रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांडु प्रेम आसा प्रेम आसा मस्त बोलतो>>> ते ऐकुन मी आणि माझा नवरा अशक्य हसलो..... जाम भारी वाटला त्याचा 'तो' टोन ऐकायला.

मागल्या टाईमाक त्या निलमीनंच घरादाराचो इस्कोट करुक होतला.. तिकां बघुचा का आता आजच्या एपिसोडात ..?? आण्णा-माईकान असलो सून मिळतंलंय म्हनुन त्यांका घरादाराक शिरा पडल्यान.

Lol डिजे मस्त मालवणी बोलतायत. बाकी स्वरा खूप दिवसांनी दिसली. Happy

कालचा एपिसोड धमाल होता. पांडु जेव्हा छायाला चहा द्यायला जातो, तेव्हा माझी मुलगी म्हणाली की पांडुच चहा पिऊन टाकेल, आणी तसेच झाले. Proud वरतुन पांडु म्हणतो इसरलयं.

हो, पांडुचा टोन छान होता प्रेम असां म्हणताना, पण माधवची टरकली ना पांडुला बघुन. तरी बरे बावडीत्सुन एको येणार नाही माधवच्या बोलण्याचा. Proud

आता त्या ठो़कळीला कशी तरूण दाखवणार आहेत काय माहित Uhoh

काशीच्या बायकोसाठी उखाणा:
इवली इवली गोगलगाय, तिचे इवलाले पाय.
काशीनाथराव खंय गेले, आण्णांक टरकून पडले काय

आता त्या ठो़कळीला कशी तरूण दाखवणार आहेत काय माहित>>>>. ह्या बाकीच्यांना दाखवली तशीच.
माई आणि आण्णा काय तरुण दिसता काय तुका?

>>निलीमाच आसान ना त्या? माधवाचो प्रेमपात्र?

काय माहित! कदाचित त्याचं प्रेमपात्र वेगळंच असेल. आणि निलिमा आण्णांनी शोधून आणलेली मुलगी असेल. पांडोबा काय लिह्तील सांगता येत नाही. बाकी सिरियलीत आण्णा, नाना, आबा आहेत. आता तात्या, बापू, आप्पा कधी येतात बघायचं.

विक्षिप्त_मुलगा, धन्यवाद!

>>माई आणि आण्णा काय तरुण दिसता काय तुका?

माई आणि आण्णा 'वजनदार' नाहीयेत..लाँग शॉटमध्ये खपून गेले असते. ठोकळीचं तसं नाही. आणि माई-आण्णा काही एपिसोडपुरते तरुण होते. सिरियल काही वर्षांनी पुढे जाणार नसेल तर माधव आणि त्याची बायको बरेच एपिसोडस तरूण दाखवावे लागतील.

डीजे, मरान नको. (बरोबर लिहिलंय का? Happy )
माका तर माई चा वेणीचा शेपटा लैच डाचत होता. आणि ता ओवरअ‍ॅक्टींग करता ता येगळाच Happy

डीजे, मरान नको. (बरोबर लिहिलंय का? Happy ) >> एकतर माका मालवणी तर ईल नायतर तुमची तर इसरंल..! Rofl

माका तर माई चा वेणीचा शेपटा लैच डाचत होता. आणि ता ओवरअ‍ॅक्टींग करता ता येगळाच >> अअगो तुका माईचो शेपटो डाचता म्हणून कुरतडकरांन तिका आंबाडो बांधूक लावलो.... आन माई ओवरअ‍ॅक्टिंग कित्या करतां..? ओवरअ‍ॅक्टिंग तर आण्णा करतलो.. वच्छीच काय तां भारी अ‍ॅक्टिंग करुचा असा..!

Lol

सस्मित हो, मियां इसरलयं !

काशीच्या बायकोसाठी उखाणा:
इवली इवली गोगलगाय, तिचे इवलाले पाय.
काशीनाथराव खंय गेले, आण्णांक टरकून पडले काय >>>>>> स्वप्ना Rofl

खरच मालवणी शिकायची असेल तर मच्छिंद्र कांबळीची नाटके बघा. खूप मनापासुन काम करायचे ते, मला फार आवडायचे. त्यांचे पांडगो इलो रे बा हे तुफान विनोदी होते.

अगो तुका माईचो शेपटा डाचुचा असां म्हनुन कुर्तड्करानु त्यांका आंबाडा बांधुचो लावलां.. आन माई ओवरअ‍ॅक्टिंग कित्या करतां..? ओवरअ‍ॅक्टिंग तर आण्णा करतलो.. वच्छीच काय तां भारी अ‍ॅक्टिंग करुचा असा..!
....अगो तुका माईचो शेपटो डाचता म्हणून कुरतडकरांन तिका आंबाडो घालूक (बांधूक) लावलो..

वच्छीचे काम करणारी संजीवनी पाटील चला हवा येऊ द्या मध्ये आली होती राखेचा च्या एपिसोड मध्ये. प्रत्यक्षात खूप छान आणी तरुण आहे. संभाजी राजेंच्या सिरीयल मधली धाराक्का / धाराऊ आली होती.

>>त्यांचे पांडगो इलो रे बा हे तुफान विनोदी होते

पाहिलं हे....पण मी पाहिलेल्या नाटकात चिन्मय मांडलेकर पांडगा झाला होता Sad

कुरतडकरांन = कुरतडकरांनी
कुरतडकरानु = अहो कुरतडकर (संबोधन)

कळला माका. आता नाय इसरायची Happy

वच्छी व्हर्सेस आण्णा कलगीतुरा रंगलाय. आज वच्छी आण्णांनी पाठवलेल्या आहेराची राखरांगोळी त्यांच्याच वाड्याभोवती पेरून मालिकेचं 'राखेचा' हा शॉर्ट फॉर्म सार्थ करणार. नक्की हे सगळं आण्णा आणि वच्छीच करताहेत ना? नाहीतर तिसराच कोणीतरी दोन्हीकडे काड्या लावत असायचा. आधी घरात भागायची बोंब आणि ती सून कित्याक आणली हा ता माका कळत नाही.

मला आणखी एक ट्विस्ट सुचला. आण्णा माधवसाठी म्हणून सरिता बायको शोधतात पण माधवमध्ये ऐनवेळी बाणेदारपणा येतो आणि तो तिच्याशी लग्न करायला नकार देतो म्हणून (हे अशकय आहे हे माका माहित आसा) किंवा मुंबईस पळून जातो म्हणून तिचं लग्न दत्ताशी लावतात. Happy

<<<बाकी स्वरा खूप दिवसांनी दिसली. Happy>>> आठवण काढल्याबद्दल धन्यवाद रश्मी. Happy

<<<बावडीत्सुन एको काढणारा पांडुच आसा ना मरे. आठव मेलंय मेलंय Lol

Submitted by सस्मित on 28 February, 2019 - 05:17>>> काल माधवाची तंतरलेली तेव्हा तो कळुच मेलय असं म्हणतो आणी त्याला चिडवायला म्हणुन दत्ता मस्त हसत बावित वाकुन मेलय म्हणतो, तो प्रसंग फार आवडला मला. Happy

बाकी वच्छी भारी डेरिंग्बाज हो, कोनाच्या बापाशिक भिवुक नाय ता. आता शेवंता नि आण्णांचा रोमांस बघुक घावाल. पाटणकर जातोय ना मरे खयतरी २ दिस?

वच्छी =ढालगज भवानी.आण्णाला अशी बायको मिळाली असती तरसगळ्या बायकांकडुन राखी बांधून घ्यायाची वेळ आली असती त्याला.माई म्हणजे 'मेणाहूनी मऊ आम्ही विष्णूदास' चा पूर्वार्ध फक्त.

काल आणखी काय दाखवलं?काही विशेष?सुपरनेचरल पाहिलं एएक्सएन वर त्यामुळे राखेचा शेवटची काही मिनीटंच पाहता आलं.आणि त्या नाईकांचया गिफ्ट हेम्पर मध्ये काय होतं?गोवर्या होत्या काय त्या?

वच्छी =ढालगज भवानी.आण्णाला अशी बायको मिळाली असती तरसगळ्या बायकांकडुन राखी बांधून घ्यायाची वेळ आली असती त्याला.माई म्हणजे 'मेणाहूनी मऊ आम्ही विष्णूदास' चा पूर्वार्ध फक्त.>>>>>>. +१११११ Rolling laughter

स्वप्ना, अगदी खरे आहे हे. अण्णांना जर वच्छी सारखी बायको मिळाली असती तर तिने अण्णांचा विग पार सफाचाट केला असता, आणी आधी भिवरीच्या झिंज्या उपटल्या असत्या म्हणजे अण्णांना पुढे शेवंता मिळालीच नसती. Proud

Pages