रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिवरी मात्र आण्णा chya पाठीच लागलीय .
खूप भीतीदायक वाटतात तिचे डोळे>> जास्त वेळा भिवरीला स्क्रीन टाईम दिल्यामुळे आता भिती नाही वाटत तिची. अण्णा नाइट आउट ला शेवंता कडे जातात त्या भागात भिवरी एकदम danger वाटली होती,जेव्हा ती सुषमाला आपल मुल म्हणून तिच्याकडे बघते..

माझी मुलगी म्हणते ," भिवरी खूप व्हीडिओ बघते म्हणून तिचे डोळे up गेलेत">>>>> Lol अनिश्का, मस्त निरागस कमेंट आहे तुझ्या मुलीची.

हल्ली दत्ताचा फार राग यायला लागलाय मला. बिचार्‍या पांडुला त्याची काहिच चुकी नसताना गुरासारखा बडवत असतो.
मेल्यांनो तुमच्या बापानं पापं केल्यान नि त्याची शिक्शा त्या बिचार्‍या पांडुक का देतावं... Angry

बाकी वच्छीकं सुन तोडीस तोड घावली असा. Biggrin Biggrin Biggrin

पूर्ण गावात एक सुधा पाळीव शेतीउपयुक्त जनावर नाही साधं कुत्र सुधा कुठे दिसलं नाही ,गावात काय फक्त 3 च घर आहेत काय

अरे त्या २५-३० कोंबड्या मेल्या का काय? त्यांचीच भुतं पहिल्या सीझनमध्ये नाईकांच्या वाड्यासमोरून पळत असणार मग. किंवा आता त्यापण डोळे पांढरे करून अण्णांना दिसायला लागतील. नाहीतर त्या कोंबड्यांचे आईवडिल 'माझं प्वार मला द्या' म्हणून धोशा लावतील.

बाकी ते नस्तर का काय म्हणत होते काल ते काय असतं? बिचार्‍या पांडूला उगा बडवलं दत्ताने. वड्याचं तेल वांग्यावर निघालं. अण्णा अतिशय हरामखोर माणूस आहे. खोपच्यात नेऊन घरच्यांनी धुतला पाहिजे त्याला एकदा. त्या शेवंताशी फक्त गुलूगुलू बोलत असतो. तो अतरंगी डॉक्टर पहिल्या सिझनमध्ये पण होता. कसलं इंजक्शन दिलं म्हणे त्याने? सगळ्या सापांच्या विषावर एकच इंजक्शन? डोळे बंद करून नस कशी सापडली त्याला देव जाणे. बाकी सुनेसाठी इतका जीव टाकणारी सासू पहिल्यांदा पाहिली. Uhoh

आण्णा चा फॉर्म्युला खूप जोरात आहे , लाईन
मारणे नाही ,पाठी फिरणे नाही पहिल्याच भेटीत जेवणाच आमंत्रण .
चहा, नाष्टा, ह्या स्टेप डायरेक्ट skip

अरे त्या २५-३० कोंबड्या मेल्या का काय? त्यांचीच भुतं पहिल्या सीझनमध्ये नाईकांच्या वाड्यासमोरून पळत असणार मग. किंवा आता त्यापण डोळे पांढरे करून अण्णांना दिसायला लागतील. नाहीतर त्या कोंबड्यांचे आईवडिल 'माझं प्वार मला द्या' म्हणून धोशा लावतील.>>>>>> Rofl स्वप्ना, भारी लिहीलस. Proud

लसुण, आले, सगळ्या प्रकारच्या मिर्च्या, सगळा तिखट खडा मसाला, कोरडी तिखटाची पावडर व आसाम मधील सुप्रसिद्ध जहाल मिर्ची भूत ढोलकीया हे सर्व एकत्र वाटावे, त्याचा अर्क एका रांजणभर पाण्यात कालवावा. आणी मग त्या अण्णाला त्या रांजणात खाली डोके वर पाय करुन बुचकळुन काढावा असे मला तीव्रतेने वाटु लागले आहे. Angry Proud

या बेशरम माणसाला आपली बायको, वडील, मुले सोडुन त्या शेवंताची पडलीय, टकल्या कुठचा !

परवा शेवंता एबीपी माझाच्या न्युजरुम मधे आली होती. अगदी शेवंताचाच गेटप केलेला होता. जाम मजा आली तिच्या गप्पा बघताना. अजुन तिचं लग्न झालेलं नाही हे समजल्यावर अँकरसहीत बाकी स्टाफचे डोळे एकदम लकाकलेले दिसले म्हणजे प्रेक्षकांचे पण लकाकले असणारच म्हणा..!! Proud

शेवंताच् लग्न होऊन डिवोर्स झालाय...माझ्या कझिंन च्या पाठच्या बिल्डिंग मध्ये राहते ती...तिचा हा वर्गमित्र बालमोहन चा
अर्थात हे अवांतर

त्यापण डोळे पांढरे करून अण्णांना दिसायला लागतील. नाहीतर त्या कोंबड्यांचे आईवडिल 'माझं प्वार मला द्या' म्हणून धोशा लावतील.>>>>>> Lol

बाकी ते नस्तर का काय म्हणत होते काल ते काय असतं?>>>>> शब्दकोड्यातील नस्तर म्हणजे न्हाव्याकडचे नखे कापायचे साधन वाचलं होते पण राखेचामधलं नस्तर म्हणजे खरंच काय असतं?

@ रश्मी : अहो एंगेजमेंटच झालिये ना..? (ते तिने एबीपी माझा मधे नाही सांगितलं) लग्न तर नाही ना झाले Wink

शेवंताच् लग्न होऊन डिवोर्स झालाय...माझ्या कझिंन च्या पाठच्या बिल्डिंग मध्ये राहते ती...तिचा हा वर्गमित्र बालमोहन चा
अर्थात हे अवांतर>> गे बाय माझे..! ह्या तु काय बोलताहा..! Uhoh

लसुण, आले, सगळ्या प्रकारच्या मिर्च्या, सगळा तिखट खडा मसाला, कोरडी तिखटाची पावडर व आसाम मधील सुप्रसिद्ध जहाल मिर्ची भूत ढोलकीया हे सर्व एकत्र वाटावे, त्याचा अर्क एका रांजणभर पाण्यात कालवावा. आणी मग त्या अण्णाला त्या रांजणात खाली डोके वर पाय करुन बुचकळुन काढावा असे मला तीव्रतेने वाटु लागले आहे. >>>>>>>> मस्त! पुढचा नम्बर गुरु उर्फ गॅरीचा.

राखेचामधलं नस्तर म्हणजे खरंच काय असतं? >>>>>>> हस्तरचा भाऊ असेल.

अपुर्वा नेमळेकरचं (शेवंता) कधीच लग्न झालंय, तिचे वटपोर्णिमा वगैरेचे पण फोटो दोन तीन वर्षापुर्वी स्टार प्रवाह चॅनेलने पोस्ट केलेले फेसबुक पेजवर, कशी साजरी केली लग्नानंतर पहीली वटपोर्णिमा वगैरे, सिरीयल मधली नव्हे. डीव्होर्स झालेला माहीती नव्हतं पण लग्नाचे पण फोटो पुर्वी बघितलेले.

बाकी ते नस्तर का काय म्हणत होते काल ते काय असतं?>>>>> शब्दकोड्यातील नस्तर म्हणजे न्हाव्याकडचे नखे कापायचे साधन वाचलं होते पण राखेचामधलं नस्तर म्हणजे खरंच काय असतं?
>>>>>>नस्तर म्हणजे पनवती बहुतेक.

जावंद्या.. काशी भरल्या पोटान नी भरल्या मनान जातंलंय.. काळजी करुचा नाय.
काशीचं मरान सरिताच्या हातुन लिहिलेलं असां.. आता काशीक मारलं म्हनुन सरितावर आळ घेऊक नाय म्हंजे मिळवलां.
मटान कापुचा लाकुड कित्या झाडाचो असतंलंय? वच्छीच ते लाकुड थयसर टाकुक गेली असां. वच्छी १ पट नी तिची सुन १० पट र्‍हातलंय.. आपल्याच कर्मानं आपलाच घो गिळुक बसलीन. Uhoh

आता ते तळलेलो मासो वाया जातलंय.. Uhoh

>>मग त्या अण्णाला त्या रांजणात खाली डोके वर पाय करुन बुचकळुन काढावा असे मला तीव्रतेने वाटु लागले आहे.

मी येते मिरच्या कुटायला Proud

>>नष्टर/ नाट = पनवती
धन्यवाद!

काशी मेला तर त्याच्या त्या लुकड्या बायकोची चांगली जिरेल. माझ्या जाम डोक्यात जाते ती. काय चेहेरे करते. ओव्हरअ‍ॅ़क्टींगचा महापूर आहे नुसती.

कालचो भागात कोंबो काय दावलां मासो काय दावलां.. ते बघान माका परत भुक लागतंली म्हनुन रात्री ११ वाजता आमलेट करुन खाल्ला गे बाय माझे.. Proud

मॉपशे दिसान कालचो भाग पाह्यलय. टोटल लागाक नाय पण एक लक्षात इला की दत्ताची हळद उतरवणीचो कार्यक्रम मटान शिजवून साजरा होतला.
काशी मटान मटान करून मरान पडणा वाटते. आजच्या भागात कळतला.

Pages