आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तसेच वर्षानुवर्षे जे पैसे घरी साठवत आले आहेत ( व्हाइट मनी देखील ) तो पैसा बँकीग व्यवस्थेमध्ये येऊ शकेल.
तीच तर गम्मत आहे. म्हणजे बँकांना, सरकारला बराच पैसा मिळू शकेल एकदम, जो अन्यथा सहज मिळाला नसता.

आणखी एक मुद्दा, नवीन नोटा आधी तयार करायच्या आणि त्या उपलब्ध करून मग निर्णय जाहीर करायचा असे का नाही केले ? त्याने एक दोन दिवस होणारा गोंधळ आणि हाल तरी वाचले असते लोकांचे.

अंजली, भारताच्या लोकसंख्येच्या लोकसंख्येची बरीच मोठी टक्केवारी हे लो इन्कम असलेल्या लोकांनी भरलेलं आहेत. रोजच्या व्यवहारात ५०० च्या नोटा येतात पण बरेससे व्यवहार त्या पेक्षा खालच्या नोटा वापरुनच होतात. थोडक्यात मजॉरिटी ऑफ जनतेला सध्या बाजारात पुरेश्या १००, ५०, २० वगैरेच्या नोटा येऊ पर्यंत त्रास होणार आहे पण खुप असा लाँग टर्म त्रास होणार नाही. सध्या काहीतरी खटपट करुन असतील त्या नोटा बदलून आणाव्या लागतील.

बापरे खूपच पोस्ट झाल्या ईथे. अपेक्षितही होतेच. व्हॉटसप फेसबूक पेटलेय नुसते. सध्या सामान्य माणसांना याचे नक्की काय फायदे तोटे होतील आणि मुळात कोणाचे फायदे तोटे करायला हा निर्णय घेतलाय हे अजून समजत नाहीये. आणि कोण्या अर्थतज्ञांचीही पोस्ट तटस्थ असेलच का हे सांगता येत नाही. तरी कोणाच्या वाचण्यात कुठे चांगले लेख आले तर शेअर करा.

पण एक मात्र आहे, बातमी ऐकताच आता सारा काळा पैश्याचा समुद्र बाहेर येईल असे जे मला कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे वाटलेले अगदी तसे होणार नाहीये हे आता भावनेचा आवेग किंचित ओसरल्यावर जाणवतेय. म्हणजे मोठ्या खेळाडूंकडे असलेला मेजॉरटी पैसा तर चलनी नोटांपलीकडे सुरक्षित गुंतवला गेला असणार याचे आकलन झालेय. त्यामुळे आता या गदारोळामुळे होणारे नुकसान / मनस्ताप तसेच हे राबवताना सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा, विरुद्ध प्रत्यक्षात बाहेर पडणारा काळा पैसा तसेच खोट्या नोटा यांचा हिशोब जेव्हा लागेल तेव्हाच काय ते नक्की अभिप्राय देता येईल.

एका गोष्टीचे मात्र कमाल आणि कौतुक वाटते, की बातमी फारच लपवून अचानक बॉम्ब टाकावे तशी आज फुटली. अगदी सर्जिकल स्ट्राईक च..

नाही म्हणायला गेले काही दिवस २००० च्या नोटेचे कौतुक व्हॉटसपवर फिरत होते मात्र ५००-१००० च्या नोटा बाद होणार याची खबर ना या कानाला खबर ना त्या कानाला.. प्रत्यक्षात हे कोणाकोणाला ठाऊक असावे याचा तर्क करणे मात्र ईंटरेस्टींग.

अरे हो, ते २००० च्या नवीन नोटांमध्ये काहीतरी टेक्नोलॉजी आहे की ज्याने त्या ट्रेस होतील वगैरे मेसेज व्हॉट्सपवर फिरतोय ते खरे आहे का? पुढे काळा पैसा निर्माण होऊ नये म्हणून अशी काही काळजी घेतली जाणार असेल तर ते एक जबरी काम ठरेल..
बाकी उद्या बघूया आणखी काय हाती लागते..
तुर्तास शुभरात्री Happy

तुर्तास शुभरात्री >> हुश्श !!! १२ तासांची निश्चिंती बगूनाना Lol

अवैध केलेल्या नोटांच्या रुपात किती काळा पैसा आहे ह्याबद्दल कुठे वाचले असल्यास कृपया लिंक द्या.

असामी,
काळा पैसा किती आहे माहित नाही, पण चलनात बर्‍याच नोटा होत्या.
http://money.cnn.com/2016/11/08/news/economy/india-rupee-notes-ban-curre...

The Reserve Bank of India (RBI) estimates that there are 16.5 billion 500 rupee notes and 6.7 billion 1000 rupee notes currently in circulation.

ती लिंक मी पण पाहिलेली अंजली , एव्हढा निर्णय घेताना काहितरी अभ्यास केलेला असणारच म्हणून माहितीसाठी विचारत होतो.

>>आज मात्र हजारपाचशेची नोट कुणाकडेही असू शकते. कामवाल्या बाया, सफाई कर्मचारी, गवंडी, मिस्त्री, वॉच् मन, भाजीवाले, फेरीवाले वगैरे. या सगळ्यांना महिनाभर त्रास होणार.

खरंय .. या लोकांना जमेल तशी योग्य माहिती पुरवली गेली तर त्रास कमी होईल.

>> दुर्गम भागात जर ही बातमी पोचली नसेल आणि त्याचे महत्त्व समजले नसेल तर तिथल्या लोकांची नाडणूक, लुबाडणूकही होण्याची शक्यता आहे.

हे कसे थांबवता येईल ?

मध्यंतरी वोल्युनटरी डिस्क्लोजरची स्कीम आणली होती त्यात फार नव्हता आला वाटतं पैसा बाहेर. आता म्हणजे अशी टेढी केलीये उंगली की काढावाच लागेल बाहेर नाहीतर खरच शेकोटी, भेळ वगैरे ला वापराव्या लागतील नोटा.
कसं आहे, सगळच जाण्यापेक्षा टॅक्स गेलेला बरा, उरलेले आपल्याला ठेवता तरी येतील ह्या विचारानी बदाबदा बाहेर येतील. दुसरं काही करुच नाही शकत.

काळा पैसा कितपत बाहेर येईल कुणास ठावूक पण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे. सीमेपलिकडची मंडळी आणि त्यांचे देशातले साथीदार यांची पंचाईत होणार आहे.

...

This is a good move, but I am sceptical. The Janata Government too had taken the same step in 1978 to curb black money. It did not succeed. Arthakranti had been demanding that Rs. 500 and 1000 currency notes be rendered invalid since last many years. They had made several other important suggestions which have been ignored.

I see no point in introducing Rs. 2000 notes if the main intention was to curb black money. The very idea that people tuck away their black money inside pillow cases is naive.

I also suspect that spending will take a hit for a long time and prices will spike.

Could somebody please explain what a 'micro nano GPS chip' is?

भविष्यात कर्ब होईल की नाही त्याबद्दल नाहीये हे कारण ज्यांनी १०००/५०० च्या नोटा साठवल्या, ते पुढे २,००० च्या पण साठवतीलच. पण ह्या घटकेला जो पैसा अडकून आहे लोकांकडे तो बाहेर येऊन सरकारला मिळणे आवश्यक आहे. थोडया दिवसांकरता म्हणजे नोटांचा सप्लाय नीट होउ पर्यंत गडबड होईल आणि भाजी पाला, इतर किरकोळ कन्सुमर गोष्टींचे भाव वाढू शकतील लोकल लेवलला पण ओवरॉल पुढे डिफ्लेशनरी इफेक्ट येइल बहुतेक खासकरुन रियल इस्टेट प्रायसेस ना. ब्लॅक मनीनी पैसे देणारे घेणेकरी कमी झाले की आपसुक भाव घसरतील रियल इस्टेटचे.

आणि हो भरपूर काळा पैसा घरात, तिजोर्‍यांमध्ये, इकडे तिकडे लपवून ठेवलेला असतो हे आजिबात नाईव नाहीये. यु आर बिईंग नाईव बाय सजेस्टिंग दॅट इन फॅक्ट.

भरपूर काळा पैसा घरात, तिजोर्‍यांमध्ये, इकडे तिकडे लपवून ठेवलेला असतो हे आजिबात नाईव नाहीये.>>> +१

इन्कम टॅक्सेसच्या धाडी पडतात त्याबद्दलच्या बातम्यांमधे लाखांमधे/कोटींमधे कॅश सापडल्याचा उल्लेख असतो, तो खरा नसतो का?

सध्याच्या १००० आणि ५०० च्या नोटांसारख्या बनावटी नोटा करणे फारच सोपे आहे, त्यामुळे खूप सार्‍या बनावट नोटा देखील चलनात आहेत, असे RBI म्हणते आहे. नविन २००० ची नोट कॉपी करायला सोपी नाही. असेही त्यांचे म्हणणे आहे. पण मला २००० च्या नोटा आणायची गरज नाही, असे वाटते.

असा धक्कादायक निर्णय घेणे आणि अंमलबजावणी करणे मात्र आवडले.

ज्यांनी जस्ट आता आता प्रॉपर्टी चे व्यवहार केलेत आणि रेजिस्ट्रेशन व्हायच्या आधी ब्लॅक मनी ज्यांच्या घरात गेल्याच आठवड्यातच आला आहे त्यांची खरी पंचाईत आहे .परत बिल्डर्स लोकांची पण हीच पंचाईत होईल . आणि मुंबई सारख्या शहरात प्रॉपर्टी चे ब्यवहार झाले तर भरपूर काळा पैसा घरात येतो Happy

भरपूर काळा पैसा घरात, तिजोर्‍यांमध्ये, इकडे तिकडे लपवून ठेवलेला असतो हे आजिबात नाईव नाहीये.>>> +१
<<ज्यांना खरेच पैसा कसा लपवायचा ते माहित्येय त्यांनी तो ऑलरेडी व्यवस्थित लपवलाय, चलनी नोटांपलीकडच्या माध्यमांत.>> चलनी नोटांपलीकडच्या माध्यमांत म्हणजे कसा ?सोन खरेदी करता येईल एवढा समजलं. ज्यांनी आधीच एक घर विकून आलेल्या पैशातून (ब्लॅक मनी सकट ) मधून दुसरं घर घेतलाय ते सुटले . आणखीन कसा जरा सांगणार का साती ?

याचा यू टर्न कधी येणार ते पहायचे.

दरम्यान माझ्या दीड-दोनशे किलो नोटांचं काय करायचं ते पहातो. Wink

>>याचा यू टर्न कधी येणार ते पहायचे.>> म्हणजे घूमजाव? तो कसा काय? म्हणजे नक्की काय?
वॉट्सॅपवर जोक फिरत होता. ज्या लोकांच्या घरी रात्री लाईट ऑन दिसेल ते लोकं नोटा मोजतायत असं समजायचं. Proud
तुम्ही का बरं जागे?

म्हणजे आता क्रेडिट कार्ड वापरणार्‍यांचे प्रमाण वाढणार! सोयीचे पडेल ना.
नि शंभराच्या बनावटी नोटा करणेहि वाढणार.
नि समजा दोनशे रु. सुटे नसतील तर २०० रू. साठी २००० रु. ची नोट द्यायची. म्हणजे बरोबर एक पिशवी घेऊनच बाहेर पडावे लागणार, सगळ्या नोटा ठेवायला. म्हणजे पूर्वी चिल्लर नाही म्हणून एक दोन रु. परत आले नाही तरी चालेल असे म्हणणारे लोक आता चिल्लर नाही म्हणून १८०० रु ऐवजी १५०० रु. च घेतील का? शंभराच्या नोटां निदान पाचपट संख्येने छापाव्या लागतील.

मज्जा करा.

तुम्ही का बरं जागे?
<<
नोटा मोजत होतो.

यू टर्न म्हणजे, या डिसिजनचा यू टर्न. काहीतरी लोचा/जुमला येईल लवकरच.

शहा, गडकरींना ऑलरेडी २००० हजाराच्या नोटा पोहोचल्या असतील. त्यातून मला किती मिळतात ते पहातोय. २०० किलो ची सोय झाली ऑलरेडी. बाकी ३-४शे किलो नोटांचं काय करावं हा विचार करतोय.

धन्य आहात तुम्ही झाडू. तिकडे ते शेंडॅनक्षत्रं अन इकडे तुम्ही. अशक्य कान्फिडन्स असतो, समोरचे किती करप्ट आहेत त्याबद्दल.
Lol

अच्छा, असं होय. पण हा निर्णय काँग्रेसने घेतला असता तर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा आणि तिचा नवरा ह्यांनाही तसेच पैसे आधीच पोचले नसते का? तात्पर्य काय तर सगळ्या पार्ट्या सारख्याच. कुणी जास्त, कमी नाही. Happy

सायो,
सोनिया प्रियंकाना काहीच फरक पडत नाही. माझ्यासारखा ग्राउंड लेव्हल कार्यकर्ताही दोन्ही कडुन सेफ असतो. तेव्हा३ तुम्ही टेन्शन घेउ नका.
झाली सोय माझी. झोपा आता निवांत.

दोन दिवस बँक बंद ?
मी तर काल दिवसभर घरातले सामान लावण्यात बिझी होते. कसलीच कल्पना नाही. परवा एटीम मधून पैसे काढलेत सुतार, इलेक्ट्रीशियन्स यांना द्यायला. ते पाचशेच्या नेटांतच आहेत.

आता एटीम मधून पण शंभरच्या नोटा संपल्या आहेत. भाजी आणायची म्हटलं तरी शक्य नाही. पेट्रोल पंपवर कार्ड्स तरी स्विकारतात,पाण कार सीएनजीवर आहे. तिथे कार्ड घेत नाहीत. पाचशेच्या नोटाही नाहीत चालणार... त्यातून नवरा परगावी आहे. त्याचं कसं होईल ? सगळं ठीक आहे एव्हढंच बोलतो तो.

टेण्शनच आलंय. दोन दिवस काय करायचं ? पोस्टात बदलून देतील की फक्त आहेत त्या नोटा स्विकारणार आहेत ? सरकारने देशहितासाठीच निर्णय घेतला असणार तरी पण सरकारनेच आता घरोघरी फिरून पाचशेच्या नोटा घेऊन शंभरच्या द्याव्यात.

>>सायो,
सोनिया प्रियंकाना काहीच फरक पडत नाही. माझ्यासारखा ग्राउंड लेव्हल कार्यकर्ताही दोन्ही कडुन सेफ असतो. तेव्हा३ तुम्ही टेन्शन घेउ नका.
झाली सोय माझी. झोपा आता निवांत.>> सोनिया प्रियांकांना फरक पडत नसेल तर मग शहा, गडकरींना नक्कीच पडत असेल असा ओव्हर कॉन्फिडन्स का? आणि मी टेन्शन घेते असाही गैरसमज का झाला तुमचा?

धाडसी व चांगला निर्णय. शिवाय अचानक जाहीर केल्याने अजूनच परिणामकारक. लोकांना थोडासा त्रास व गैरसोय होईल पण कुणी फारशी कुरकुर करणार नाही.

दोन हजाराच्या नव्या नोटा बाजारात आणणे हेही योग्यच आहे. चलनवाढीमुळे शंभर रुपये ही तशी फार मोठी रक्कम उरलेली नाही लोकांना उगीचच फुगलेल्या खिशाने वा नोटा भरलेल्य शबनम बॅग्स घेऊन इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा हे बरे.

सार्वत्रिक निवडणूकांच्या वेळेला जीडीपी वाढत असतो कारण एरवी उमेदवाराच्या घरातच पडूनअसणारा पैसा बॅनर्स, पोस्टर्स वगैरे साठी खर्च होतो. आताही निदान थोड्या प्रमाणात तसे होईल. काळा पैसा बाळगून असणारे लोक नाईलाजाने का होईना खर्च करतील.

राजकारण ही पर्सेप्शन ची लढाई असते व काळ्या पैश्या विरुद्ध उचललेले धाडसी पाऊल असे पर्सेप्शन निर्मण करण्यात मोदी सरकार प्रथमदर्शनी यशस्वी झाले आहे. संजय झा सारखी बळंच ओढून ताणून टीका करण्यात अर्थ नाही.

लोकांना थोडासा त्रास व गैरसोय होईल पण कुणी फारशी कुरकुर करणार नाही. >> ???

शंभरच्या नोटा नाहीत. पाचशेच्या काढून बसलेय. नवीन घरात शिफ्ट झाल्याने ओळखी नाहीत फारशा. कोण पाचशेच्या नोटा घेणार माझ्याकडून ? आणि जे परगावी गेलेत त्यांची फजिती नाही का ? बँका बंद ठेवायच्या ऐवजी पाचशेच्या नोटा बदलून घेणा-यांचं रेकॉर्ड ठेवायचं होतं (किंवा ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बदलून घेणा-यांचे व्यवहार पॅन कार्ड किंवा आधार कार्डशी लिंक करायचे होते ).

जुन्या घरच्या दूधवाल्याचे महिन्याचे पैसे, इस्त्रीवाला, क्लासेसचे पैसे हे सगळे देण्यासाठी पाचशेच्या स्वरूपात काढलेत. आता दोन दिवस हे पैसे बदलता येणार नाहीत आणि कुणी माझ्याकडून घेणार पण नाही. तिकडे सासू सास-यांना औषधासाठी पैसे लागणार आहेत. सात तारखेला पाचशेच्या नोटात पेन्शन आणलीय. त्यांचं कसं होणार ? प्रत्येकाला काही न काही प्रॉब्लेम्स येतील दोन दिवस. मला आज मुलांना डब्यावर द्यायला आहे, उद्या काय करायचं ?

सोनिया प्रियांकांना फरक पडत नसेल तर मग शहा, गडकरींना नक्कीच पडत असेल असा ओव्हर कॉन्फिडन्स का?
<<

शहा गडकरींची सोय आधीच झालीय हो. सोनिया प्रियंका इ.ना देखिल फरक पडणार नाही. त्रास सामान्य लोकांनाच होणार आहे, हे सांगतोय.

तुम्ही फारच टेन्शन घेता बुवा.

तुम्हीच उगा टेन्शन घेऊन बसलायत. कुणालाच काहीच फरक पडत नाही आणि ज्यांची व्हायची आहे त्यांची सोय झालीये ना, मग इकडे वैताग काढून काय मिळणार? सामान्य माणसांचं काय ते कळेलच हळूहळू.

Pages