रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>स्वप्ना, लोकसत्ताने ऑनलाईन प्रतीसाद ( वाचकांच्या कमेंट्स ) टाकणे बंद केलेय. कारण लोकसत्ताच्या संपादकांवर मध्ये लोक खूप टीका करत होते.

अग एका लेखात आलं होतं हे......

>>अण्णाना फारच वाह्यात दाखवलंय असे आरोप तेच लोक करू शकतात ज्याना कोकणची खरी ओळखच नाही . ४०-५० वर्षापूर्वी खरोखरच अशा प्रकारचे रगेल अन रंगेल लोक, विशेषतः खोत / पाटील मंडळी अस्तित्वात होती .

असतील हो....पण मालिकेतला काळ ४०-५० वर्षांपूर्वीचा आहे काय?

मालिकेत काळावेळाचा गोंधळच आहे.
छाया लहान असताना कौलावरुन दत्ताला उडी मारायच्या सीन मधे स्पायडर्मॅन सारखं उडायचं असं म्हणालेली.
ह्या मुलांना स्पायडरमॅन माहित आहे हे मला नवल वाटलं.
तसंच कुणाकडेही मोबाईल नाहीत.
मधेच माईंच्या चुलीच्या बाजुला गॅस पण होता.

90s चे असतील...माधव अभिराम च्या लग्नात येतो तेव्हा त्याचा मुलगा 17 वर्षाचा वगैरे असतो. म्हणजे दत्ता, माधव ही मंडळी 1970 च्या दशकात जन्माला आली असतील... आणि आता तरुण पणीचा काळ आहे ते 85नंतर चा असावा

माधव अभिराम च्या लग्नात येतो तेव्हा त्याचा मुलगा 17 वर्षाचा वगैरे असतो....

१८ किंवा १८+ असावा, कारण तो गाडी चालवताना दाखवला होता. मुंबईवरून गावी गाडी चालवत तोच आणतो.

कालच्या प्रोमोत दाखवलं की शेवंता आण्णांना मिठाई देते तेव्हा तो तिला,"तु भरवं", असं अ‍ॅक्शन करुन सांगतो, आईशप्पथ त्याचं ते मुरडण बघुन त्याला चामटवायची इच्छा झाली होती माझी. Angry

काल पाटणकरीण उगा लटके-लटके रागे भरत होती. मिठाईचं शेण झालं की कायसं म्हणाली. मिठाईचं शेण कसं होईल..??
आण्णा तर घरात लग्न असुन पाटण्कराकडे जातोय म्हणाजे कमाल आहे. लग्नात अक्षता टाकायला तरि थांबणार आहे की नाही कोण जाणे.

>>तिला,"तु भरवं", असं अ‍ॅक्शन करुन सांगतो,..
अण्णा आणि शेवंता मुळे मालिकेचा टीआरपी भलताच वर चढल्याने पांडू अगदी रंगवून लिहीतोय त्यांची दृष्ये.. Proud

बाकी, अण्णा शेवंता बरोबर अगदीच मांजर (बोका!) असतात. एरवी जरा काही झाले की बंदूक, कायम गब्बर अवतारात.
हे दृष्य समोर येते:
सर्व अडले, नडले, लोक्सः, अगदी घरचे देखिलः अण्णानू माफ करा मी तुमका नमक खाल्ले आहे..
अण्णा: अब गोळ्यो खा!

(रासवट पुरूष वगैरे ठीक आहे पण एखादा बाप, पती एव्हडा टोकाचा क्रूर, स्वार्थी, मग्रूर, असू शकतो हे जरा न पटण्या सारखे आहे.)

पाटणकरणीक छायाचो पंटर दिसुक व्हया. मिया तं असा वाटतलंय की हयसुन म्होरं पाटणकरीण छायाक ब्लॅकमेलिंग करुची असतंलय. आता ती पाटणकरीण छायाक नाईकवाड्यातलो सोनं-नाणं आणुन देयाक सांगनार नायतर पंटरचो नाव आण्णाक सांगतलंय...!!

पाटणकरीण फार म्हणजे फार आगाऊ, शेफारलेली ( अण्णांमुळे ) आणी महाचालू आहे. संधीचा फायदा कसा उठवावा हे तिला लग्गेच कळते. आजच्या भागात तिने इनडायरेक्टली छायाला ब्लॅकमेल केलेय, म्हणजे हिचा मार्ग मोकळा. छायाला हिचे कळले तरी ही छायाला लगेच अण्णांचे नाव सांगुन अळीमिळी चिडीचुप करणार.

ही नवीन सरीता कुठेतरी पाहीलीय.

पाटणकर ला न लागलेली गोळी बघून पाटणकरकरणीला गोळी घालण्याची कल्पना सुचते अस मला तिने अण्णा कडे बघून दिलेल्या लूक वरून वाटतंय. अण्णाला तर गावातल्या लोकांनाच गोळ्या घालण्याचे परमिट मिळाल्यासारखे वाटतंय

ती पाटणकरीण अण्णा ना अगदी तोडीस तोड मिळालेय . अण्णांच्या पाठी पाठी पाठी . नवऱ्याला चुकवून . का तर दागिने आणि अण्णांचे पैसे. मस्त झालं अण्णा ना कोण तर लुबाडणारी मिळाली ते. तिकडे वच्छी पण छान काम करते

वच्छी धमालच करते. काल वच्छीच्या घरातील रंगारंग कार्यक्रम बघण्यासारखा होता. Proud अण्णा उगाच आपले हिरोगिरी करत होते लोकांसमोर. नेमका माझा शेवट चूकला. त्यामुळे पाटणकरचे काय झाले हे कळेना. मुलीने सांगीतले सारे, पण बघण्यात मजा असते.

गंमत म्हणजे ती पाटणकरीणच वाटते, शेवंता नाही. सुसल्या कशी सुसल्या वाटते. तशी ही वाटत नाही.

पाटणकर उगाच एवढा घाबरलेला दाखवलाय. एवढा घाबरलाच आहे तर रात्र होईपर्यंत आण्णाच्या घरात का थांबला..? पाटण्करीण तर जिथे चांस मिळेल तिथे आण्णाला जाऊन चिकटतेय.. आजच्या भागातही पाटणकर तिथे पोचायच्या आधिच आण्णा-पाटणकरीण वेगळे होतील.

मी एक शॉट बघितला त्यात लग्न सीन होता दत्ताचा. त्यात पाटणकर कोण ते पहिल्यांदा बघितलं. तो पाटणकर छान आहे की, अण्णा जाम म्हातारेच दिसतात त्याच्यापुढे.

अगं अंजू, अण्णा मोठेच असतात की वयाने पाटणकरपेक्षा. आणी मुळात ओरीजीनल अ‍ॅक्टर पण वयस्कर असल्याने तो फरक उठुन दिसणारच की.

पाटणकर कर बाई लवकर मरायला नकोत>>>> हो ना छान गुलगुलीत आहेत.त्या २ बटा कृत्रिम वाटतात खरं.पण चालसे.

पाटणकरणीएवढी तिची मुलगी सुसल्या देखणी नव्हती. आण्णा आणि पाटणकरीण दोघांचेही दात चेपटलेले नव्हते तरी सुसल्याचे कसे काय चेपटले काय माहीत.

अगं अंजू, अण्णा मोठेच असतात की वयाने पाटणकरपेक्षा. आणी मुळात ओरीजीनल अ‍ॅक्टर पण वयस्कर असल्याने तो फरक उठुन दिसणारच की. >>> हो ते बरोबर पण काय ती अशी, नवरा तर छान आहे तर त्याला का भुलली. नसता जरी छान तरी वि बा सं कशाला.

वरातीच्या scene मध्ये सुधा रिक्षा स्पष्ट दिसत होती .
मग मनात प्रश्न आला आण्णा नाईक कडे गाडी का नाही गाडी पेक्षा जास्त किमतीचे दागिने तर आण्णा नी असेच उठवलेत

Pages