आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००० रुपयांच्या नवीन नोटा काढण्याचे मात्र पटले नाही...
कदाचितः हल्ली बाजारात गेलं की हजार / पाचशे सहज उडतात, त्यामुळे सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये म्हणून केले असेल पण माझा हिशोब वेगळा होता...

काही वर्षांपुर्वी मी एक जागा घेतली होती. त्यात बिल्डरने कितीतरी लाख रोख (कॅश) घेतले होते.
ते बँकेतून त्याच्याकडे न्यायला मला एक छोटी सूटकेस भरवी लागली होती. (१००० च्या नोटा).
आज तेच करावे लागले (१०० च्या नोटा) तर मला ट्रक बोलवावा लागेल.
आणि बिल्डरला हा काळा पैसा ठेवण्यासाठी वेगळी इमारत बांधावी लागेल.
हीच गत रजिस्ट्रेशन कार्यालयाची. साहेबासमोर बसायचे , सह्या करायच्या आणि हुण्डीत टाकल्यासारखे अमुक एक हजार त्याच्या ड्रॉवर मधे टाकायचे. (साहेब 'भ्रष्टाचार मना है' च्या पाटी समोर बसलेला असायचा).
आता तो पैसे घेऊ लागला तर त्यालाही पोत्यातून कॅश घरी न्यायला लागेल.
....
२००० ची नोट आली की परत असले व्यवहार सोप्पे होणार .. त्यापेक्षा २/४ वर्षे १०० च्या नोटेवर चालवले असते तर असल्या लोकाना आळा बसला असता का? की मी चुकीचा विचार करतोय.....

बरोबर विचार आहे. त्या २००० च्या नोटेने काय साध्य करायचे आहे याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
१००० चीच काढली असती. किंवा खरे तर ५०० च ओके होती. एक बंडल म्हणजे ५०,००० होतात. यावरचा व्यवहार मुळात रोखीने करायचाच का असतो?

आम्ही काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार साफ करायला १००० ची नोट बंद केली.

मग २००० ची का सुरु केली ?

कुठल्या डिनॉमिनेशनच्या किती नोटा वापरात आहेत याचा आर बी आय कडे हिशोब असतो. गेले काही दिवस
त्यापेक्षा कितीतरी जास्त नोटा चलनात असल्याचं नोटीस झालं होतं. या जास्तीच्या नोटा काऊंटरफिट असून त्या दहशतवाद्यांमार्फत देशात आणवल्या जातात. तर अशा काऊंटरफिट नोटा चलनातून बाद करण्यासाठी सुद्धा ह्या मोहिमेचा उपयोग होणार आहे. म्हणूनच त्याच डिनॉमिनेशनच्या नव्या नोटा नवी टेक्नॉलॉजी वापरुन नव्या रुपात छापल्या जातील.

कुणीतरी सांगाल का ?
यापुढे कार्डावर व्यवहार वाढतील का ?
पावत्या मिळतील का ?

ब्लॅकचा पैसा आता जर डिक्लेअर केला तर कुठून आला याची चौकशी होणार का ? इन्कम टॅक्स बरोबरच सेल्स, सर्विस आणि व्हॅट हे बुडाले असतील तर ते वसूल होतील का ? (इथून पुढे हे कर सरकारजमा व्हायला लागतील का ? )

एवढ्या सगळ्या लोकांची चौकशी करण्याइतपत मॅनपॉवर आयटी डिपार्ट्मेंट कडे नसावं , त्यामुळे अव्वाच्या सव्वा दंड आकारुन पैसे जमा करुन घेतले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत.

चौकशी सावकाशीनी होईल श्री. नो युअर कस्टमर (के वाय सी) सिस्टम खाली तुमच्या पॅन कार्ड वगैरेला जोडूनच अकाऊंट असणार. पुढच्या टॅक्स सीजनला नक्की ऑडिट फ्लॅग होणार जर त्यांनी अप्रोप्रियेट टॅक्स नाही भरला तर.
इथे अमेरिकेत नाही का? तुमचे सिडी (फिक्स डिपॉझिट), स्टॉक्स वगैरे असतील तर बँका तुम्हाला १०९९ पाठवतात? तो पुढे तुम्हाला फाईल करावा लागतो टॅक्स रिटर्न फाईल करताना. तुमचं इन्कम ब्रॅकेट त्या मिळकतीच्या हिशोबानी वर जातं.

श्री & बुवा,

जर बॅकानी टॅक्स कापला नसेल तर भारतात १०९९ सारखे कागद द्यायचे बंधन नाही . पण जर पॅन नंबर दिला असेल तर त्याबद्दल ची माहिती थेट आयकर विभागाला जाते. सरकारी आणि खाजगी बॅकाना ही माहिती पुरवणे बंधनकारक आहे. आपल्याला जर ही माहिती बघायची असेल तर आयकर संकेत स्थळावर जाउन Form26AS download केला तर त्या पॅन कार्डवर पुर्ण वर्षात किती व्याज मिळाले हे कळु शकते. ह्या फॉर्म वर किती कर भरला आहे, काम करणार्या कंपनीने , बॅका आणि ईतर लोकानी किती टॅक्स कापुन तुमच्या नावे भरला आहे आणि त्याचापासुन तुम्हाला किती पैसे मिळाले याची पण माहिती असते.

मागच्या वर्षापर्यन्त सहकारी बॅकाना ही माहिती न देण्याची सुट होती पण ह्या १ एप्रिल पासुन ही सुट रद्द केली आहे. (किती सहकारी बॅक पाळतिल हे मी पुढच्या वर्षी सांगिन). जर ३१ मार्च २०१६ पर्यन्त सहकारी बॅकात पैसे असले तर सरकारला कळणार नाही.

माझे वडिल कर सल्लागार आहेत आणि त्याचा मते ह्या Form26AS मधिल माहिती शक्यतो अचुक असते. ( I mean government & private bank inform income tax deparment most of the time. Sometime they do not inform if amount is small) ते नेहेमी Client ला ह्या फॉर्म वरुन किती अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे ते सांगतात. आजुन पर्यन्त आयकर विभागाने व्याजावर कर भरला नसेल किंवा बॅक बॅलन्स अचानक वाढला असेल तर त्यावर काही दंड लावला नाही पण त्याचाकडे ही सगळी माहिती असल्याने अश्या कर बुडव्याना कधीही स्क्रुटनी मध्ये आणु शकतात.

कदाचित सध्या कर बुडव्याना शोधुन काढायचे software नसेल . पण electronic data असल्याने हे काम नंतर पण करु शकतात.

साहिल शहा, ओके. आयकर खात्याला माहिती मिळते हे माहित होतं पण हे सगळे डिटेल्स माहित नव्हते. धन्यवाद.
मी आत्ताच वडिलांशी आणि एका मित्राशी बोललो, २.५ लाखाच्या वर अमाउंट टाकली आणि त्याचं इन्कम प्रुफ नसेल तर बेसिकली ते टॅक्स फ्रॉड करता २५० टक्के दंड आणि जेल टाईम पण आहे. आधी जी वॉल्युंटरीली डिक्लेअर करायची स्कीम आली होती ती शेवटची संधी होती काही प्रश्न न विचारता ४५% टॅक्स भरुन बाकी अमाउंट तुम्ही ठेवून घ्यायची.
आता तर अक्षरशः वाईट हालत झाली आहे ब्लॅक कॅश असलेल्यांची!! काहीच करता येणार नाही! जेल टाईम नको असेल तर पैसे डिक्लेअर न केलेलाच बरं.

५०, ००० रुपयाच्या वर सोनं खरेदी करताना पण पॅन कार्ड लागतं हे खरं आहे का? तसं असेल तर मग तर सोनं खरेदी हा पण ऑपशन बाद आहे.

५०, ००० रुपयाच्या वर सोनं खरेदी करताना पण पॅन कार्ड लागतं हे खरं आहे का? तसं असेल तर मग तर सोनं खरेदी हा पण ऑपशन बाद आहे. >>> बुवा, सराफ लोकं चापलूस असतात. ते तुम्हाला बिनपावतीचं सोनं जास्त दरानी विकतात. पावती हवी असेल तर टॅक्स पण भरावा लागतो. पॅन कार्ड्बद्दल माहित नाही.

२,००,००० रुपयाचा वर सोन खरेदी करताना पॅन कार्ड लागत. हा कायदा १ जानेवारी ला आला त्यासाठी सोनारानी १ महिन्याचा संप पण केला होता पण सरकारनी नमत न घेतल्याने दुकाने चालु केली. पण रोज १,५०,००० ची खरेदी केली तर नाही लागणार.

http://blogs.wsj.com/indiarealtime/2016/02/10/why-indias-jewelers-are-on...

पण हा पर्याय नवीन नोटा आल्यावर जो काळा पैसा जनरेट होईल त्याचा साठी . जुन्या नोटानी सोने घेउ शकत नाही. काही छोटे सोनार ४४००० रुपयानी विकतात पण त्याना ते पैसे बॅकेत टाकताना समस्या येउ शकतात.

सोन्यासाठी पण सरकार काहीतरी कायदा आणेल. सध्याचे सरकार ह्या बाबतीत खुप स्मार्ट आहे.

आज ndtv var aikale kee आजपासुन सोने घेताना पॅन द्यावा लागेल . खरे खोट माहित नाही.

क्रेक्ट आहे शुगोल ती चाप्टरी ते करतात.
पण पक्की पावती घेताना ५०,००० च्या वर बिल झालं तर आपल्याला पॅन कार्ड दाखवावं लागतं का हे ह्या करता विचारत होतो कारण ह्या घटकेला सोनाराला पण इंट्रेस्ट नसणार आहे ५००/१००० च्या नोटा घेऊन कच्ची पावती देण्यात कारण त्यांना तो काळा पैसा पुढे प्रोसेस करायला प्राबलेम निर्माण झालेत.

बुवा, काळा पैसा प्रोसेस करायला आपल्याला जेवढा प्रॉब्लेम येतो तेवढा सराफांना नाही येत. त्यांना अनेक पळवाटा माहित असतात.

सा. शहा म्हणतात तसं संपाबद्दल आठवतं आहे. ठराविक रकमेवरच्या विक्रीवर पावती द्यायला पाहिजे असा काही इश्यु होता. म्हण्जे पावती हवी असेल तर पॅन कार्ड दाखवावे लागत असेल, कदाचित.

रियल इस्टेटीवर कसा परिणाम होईल ह्या निर्णयाचा? असलेले फ्लॅट लोक विकायला काढतील किंमत कमी होऊ शकेल नंतर म्हणून? आणि तसे होणार असेल तर लोक आता किंमत कमी आहे म्हणून घेण्याचे ठरवतील? जर तसे झाले, तर पुन्हा जास्त लोक घेताहेत म्हणून पुन्हा किंमत वाढेल??

शुगोल, पार्शली ते बरोबर आहे. कसं आहे, कुठलाही बिझनेस असला की त्यांची ब्कॅकचा पैसा व्हाईट करायची कपॅसिटी जास्त असते. कारण पेपर वर तुम्ही लायाबिलिटिज दाखवून तो पैसा व्हाईट करता येतो. बिझनेस असला की नोकरांचे पगार (कागदोपत्री वेगळे, खरं खरं वेगळे), बिलं, गाड्या/ मशिन/सामग्रीचे डेप्रिसियेशन क्लेम करता येतं. आता हे जे सोनार लोकं ५००/१००० च्या नोटा स्विकारत आहेत त्यांच्या कडे ह्या अशा बाकी बिझनेस रिलेटेड लायॅबिलिटिजमुळे त्या ५००/१,००० च्या नोटा घेऊन तो इन्कम वैध आहे हे दाखवता येतं पण शेवटी त्याला पण लिमिट आहे.

स्नेहा, मला कॉमन सेन्सनी असं वाटतं की शेवटी घरांची किंमत वाढते कशी हे लक्षात घेतलं की लिंक लागते सगळ्याची. रियल इस्टेटला दिवसेन दिवस घेणेकरी वाढत चालले होते त्यामुळे किमती वर वर जात होत्या (हे बेसिक गणीत झालं, आता ह्यात बिल्डर लोकं मुद्दाम इन्वेन्टोरी दाबून ठेवतात भाव मिळायला वगैरे गोष्टी बाजूला ठेवू एक मिनिट). जसं वर सोनाराच्या उदाहरणामध्ये कच्ची पावती देऊन सोनार तुमचा टॅक्स वाचवतो तसच बिल्डर लोकं सुद्धा स्वतःचं इन्कम कमी दाखवण्यासाठी कागदोपत्री जागेची एक किंमत दाखवतात आणि उरलेली रक्कम कॅश मध्ये घेतात. समजा ५० लाखाच्या व्यवहारात समजा ३० लाख व्हाईट (ऑन पेपर भाव) आणि २० लाख ब्लॅक अशी जर बिल्डर नी घेतली तर तो सरकारला ३० लाखाचाच इन्कम दाखवणार.
आता असं आहे की सहसा ब्लॅक पैसे देताना सुद्धा कन्विनियन्सच्या हिशोबानी सगळे पैसे हे सगळ्यात मोठ्या नोटांचा आधार घेऊन केल्या जातात. आता ह्या नोटाच जर गायब केल्या तर जे लोकं ह्या नोटांनी ब्लॅक पैसा देण्याचा प्लॅन करत होते त्यांना ते करता येणार नाही.
तुम्ही म्हणाल की ते बंदोबस्त करु शकतील इतर नोटांमध्ये कनवर्ट करुन पण ते इतकं सोपं नाहीये सध्यातरी. (तो थोडा वेगळा विषय आहे कारण)
तर मग लोकांकडे ब्लॅकनी द्यायला पैसाच नाही सध्या तरी त्यामुळे ते रियल इस्टेट चे वाढिव भाव अफोर्ड (पेलु) शकत नाही आणि त्यामुळे शेवटी रियल इस्टेट मालकाला भाव कमी करावा लागेल.
आता भाव कमी झाला म्हणून कदाचित जास्त लोकं मार्केट मध्ये उतरतील घरं घ्यायला पण ते किती आणि कोण नेमके तेही बघावं लागेल. व्हाईट पैसा असलेले लोकं जर खुप उतरले तर भाव परत हळू हळू वर सरकेल पण असे किती लोकं तेही बघावं लागेल. आधीच आपल्याकडे खुप जास्त इन्वेन्टोरी झालीये घरांची त्यामुळे रियल इस्टेटचे भाव वर जातील ही शक्यता फार कमी वाटत आहेत पुढच्या काही वर्षांकरता तरी.

बुवा> +१

आणि भारतात जर तीन वर्ष भाव तेच राहिले तर बॅकेत मिळणारे व्याज जमेत घेता २५% नुकसान झालेले असते.

अत्ताच NDTV वर ५००/१००० रुपयाची होळी बघितली. काही नोटा पुर्णपणे जळल्या होत्या तर काही आजुन अर्धवट जळल्या होत्या. एक गरीब बाई छोट्या पिशवीत राख भरु न घेउन जात होती. आधीच दिल्ली मध्ये प्रदुषण भरपुर आहे त्यात आजुन भर.

सोन्यासाठी पण सरकार काहीतरी कायदा आणेल. सध्याचे सरकार ह्या बाबतीत खुप स्मार्ट आहे.>>>>>> हौ, हे पण एकलं काल. कॅश बरोबरीनी सोनं एक वेड्यासारखं होर्ड करतो आपण! मला वाटतं लार्जेस्ट इम्पोर्टर आहोत आपण सोन्याचे! इकडे अमेरिकेत वगैरे सोन्याचा भाव काहीच वाढला नाही तूलनेत!
इथे अमेरिकेत मागच्या ३० वर्षांमध्ये सोनं एक आउन्स (२८ ग्रॅम) हे साधारण $१,००० पासून आजच्या दिवसाला $१,२७३.५ ला आहे.

भारतात १९८६ पासून Rs. 2,140.00 प्रती तोळा (१० ग्रॅम) पासून आजचा रेट रुपये ३२,००० आहे. :बाबो:
गोल्ड डिगर्स! Proud

आत्तच मटा मध्ये वाचले... काही छोटे सोनार ४०-५०००० हजाराच्या भावाने सोने विकतायेत आणी कमी किमतीची दिवाळीच्या वेळीची पावती बनवुन देतायेत

Pages