रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी राखेचा १ आणि राखेचा २ चे पहिले एपिसोड तुलनात्मक दृष्ट्या पाहिले आहेत का?

राखेचा १ च्या पहिल्या एपिसोडनुसार अण्णा पान खात झोपाळ्यावर बसलेले असतात तेव्हा नाना ‘जाणार, जाणार’ असे बरळतात. तेव्हा अण्णा त्यांना गप्प बसायला सांगतात आणि नाथाला (नोकर) नानांना माडीवर नेऊन ठेवायला सांगतात. मग नंतर देविका (अभिरामची होणारी बायको) आणि नार्वेकर मंडळी येतात तेव्हा अण्णा नाथाला देविकावरून नारळ ओवाळून टाकायला सांगतात. आणि मग नंतर कधीतरी (माधव यायच्या आधी) मरतात. शिवाय ही बातमी द्यायला दत्ता माधवला १८-२० वेळा कॉल करतो जे माधवच्या लक्षात येत नाहीत. मग नंतर माधव कॉल करतो तेव्हा दत्ता त्याला अण्णा गेल्याची बातमी सांगतात.

राखेचा २ च्या पहिल्या एपिसोडनुसार अण्णा पान खात झोपाळ्यावर बसलेले असतात तेव्हा नाना ‘जाणार, जाणार’ असे बरळतात. तेव्हा अण्णा त्यांना गप्प बसायला सांगतात आणि तेव्हाच त्यांच्या छातीत दुखू लागते. (अजून देविका आणि नार्वेकर मंडळी आलेली नाहीत!) दत्ता त्यांना घरात घेऊन जाऊन खुर्चीत बसवतो तेव्हा त्यांना आपण स्वतः मारलेल्या सगळ्या माणसांची भुते दिसू लागतात आणि ते प्राण सोडतात. ही बातमी द्यायला दत्ता माधवला फोन करतो तेव्हा पहिल्या प्रयत्नात फोन लागतो!

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाप्रमाणेच लोकांना पडलेला आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे ‘अण्णा कसे वारले?’ आता पुन्हा नवीन प्रश्न उद्भवला, ‘अण्णा नक्की कधी गेले?? नार्वेकर मंडळी यायच्या आधी की आल्यावर???’

राखेचा १ (एपिसोड क्र. १) https://www.zee5.com/mr/tvshows/details/ratris-khel-chale/0-6-217/ratris...

राखेचा २ (एपिसोड क्र. १) https://www.zee5.com/mr/tvshows/details/ratris-khel-chale-2/0-6-1262/rat...

शिवाय राखेचा २ मध्ये (आधीच्या काळात) राखणदाराला (सापाला) गोळी घालून मारणारे, देवासमोर कधीही हात न जोडणारे, विभूती लावून न घेणारे आण्णा राखेचा १ मध्ये (नंतरच्या काळात) मात्र विहिरीला नारळ द्यायला स्वताहून सांगतात, देवासमोर गाऱ्हाणे घालताना स्वतः हात जोडून उभे राहतात! शिवाय पुर्वाशी (दत्ताची मुलगी) शुध्द (प्रमाण) मराठीत बोलतात!

हो विमु, पहिल्या सिरीयल मध्ये पहातांना असे वाटते की अण्णा खूपच धार्मिक व कर्मठ असावेत. पण हा फरक बहुतेक पांडुच्या लक्षात अला नसावा पटकथा लिहीतांना वा शुटिंग करतांना.

बाय द वे, माल्वणीत किंवा कोंकणीत शिमग्याच्या सोंगास किंवा ते घेऊन येणार्‍यास काय म्हणतात? गडे कोणाला म्हणतात? दुसरा शब्द "अ " वरुन आहे, आठवत नाही.

बाय द वे, माल्वणीत किंवा कोंकणीत शिमग्याच्या सोंगास किंवा ते घेऊन येणार्‍यास काय म्हणतात? गडे कोणाला म्हणतात? दुसरा शब्द "अ " वरुन आहे, आठवत नाही.>>>खेळे म्हणतात ना

रश्मी धन्यवाद!माधवाची bagभरुन तयार होती की काय?जाताना आईला नमस्कार केला नाही त्याने.वच्छी माझ्या आजीच्या शब्दात सांगायचं तर खाजवून खरुज काढणारयातली आहे.आता त्या चोन्गटयाला सांगून आण्णाच्या घराबाहेर ताशे वाजवायला सांगणार वाटतं.

त्या भारतीच्याआईचं प्रकरण आण्णाच्या महान कारकिर्दीच्या सुरुवातीचं असणार.आधी माई ह्या सगळ्याचा ट्रैकठेवत असणार.मग पुढे त्यानी प्रयत्न सोडून दिले असणार.नाहितर भवरी,शेवंता वगैरे अध्याय त्याना माहित असते.

मला एक बेसिक प्रश्न पडलाय.आण्णाना कुटुंबनियोजनाच्या साधनांबद्दलफारशी माहिती दिसत नाही.मग शेवंताची गाडी इतकी वर्षं एकाच मुलीवर कशी थांबली आहे?:अओ:आणि तिला ही माहिती असेल तर सुशल्याला कशाला जन्माला घातलं??

ऐक गोष्ट खूप खटकली ह्या मालिके मधली ऐकाच गावात आण्णा शी संबंध ठेवणाऱ्या खूप स्त्रिया आणि ते सुधा ज्या काळी समाजात नैतिक पना वर प्रतिष्ठा मिळायची पैशावर नाही .
लेखक टीआरपी साठी कोकणचा आणि कोकणी लोकांचं अपमान करत आहे .
ऐक प्रकरण समजून घेता आला आसात

कोणतीही सिरियल बघताना ती डोकं बाजुला काढुन(च) ठेवायची असते. त्यात लॉजिक शोधायचं नसतं. (ही साधी आणि माफक अपेक्षा असते सिरियलवाल्यांची लोकांकडुन).... Wink

स्वरा, लॉजिक गंडलेलं वैगेरे ठिक आहे पण भावना दुखावल्या, अमक्या समाजाचा, तमक्या कम्युनिटीचा अपमान वैगेरे झीच्या सिरीयलींपेक्षा बिनडोक असतं.

आण्णा इतके वारेमाप उधळलेला वारू आहेत, फक्त त्याच गावातल्या बायकांवर गप्प बसत असतील? Uhoh
आजूबाजूच्या गावात पण असेलच की त्यांची शाखा Proud

व्हय तर ! मगे ती सुदामाची भारती, अण्णाच्या झीलांक भेटली ना. शाखा काढण्यासाठी अण्णा आतूर होऊन पार लातुरपर्यंत पण गेले असतील. Proud

लोकसत्ताच्या चतुरंगमध्ये एका लेखात 'अण्णांची व्यक्तिरेखा आवरा' अश्या प्रतिक्रिया आता प्रेक्शकांतून येत असल्याचं छापून आलं होतं असं आई म्हणाली मला. मी स्वतः तो लेख वाचला नाहिये. साईटवर शोधायचा प्रयत्न केला पण मिळाला नाही.

काल माका लय म्हंजी लयच राग इलो व्ह्तो दत्ताचे, काय म्हणुन त्यानं मारलानं पांडुक. ता खुळा असयं ह्यांका म्हाईत आसा ना मग कित्या ते पण खुळ्यासारखे वागततं... Angry

बिचार्‍या पांडुने असा किती तरी वेळा मार खाल्लाय. Sad पण कालचा एपिसोड वच्छीने गाजवला. Proud एकतर गुलाबी साडीत मला ती फार आवडली आणी जाम धमाल केली तिने. शोभा, काशीची बायको पण मधून मधून हसत होती.

माईंचे काल वाईट वाटले. माई, माधव, दत्ता आणी नानाच कायम तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करत असतात.

स्वप्ना, लोकसत्ताने ऑनलाईन प्रतीसाद ( वाचकांच्या कमेंट्स ) टाकणे बंद केलेय. कारण लोकसत्ताच्या संपादकांवर मध्ये लोक खूप टीका करत होते.

नाईक न चा इन्कम च स्तोत्र काय आसेल हा प्रश्न डोकं खातोय >>>> Lol स्तोत्र काय असेल. संकष्टी पावावे याचा स्रोत पण तुम्हीच का?

अण्णाना फारच वाह्यात दाखवलंय असे आरोप तेच लोक करू शकतात ज्याना कोकणची खरी ओळखच नाही . ४०-५० वर्षापूर्वी खरोखरच अशा प्रकारचे रगेल अन रंगेल लोक, विशेषतः खोत / पाटील मंडळी अस्तित्वात होती . "तुम्बाडचे खोत" किंवा "गारम्बीचा बापू"वाचा म्हणाव एकदा !!

नाईक न चा इन्कम च स्तोत्र काय आसेल हा प्रश्न डोकं खातोय >>>> नाईकांचा इन्कम स्तोत्र काय असेल हा प्रश्न तुमचा डोकं खातोय, परंतु युगानुयुगे महाराष्ट्राच्या जनतेचं डोकं खाणारा प्रश्न 'संकष्टी पावावे' या ओळीचा स्रोत कोण हा प्रश्न आज निकालात लागला याबद्दल मायबोलीकर परिवार सदैव तुमच्या ऋणानुबंधनात राहील

Pages