Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36
आज मध्यरात्रीपासूनच!
लागला घोडा काळ्या पैश्याला
- श्री नरेंद्र मोदी !!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिल्मी, थेअरी ह्या पेपर आणि
फिल्मी,
थेअरी ह्या पेपर आणि पुस्तकातच असतात ना? आणि अजून त्याचा नक्की परिणाम काय आहे ते न जाणताच विरोध का करायचा?
असो.
रत असेही कित्येक उद्योग अजून आहेत जिथे कॅश व्यवहारच चालतो. >> तेच मुळात बंद पडणे हे ध्येय आहे असे मला वाटते. प्लास्टिक मनीला चालणा मिळाली की काळा पैसा आपोआप कमी होईल.
अंजली तेच लिहायला आलो होतो.
अंजली
तेच लिहायला आलो होतो.
गुगल आम्हालाही करता येतं. उगं आपलं येउन आपल्याला फार समजतं अशी विधानं करायची.
अन प्रॉपर्टी विक्री खरेदी करताना ब्लॅक्॑चा पैसा काय चेक नी घेतात/देतात का मग?
करोडोच्या प्रॉपर्टी घेताना कित्येक पैसा ब्लॅक असतो, १०००, ५०० च्या नोटा. आता कसं मॅनेज करणार? आता पर्यंत साठलेल्या पैशाचं काय करणार?
म्हणजे ५०० आणि १००० च्या
म्हणजे ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी नको होती असं म्हणताय का तुम्ही, विद्या? > मला म्हणायचे आहे की जे अतिशय श्रिमन्त झाले आहेत आता त्याना या नोटान्च्या मुळे काही फरक पडणार नाही.
बाकी किती फरक पडणार आहे हे मोजता आले पाहीजे तरच उप्योग आहे. खोट्या नोटाचा वापर करता येणार नाही ही एक चान्गली गोष्ट आहे.
साती म्हणाली ते बरोबर आहे, इतक्या १०० च्या नोटा आहेत का बाजारात? हा प्रश्न आहेच. केवळ सावळा गोन्धळ नको.
विद्या.
काँग्रेस करणं शक्य तरी आहे
काँग्रेस करणं शक्य तरी आहे का?
१९७०-८० मध्ये कधीतरी केले होते इदिरा गांधी आणि यशवंत राव चव्हाण या दोघानी मिळुन १००० रुपया च्या नोटावर वर बंदी आणली होती. एका माणसा कडुन फक्त ३ नोटा बॅक / पोस्ट स्विकारत होते. तेव्हा बर्याच लोकाने १००० रुपयाची नोट देवळात दानपेटीत टाकल्या होत्या
लोकांना वाटतं की एखाद्या
लोकांना वाटतं की एखाद्या घराची ऑन पेपर किंमत ५ लाख असेल आणि खरेदी करणारा १० लाख देऊन पाच लाखांचा टॅक्स वाचवत असेल तर तो काळा पैसा आहे. हे प्रत्येकवेळी बरोबर असेलच असे नाही.
कारण पैसा कमावताना खरेदीदाराने घाम गाळलेला असतो.
अर्धा पैसा खरा दिलेलाही असतो पण टॅक्स वाचवायला बाकीचे पैसे ऑट ऑफ ऑथराईज्ड वे दिलेले असतात.
पण खरा काळा पैसा वाले या ऐवजी बार्टर मेथड करतात.
म्हंजे पाच लाखाचं (ऑन पेपर) घर तू घे आणि पाच लाखांची (ऑन पेपर किंमत) जमीन मला दे.
यात कुठेही मनी ट्रान्सेक्शनच नाही.
किंवा वर्षानुवर्षे प्रॉपर्टी खरेदीदाराच्या नावावर जातही नाही.
अश्या कित्येक प्रॉपर्टीज असतात जिथे त्यांचे उत्पन्न वेगळ्यालाच असते आणि ऑन पेपर मालक वेगळाच.
(आम्हालाही 'लहानपणी' ग्रे मार्केट म्हणजे क्रॉफर्ड जवळ्चं मनिष मार्केट किंवा महालक्ष्मीचं 'हिरापन्ना' एवढंच माहित होतं. डोळे उघडल्यावर ग्रे इज अॅक्च्युअली मोअर ग्रे आणि ब्लॅक इज व्हेरी व्हेरी ब्लॅक हे कळलं.)
ज्यांना खरेच पैसा कसा लपवायचा
ज्यांना खरेच पैसा कसा लपवायचा ते माहित्येय त्यांनी तो ऑलरेडी व्यवस्थित लपवलाय, चलनी नोटांपलीकडच्या माध्यमांत.>>> बरोबर. तरीही ५०० आणि १०००च्या रूपात जो काही लपवला गेला असेल, तो बाहेर येईल. त्याची टक्केवारी नक्की किती असेल माहित नाही. शिवाय जो काळा पैसा देशाबाहेर गेला आहे, त्याचं काही करता येणार नाही. पण खोट्या नोटांना आळा बसेल. अजूनही भारतात ५०० आणि १०००च्या माध्यमात बराच काळा पैसा असावा.
विद्या, निर्णय घेण्यापूर्वी रीझर्व बँकेशी सल्ला मसलत केली असणार. १०० किती नोटा आहेत त्याचा अंदाज घेतला असेल की. शिवाय गोंधळ नको म्हणून दोन दिवस बँका बंद आहेत. काही दिवसांसाठी गैरसोय होणारच. पण निर्णय देशहिताचा असेल तर नागरीक कुरकुर करणार नाहीत.
असो. याहून जास्त समजावणे मला
असो.
याहून जास्त समजावणे मला शक्य नाही.
याहून जास्त समजावणे मला शक्य
याहून जास्त समजावणे मला शक्य नाही.>>> बरं.
बाय द वे तू डोळे का मारतेस सारखे?
बरोबर. तरीही ५०० आणि १०००च्या
बरोबर. तरीही ५०० आणि १०००च्या रूपात जो काही लपवला गेला असेल, तो बाहेर येईल.>>>
हे फार जर तर आहे. तुम्हीच यादी काढा ओळखीच्या लोकांची ज्यांत काळा पैसा असणारे किती असतील आणि या निर्णयाने त्रास होणारे किती?
बेसिक विचार हरवतोय काय लोकांचा?
बाय द वे तू डोळे का मारतेस
बाय द वे तू डोळे का मारतेस सारखे? >>+1
तुम्हीच यादी काढा ओळखीच्या
तुम्हीच यादी काढा ओळखीच्या लोकांची ज्यांत काळा पैसा असणारे किती असतील आणि या निर्णयाने त्रास होणारे किती?>>> आमच्या ओळखीच्या लोकांकडे काळा पैसा नाहीये. काळा पैसा जवळ बाळगण्याइतपत पैसा जवळ असता तर भारतातच राहिलो असतो.
आईवडिलांशी, सासू सासर्यांशी बोलले तेव्हा थोडी गैरसोय होईल म्हणाले. पण तक्रार काहीच नव्हती. मी काळजी दाखवली तर होईल गं दोन -तीन दिवसात सुरळीत म्हणाले, काही त्रास नाही असंही.
कारण मला आणि या पलीकडे
कारण मला
आणि
या पलीकडे दुसर्या स्मायली देताच येत नाहीत.

अरेरे फार दुर्दैवी आहे हे
अरेरे फार दुर्दैवी आहे हे

उद्या अनेक लोकांचे फार हाल होणार आहेत. विशेषतः ज्यांच्याकडे कसलीही कार्डस नाहीत आणि आज जे लोक पैसे काढू शकणार नाहीत अशा गरीब लोकांचे जास्त हाल आहेत.
>>ज्यांना खरेच पैसा कसा लपवायचा ते माहित्येय त्यांनी तो ऑलरेडी व्यवस्थित लपवलाय, चलनी नोटांपलीकडच्या माध्यमांत.
वेल सेड साती, आय अॅग्री हिअर. काळा पैसा हा परकीय चलन, सोने आणि स्थावर मालमत्ता यात जास्त आहे.
५०० आणि १००० च्या चलनात ठेवणे म्हणजे येडेपणाच ठरेल. समजा असलाच तरी त्याचे प्रमाण जास्त नसणार.
या प्रकाराने नक्की कोणत्या प्रकारचा काळा पैसा कसा आणि किती प्रमाणात बाहेर येईल हे कोणी क्लिअर करेल का ?
तसेच नवीन नोटा येणार आहेत ५०० आणि २००० च्या, त्यामुळे अजुन जास्त काळा पैसा जमा होऊ शकणार नाही का ? खोट्या नोटा कमी होतील असे म्हणत असतील तर ते एका मर्यादेपर्यंत मान्य होऊ शकते.
मी नेमका संध्याकाळी एटीएम मधुन १००० काढले, ५०० च्या दोन नोटा आल्या आणि येऊन पाहिले टिव्हीवर तर ही बातमी.
>>साती | 8 November, 2016 -
>>साती | 8 November, 2016 - 14:12
अंजली , आप एकवेळ हे करेल.>> आप ने केलं असतं तर कौतुक केलं असतं की नाही?
लेखक महोदय, कृपया शिर्षक
लेखक महोदय, कृपया शिर्षक लेखातली दुसरी ओळ बदलावी ही नम्र विनंती.
साती, स्मायलींची माहिती इथे
साती, स्मायलींची माहिती इथे आहे बघ.
आमच्या ओळखीच्या लोकांकडे काळा
आमच्या ओळखीच्या लोकांकडे काळा पैसा नाहीये. >>
सेम हियर. आणि असे असंख्य असतील. इथे शहरात प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक मनी वापरणे आणि खेड्यापाड्यांत खरा पैसा वापरने यात फरक आहे हो.
कुणाला त्रास देतोय हा निर्णय? कोणासाठी?
महेश! खरंय. पण तुम्ही हल्ली
महेश!
खरंय.
पण तुम्ही हल्ली भारतात जास्त रहाता ना जपानपेक्षा त्यामुळे तुम्हाला माझ्यासारखंच नीटसं काही कळत नसणार.

अंजली, ती माहिती वापरूनही मला
अंजली, ती माहिती वापरूनही मला नाही देता येत.
आणि
बरंय.
आणि मग 'हगलो' 'हहगलो' असं काहितरी विचित्र होतं.
त्यापेक्षा
सायो,
आपने केलं असतं तर कौतुक केलं असतं हो. (पण म्हणजे मी मिर्ची नाही!)
साहिल शहा ,
सध्याचा काँग्रेस म्हणतेय हो.
इंदिरा गांधींनी बरंच काय काय केलं.
त्यांचे मापदंड सध्याच्या काँग्रेसला काय लावणार?
फिल्मी, कुणाला त्रास देतोय हा
फिल्मी,
कुणाला त्रास देतोय हा निर्णय? कोणासाठी?>>> तुमचा ५०० आणि १०००च्या नोटा बंद करण्याला विरोध आहे असं गृहित धरते आहे. निर्णयाच्या बाजूने बोलणार्य बर्याच पोस्ट वाचल्या. माझं व्यक्तिशः मत बाजूनेच आहे. मी मोदी भक्त वगैरे नाही, पक्ष - व्यतीच्या पलीकडे जाऊन देश हितासाठी काय चांगले असाच नेहमी विचार असतो. पण दुसरी बाजू तटस्थपणे मांडणार्या पोस्ट - एकही वाचली नाही. कुठलंही राजकारण, पक्ष, व्यक्ती मधे न आणता बॅलस्डं पोस्ट कुणी लिहीली तर वाचायला, माहिती करून घ्यायला आवडेल.
>>पण तुम्ही हल्ली भारतात
>>पण तुम्ही हल्ली भारतात जास्त रहाता ना जपानपेक्षा त्यामुळे तुम्हाला माझ्यासारखंच नीटसं काही कळत नसणार.

मला वाटले इकडे पण डोळा मारणार
असो, जोक अपार्ट,
खरी गेम वेगळीच आहे असे कळत आहे. बँकांकडे लिक्विडिटी कमी आहे ती भरून काढायची ही एक युक्ती असावी.
या नोटा अवैध नाही होणार, तर कॉलबॅक केल्या आहेत. त्याचा बँका, सरकार, उद्योग, इ. ना उपयोग होईलच ना.
माझी माहिती आणि ज्ञान या विषयात खुप नाहीये, पण जे काही ऐकत आहे त्यावरुन हा निर्णय फार चांगला असेल असे वाटत नाहीये. आगे आगे देखते हैं होता हैं क्या ?
>>सायो, आपने केलं असतं तर
>>सायो,
आपने केलं असतं तर कौतुक केलं असतं हो. (पण म्हणजे मी मिर्ची नाही!)>> कोण मिर्ची?
मुद्दा हाच आहे की आपण सपोर्ट करत असलेल्या पक्षाने असा काही धाडसी निर्णय घेतला की कौतुक नाहीतर शिव्याशाप.
हातात असलेल्या ५००,१००० च्या नोटांना अचानक काही किंंमत न राहिल्याने बर्याच लोकांची गैरसोय होणार आहे हे उघडच आहे आणि कुठल्याही देशातली लोकं अशा तडकाफडकी निर्णयाने पॅनिक होऊन आणखीच गोंधळ वाढवतात.
या नोटा अवैध नाही होणार, तर
या नोटा अवैध नाही होणार, तर कॉलबॅक केल्या आहेत. >>> चालणार नाहीत, वापरातून रद्द म्हणजे अवैध नाहीत का? अवैध होण्यासाठी अजून काही लिगल प्रोसीजर असते का?
पण जे काही ऐकत आहे त्यावरुन हा निर्णय फार चांगला असेल असे वाटत नाहीये. आगे आगे देखते हैं होता हैं क्या ?>>> मी जे काही वचते आहे त्यावरून मत उलट आहे. चांगला निर्णय असंच वाचलं. अनेक प्रगत देशांमधे मोठ्या नोटा चलनात नाहीत. तुम्ही कुठे वाचलं त्याची लिंक द्याल का?
>>मुद्दा हाच आहे की आपण
>>मुद्दा हाच आहे की आपण सपोर्ट करत असलेल्या पक्षाने असा काही धाडसी निर्णय घेतला की कौतुक
सायो, मी खुप सपोर्ट करत असलो तरी मी या निर्णयाचे कौतुक करत नाहीये.
>>अनेक प्रगत देशांमधे मोठ्या
>>अनेक प्रगत देशांमधे मोठ्या नोटा चलनात नाहीत.
जपान मधे १०००, २०००, ५००० आणि १०००० च्या नोटा आहेत.
मी वाचलेले नाही, ऐकत आहे. आमच्या ऑफिसमधे आहे एक हिरा.
>>मी खुप सपोर्ट करत असलो तरी
>>मी खुप सपोर्ट करत असलो तरी मी या निर्णयाचे कौतुक करत नाहीये.>> बरं.
जपान मधे १०००, २०००, ५००० आणि
जपान मधे १०००, २०००, ५००० आणि १०००० च्या नोटा आहेत. >>> जपानच्या करन्सी व्हॅल्यूचा परीणाम ना तो?
मी वाचलेले नाही, ऐकत आहे. आमच्या ऑफिसमधे आहे एक हिरा.>>> ओह, मग जाऊ दे.
नवीन २००० आणि ५०० मध्ये अधिक
नवीन २००० आणि ५०० मध्ये अधिक सेक्युरिटी फिचर्स असल्याने खोट्या नोटा छापणे कठीण होईल ( ज्याचा उपयोग अतिरेकी कारवाईच्या फंडिग साठी होतो ) असे वाचले. तसेच वर्षानुवर्षे जे पैसे घरी साठवत आले आहेत ( व्हाइट मनी देखील ) तो पैसा बँकीग व्यवस्थेमध्ये येऊ शकेल.
अमेरिकेप्रमाणे १०० च्या वर करन्सी नाही असे करायला हवे.. भारतात अजुनही बरेच व्यवहार कॅशने होतात ते जर डिजिटल झाले तर भ्रष्टाचाराला आळा बसेल.
>>पण दुसरी बाजू तटस्थपणे
>>पण दुसरी बाजू तटस्थपणे मांडणार्या पोस्ट - एकही वाचली नाही. कुठलंही राजकारण, पक्ष, व्यक्ती मधे न आणता बॅलस्डं पोस्ट कुणी...<<
फार अपेक्शा आहे बुवा तुमची. विरोधाकरता विरोध अशातला प्रकार आहे हा; उन्हे उनके हाल पे छोड दो...
लंच ब्रेकला एका इंडियन न्युज चॅनलवर काॅंगी प्रवक्ता, संजय झा यांच्या मते हा नविन जुमला आहे असं कळलं. झा साहेबांच्या मते या नोटा (५००/१०००) सहजरीत्या देशाबाहेर हवाला मार्गे जाऊ शकतात आणि लाउंडर होऊ शकतात. किती अगाध द्न्यान हे! संजय झांच्या त्या कमेंटची, मुर्खपणाचा कळस वगैरे म्हणुन ताबडतोब त्या ॲंकर आणि बिजेपी प्रवक्त्याने खिल्ली उडवल्यावर झासाहेबांची बोलती बंद झाली...
भारतात अजुनही बरेच व्यवहार
भारतात अजुनही बरेच व्यवहार कॅशने होतात ते जर डिजिटल झाले तर भ्रष्टाचाराला आळा बसेल.>>> हो, पण खेडोपाडी कसं शक्य होणार ते? जिथे १२-१८ तास वीज नसते त्याठिकाणी डिजीटल मनी सध्याच्या/नजीकच्या काळात अवघड वाटत आहे. तसंच भारतात मोठा शहरांमधून्ही अनेक क्रेडीट कार्डस स्वीकारली जात नाहीत. त्याबाबतही काही झालं तर बरं.
Pages