आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://maharashtratimes.indiatimes.com/MT-LIVE-UPDATE/liveblog/55322460.cms

मटा पोलची लिंक.

पोस्ट ऑफिसात पण मिळतिल नोटा बदलून.>>>>. मी ऐकलंय त्यासाठी तुमचे पोस्टात सेव्हिंग अकांऊंट असायला हवे. कोणी माहिती देऊ शकेल का?

कित्येकांचे स्वतःचे बँक अकांऊंट नसते त्यांच्यासाठी सरकारने काही तरी पर्यायी व्यवस्था करावी ही अपेक्षा आहे.

<<

नरेश माने,

ही व्यवस्था मोदी सरकारने कित्येक महिने आधी जन धन योजने अंतर्गत केली होती, पण या योजनेची त्यावेळी अनेक तथाकथित ढोंगी पुरोगामी व कॉंगीज नेते/समर्थकांनी यथेच्छ टिंगळ टवाळी केली होती, आणि आता त्याच जनतेचा पुळका येऊन त्यांची काळजी लागून राहलेय त्यांना. मात्र अशी लोक पोस्टात किंव्हा बॅंकेत आधार/पॅन कार्ड दाखवून दिवसाला फक्त चार हजार रुपये बदलून घेऊ शकतात.

हा पॉलिसी पॅरालिसीस आहे मोदींचा ,इन्कम टॅक्स डिपार्ट्मेंट्ची कार्यक्षमता वाढवण्याऐवजी असले दळभद्री निर्णय घेऊन काय साधले तर सामान्यांची गैरसोय केली.रोजचे व्यवहार करताना जवळपास ७०% व्यवहार हे ५००/१००० मध्ये होतात ,त्यांना रिप्लेस करायला १०० च्या नोटा आहेत काय याचा पाठपुरावा न करता घेतलेला हा बिन्डोक निर्णय आहे.

http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=153404

हे कालचे पंतप्रधानांचे भाषण भारत सरकारच्या पोर्टल वरील. इथे स्पष्टपणे म्हटले आहे कि "1. Persons holding old notes of five hundred or one thousand rupees can deposit these notes in their bank or post office accounts from 10th November till close of banking hours on 30th December 2016 without any limit."

रोजचे व्यवहार करताना जवळपास ७०% व्यवहार हे ५००/१००० मध्ये होतात ,त्यांना रिप्लेस करायला १०० च्या नोटा आहेत काय याचा पाठपुरावा न करता घेतलेला हा बिन्डोक निर्णय आहे.

<<

अहो बिंडोक जिनियस,
उद्यापासून रिप्लेस करायला आहेतच कि पाचशे व दोन हजाराच्या नविन नोटा. Proud

बिंडोक जिनियस,
उद्यापासून रिप्लेस करायला आहेतच कि पाचशे व दोन
हजाराच्या नविन नोटा.>>>>>>> अहो प्रसाद ,यासाठी बॅकेत कीती रांगा लागतील व भांडणे होतील याचा अंदाज बिन्डोक भक्तांना नसणारच.

सगळीकडे या निर्णयाचे स्वागत आणि जोक्स फिरत आहेत म्हणून इथे वाचायला आलो की विरोधात काही मुद्दे मांडले असतील. साती सोडल्या तर बाकी मुद्दे अगदीच पोकळ निघाले.

ज्यांनी कोणी सोय करून ठेवली ते सुटले पण झाडून सगळ्यांनी केली असेल असे वाटत नाही. बघूया पुढे काय होते ते, लगेच सगळा काळा पैसा बाहेर येईल आणि आलबेल होईल अशी भाबडी अशा मुळीच नाही पण जे काही होईल त्याने देशाला फायदा व्हावा, कुणा व्यक्ती किंवा पक्षाला होण्यापेक्षा असे कळकळीने वाटत आहे

अहो प्रसाद ,यासाठी बॅकेत कीती रांगा लागतील व भांडणे होतील याचा अंदाज बिन्डोक भक्तांना नसणारच.

<<

ठिक आहे.
नोटा बदलायला तुमच्या घरि माणूस पाठवायला सांगू आपण सरकारला. Lol

एकीकडे अदानी सारख्यांना स्टेटबॅकेकडून ७०००० कोटीचे अनकंडीशनल लोन द्यायचे व काळ्या पैशावर कारवाई करण्याचे नाटक करुन सामान्यांच्या नसा आवळायच्या हा प्रकार भाजप करत आहे.याचा निषेध कोण करताना दिसत नाही.देशात आणिबाणीसारखी परिस्थीती आली आहे आज.लोक वेड्यासारखे एटीएम वगैरेकडे धावत आहेत.काय साधले यातून?

हे बघा!

https://www.youtube.com/watch?v=AOzxfHFXMuI

मोदींनी ही घोषणा केली तेव्हा अमेरिकेतील मतदान चालू होतं. निर्णय काय लागणार याचा मागमूसही नव्हता. याचीही नोंद घ्यावी.

please चुकीची माहिती पसरवू नका.
२००५ व त्या पूर्वीच्या १००० व ५०० च्या नोटा बंद होणार आहेत.

सर्व ठिकाणी एकच बोंब १००० व ५०० च्या नोटा बंद..
अरे काय चाललय काय ???

Decision was not sudden... It merely started with bank account for all. Then linked bank accounts with aadhar... Then brought disclosure of bank account passport and aadhar no. in income tax return... Add to it the various data mining and collection tools in the hands of the income tax department... Then the income disclosure scheme... And this masterstroke... Truly a systematic change in the last 2 years!!!

Timing is also key - 8 pm announcement means no possibility to make last moment transaction at jewellers shop or any impact on share market.
Guys, just look at the timing! He's totally screwed the satta bazaar who are betting thousands of crores on the US elections results today. The results will be out by 1 am, whereas the currency notes will be worthless from 12 am tonight...: That's okay, Be at home. Don't worry, Eat wat u have, Travel as u can, Ask for lift if u don't have change

Don't worry
This is a drastic change, It's for good ..We can support this
Don't complain or frustrate ...it's our chance to raise India back to what it was... Sone ki chidiya
It's our chance to support Our leader

Indeed why only army has to support the fight
Let's all come togeather and fight back Let us do for us n our coming generations, Let's do for our country .Let's support our pm

Drastic change does not come slowly.. it hits like a hammer and breaks all that is ...
Congratulations India for a legendary leader.
It can be chaos in the moment, it will be revolutionary transforming for our coming generations.
I dont mind bearing this inconvenience now, for a better future.

Proud of my pm
I support Narendra Modi.
(व्हाट्स अप वरचा मेसेज. आवडला/ पटला म्हणून इथे शेयर करतेय )

Now a days visiting Maayboli is like watching NDTV.>>>>बरोबर..........

रतिका | 9 November, 2016 - 13:31 नवीन
please चुकीची माहिती पसरवू नका.
२००५ व त्या पूर्वीच्या १००० व ५०० च्या नोटा बंद होणार आहेत.

सर्व ठिकाणी एकच बोंब १००० व ५०० च्या नोटा बंद..
अरे काय चाललय काय ???
>>>
माबोवर लिहीताय म्हणजे नेट हाताशी आहे. बातम्या वाचाल का? याच धाग्यावर कित्येकांनी लिंका दिल्यात त्या पण वाचा / बघा.

please चुकीची माहिती पसरवू नका.
२००५ व त्या पूर्वीच्या १००० व ५०० च्या नोटा बंद होणार आहेत.

सर्व ठिकाणी एकच बोंब १००० व ५०० च्या नोटा बंद..
अरे काय चाललय काय ???
>>> . ह्याचा सोर्स देणार का?? (ही पुराण कालीन बातमी आहे..)

नवीन बातमी नुसार ५०० व १००० च्या नोटा बंद होणार, आणी नवीन ५०० व २००० च्या नोटा येणार... त्यातल्या ५००च्या उद्या पासूनच येतील.. आणि २००० च्या उशिरा येणार आहेत....

काल तर २४तास आणि abp news ला तर सांगितलं कि २००५ पासून पूर्वीच्या सर्व नोटांचे चलन बंद म्हणून.
अरे देवा आता या झी वाल्याना काय म्हणावा

२००५ पासून पूर्वीच्या ५०० च्या सर्व नोटा बंद होऊन किती तरी काळ लोटला, २००५ पासून २०१६ पर्यंतच्या सर्व ५०० च्या नोटा काल मध्य रात्रीपासून बंद झाल्या आहेत.

काळ्या पैशाचे उगमस्थान ५०० किंवा १०००च्या नोटा हे नव्हे. ते फक्त काळा पैसा साठवण्याचे एक नगण्य साधन आहे बस्स. काळ्या पैशाचे उगमस्थान वेगळेच आहे. भ्रष्ट व्यवस्था हे ते उगमस्थान आहे. अन्नधान्यांचे वायदे, साठवणूक, खोटे इंपोर्ट्/एक्स्पोर्ट, बेनामी कंपन्या, बिल्डर्स आणि मोठ्या व्यापार्‍यांचे सरकारशी साटेलोटे, निवडणूक देणग्या, संरक्षण-मनी, अत्यल्प जनहित पण भरपूर फायदा असलेल्या अवाढव्य कंपन्यांची टेंडरे, यातून बेहिशेबी पैसा निर्माण होतो. यावर उपाय? काही फुटकळ उदाहरणे. न्हावाशेवा बंदरात जाणार्‍या आणि तिथून येणार्‍या कंटेनर्सची कसून तपासणी झाली किंवा झोपु योजनेतल्या घरांचे सध्याचे मालक आणि मालकीव्यवहार तपासले गेले किंवा (मुंबईपुरते पाहायचे झाल्यास) दक्षिण मुंबई, वान्दरे, कफ परेड, हिरानंदानी, अशा श्रीमंत वस्त्यातले गृहव्यवहार कसून तपासले गेले. कुलाबा-सीप्झ मेट्रो सारखी अवाढव्य खर्चाची पण अल्प जनहिताची योजना का हिरिरीने राबवली जातेय ते पाहिले गेले.. असे घडले तर? सरकारने बिल्डर्स, ट्रेडर्स बरोबरचे आपले संबंध पारदर्शी केले तर? इन्कम टॅक्स कायदा प्रामाणिकपणे राबवला गेला तर? पण यात सोपी सोल्यूशन्स नाहीत. तात्काळ मिळकत (gain) नाही. कष्ट आणि कठोर परिश्रम आहेत. मूले कुठारः असा प्रहार झाला तर उपयोग. शेंडे टहाळ्या तोडून फारसा उपयोग नाही.

हीरा, मूळावर प्रहार करताना फांद्या, मग खोड मग मूळं असं पद्धतशीर गेलेलं बरं नाही का? एकदम मूळावर वार करायला गेलं तर झाड आपल्याच अंगावर पडायची भिती!

मेट्रो अल्प जनहिताची आहे हे काही पटले नाही.

मला आता स्कूटरच्या दुकानातून एस एम एस आला आम्ही पाचशे हजारच्या नोटा घेउन गाडी विकू. फक्त आजच. काही लोक्स धंदा पण करताहेत ह्या अवघड परिस्थितीत.

मेट्रो अल्प जनहिताची आहे हे काही पटले नाही. >>
सगळ्या नाही. कुलाबा-सीप्झ मेट्रो जिथे सगळे गाडीवाले राहतात व मेट्रो बहूदा त्यांच्या घरी काम करायला येणाऱ्यांची सोय व्हावी म्हणून केली जातेय असं म्हणतात.

सोने ३१६०० प्रति तोळा.
लोक किलो किलो ने सोने बुक करत आहेत.
बिलिंग शिवाय सोने हवे असेल तर ४४००० प्रति तोळा.

Pages