रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pintee....नाही हो.....पांडबा सगळे कयास चुकवताहेत ह्या वेळेस.....

विकान्तला मोर्नीग वॉकला गेले होते तेव्हा 3मांजरं पाहिली.एक पांढरा बोका एका ब्राऊन कलरच्या मांजरी मागे फिरत होता.म्हटलं हे आण्णा आणीशेवंता.तिसरी काळी मांजर बिचारी एकटीच फिरत होती.ह्या माई.बोका मात्र दोन्ही मांजरीवर लक्ष ठेवून होता Proud

माका वाटता छायान माधववांगडा ही पैज लावल्यानी की ता लग्नाक नाय म्हणूचो नाय.गपगुमान रवान लग्न करतल्ंय.माधव गप रवलोच की.छाया महाडयाम्बिस आसा.माधवाक उचकवून त्याचा लग्न मोडूक बगता.

अण्णा भयानक पाचकळ आहेत. दिवसेंदिवस त्यांचा पाणचटपणा वाढत चाल्लाय.

काल माधव जिला बघायला जातो, ती गाव गाता गजाली मधली गुरवाची मुलगी शिल्पा होती.

आण्णा आपल्याच मुलांका नायकीणीच्या घरी पाठवुक व्हया गे बाय माझे..!!
आजच्या भागात माधवचो पुरता फणस होऊक व्हया..!

माधव झालेल्या कलाकाराबद्दल मध्यंतरी कुठेतरी वाचलं की त्याने या भूमिकेसाठी (मागच्या पर्वातल्या माधवापेक्षा कमी वय दिसण्यासाठी) वजन कमी केलं. कालच्या भागात इनशर्ट मधे चांगलंच जाणवत होतं ते. मस्त काम करतो पण माधवा !

अण्णा हरखलेत आणी माधव भंजाळलाय. बिचार्‍या माधवला लहानपणापासुन कसलाच आत्म विश्वास नाहीये. सगळ्यांका आपले हो हो करीत बसतो. बाकी छाया नाचत असेल कारण माधवचे लग्न मोडले तर तिची वाट मोकळी, पण समजा माधवचे लग्न मोडले आणी अण्णांनी घाई घाईत दत्ताला उजवले तर ? Uhoh Biggrin

हो मग, स्पर्धा नको का ! वच्छी त्यांच्या घरासमोरुन नाचत मिरवणूक नेते ना.

मागच्या भागात अण्णा, चोंगट्याला वच्छीच्या घरी पाठवुन गोवर्‍या, शेणी, कोळसे असा अहेर पाठवात. मग वच्छी चिडुन ते जाळुन त्याची राख अण्णांच्या अंगणात ओतते, ते आपल्याला कळते, पण नायकांक नाय. मग रघु गुरुजी याचा सालाबादप्रमाणे फायदा घेतो. किती अंधश्रद्धाळू लोक दाखवलेत हे.

>>माधवाक 'आत्मविश्वास' नसंय असा वाटता आण्णांका म्हणान धाडल्यानीत तेका नायकिणीकडं.
Proud अण्णांकडून दुसरी काही अपेक्षा नाही..
आता विश्वास सापडलेला माधव सगळ्यांना खरं सांगतो का ते पहायचे...

काल माका दत्तानी माधवाचा लय वाईट वाटला.

आण्णा त्या माधवाकं मारत हुते नि माधवासाठी दत्ता मध्ये पडला नि मार खाल्ल्ल्यान,

मार खायच्याआधी मात्र जाम हसायला येईल असं काम केलं माधवाने. भारी अ‍ॅक्टींग केलिये अगदी. म्हणजे एखादा बुळा त्याने परफेक्ट रंगवलाय.

नीट Root Cause Analysis न करता समस्या सोडवायला गेलं की हे असं होतं. अरे त्याचा प्रॉब्लेम काय तुम्ही करताय काय. आता प्रोमोत माधवाचा पाय कुठल्याश्या राखेच्या भांड्यावर पडला असं दाखवलंय. आता त्याचा एकदम Hulk होणार का काय?

कालच्या भागात माधवानं काम चांगला केल्यान.न्हाय तर इतरवेळाक मेलो कंटाळो हाडतां.अ‍ॅक्टिंगच्या नावानं शंख!
छायाचा कामही सुरेख होतां.

काल माधव आणी दत्ता दोघांनी जबरी काम केले. मला दत्ताचे काम फार आवडले, चेहेर्‍यावर असहाय्यता दिसत होती. मला पण माधवचे बोलणे ऐकुन गहीवरुन आले. डोळ्यात एकदम पाणी आले. Sad छायाला सुद्धा काल थोडेसे वाईट वाटल्याचे जाणवले, नाहीतर ती पण बेरडच आहे.

त्या अण्णांच्या धोतरात उंदीर / विंचु / सापसुरळी / बेडुक असे काहीतरी सोडावे असे प्रकर्षाने वाटु लागले आहे. Angry Proud

मालवणी जोक

दरोडेखोर मालवणी दुकानदारास : Hands up !

दुकानदार : काय तां ? Hands up नाय गावणा आमच्याकडे. Thumbs up नायतर 7 up आसां. व्हया तर पी, नायतर वाटेक लाग. मेलो शिमग्याचा सोंग घेऊन माका हुशारे करुन दाखवतां .

Lol

>>काल माधव आणी दत्ता दोघांनी जबरी काम केले. मला दत्ताचे काम फार आवडले

+१....आण्णांचं नाव हरी आहे हे काल कळलं. बाकी दत्ताने 'पाठीवर मारा पोटावर मारू नका' हा वाक्प्रचार सार्थ करून दाखवला काल.

>>त्या अण्णांच्या धोतरात उंदीर / विंचु / सापसुरळी / बेडुक असे काहीतरी सोडावे असे प्रकर्षाने वाटु लागले आहे

गे बाय, माका पण आसाच वाटता. पण ते उंदीर / विंचु / सापसुरळी / बेडुक पकडणार कोण??? Happy

आण्णांना सून आणायची घाई
माधवाला एव्ह्ढ्यात लग्न करायचं नाही
सोमेश्वरच्या आगीला रामेश्वरला बंब धाडला
नाईकानु, आता तरी गुगल मॅप्स वापरा

मागे एका भागात मला त्या गावात टीव्हीएस स्कुटीवरुन २ मुली जाताना दिसल्या. रघु काका आणि माधव सोबत जात असताना (पाटणकरणीच्या लाडवाच्या डब्यात भाताचे गोळे प्रकरण) ती स्कुटी दिसली होती.

जर गावातल्या पोरिंकडे टीव्हीएस स्कुटी आहेत तर नाईकांच्या घरी एकही टु व्हीलर का नाही.? आण्णाकडे तर बुलेट असायला हवी होती.

Pages