आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लो कल्लो बात. त्या हरिनामे ताईंनी काय लिहिलं ते वाचा जरा.

तुम्हाला माझ्याच वैतागाचं भारी टेन्शन ब्बा! शेवटचा प्रतिसाद लिहिल्याविना ते जाईना. Want to have the last word. Lol

तुमच्याकडल्या इलेक्शन रिझल्ट्सचं काय झालं?

मोदींन्च्या नावाने अन "सर्वसामान्य/वंचित/बहुजन" वगैरेंच्या निमित्ताने उठसुठ गळे काढणार्‍यांना भोकाड पसरायला अजुन एक निमित्त मिळाले. Proud

काल माझ्या खिशात शब्दशः दोन अडिचशे रुपये, रात्री साडेदहाला कळले की नोटा बॅन, एटीएमला गेलो तर तिथे भल्या मोठ्या रांगा, मग मुकाट परत फिरलो, पुढचे दोनतिन दिवस खिशात एक पैसाही नाही असे धरुन चाललो आहे, काय फरक पडत नाही,होईल थोडी अडचण, पण निर्णय झकास... त्यामुळे तक्रार दु:ख रडणेभेकणे वगैरे नाही.
अन खिशात रोख चलन नसताना बाजारात/शेजार्‍यापाजार्‍यात्/नातेवाईकात माझी "पत " किती ते देखिल येत्या दोनतिन दिवसात आजमावुन बघता येणार आहे हा दुहेरी फायदा Wink
मज्जा आहे..... मी एंजॉय करतोय...!

कुणाला कशाचं आणि लिंब्याला उधारीचं !

काँग्रेसवाल्याना काळा पैसा लपवायला हजाराच्या नोटा लागत होत्या.

आता आम्ही भाजपावाले ते काम दोन हजाराच्या नोटाने करू.

मी काढलेला अर्थ

काही वृत्तपत्रांनी ५०० व हजाराच्या नोटा रद्द करण्याविषयी गेल्या वर्षीपासून लिहायला सुरुवात केली होती. अर्थक्रांतीची चळवळ होतीच. शिवाय संघाशी संबंधित काहींनी या बाबतीत जोर धरल्याचंही ऐकलं होतं. मोदींनी सप्टेंबरानंतर 'माझी जबाबदारी नाही' हे सांगितलं होतं. शिवाय गेल्या आठवड्यापासून नव्या नोटांची चित्रंही फिरत होती. त्यामुळे सर्वसामान्यांना हा धक्का असला, तरी ज्यांना खरंच पैसा लपवायचा असतो, त्यांनी व्यवस्थित सोय करून ठेवल्याची शक्यता आहे.

पुण्याबाहेरून येणार्‍या बातम्यांनुसार पैसा लपवणारे आणि जाहीर न केलेल्या पैशावर व्याज देणारे काही निश्चिंत आहेत.

मोदींनी आधीच सांगितलं होत काळा पैसा डिसक्लोज करा नाहीतर जरुरी ती ऍक्शन घेतली जाईल.
आता घेतली ऍक्शन. लोक दोन दिवस कुरकुर करतील .कुठलीही गोष्ट अंगिकारण्यासाठी सुरवातीला त्रास होतोच . आणि या निर्णयाच कौतुक पण खूप होत आहे नक्कीच . दोन हजारच्या आणि ५०० च्या नवीन नोटा बाजारात आजपासूनच येत आहेत असं बातम्यात ऐकलं. पाचशेच्या नवीन नोटेचा रंग बदललेला आहे आणि गांधीजींच चित्र मधोमध आहे हा फरक आहे . नोटेच्या पाठीमागच चित्र पण बदललेलं आहे Happy

चिनुक्स, तेच तर. कसंही, कुठूनही गरीब सामान्यच मरणार! आता जोक फिरत आहेत 500 का 100 वगैरे. लबाड्या करणाऱ्यांना आयतं कुरण गावलंय असं म्हटलं तर शंका नको.
कित्येकांना ठाऊकच नाही अजून काय नेमकं ते.
सुशिक्षित, व्यवहारी दृष्टिकोन असणारे तरतील पण इतरांचं काय?

नोटेच्या पाठीमागच चित्र पण बदललेलं आहे स्मित >>> हो ५०० च्या नोटमागे लालकिल्ला तर २००० च्या नोटेमागे मंगळयान आहे

मलातर बिच्चार्या ब्रांचवाल्यांची दया येतेय खासकरुन कॅशियरची..... नशिब आम्ही बॅक ऑफिसमध्ये आहोत

तेच तर चिनूक्स. मार्केटमध्ये हे होणार याची कुणकुण होती. कोणत्या तारखेपासून होणार हे माहित नसले तरी लवकरच हा निर्णय घेतला जाईल हे माहित असल्याने ब्लॅक मनी वाल्या बड्या प्लेयर्सनी आधीच सोय केलेली असणार.

Congress was using 500 notes for black money

Bajpeyee came and started 1000 notes

Then bjp went.

Congress continued with 1०००

Then Modi started 2000...

What will be the future ?

कुणकुण लागली तरी काय सोय करणार? जाउन बँकेत भरणार की ताबडतोब सोनं, जमीन खरेदी करणार? बँकेत तर शक्य नाही त्यामुळे उरले काय तर सोनं आणि रियल इस्टेट जे दोन्हीही तितके सोपे मार्गं नाहीयेत.

२००० चं पेट्रोल टाकलं काल.पेट्रोल पंप वाला ५०० १००० १५०० २००० च्या पटीत पेट्रोल टाकू देत होता.
बाकी बरेच व्यवहार कार्डावर होत असल्याने आणि दिवाळी बक्षिस घेऊन सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्स नी खिसा रिकामा केलेला असल्याने काही फरक पडणार नाही.
कामवल्यांना वगैरे एज्युकेट करणे चालू आहे.तसेही पैश्याशी संबंधित बातम्या लवकर पसरतात.त्यामुळे बर्‍याच जणांना माहिती झाले आहेच.
हा निर्णय ज्यासाठी घेतला आहे तो उद्देश सफल व्हावा आणि कमीत कमीत लोकांना त्रास व्हावा.मोठ्या बदलांनी थोडा त्रास होतोच.बट चेंज इज ओन्ली कॉन्स्टंट थिंग.
मोदी सरकार ला आणी बँक वाल्यांना सर्व निभावून न्यायला शुभेच्छा.

हा निर्णय ज्यासाठी घेतला आहे तो उद्देश सफल व्हावा आणि कमीत कमीत लोकांना त्रास व्हावा.मोठ्या बदलांनी थोडा त्रास होतोच.बट चेंज इज ओन्ली कॉन्स्टंट थिंग.
मोदी सरकार ला आणी बँक वाल्यांना सर्व निभावून न्यायला शुभेच्छा.>>>>> +१००००००

निर्णयाचे स्वागत. काही दिवस त्रास नक्की होईल. पण कॅश डीलिंग कमी झाले तर बरेच होईल. माझ्याकडे पण शंभरच्या दोन नोटा, काही चिल्लर व सोडेक्सो पास आहेत. फारशी खरेदी करणार नाही.
पेट्रोलचा प्रश्न नाही. घरा पासून रिक्षा नाही मिळाली तर बस किंवा चालत हपीस परेन्त असे पर्याह ५००पलब्ध आहेत.

चुकून किल्ली विसरली हरवली तर म्हणून मी माझ्या कुत्रा फिरवण्याच्या बॅगेत शंभर रुपये लपवून ठेवते.
ते हाताशी आहेत स्पेअर कॅश. फक्त जे विद्यार्थी हॉस्टेल मध्ये आहेत ते दिवाळीत घरी आले होते व त्यांच्या हात खर्चा साठी पैसे ते १००० ५०० च्या नोटांमध्ये दिलेले आहेत. मुले कसे मॅनेज करतील ते बघावे.

विदाउ ट बिलाचा धंदा करणारे व करबुडवे लोकांच्या घरी व कपाटात जे कॅश च्या थप्प्या असतात त्या लगेचच वर्थ्लेस झाल्या आहेत ते बघून आनंदच झाला. निवडणुकीच्या आधी जी कॅश सर्क्युलेट होते त्यालाही पायबंद बसेल.

बँकांमधली गर्दी कमी झाली की हातातल्या नोटा भरून येइन. त्या ही फार नाहीत. हात खर्चाला पैसे काढलेले तेव्ढेच आहेत. बघु या.

आज नारळपाणी घेउन येणार्‍या मुलाचा चेहरा पडला होता. मी आजचे पैसे देउन बंद केले. त्यात एक शंभराची नोट गेली. काही पैसे परतही आले. अशांना त्रास जास्त होईल. धोब्याचे पैसे महिना अखेर द्यावे लागतात. एक लॉट आहे तो घेउन ते ही बंद केले तर बरे पडेल. मग रेगुलराइज झाले की परत सुरू करता येइल.

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेक, इ वॅलेट हे पर्याय उपलब्ध आहेत. सोडेक्सो पण आहे.

एक आवडले की दिवाळी, खरेद्या उरकल्यावर हा निर्णय लागू केला आहे. नाहीतर पंचाइत झाली असती.

वैद्य बुवा +१११
कुणकुण कधी पासून लागली होती ? आधी सोय करून ठेवली असणार म्हणजे काय असत ते. . फार फार तर सोन खरेदी करू शकतात . आणखीन काय ? ते कोणीच बोलत नाहीये नुसतच सोय केली असणार / सोय केली असणार इत्यादी इत्यादी Happy

>>> कुणकुण लागली तरी काय सोय करणार? जाउन बँकेत भरणार की ताबडतोब सोनं, जमीन खरेदी करणार? बँकेत तर शक्य नाही त्यामुळे उरले काय तर सोनं आणि रियल इस्टेट जे दोन्हीही तितके सोपे मार्गं नाहीयेत. <<<
वैद्यबुवा, माझ्या आठवणीप्रमाणे सहा ते आठ महिन्यांपूर्वीच ५,०००/१०,००० रक्कमेच्या नोटा निघणार, (अगदी त्याचा आकार काय असावा.. वगैरे चर्चाअ) अशीही भुमका उठवली गेली होती, ती बरे सगळेजण सोईस्कर विसरताहेत? असो.

आंधळे मोदीविरोधक याहुन वेगळे काय बोलणार म्हणा?

बाकी कुणकुण लागली असे गृहित धरले (तसे ते कॉन्गीराज्य असते तर गृहितच धरणे भाग पडते म्हणा Wink ) अन सोने वा रियल इस्टेट मधे घातले पैसे, तरी कुठे ना कुठे ते पैसे नोटा स्वरुपातच आहेत. अन सोने एनकॅश करु म्हणाल तर ते देखिल आता शक्य नाही, रियल इस्टेटीचे दर कोसळू लागल्यावर, वा महागडे दरांना गिर्‍हाईकच न मिळाल्यास ते काय चाटायचे आहे?
त्यामुळे हा दणका सॉलिड बसलेला आहे. तेव्हा आंधळ्या कॉन्गी/लाल बावट्यांचा थोडा फार थयथयाट होणारच...

तिकडे अमेरिकेत कोण निवडुन येतय, वा कॉन्ग्रेसचे नवे अध्यक्ष कोण बनतय या बातम्या पार रसातळाला गेल्यात... ! Proud

मी फक्त अचानक निर्णय घेतल्याने धक्का दिला असं जे म्हणत आहेत त्यासंदर्भात लिहिलंय. गेल्या तिनएक महिन्यांपासून चर्चा चालू होती याबद्दल.

कसलीही कुणकुण बिणकुण नाही , जबरी प्लानिंग होतं , एवढ्या प्रचंड मोठ्या निर्णयात इतकी टाईट सिक्रेसी .............. हॅट्स ऑफ मोदी आणि त्यांच्या टीमला.
सोनं खरेदीत प्रचंड वाढ किंवा प्रॉपर्टी खरेदीत प्रचंड वाढ असलं काहीही मागील ४-५ महिन्यांत वाचायला मिळालं नाहीये त्यामुळे सोय करुन ठेवलीय म्हणण्यात काही अर्थ नाही.

आता लगेच जनधन अकाउंट्स चा ग्राफ पहिला पाहिजे.
Sudden increase in deposits, sudden overseas transfer असे ट्रेंड्स नक्की दिसतील.
निदान 30 dec पर्यंत तरी डेली बॅलन्स मॉनिटर करता आला तर बऱ्याच गोष्टी काळतील
RBI च्या म्हणण्या नुसार मिनिमम 25-40 %अकाउंट्स डुप्लिकेट/फेक आहेत.

>>>> कसलीही कुणकुण बिणकुण नाही , जबरी प्लानिंग होतं , एवढ्या प्रचंड मोठ्या निर्णयात इतकी टाईट सिक्रेसी .............. हॅट्स ऑफ मोदी आणि त्यांच्या टीमला.
सोनं खरेदीत प्रचंड वाढ किंवा प्रॉपर्टी खरेदीत प्रचंड वाढ असलं काहीही मागील ४-५ महिन्यांत वाचायला मिळालं नाहीये त्यामुळे सोय करुन ठेवलीय म्हणण्यात काही अर्थ नाही. <<<<

अगदी बरोब्बर.... !

RBI च्या म्हणण्या नुसार मिनिमम 25-40 %अकाउंट्स डुप्लिकेट/फेक आहेत.>> टोटल किती अकाउंट्स उघडले गेले होते?

भारत सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. मध्यमवर्गाला थोडे दिवस त्रास सहन करावा लागणार हे नक्की. पण आज ट्रेन, बस आणि ऑफिसमध्ये जी चर्चा चालू आहे त्यानुसार बहुतेकांची हा त्रास सहन करण्याची तयारी आहे. आणि लोक सरकारच्या निर्णयावर समाधानी आहेत. पण गरीब वर्ग ज्यांचे हातावर पोट असते त्यांची गैरसोय होणार हे नक्की आणि त्यांच्या हालअपेष्टांत आणखी वाढ होईल. कित्येकांचे स्वतःचे बँक अकांऊंट नसते त्यांच्यासाठी सरकारने काही तरी पर्यायी व्यवस्था करावी ही अपेक्षा आहे.

कित्येकांचे स्वतःचे बँक अकांऊंट नसते त्यांच्यासाठी सरकारने काही तरी पर्यायी व्यवस्था करावी ही अपेक्षा आहे.>> पोस्ट ऑफिसात पण मिळतिल नोटा बदलून. ४००० पर्यंत कॅश बदलता येईल.. त्यापेक्षा जास्त असतिल तरच बॅंकेत डिपॉझीट करायचे. आजच्या दिवस कदाचीत त्रास होईल.

माझी एक शंका आहे. उद्यापासून बॅंकेतून पैसे काढण्यावर लिमिट आहे ना? ती फक्त वैयक्तिक अकाउंटना आहे कि व्यावसायिक अकाउंटना सुद्धा?

Pages