचित, अजून वेळ आहे ना हातात एक्स्चेंज करायला? म्हणजे आत्ता हातात खर्चायला पैसे नसू शकतील हे कळतंय पण जरा सुरूवातीची गर्दी कमी झाली की शक्य होईलच की.

परदेशी टॅक्स हेवन्स मध्ये गुंतवणूक करणार्‍यांच्या तुलने मध्ये भारतातच कॅश लपवून ठेवणारे खुप जास्त लोकं आहेत.
दॅट इज रियली स्मार्ट बाय द वे, बिग बाझार करतय ते. मला तर पहिली भिती म्हणजे दुकानदार लोकं ताबडतोब पाचशेच्या नोटा घेणे बंद करतील आणि लोकांचा खोळंबा होईल हीच वाटली होती.

आमच्यासारख्या मध्यमवर्गाला थोडे दिवस नोटा बदलताना वगैरे त्रास होणार. बँकेत रांगा, भांडणे वगैरे. काउन्टरफीट करन्सी खर्‍या नोटांबरोबर आपोआपच डीमॉनेटाइझ (बाद) होईल. बाकी काळा पैसा फारसा बाहेर निघेल असे वाटत नाही. बडे मासे काळा पैसा नोटांमध्ये ठेवत नसतात.
या आधीच्या डीमॉनेटायझिंगच्या दोन्ही प्रसंगी फारसा काळा पैसा बाहेर निघाला होता असे नाही. आणि तेव्हा हजार-पाचशेच्या नोटा अगदीच थोड्या लोकांकडे असायच्या. त्या बाद केल्याने सामान्य लोकांना फारसा त्रास झाला नव्हता. आज मात्र हजारपाचशेची नोट कुणाकडेही असू शकते. कामवाल्या बाया, सफाई कर्मचारी, गवंडी, मिस्त्री, वॉच् मन, भाजीवाले, फेरीवाले वगैरे. या सगळ्यांना महिनाभर त्रास होणार. दुर्गम भागात जर ही बातमी पोचली नसेल आणि त्याचे महत्त्व समजले नसेल तर तिथल्या लोकांची नाडणूक, लुबाडणूकही होण्याची शक्यता आहे.>>>>>

हिरा, मग तुमच्यामते ५०० आणि १०००च्या नोटा बाद करणे हा चांगला निर्णय नाही का? अजून काय केल्यानं काळा पैसा बाहेर पडेल? कुतूहल म्हणून विचारते आहे. हा निर्णय चांगला का नाही याचं विश्लेषण कुणी केलं तर माहितीत भर पडेल.

Pages