रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्धश्रद्धा नाही दाखवत असे नाही म्हणता येणार. सरिताचा सर्पदंश नुसत्या कोम्बड्या लावुन आणि शहाळे एका घावात फोडून झालेला दाखवलाय. त्या फुटकळ डॉक्टरच्या इन्जेक्शन ने ती बरी झाली असे म्हणता येणार नाही. सर्पदंशाचे इन्जेक्शन घेउन डॉक्टर नक्किच फिरत नसतील.
अशी औषधे कशी साधारण तपमानाला जतन करायची, त्याची एक्स्पायरी, त्या व्यतिरीक्त इथे कुणीतरी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रजातीच्या सर्पदंशाला एकच औषध असणे... ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता इथे अन्ध्श्रद्धाच दाखवली गेलीय...
बाकी सगळे योगायोग मानण्यासारखे आहेत. पण हा प्रसंग नाही.

पुढचा धागा काढलाय, https://www.maayboli.com/node/69398
इथे १९५०+ प्रतिसाद झाले म्हणून
जरा घाईच झाली नाही का Proud>>

किल्लीता, थोडा आधी तर सांगायचा ना.. म्यापन धागो काडल्या व्हतान.. Uhoh
https://www.maayboli.com/node/69399

तुमका जो धागा आवडल्यान त्या धाग्यावर लिवा... किल्लीता तं कोनचा धागा १९५०+ होउक होया हेच बघुक असतंलंय.. कवा एक कमेंट टाकुची नाय पन धागा काढुक गावच्या पयलो इलंय जसो काल काशी मटान खाउक पयलो ईलो Proud

गेल्या टायमाक ठोकळीक अटक करुक नेतला तवा ठोकळीक हातात बेडी घालुक तिका पोलिस स्टेशनाक जी पोलिशीन बाय घेउक जातला तीच आपल्या दत्ताचो नवी सरिता असां... ह्ये पाह्य तिचो फोटो.......
Submitted by DJ. on 26 March, 2019 - 18:24

DJ., धन्य आहे तुमची. राखेचा वर PHD करायची बाकी ठेवली आहे तुम्ही!!!

माई दत्ताच्या वेळी प्रेग्नंट असताना त्यांचं अ‍ॅबॉर्शन होतं तेव्हा गर्भ काळा पडला होता असं त्या बायका नानांना सांगतात .. दत्ता भिवरीचा मुलगा असतो ना

गेल्या टायमाक ठोकळीक अटक करुक नेतला तवा ठोकळीक हातात बेडी घालुक तिका पोलिस स्टेशनाक जी पोलिशीन बाय घेउक जातला तीच आपल्या दत्ताचो नवी सरिता असां... ह्ये पाह्य तिचो फोटो : >>>> DJ जबरदस्त observation, सही पकडे !!

झी च्या कुठल्या तरी फॅंगशन ला मला वाटतं माई नाचली होती किंवा चला हवा येऊ द्या मध्ये .
main performance नाही पण किंवा असाच मधला टाइमपास between 2 performances
सिझन १ संपत आला होता किंवा संपला होता नुकताच

काजुचा लाकडी ठोकळा म्हणाली का वच्छीची सून..??>>>>> काजू चा नाय काज-याच्या झाडाचा लाकूड .काजरो नावाचा विषारी झाड असता आमच्या कोकणात .उपाशी पोटी तेची फळा खाल्ली झाल्यार लय उलट्यों होतत. अति विषारी नसता पण चक्कर येणे उलटी होणे असला कायमाय होता.

अति विषारी नसता पण चक्कर येणे उलटी होणे असला कायमाय होता.>>>>>>> म्हणजे काशी मरुचा नाय. तो बरो होतलो. तेका निस्ती चक्कर इली आसल.

https://www.youtube.com/watch?v=bvd2zKBMkHU

हे घ्यां Mai dancing ( Green saree)>>>> कसं काय अगदी बरोबर शोधून काढतात तुम्ही लोक..धन्य आहे.. Happy अजून एक निरीक्षण: या dance मध्ये छाया ने नेसलेली साडी परवा दात्तू च्या लग्नाच्या एपिसोड मध्ये reuse झाली होती.. छाया नेच नेसली होती.. Lol

>>दत्ता भिवरीचा मुलगा असतो ना

माई प्रेगंट असतात तेव्हा मुलाचं नाव दत्ता ठेवायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. पण ते बाळ जातं. तेव्हाच भिवरी त्यांच्या घरी येते. तिचा खून केल्यावर अण्णा मुलालाही मारणार असतात ते पाहून माई पुढे होतात आणि त्याला वाचवतात. त्याच्या रुपाने आपला दत्ताच आलाय असं समजून त्याचं नाव त्या दत्ता ठेवतात.

नुसतो दत्ता नाय - दत्ताराम नाव ठेवुचा असता.. माईच्या आज्जेसासर्‍याचा नाव असतंला - दत्ताराम. पन माईचो गर्भपात झालो मगे त्याच टायमाक भिवरी पोरासोबत वाड्यात घुसली. तिचो मुडदो गाडल्यावर माईन भिवरीच्या पोराक पोटाशी धरला आन तेका - दत्ता नाव दिल्यान.

नुसतो दत्ता नाय - दत्ताराम नाव ठेवुचा असतंलंय.. माईच्या आज्जेसासर्‍याचा नाव असतंलंय - दत्ताराम. पन माईचो गर्भपात होतलो मगे त्याच टायमाक भिवरी पोरासोबत वाड्यात घुसतली. तिका मुडदो गाडल्यावर माई भिवरीच्या पोराक पोटाशी धरतंलंय आन त्याक - दत्ता नाव देतंलंय.
Submitted by DJ. on 27 March, 2019 - 12:18

अहो DJ., हे सगळं तुम्ही भविष्यकाळात लिहिलं आहे. वास्तविक घटना घडून गेलेली असल्यामुळे भूतकाळात लिहायला हवे.

नुसतो दत्ता नाय - दत्ताराम नाव ठेवुचा असता.. माईच्या आज्जेसासर्‍याचा नाव असतंला - दत्ताराम. पन माईचो गर्भपात झालो मगे त्याच टायमाक भिवरी पोरासोबत वाड्यात घुसली. तिचो मुडदो गाडल्यावर माईन भिवरीच्या पोराक पोटाशी धरला आन तेका - दत्ता नाव दिल्यान.

पण एवढ्या मोठ्या मुलाला आधीच काही नाव नव्हतं का? भिवरीने त्याला बिननावाचाच वाढवलेला काय?
आला आणि लगेच ठेवलं मनाला वाटलं ते नाव. त्या मुलालाही स्वतःचं नाव माहित असायला हवं ना. दोन अडीच वर्षातच नाव सांगता येतं मुलांना.

पण एवढ्या मोठ्या मुलाला आधीच काही नाव नव्हतं का? > मलाही हाच प्रश्न पडला होता.

पांडूला सोडतात तेव्हा दत्ताला विहीरीजवळ "मेलंय मेलंय" ओरडलेले आठवते तर काही दिवसांपूर्वीच वारलेली सख्खी आई का नाही? सख्खी आईच्या पुसट आठवणी तरी हव्या होत्या.....! पूर््ण brainwash खटक्तो...!

माईच्या रडण्याचे हसू येते गळा काढून प्रत्येक गोषटीवर रडत असते मोठमोठ्याने . ती Overacting वाटते

इतर नाईकांकपेक्षा माईक झीवर लय फुटेज मिळतलां. राखेचा१ नंतार नकटीचो लग्नाक सतराशे विघ्न मधे चमकली असां. मगे परत राखेचो२ येतलंय. माईक झी पावलो Proud

माईक झी पावलो>>> +१
बाकी कुणी कुठे दिसले नाहीत. फक्त दत्ता सेक्रेड गेम्स मधे होता. सुसल्या मोनिका मानसीच्या सिरीयलीत होती.

दत्ता 'रुद्रम' मधे पण दिसला होता.. झी युवाच्या आनि सुसल्या त्या खुकखु मधे. पण दोघांना फार थोडे फुटेज होते. माई मात्र रोज दिसायची त्या नकटीच्या लग्नात.

माईच्या रडण्याचे हसू येते गळा काढून प्रत्येक गोषटीवर रडत असते मोठमोठ्याने . ती Overacting वाटते>>>> सहमत.आत्ता गळा काढेल की मग गळा काढेलसं वाटतं.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा