रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बुलेट s आहेत की आण्णांकडे!

Proud नाईक मनात येईल तेच करतात.....त्यांच्या घराण्याची टॅगलाईन आसा Just Do It!

आज टॉपलेस दत्तादाखवला!त्याच्या कमरेखाली फटके बसले होते ना?मग माई पाठ का शेकत होत्या???
सगळ्यात मजा म्हणजे नाना माईला विचारत होते की हे काय चाललंय.त्यानी लहानपणी आण्णाला चान्गला कानपटला असता तर आता तो डोईजड झाला नसता असा Angry
प्रोमोत माधव आपल्या गर्लफ्रेडला घरी आणतो असं दाखवलंय.हा त्याचा 'पहिला प्यार' का तरुणपणची निलिमा ते उद्या कळेल.

>>बुलेट s आहेत की आण्णांकडे!

Proud नाईक मनात येईल तेच करतात.....त्यांच्या घराण्याची टॅगलाईन आसा Just Do It! >>>>>>>>>>>>>> मस्त

<<<त्या अण्णांच्या धोतरात उंदीर / विंचु / सापसुरळी / बेडुक असे काहीतरी सोडावे असे प्रकर्षाने वाटु लागले आहे. Angry Proud

Submitted by रश्मी.. on 7 March, 2019 - 05:30
मालवणी जोक

दरोडेखोर मालवणी दुकानदारास : Hands up !

दुकानदार : काय तां ? Hands up नाय गावणा आमच्याकडे. Thumbs up नायतर 7 up आसां. व्हया तर पी, नायतर वाटेक लाग. मेलो शिमग्याचा सोंग घेऊन माका हुशारे करुन दाखवतां .>>> लोल रश्मी :गडाबडा लोळणारी बाहुली:

पण दत्ताचा जीव असा बाकी सगळ्यांवर, कायव करतलो तो घरा नि घरातल्यांसाठी. अजुन एक, माका गेल्या काहि दिवसांपासुन दत्ता लंगडत चलता हा असा वाटता हा... खरंच तसा हा की माका भास होतत?

हो स्वरा, कालच्या भागात दत्ता मला लंगडतांनाच दिसला. दोन दिवस जरा ओझरते पाहील्याने जास्त लक्षात नाही आले. काल सुरुवात पण चूकली होती.

>>माईचो झीलोवरचो आंधळो प्रेम नाईकांचो घरावर पाणी फेरतलां

नाईकांक पाण्यापासून भय आसा. इसरलात काय? Happy

>>माका गेल्या काहि दिवसांपासुन दत्ता लंगडत चलता हा असा वाटता हा

हो लंगडतोय तो.....मला वाटलं त्या वच्छीवर गोळ्यो झाडायला आण्णा जात असताना दत्ता आडवा आला तेव्हा त्यांनी त्याला ढकललं....पायाला लागलं असेल म्हणून तो लंगडतोय. Uhoh

माईक, छायाक्, वच्छीक, वच्छीचो सुनेक, पाटणकरणीक, भिवरीक, निलमी ठोकळीक म्या वुमन डेचो लय लय सुबेच्चा देतंय. समद्यांक लय लय काम मिळुदे रे रवळनाथा..!!

निलिमा सारखा दिसणय नाय माधवाची मैत्रीण,गावकर असा,माई चौकशी करता नवीन कायतरी असतला भुतुर

'सारे कोकणवासिय माझे बांधव आहेत' असं आता माधव दत्ता वगैरेनी म्हणायला हवं.पोरांची लग्नं आण्णानिच जमवलेली बरी.पंचक्रोशीतली कुठली पोरं आपली हे त्याना माहित असेल....कदाचित.आण्णाच्या पोरांची लीगकाढण्याइतकी तरी एकुण संख्या नक्कीच असेल.....
बाकी तो लाडू कसला होता?एव्हढ्या उंचीवरुन धाडकन पडून पण फुटला नाही.वच्छीला गोळ्योघालायचया ऐवजी आण्णानीहा लाडू फेकून मारला असता तरी चाललं असतं.
माईला शेवन्ताची खबरबात अजून कशी लागली नाही हे एक मला गुढ आहे.का वेड पांघरुन पेडगावला जातहेत?

निलिमा माधवला मुंबईमधेच भेटणार.....तिथे आण्णानी आपली आघाडी उघडलेलीनाही त्यामुळे तिथे सूत जमवण सेफ.

थोडक्यात काय तर माधवचा "दादाभाई नवरोजी" होता होता राहिला.माई त्याला खरं कारण सांगतातका काय ते पाहायचं.सांगितलं तर हा ह्यापुढे प्रत्येक मुलगी आपली बहिण तर नाही ना ह्या काळजीने हैराण होणार.नाही सांगितलं तर आई विरोधात उभी राहिली असंसमजणार.....कठिण आहे सगळं.

सारे कोकणवासिय माझे बांधव आहेत' असं आता माधव दत्ता वगैरेनी म्हणायला हवं.पोरांची लग्नं आण्णानिच जमवलेली बरी.पंचक्रोशीतली कुठली पोरं आपली हे त्याना माहित असेल....कदाचित.आण्णाच्या पोरांची लीगकाढण्याइतकी तरी एकुण संख्या नक्कीच असेल.....

Happy

काल आणि आजचा भाग चुकला माझा तरी कोणी सांगेल का थोडक्यात? माधवची मैत्रीण त्याची बहीण कशी झाली? आणि हे कोणी सांगितलं?

लोल......

माका पण तसाच वाटता.
ता चेडु आणांचाच असय म्हनुन. कारण तिका फक्त आउस असा, बापुस नाय. मग माईचा संशय खराच असतलो.

काल माका दत्ताच्या पायाकं क्सलो तरी लेप लावलेलो दिसलो. कोनाक दिसलो काय तो?

होय गे बाय. माका दिसलो तो लेप. मिया तो सीन पूर्ण होईपर्यंत बघी होतंय कि दत्ताचो पाय असो कित्याक दिसता काहीतरी इन्फेक्शन झाल्यासारखा दिसा होतो. तिया म्हणतंय तसा काहीतरी लेप-बिप असू शकता तेच्या पायावर.
आणि मिया आता ताच इचारणार होतंय हयसर.

सान्वी......माधव त्या बाईकडुन तसाच निघुन आलयावर आण्णा त्याला बडवायाला निघाले.दत्तने मध्ये पडून तो मार खाल्ला.मग माधवने माझ्यात हिम्मत नाही म्हणुन त्रागा केला.दुसर्या दिवशी घरातून गायब झाला.दत्ता,तो नोकर,पांडू सगळे शोधयला गेले.माधवने पाण्यात पडून धडपडून घेतलं.पण तरी वाचला.हा नाईक नाही की काय?पाण्यात पडुन पण वाचला ते.असो.मग स्वत:च घरी आला.माइने लग्न का करायचं नाही विचारलं तेव्हा त्यने एका मुलीवर प्रेम आहे असं सांगितलं

माईने दुसर्या दिवशी आण्णा घरी नाहीतचतेव्हा माझ्या सुनेला घेउन ये असं त्याला सांगितलं.तो तिला घेउन आला.माइने तिचं स्वागत केलं आधी.पण नंतर दत्ता म्हणाल की तिचं नाव विच्गर की.माईने नाव विचारलं आणी ते ऐकून चमकली.तिच्या वडिलांचं ,गावाच्ं,आईचं नाव विचारलं आणी मग हे लग्न होणार नाही म्हणुन तिला निघुन जायला सांगितलं.ती मुलगी पण घरी न सान्गता आली होती वाटतं कारण ती आण्णाची मुलगी असेल तर तिच्या आईने पण विरोध केला असता.मी दोन्ही भाग मधूनमधून पाहिले.जितकं पाहिलं तेव्हढ्ं लिहिलं

तुफान अशक्य कमेंट्स आहेत सगळ्यांच्या ! Rofl काल माईने त्या मुलीला घराबाहेर जा सांगुनही माझी ट्युब पेटली नाही, कारण अण्णांची इतकी प्रकरणे माईला कशी ठावक ते मला आधी लक्षात आले नाही. Proud

ह्यात काही वेगळं कारणही असू शकेल कारण माईना भिवरीबद्दल माहित नव्हतं.शेवंताबद्दल ही माहित नाहिये.मग ह्याच प्रकरणाबाद्दल का माहित असेल?ही माईची लग्नाआधिची मुलगी नाही ना?अर्थात मग ती माधव पेक्षा मोठी असेल म्हणा.कळेल आज काय ते.कदाचित माध्वचीदूरची कझीनपण असू शकेल.

Pages