Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36
आज मध्यरात्रीपासूनच!
लागला घोडा काळ्या पैश्याला
- श्री नरेंद्र मोदी !!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असे भारतभर कितिकसे
असे भारतभर कितिकसे असतील?
स्मित मागच्या २-३ वर्षांपासून फ्लॅटचे भाव म्हणाल तसे वाढत नाहीच आहेत, स्टेडीच आहेत मी तर म्हणेन. इट्स कमिंग.
yeah it might happen but real estate market can be spooky and unpredictable especially in a country like india..many many factors can influence it including international events . So a single move is not going to reverse it, other factors have to be aligned too. त्यामुळे उगाच इथे 'मोदींच्या या मुव्हमुळे जागांचे भाव पडणारच' असे ठरवणे आणि मग ते नाही पडले किंवा पडून पुन्हा वधारले तर 'मोदींचीच चूक आहे' म्हणून त्यांना दोष देत बसणे असे करणार्यांना आधीच डिस्क्लेमर देऊन ठेवावा लागतो. नाहीतर हे लोक तुम्हालाच रोज 'जागांचे भाव कधी पडणार' म्हणून पिरपिर करतील.
साती जी, येस आम्ही इडली -
साती जी,
येस आम्ही इडली - चटणी व्यवसाया ची रितसर पावती देतो, अगदी मागीतली नाही तरी , नाशकात येता ? किती डॉकटर दाखवू जे रिसिट नाही देत, एकट्या गंगापूर रोड भागात ५०+ निघतील , आहे तयारी खरे खोटे करायची ? कधी येताय ? ? . आणि माझ्या उत्पना वर जो लागू असेल तो कर भरतो.
मी कार्ड स्वाइप मशीन केव्हाही बसवू शकतो पण आमची ९९ % ट्रन्झाक्शन १५, ३० रुपये अशी असतात इतक्या लहान ट्रान्झक्शन ला कार्ड वापरणे अव्यवहार्य आहे . जर एखादे बिल २०० पेक्षा जास्त असेल तर कार्ड चा व्यवहार योग्य ठरेल. जर आमचा व्यवसाय त्या पातळीवर पोचला ( २०० पेक्षा जस्त रकमेची बिले ५०% पेक्षा जास्त) जर मी अगदी आनंदाने कार्ड सिस्टीम बसवून घेईन त्यात काय मोठे !
डबल पोष्ट म्हणून डिलीट केली
डबल पोष्ट म्हणून डिलीट केली
अडीच लाखाहून जास्तीची रोकड
अडीच लाखाहून जास्तीची रोकड बँकेत भरताना तिचा सोर्स ऑफ इन्कम विचारला जाणार. काळा पैसा बाळगणारे महाभाग ही रक्कम भरताना तिचा इन्कम सोर्स "भास्कर वाघ" थिअरीनुसार सांगतील अशी एक शक्यता वाटते.
जागांचे भाव कमी कसे होतील ?
जागांचे भाव कमी कसे होतील ?
काळा बाजारवाल्याचा काळा गेला तरी पांढराही पैसा असेलच ना ?
मुळात रिअल ईस्टेट्मध्य
मुळात रिअल ईस्टेट्मध्य ईनवेस्ट्मेन्ट बरेच जन रोख व्यवहार करुन काळा पैसा गुंतवतात.... मग जर तो पैसाच नही राहीला तर मग गुंतवनार काय...
पांढर्या पैस्या वर कर भरायची प्रव्रुतीच नसते आणी तो असा लपवायची गरजपण नसते
अंजली , ज्या नोटा बदलून
अंजली , ज्या नोटा बदलून मिळतात त्याबद्दल नाही, माझा प्रश्न ज्या नोटा आता सर्क्युलेशनमधून अनरेकग्नाईज्ड निघून जातील त्यांबद्दल आहे. >>> साती त्या नोटा बाथरुममध्ये दाबुन ठेवलेल्या असतिल तर सर्क्युलेशन मध्ये कशा येतील ? अनलेस तो प्रॉपर्टी विकत घेतो किंवा इलेक्शन मध्ये वाटतो पण दोन्ही केस मध्ये अजुन ब्लॅक मनी जनरेट होतो आणि पुढील व्यवहारासाठी परत बाथरुममध्ये लपवुन ठेवला जातो.
जर १०००,५०० आणि शिवाय २००० च्या नोटा पुन्हा बाजारात आणणार आहेत तर मग पुन्हा एकदा काळा पैसा निर्माण होणार नाही याची काय खात्री? >>> अजुन ५ वर्षांनी परत ह्या नोटांवर बंदी आणली तर परत एकदा ब्लॅक मनीवाल्यांचे धाबे दणाणतील आणि नाईलाजाने का होईना लोक व्हाईट मनी ट्रांझॅकशन्ला सुरुवात करतील.
काही जणांना असाही फटका
काही जणांना असाही फटका बसलाय...
एका कुटूंबाने अगदी दिवाळीच्या आसपास त्यांचा २ बेडरुमचा फ्लंट विकला , दुसरा मोठा ३ बेडरुमचा फ्लॅट घेण्या साठी... ....विक्री रेकनर भावा नुसार २२ लाखाची झाली ..वरचे २५ लाख ब्लॅक ने घेतले. नवा फ्लॅट ची खरेदी १५ नोव्हेंबरला होणार होती !
नोटा रद्द झाल्या ! आता या २५ लाखाचे काय करायचे? कुटूंब प्रमुखाला काल मोठ्या दवाखान्यात अॅडमीट केले आहे , हृदयविकाराचा धक्क! काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी लाख -लाख रुपये बदलून द्यायची तयारी दाखवली , त्यातून १०- १५ लाख व्हाईट होतील पण उरलेल्या रकमेचे काय?
लोक बाथरूममध्ये कसा काय पैसा
लोक बाथरूममध्ये कसा काय पैसा लपवतात?? नोटा भिजत अथवा दमट हवेमुळे बुरशी पकडून वाया नाही जात का?? पावसाळ्यातच अगदी महिनाभरच माझ्या कपाटात ठेवलेल्या नोटाही बुरशी पकडून आजारी झाल्या होत्या.
मी आज बँकेत न जाता पोस्टातून पैसे काढून आणले. तिथे तुलनेने फारच कमी गर्दी होती. तासाभरात काम झाले.
वरचे २५ लाख ब्लॅक ने
वरचे २५ लाख ब्लॅक ने घेतले>>>>
तुम्ही कशाचे समर्थन करत आहात ?
फरहान अख्तर सांगत होता की
फरहान अख्तर सांगत होता की सिंगल स्क्रीन वाल्यांनी कार्द पेमेंटवर कन्विनियन्स फी माफ केलीय काही दिवसांसाठी. रॉकऑन २ रिलीज होतोय आजच, पुढे नाही ढकलला. दुसरा कुठलातरी पुढे ढकलला लोकांकडे तिकीटाला पैसे नसतील म्हणून.
ओ प्रकाशजी , मी कोणाचेही
ओ प्रकाशजी ,
मी कोणाचेही समर्थन केलेल नाही , तसे कोठे दिसतेय? मी एक घटना जी माझ्या परिचयाच्या घरात घडली आहे ती जशीच्या तशी सांगीतली आहे बस्स ! उगाच चुकीचा अर्थ काढू नका , माझी पोष्ट नीट वाचली असती तर लक्षात आले असते ..असो...
प्रकाश काळेल | 11 November,
प्रकाश काळेल | 11 November, 2016 - 03:47 नवीन
वरचे २५ लाख ब्लॅक ने घेतले>>>> तुम्ही कशाचे समर्थन करत
आहात ?
>>> काळेल, साहेब स्थावर मालमत्तेचे ९९ व्हवहार रेकनरपेक्षा जास्त किंमतीचेच होतात हे तुम्हाला माहीत नाही काय..
छान चर्चा. बर्याच जणांनी
छान चर्चा. बर्याच जणांनी नेमके कळीचे मुद्दे सांगितलेत. especially वैद्यबुवा.
असं ऐकलं की ४४००० तोळ्यानी सोनं विकलं गेलं. मग सोनार लोक हे पैसे/इन्कम कसे डिक्लेअर करतील? मला असं विचारायचं आहे, की ३२००० तोळ्या ऐवजी कोणी ४४००० ने सोनं विकलं आणि तसंच बँक कडे डिक्लेअर केलं तर काही अडचण नाही येणार का?
सुलक्षणा, याविषयी देखील
सुलक्षणा,
याविषयी देखील बर्याच जणांनी लिहीलय आधी, ते वाचा.
वाचलं. पान नं. १० वर.
वाचलं. पान नं. १० वर.
नोटा रद्द झाल्या ! आता या २५
नोटा रद्द झाल्या ! आता या २५ लाखाचे काय करायचे? कुटूंब प्रमुखाला काल मोठ्या दवाखान्यात अॅडमीट केले आहे , हृदयविकाराचा धक्क! काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी लाख -लाख रुपये बदलून द्यायची तयारी दाखवली , त्यातून १०- १५ लाख व्हाईट होतील पण उरलेल्या रकमेचे काय? >>
सुहास जर मिळणारी रक्क्म नवीन घरात गुंतवणार असेल तर अगोदरचा २२ लाखांचा व्यवहार रद्द करा आणी नवीन व्यवहार ४७ लाखांचा करा आणि झालेला नफा नवीन घराच्या खरेदीव्यवहारात दाखवा. ही माहिती सीए करुन खातरजमा करुन घ्या.
The limit to exchange old
The limit to exchange old notes of Rs 500 and Rs 1000 is Rs 4000 till further review by the RBI and NOT per day as has been misunderstood by some people.>>
असे वाचले. आता मज्जा.
याचा अर्थ ४००० वरती कॅश असेल तर ती तुमच्या खात्यातच जमा करावी लागणार. त्यापेक्षा जास्ती पैशाची गरज असेल तर आपापल्या खात्यातुन काढा.
अगोदरचा २२ लाखांचा व्यवहार
अगोदरचा २२ लाखांचा व्यवहार रद्द करा आणी नवीन व्यवहार ४७ लाखांचा करा>>४७ लाख नाही हो. रेकनरप्रमणे जी किंमत असेल त्यालाच व्यवहार करावा लागेल.
तसेच व्यवहार रद्द करायला दुसरा २बिएच्के घेणारा तयार होईल का? तयार झालाच तर तो नाही अॅटॅक येऊन पडणार.
होच की मग. चेक देऊन एका वेळी
होच की मग.
चेक देऊन एका वेळी दहा हजार काढता येते कॅश.
The limit to exchange old
The limit to exchange old notes of Rs 500 and Rs 1000 is Rs 4000 till further review by the RBI and NOT per day as has been misunderstood by some people.>>
असे वाचले. आता मज्जा.
याचा अर्थ ४००० वरती कॅश असेल तर ती तुमच्या खात्यातच जमा करावी लागणार. त्यापेक्षा जास्ती पैशाची गरज असेल तर आपापल्या खात्यातुन काढा. >>>> असे काही नाही ईकडे बर्याच लोकांनी काल्पण ४००० बदलली आणी आजपण
सुहासजी, नोटा रद्द झाल्याची
सुहासजी, नोटा रद्द झाल्याची घोषणा ऐकल्याऐकल्या माझ्या मनात ह्याच लोकांचा विचार आला होता. बाकीची लोकं जी इन्कम लपवून ठेवतात, कर भरत नाहीत त्यांच्याविषयी कळवळा वाटण्याचे काहीच कारण नाही पण ह्या लोकांची गोष्ट वेगळी आहे.
आजच्या घडीला मुंबईतल्या वन बीएचके घरांच्या किंमती दीड कोटीच्या आसपास किंवा जास्त जातात आणि बिल्डिंग खूप जुनी असली तर बँक लोन देत नाही किंवा फारच कमी किंमतीचे लोन देते. रेडी रेकनरची प्राईस खूप कमी येते त्याचाही लोन मिळण्यावर परिणाम होतो ( ह्याचा अर्थ ते जास्त किंमत लावत असतात असे मुळीच नव्हे. बिल्डिंगच्या वयाप्रमाणे त्या भागातले फ्लॅट उतरत्या भाजणीने विकले जात असतात. उदा. नवीन बिल्डिंग वन बीएचके दोन कोटी, पंधरा वीस वर्षे जुनी पावणे दोन तर पन्नास वर्षं जुना असलेला फ्लॅट एक पस्तीस ते पन्नासमध्ये जात असतो आणि रेडी रेकनर ९५ लाख किंमत दाखवतो ! )
विकणारी माणसं मराठी मध्यमवर्गीय, त्यांना फ्लॅट विकून ठाण्यात-पुण्यात-नाशकात त्यांच्या मुलांजवळ हलायचे असते. विकत घेणारा बहुतेकदा गुजराथी. तो गुजराथी असेल नसेल तरी काही लाख रक्कम ब्लॅकने घ्यावीच लागते. पटत नसलं तरी नाईलाज होतो ! ( कारण ज्येष्ठ नागरीकांना घर विकण्याची निकड झालेली असते ) पुढे दुसरे घर घेताना बिल्डर आनंदाने हे ब्लॅक पैसे स्वीकारतोच.
आमच्या ओळखीतल्या प्रत्येक व्यवहारात हेच होत आलेलं आहे. आत्ता ह्या घडीलाही फ्लॅट विकला गेलाय, कॅश हातात आलीय पण नवीन घर घेतलेलं नाही अशी बरीच मराठी मध्यमवर्गीय पांढरपेशी लोकं असतील पार्ला-दादर एरियात. दुसर्या शहरात हलायचं असेल तर विकणे आणि विकत घेणे ह्यामध्ये वर्षभराचीही गॅप जाऊ शकते. ही सगळी एरवी पांढरपेशी, आयुष्यभर प्रामाणिकपणे कर भरलेली लोकं सिस्टिमची बळी ठरली असतील का ?
होच की मग. चेक देऊन एका वेळी
होच की मग.
चेक देऊन एका वेळी दहा हजार काढता येते कॅश.>>
http://economictimes.indiatimes.com/wealth/personal-finance-news/exchang...
या बातमीनुसार काही लोकांना वाटतंय रोज सकाळी उठायचे ४००० घ्यायचे व बदलुन आणायचे. ४०००*५० दिवस असे निदान २ लाख तरी बदलुन मिळतील. तर तसे नसुन ४००० बदली बाकीचे खात्यात टाका.
अगो, असेच काहीसे उदाहरण मी
अगो, असेच काहीसे उदाहरण मी काल ऐकले. मात्र ज्याचे नुकसान झाले त्याला मी ओळखत नाही. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही.
अगोदरचा २२ लाखांचा व्यवहार
अगोदरचा २२ लाखांचा व्यवहार रद्द करा आणी नवीन व्यवहार ४७ लाखांचा करा>>४७ लाख नाही हो. रेकनरप्रमणे जी किंमत असेल त्यालाच व्यवहार करावा लागेल.>>
असा काही कायदा नाही. घर विकत घेताना आपण खरेदीखत आणि स्टॅम्पडुटी भरतो. जर रेडीरेकनर
पेक्षा घ्रराची किंमत जास्त असेल तर घर विकणारा नफेवरचा टॅक्स भरतो. जर घर खरेदी करणार्याने अगोदरचे २५ लाख बॅकेतून काढले असतील तर त्याला डिपॉझीटला काही प्रॉबलेम येणार नाही.
वैद्यबुवा वा ईतर, चर्चा
वैद्यबुवा वा ईतर,
चर्चा चांगली चाललेली आहे. नेहेमी प्रमाणे ह्या धाग्याचा सत्यानाश झाला नाही ही जमेची बाजु आहे.
फ्लॕट विकत घेणारे सुद्धा बॕक मनीच्या निर्माण करण्यात हातभार लावत असतात. विकत घेण्याच्या मुळ किंमती पेक्षा कमी किंमत दाखवल्याने स्टँप ड्युटी कमी बसते पण बाकी राहीलेली रक्कम बॕक
मध्ये द्यायला लागते.
राजु 76 एकदा डिल मधला कॕश
राजु 76
एकदा डिल मधला कॕश पार्ट दिलाकी लगेच आॕफिशियल सेल डिड ऐक्झेक्युट करतात कारण कॕश ट्राँझॕक्शन झाल्याचे प्रूफ नसतात.
त्यामुळे वरच्या उदाहरणात पैसे परत करून डिल करता येणार नाही.
जुन्या घरांच्या / प्लॉट च्या
जुन्या घरांच्या / प्लॉट च्या खरेदी विक्रित मोठ्या प्रमाणात म्हणजे सुमारे ५०% भाग हा ब्लॉक मनी असतो. याला दोन करणे आहेत"
१> दुसर्या व्यवसायातून निर्माण झालेला काळा पैसा पार्क करायला
२> सरकारी स्टॅप डुटी (विकत घेणार्याला) आणि कॅपीटल गेंस टॅक्स ( विकणार्याला) कमी करण्यासाठी .
म्हणूनच मी लिहले आहे त्या व्यवहारात..
ज्याने तो बिएचके फ्लॅट घेतला त्याने कदाचित त्याचा ब्लॅक चा पैसा गुंतवण्यासाठी घेतला असले कोण सांगावे.
दुसरे म्हणजे २५ लाख ब्लॅक ने देऊन (हे चांगले नाही हे आधीच जाहीर करतो गैरसमज नको) विकत घेणार्याने २५ लाखाच्या ५% म्हणजे १,२५,००० स्टॅप डुटी वाचवली आहे , विकणार्याने २५ लाखावरचा होणारा कॅपीट्ल गेन टॅक्स जो १०% फ्लॅट रेट ने २,५०,००० असू शकतो तो वाचवला आहे.
महाराष्ट्रात सगळ्यात जास्त स्टॅप डुटी आहे , ती जर रिझनेबल ठेवली असती १- २ % तर कदाचीत व्यवहारतला ब्लॉक चा हिस्सा कमी झाला असता. घराच्या विक्रि वरचा कॅपीटल गेन टॅक्स सुद्धा जास्त आहे, ज्या व्यक्तीचा घरे घेणे - विकणे असाच व्यवसाय आहे त्याला या दराने जास्त टॅक्स लावणे समजता येते पण उन्ह्या आयुष्यत असा एकमेव व्यवहर करणार्याला हा कर असह्य वाटतो आणि म्हणुनच तो ब्लॅक ने पैसे घेण्याचा मार्ग (नाईलाजाने) स्विकारतो.
कर असूद्या पण तो कमी ठेवले लोक कर भरायला तयार होतील,
व्यवहार रद्द करा अशी सुचना देणार्यांनी फारसा विचार केलेला नाही किंवा घराचे व्यवहार कसे होतात याची त्यांना कल्पना नाही असेच म्हणावे लागले.
एकदा सेल्स डीड झाले की ते रद्द होत नाही , त्यामुळे व्यवहार रद्द होणार नाही. व्यवहार रद्द करायचा झाला , वादा साठी असे होते हे मान्य करुन, तरी ज्याने फ्लॅट विकत घेतला तो फ्लॅट परत करेल पण तो त्याचे ब्लॅक चे पैसे परत मागेल पण तसे करताना तो आता चलनातून रद्द झालेल्या नोटा का स्विकारेल, तो म्हणेल नवीन २००० च्या नोटा द्या ! आता या नोटा कोठून आणायच्या कारण हाततल्या २५ लाखाच्या जुन्या नोटा या बेहिशोबी आहेत हीच तर अडचण आहे ना !
दुसरे म्हणजे व्यवहार रद्द करणे म्हणजे पुन्हा नव्याने एक सेल्स डीड करावे लागेल म्हणजे परत ६% स्टॅम्प ड्युती बसेल , आता जो फ्लॅट परत करेल त्याला २०% दराने कॅपीट्ल गेंस टॅक्स बसेल (कारण दोन्ही वुवहार एकाच आर्थिक वर्षात होत आहेत) या जादाचे नुकसान कोण सहन करणार?
सुहासजी सुरवातीच्या कॉमेंट
सुहासजी सुरवातीच्या कॉमेंट मध्ये मी पण हीच प्रतिक्रिया दिली होती आधी ( पान नंबर ४ )
<<ज्यांनी जस्ट आता आता प्रॉपर्टी चे व्यवहार केलेत आणि रेजिस्ट्रेशन व्हायच्या आधी ब्लॅक मनी ज्यांच्या घरात गेल्याच आठवड्यातच आला आहे त्यांची खरी पंचाईत आहे .परत बिल्डर्स लोकांची पण हीच पंचाईत होईल . आणि मुंबई सारख्या शहरात प्रॉपर्टी चे ब्यवहार झाले तर भरपूर काळा पैसा घरात येतो>>
या सगळ्या गोष्टीं मधून मी गेले आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारातला जो ब्लॅक मनी असतो तोच तुम्ही दुसरा फ्लॅट खरेदी करताना ब्लॅक म्हणूनच देता. पहिला फ्लॅट विकल्यानंतर दुसरा खरेदी करायचा असला तरी ३ ते ४ महिन्याचा अवधी जातोच जातो . त्या मधल्या काळात (दोन -तीन- चार महिने )तो तुमच्या कडेचा असतो दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात जाण्याच्या प्रतीक्षेत . नेमके त्याच वेळी हा दणका बसला तर प्रचंड धक्का बसू शकतो
इथे कुणी कोणाच समर्थन करत नसत . हा फ्लॅट च्या खरेदी विक्री व्यवहारातला सिस्टीम ( पद्धत )चा भाग झाला. सिस्टीम प्रमाणे वागावं लागत. नाही वागलात तर तुम्हाला कधीच प्रॉपर्टी खरेदी करायला नको. बिल्डर कडे जाऊन सांगा पूर्ण ( १००% ) व्हाईट ने खरेदी करणार फ्लॅट . तयार होईल तो ? अतिशय दुर्मिळ बिल्डर्स असू शकतील
आज चार हजार रूपये मिळाले
आज चार हजार रूपये मिळाले ....यिप्पी !!!
Pages