Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36
आज मध्यरात्रीपासूनच!
लागला घोडा काळ्या पैश्याला
- श्री नरेंद्र मोदी !!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
15 लाख देणारे जमोप्याचे ड्युआ
15 लाख देणारे जमोप्याचे ड्युआ शेळ्या मेंढ्या बैल रेडा वैगेरे अल्लाला प्यारे झाले आहेत.
65 वर्ष काळा पैसा तयार करायला मदत करणारे कधीपासुन 15 लाखाची मागणी करत आहेत. गुन्हा होत आसताना त्या गुन्हेगारांच मनोधैर्य वाढवणे म्हणजे गुन्हाच आहे.
आणि तुमचे डु आयडी कुठे
आणि तुमचे डु आयडी कुठे गेलेत ? कैलासाला की वैकुंठाला?
असू दे.. पंधारा लाखात आता मिलिंद जाधव यांचाही वाटा असल्याचे मी घोषीत करत आहे.
रडू नको
त्यांना त्यांचे मिळतील ना
त्यांना त्यांचे मिळतील ना पंधरा लाख!
तुम्ही आपल्यातले पाच लाख त्यांना कशाला देताय आणखी?
०
०
>>ता आपण काहीही न करता ब्यांक
>>ता आपण काहीही न करता ब्यांक आपोआपच त्या नोटा बदलून आपले अकाउंट शुद्ध नोटांनी भरणार का ?>> हो, म्हणूनच बँक दोन दिवस बंद आहे आणि बँक कर्मचारी बंद दरवाज्यामागे लोकांचं अकाऊंट शुद्ध नोटांनी भरायचं काम अहोरात्र करत आहेत.
(No subject)
सायो वैद्यबुवा, मस्त लिहिले
सायो
वैद्यबुवा, मस्त लिहिले आहेत प्रतिसाद. वरचा प्रज्ञा९ चा एक मोठा प्रतिसाद पण आवडला.
500 आणि एक हजार रुपयांच्या
500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा देऊन आरक्षित करण्यात आलेली तिकिटे रद्द करता येणार नाहीत. तसेच त्यांचा परतावा मिळणार नसल्याचे काही विमान कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
आता आपण काहीही न करता ब्यांक
आता आपण काहीही न करता ब्यांक आपोआपच त्या नोटा बदलून आपले अकाउंट शुद्ध नोटांनी भरणार का ? >>> नका हो असं काही बोलु
ब्यांक आपोआपच त्या नोटा बदलून
ब्यांक आपोआपच त्या नोटा बदलून आपले अकाउंट शुद्ध नोटांनी भरणार का <<< बँक नाही.. सरकार भरणार ना?
>>आता आपण काहीही न करता
>>आता आपण काहीही न करता ब्यांक आपोआपच त्या नोटा बदलून आपले अकाउंट शुद्ध नोटांनी भरणार का ? <<
हो, अगदि ते लाॅकरमध्ये ठेवलेले असले तरी. कदाचित त्या साठी वेगळा सर्विस चार्ज लावतील...
डीमार्टात डेबीट कार्डवर भाजी,
डीमार्टात डेबीट कार्डवर भाजी, फळं मिळाली. पण कांदे लसूण साठी शंभराच्या नोटा नाहीत. उधार मागावेत तर इथे नवी आहे. ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करते म्हणाले किंवा कुणाकडे कार्ड स्वाईप करून घेत असाल तर कार्ड पेमेंट करते म्हणाले तर कांदे लसूण वाला म्हणाला की ब्यांकेत पैसे गेले तरी नवीन नोटा काढायच्या कशा ? मी पण कन्फ्युज झाले त्याच्यामुळं.
आताच अपना बाझारवरून
आताच अपना बाझारवरून आले.जुन्या ५००च्या नोटा चालल्या.सेफरसाईडला १०० च्या घेऊन गेले होते.पण जुन्या चालल्या म्हटल्यावर त्या ठेवल्या.असे कसे म्हणून विचारल्यावर्,काल बंद होते.पण आज सकाळी त्यांना जुन्या नोटा स्वीकारायचे आदेश मिळाले होते.मात्र कमीत कमी खरेदी ४०० ची हवी.चला काही नोटा खपल्या.या आनंदात घरी आलो.
>आता आपण काहीही न करता ब्यांक
>आता आपण काहीही न करता ब्यांक आपोआपच त्या नोटा बदलून आपले अकाउंट शुद्ध नोटांनी भरणार का ? <<
हो, अगदि ते लाॅकरमध्ये ठेवलेले असले तरी. कदाचित त्या साठी वेगळा सर्विस चार्ज लावतील. >>>> अरेरे मुळात आपल्या खात्यात जमा असलेला पैसा हा हार्ड कॅश नसतोच... दैंन्दीन व्यवहारासाठी लागतील एवढाच पैसा बॅंकेत थेवतात. बाकीचा ईतरत्र गुंतवलेल्ला असतो.
आणी लॉकरमध्ये आपण जे ठेवतो ते गोपन्नीय असते ना मग त्याचे जबाबदारी बॅंक कशी घेणार
आता आपण काहीही न करता ब्यांक
आता आपण काहीही न करता ब्यांक आपोआपच त्या नोटा बदलून आपले अकाउंट शुद्ध नोटांनी भरणार का ? >>>
त्यावर गंगाजळ / holy water शिंपडणार की.
सहकारी बाजारात ३ दिवस ५००/१००० च्या नोटा चालणार आहेत.
माझे डेबिट कार्ड मॄत
माझे डेबिट कार्ड मॄत झालेय.नवीन कार्ड काल आलेय.आज नवीन पिन टाकायचे म्हणून घेऊन गेलो तर ATM machines are out of order.सुरुवातीचा पिन त्याच बँकेचा लागेल म्हणून सांगितल्याने म्हणून आणखी वाट लागली आहे.असो.
दुसर्या डेबिट कार्डावर आता मदार आहे.
ब्यांकेत पैसे गेले तरी नवीन
ब्यांकेत पैसे गेले तरी नवीन नोटा काढायच्या कशा ? >>>>>> सपना, आज नवर्याने चेकने बँकेतून पैसे काढले.लवकर गेला होता.पैसे बदलले नाही,फार रांग नव्हती.
केमिस्टकडेपण चल्ताहेत जुन्या नोटा.मात्र खरेदी जास्तची ३००-४०० ची हवी.
सपना, आज नवर्याने चेकने
सपना, आज नवर्याने चेकने बँकेतून पैसे काढले.लवकर गेला होता.पैसे बदलले नाही,फार रांग नव्हती.>>>
मी आज नांदेड सिटीपासून एकेक ब्यांक चेक करत गेले. सगळीकडे रांगा लागल्या होत्या. आनंदनगरला पोहोचले. तिकडे आयडीबीआय ब्यांकेत पैसे संपले होते. उद्या या म्हणाले. मग परत आले.
सपना यांच्या प्रश्नावर एक
सपना यांच्या प्रश्नावर एक जुना किस्सा आठवला..

एक वयस्कर कमी शिकलेल्या आजी, बँकेत १०० रुपये घेऊन येतात आणि कॅशियरला सांगतात...
'मी बँकेत पूर्वी ठेवलेले १०० रुपये मला काढून द्या, आणि हे १०० रुपये बँकेत भरा'...
...
संटा बँकेत पैसे भरायला जातो,
कॅशियरः हे पैसे जमा करता येणार नाहीत, या नोटा खोट्या आहेत..
संटा: पैसे माझे, Account माझे... नोटा खर्या असोत किंवा खोट्या तॅणू की (तुला काय त्याचे) ?
नांदेडात ?
नांदेडात ?
वर बातम्या आल्या आहेत कि
वर बातम्या आल्या आहेत कि सोनारांनी सोनं चढत्या भावात विकुन ५००/१००० च्या नोटा जमा केलेल्या आहेत, अर्थात पावती शिवाय. तर मग हे वरचे जमवलेले पैसे परत सिस्टम मध्ये कसे येतील? सरकारची तीक्श्ण नजर अशा लोकांवर असणारंच आहे. जमीन, प्राॅपर्टिचे व्यवहारातहि तीच गत. खरोखर असे व्यवहार होत असतील तर हे लोक अशाप्रकारचा आतबट्ट्याचा व्यवहार का करत असतील?..
नांदेडात ? >>> अचे , त्या
नांदेडात ? >>> अचे , त्या न्यायाने मगरपट्टा काय मगरीच्या गळ्यात असणार आहे ?
आमच्या परिसरातले (गंगापूर रोड
आमच्या परिसरातले (गंगापूर रोड , नाशीक) बहुतेक सर्व दुकानदार (औषध , किराणा, बेकरी इ.) जुन्या ५०० / १००० च्या नोटा घेत आहेत अट एकच आहे ५०० च्या नोटे साठी ४०० रुपये खरेदी करायला लागेल (१००० च्या नोटे साठी ९०० ची खरेदी) आम्ही ३५०० च्या नोटा आज अशा बदलून घेतल्या ! ओळखीचा दुकानदर असेल तर क्रेडिट वर माल देत आहेत. अडचण फक्त भाजी मंडईत येत आहे.
राज, बॅकडेटेड पावत्या बनवणार.
राज,
बॅकडेटेड पावत्या बनवणार. अज्जुन पर्यंत भरले नव्हते बँकेत असे सांगणार. जो इन्कम टॅक्स होईल तो भरणार.
उगम दाखवू शकलात तर पेनाल्टी नाही. इन्कम टॅक्स जेवढा होईल त्याच्या कितीतरी पटीने जास्त आधीच खरेदीकरणार्याकडून घेतलेत.
जमवलेले पैसे परत सिस्टम मध्ये
जमवलेले पैसे परत सिस्टम मध्ये कसे येतील <<< जर कोणी असे करत असेल तर तो धंद्याच्या नावावर ते पैसे बॅंकेत जमा करू शकणार आहे, नाहीतर त्याला मोठे नुकसान आहे.. आता बॅंक किती खोलात जाऊन त्याच्या धंद्याची चौकशी करणार किंवा इनकम टॅक्स ऑडिट होणार का , हा प्रश्न आहे..
राज, सोनार लोक अॅडवान्स
राज, सोनार लोक अॅडवान्स बुकींगने सोनं उचलतात आणि मग यथावकाश पेमेण्ट करतात.
त्यातले जे ऑफिशीयल पेमेंट आहे ते ऑफिशीयल अकाऊंटवरून ट्रान्सफर किंवा चेकने करायचे असते आणि त्याला टॅक्स असतो.
तर अनऑफिशीयल पेमेंट काळ्या पैशांत, टॅक्स वाचवायला.
आता मागच्या महिन्यापासूनचे उर्वरित पेमेंट ऑफिशीयल पावत्या घेऊन भरतील आणि त्यावर जितका टॅक्स बसेल त्याच्या दुप्पट रिटर्न येईल याच्या हिशोबाने सोन्याचे दर अॅडजस्ट करून विकतील.
सोनारांना गिर्हाईकांकडुन
सोनारांना गिर्हाईकांकडुन पॅनकार्ड डिटेल्स घेणं कंपल्सरी केलयं ना ? मग त्यांना ती माहिती बँकेत भरणा करताना बंधनकारक असणार आहे.
केलं होतं. दोन लाखांच्या
केलं होतं.
दोन लाखांच्या वरच्या खरेदीला.
त्याविरोधात आंदोलन करून ते केव्हाच रद्द करण्यात आलंय.
कारण सोनं खरेदी करणार्या कित्येकांकडे पॅनकार्ड नसते.
आता परवापासून नव्याने कंपल्सरी केलं असेल तर माहित नाही.
५०० व १००० च्या नोटा प्रिंट
५०० व १००० च्या नोटा प्रिंट करणे कधी बंद केले ते शोधत होते पण तसे स्पष्ट काही मिळाले नाही.
१००० ची नवी नोट मे २०१६ मधे छापली होती.
आधीच ठरलेले असल्याने नवे स्टेन्सील नी नवीन छपाईचा खर्च कमी करायला हवा होता. किमान थोडी कपात तरी.
५०० व १००० च्या बर्याच नोटा गेल्या वर्षात छापल्या कारण एकूण नोटांची संख्या वाढलीय गेल्या वर्षीच्या तुलनेत.
या वर्षाचा विदा नाहीय तिथे उपलब्ध.
परत कंपल्सरी केलयं असं वाचलं.
परत कंपल्सरी केलयं असं वाचलं.
Pages