आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोने ३१६०० प्रति तोळा.
लोक किलो किलो ने सोने बुक करत आहेत.
बिलिंग शिवाय सोने हवे असेल तर ४४००० प्रति तोळा >> ह्याच्या पेक्षा जेव्हा चान्स होता तेव्हा पैसे डिक्लेयर केले असते तर परवडले असते असे म्हणतील काही जण.. हे जवळपास ४०% जास्त रेटनी आहे.. ४५% भरुन पैसा तरी सगळा व्हाईट झाला असता आणि पाहिजे तेव्हा वापरता आला असता...

बिलिंग शिवाय सोने हवे असेल तर ४४००० प्रति तोळा. >>> अशा परिस्थितीत कुठला सोनार बिलिंग शिवाय काळा पैसा गोळा करेल ? आणि १-२ किलो सोनं घेऊन थांबणारे थोडीच काळापैसावाले असणार आहेत ? Uhoh

जे लोक
बिल्डर, बिल न देणारे डॉक्टर, बिल न देणारे मोठाले किराणा दुकानदार इ. च्या बाजुला रहात असतील त्यांनी पुढील काही दिवस, रात्र,, बेरात्री सावध रहावे......अचानक मोठ्ठा धनलाभ होवु शकतो .....५००/१००० रु. नोटांच्या फेकलेल्या पुडक्यांच्या स्वरुपात.

कुणाच्या लक्शात आलेय का.. ह्या आठवड्यात ३ दिवस बँक बंद असणारेत... १२, १३ & १४

एटीम मधील पैसे पुरतील का अश्या रांगा लागल्यावर

कुणाच्या लक्शात आलेय का.. ह्या आठवड्यात ३ दिवस बँक बंद असणारेत... १२, १३ & १४

एटीम मधील पैसे पुरतील का अश्या रांगा लागल्यावर>>>. मुळात पुढील काही दिवस तुम्ही एटीएम मधून दिवसाला २००० रूपयांच्यावर पैसे काढू शकणार नाही. आणि एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी बँकानी एजंसीला कंत्राट दिले असते. त्यांच्या गाड्या येऊन पैसे भरतात. त्यामुळे बँका बंद असल्या तरी एटीएम मशीनमध्ये पैसे असतात.

वर्तमानपत्रातील माहितीनुसार जुन्या नोटा बदलून नविन घेण्याच्या रकमेवर कांहींही मर्यादा ठेवलेली नाहीं [फक्त ओळखपत्र दाखवण्याचीच अट आहे ]. इथं मोठ्या प्रमाणात 'बेनामी ' व्यवहार होवून काळा पैसा बाद करण्याच्या उद्देशाला बाधा येवूं शकते, असं वाटतं; १० कोटीच्या जुन्या नोटा बाद होणार असतील , तर कुणीही १०० जणांकरवीं त्या नविन चलनात बदलून घेईल व त्याकरतां त्या १०० जणाना ५० लाखांचं वांटप करणंही त्याला परवडणारं ठरेल.
[अगदीच बालीश वाटते का ही शंका ? ]

भारतीय रिजर्व बँकेतर्फे माहिती
पंतप्रधान मोदी यांचे भाषण

२१:०० पासूनच्या भाषणानुसार ११ नोव्हेंबर रात्री १२ पर्यंत काही बाबतीत ५०० आणि १००० च्या नोटांच्या वापरासाठी सवलत दिली आहे.

भाऊ, शंका चांगली आहे. पण जुन्या नोटा बदलण्याच्या रक्कमेवर बंधन नसले तरी त्या तुम्ही तुमचे ज्या बँकेत/पोस्टात बचत खाते असेल त्याच बँकेत/पोस्टात बदलू शकता. त्यासाठी वरील तक्यावरून २४ नोव्हेंबर पर्यंत फक्त ४,०००/- रूपये दिवशी आणि त्यानंतर ४,०००/- रुपयांपेक्षा जास्त पण किती जास्त ते लिहिले नाही. म्हणजे ३० डिसेंबर पर्यंत एक व्यक्ती जास्तीत जास्त किती रूपये जमा करू शकेल? आणि तुम्ही रोज नोटा बदलत आहात हे तर कोणाच्याही निदर्शनास येणारच. म्हणून तुम्हाला वाटत असलेली शंका रास्त असली तरी ती व्यवहारी ठरणार नाही असे मला तरी वाटते.

भाऊ,
आयडी वापरावे लागणार आहे म्हणजे व्यवहाराची नोंद देखील होईलच त्यामुळे एकंदरीत बेनामी व्यवहार करणे कठीण जाईल. चांगला निर्णय!

त्याकरतां त्या १०० जणाना ५० लाखांचं वांटप करणंही त्याला परवडणारं ठरेल.>>> पण सोर्स ऑफ इनकम काय दाखवणार ? आणि ज्यांच्याकडे असा सोर्स ऑफ इनकम असेल त्यांच्याकडेही असाच पैसा पडुन असेल की.

.

मला त्रास झाला खरा. पण एकंदर आता कल्पना आली त्यावरून चांगला निर्णय घेतला आहे मोदीजींनी.
माझी बहीण नागपूरला अडकून पडली आहे. तिला येताना संत्रा बर्फी आणि लंबी रोटी घेऊन ये म्हटलं होतं फ्लाईटच्या दिवशी. पण पाचशेच्या नोटा असल्याने खरेदी बंद आहे. जाऊन काहीच उपयोग नाही होणार..

पण काळा पैसा बाहेर येणार असेल तर हा त्रास हसन करू.
तिकडे ट्रम्पजी आले का ? इंडीयन्स ना थँक्स म्हणालेत.

>>ट्रम्पजी आले का ? इंडीयन्स ना थँक्स म्हणालेत.>> हो, हो, ट्रंपजी मोठ्या संख्येने निवडून आलेत. भारतातूनही काही लोकांनी छुपं मतदान केल्याचं ऐकलं. म्हणूनच ट्रंपजी त्यांना थँक्स म्हणाले असतील. Wink

ही बातमी बरोबर आहे का? सोनार ५०० / १०० च्या नोटा कसे घेत आहेत? ऑफिशियली परवानगी आहे?
लोकांनी सोने घेउन ठेवले तर काळा पैसा बाहेर कसा येइल? की फक्त कॅश फ्लो वाढवायचा आहे?

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5447556067776668463&Se...

याचसाठी केला होता का हा अट्टहास?

http://www.loksatta.com/desh-videsh-news/government-fully-focused-on-tac...

२००० च्या नव्या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप असल्याची चर्चा चुकीची: जेटली

निर्णय चांगला वाईट ठरवण्याइतकी अर्थशास्त्रीय अक्कल मला नाही. पण इतका मोठा निर्णय घेताना रीझर्व बॅन्केचा पूर्ण पाठिंबा आणि निदान काही महिन्यांचं पद्धतशीर प्लॅनिंग असल्याशिवाय पुढे पाऊल टाकलं गेलं असेल असं वाटत नाही. एरवी मोदीसरकारला अजिबात पाठिंबा देत नसले तरी फक्त त्यांनी घेतलेला निर्णय म्हणून एका फटकार्‍यात तो वाईटच असं ठामपणे सांगू शकत नाहीये.
मोठे मासे अर्थातच यात अडकणार नाहीयेत. पण असे अनेको व्यावसयिक, दुकानदार, भ्रष्ट अधिकारी इ. लोक मध्यम पातळीवरची भ्रष्ट व्यव्स्था चालवत असतात आणि सहसा बरीचशी रोख रक्कम बाळगून व्यवहार करतात हेही पक्कं माहित आहे. त्या लोकांना या मुळे चाप बसणार असेल तर हरकत नाहीये. निदान कुठल्या तरी पातळीवर काहीतरी होऊदेत. याचा अर्थ बड्या धेंडांना पाठिमागे घालणे क्षम्य नाही. पण म्हणून हे होत असेल तर होऊदेत... आसपास ओळखीतले काही दुकानदार, व्यावसायिक, डॉक्टर्स इ. अतिशय अस्वस्थ झालेले बघितले. एरवी कलकत्त्यात अजिबातच मोदीभक्तीचं वातावरण नाही, आणि शहराची अर्थव्यवस्था पुणे, मुंबई, दिल्लीच्या तुलनेत खालच्या पातळीवर आणि जवळजवळ इलेक्ट्रॉनिक व्यवहार विरहित चालते. तरीही सर्वसाधारण मोलकरणी, टॅक्सी ड्रायवर्स, छोटे मोठे फेरीवाले असे लोक कूल होते एकदम. दोनेक दिवस अडचण होईल नंतर बॅन्केतून बदलून मिळतीलच की घामाचे पैसे अशी त्यांची साधारण प्रतिक्रिया होती....

पण हा तात्पुरता परिणाम करणारा निर्णय आहे. याचबरोबर नव्याने काळा पैसा निर्माण होऊ नये/ कमीतकमी निर्माण व्हावा यासाठी धोरण यावं, काही पावले उचलली जावीत अशी आशा आहे.

*BIG GAME !! Food for thouid Mukesh Ambhani already knew about this currency change?

He invested billions in Jio and made it free till Dec 30th ? Ironic...And now, the currency exchange will only be allowed till Dec 30th? And from Jan 2017 he will start getting returns in all white money!! a real masterstroke by a visionary businessman or a trick by a fraudster...only time will tell..no wonder the Present RBI governor was a financial advisor to Ambani's Reliance group & an inside man..!! Conspiracy Theories!

*WHAT A GAME...Hats off !

(व्हॉस्स्सपा)

काल मला हा निर्णय भारी वाटला होता. पण जशीजशी माहिती बाहेर येतेय त्यानुसार त्यातली हवा निघून जात चालली आहे.

१. काळ्या पैशाविरोधात याचा फारसा उपयोग होणार नाही. मागे जुन्या ५०० च्या नोटा चलनातून काढून घेताना हेच कारण दिले होते. पण त्याने काही फार मोठे काळे धन बाहेर आले असे कुठे वाचले नाही. अर्थात त्यापेक्षा ह्या वेळेची निर्णयाची व्याप्ती जास्त आहे. पण नोटा बदलून मिळणार आहेत तेंव्हा त्या बदलण्याच्या अनेक पळवाटा असतीलच.

२. कोणी अनिल बोकीलांचे मत पुढे केलय. पण आता तर १००० च्या ऐवजी २००० नोटा येणार आहेत त्यामुळे बोकिलांनी केलेल्या सुचना धाब्यावरच बसवल्या आहेत.

३. शहरात आपण क्रेडीट कार्ड आणि ऑनलाईन सुविधा सहज वापरतो. पण खेड्यातल्या सर्वसामान्यांचे मात्र हालच होणार आहेत.

४. यात एकच फायदा आहे (आणि तो मोठाच आहे) तो म्हणजे नकली नोटांना आणि त्या अनुशंगाने दहशतवादाला आळा. पण त्या करता सरकारने 'आम्ही काळ्या पैशाविरुद्ध कारवाई केली' असे क्रेडीट उकळणे पटले नाही.

'आम्ही काळ्या पैशाविरुद्ध कारवाई केली' असे क्रेडीट उकळणे पटले नाही.>>> ज्यांनी नोटा गाद्या , बाथरुम्स मध्ये दडवुन ठेवल्या होत्या तो काळा पैसाच असणार ना ? कित्येक धाडींमध्ये करोडोंमध्ये पैसा मिळालाय आता धाडी टाकायची पण गरज उरली नाही. Proud

Pages