रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते मटण कोंबडीचं होतं काय? मग सरिताला वाचवताना २५-३० कोंबड्या बळी पडल्या त्यांचंच असेल ते मटण. मला तरी पांडूचा रेकॉर्ड बघता काशी मरेल असं वाटत नाही. तो डोळे मिटून बसलेला दाखवलाय ते बहुतेक पोस्ट-लंच वामकुक्षी असेल Happy कारण तो करणीमुळे मेला असं दाखवलं तर अंधश्रध्दा पसरवतात म्हणून बोंब होईल की.

तो करणी मुळे मेला असं नाही होणार यात . त्या विशिष्ट विषारी झाडाच्या तुकड्यावर ( जे वच्छि ने तिथे टाकलेले असते ) चिकन कापल्यामुळे रस्सा विषारी होऊन त्याला फेस सुटला. सरिता त्याला चिकन देते तेव्हा फेस नसतो सुटलेला. पण नंतर माई बघते तेव्हा तिला वाटतं की कोणीतरी करणी केली म्हणून ते असं खराब झालं मटण...
ती सून नाही का आधी काशी च्या आई ला त्या विषारी झाडाची आयडिया देते...
चिकन कापणारे पण बोलतात ना की हे नवं दिसतंय म्हणून...आणि जुना ठोकळा ( नीलिमा नाही ..लाकडाचा च) दुसरीकडे पडलेला असतो

ह्या मालिकेत खरंतर करणी, भानामती, अंधश्रद्धा काही नाही. मालिकेतुन मिळणारा संदेश म्हणजे जर दुसयाचं वाईट कराल तर तुमचं वाईट होणार.
वच्छीच्या बाबतीत तर ते नेहमीच दिसतं.
भुत वैगेरे नाही. आण्णाला जी काही भुतं दिसतात भिवरी तातुची ते त्याने केलेल्या पापाची फळं म्हणुन भास होतात.

ती काजरा, काजरा म्हणत होती होय. मला ते बराच वेळ गाजरा असेच ऐकु आले. Uhoh धन्यवाद जिप्सी.

स्वप्ना, हो. सगळे मिळुन काहीतरी कुटुन अण्णांना भोवळ आणुया. शेवंताची ( अपूर्वा नेमळेकर ) खरीच ट्रॅजेडी झाली म्हणायची की.

काशी, मटाण खाऊन खरच काशीला गेला की काय? कारण पहिल्या भागात तो पण होता की भूत बनून अण्णांच्या मानगुटीवर. तो खरे तर वच्छीच्या कर्माने गेला म्हणायचे. सस्मित, यु आर राईट. मला पण असेच वाटते की लेखकाला हेच दाखवायचे आहे, पण ते रघु गुरुजींसारखे लोक याचा फायदा उठवुन समाजात अंधश्रद्धा पसरवतात आणी भोळसट, अडाणी लोकांचा गैरफायदा घेतात.

छाया आणी अण्णा दोघेही माझ्या डोक्यात कधीचेच गेले हत. Proud

काजरा म्हणून विषारी झाड आहे, विशेषतः कोकणात आढळते. त्याचा ठोकळा.>> ओह ओके.. बरं झालं सांगितलं नाहीतर मी चुकुन काजरा म्हणजे काजु समजलो होतो.

डोक्यावरुन जाते serial .. बायको कोकणची म्हणून आवडीने बघत असते आणि मलाही बघायला लावत असते...

पहिले काही भाग तर अण्णा त्याच्या कानामागच्या मळाचा वास आवडीने का घेत असतो, असा प्रश्न पडला होता Uhoh नंतर कोण तो.. हां काशि अत्तर अत्तर करतो तेव्हा tube पेटली Lol

परवा वच्छीच्या घरासमोर माईने dance करायला हवाहोता Lol

नस्तर म्हणजे काय मला कळले नाही... कोण सांगता का?

पहिले काही भाग तर अण्णा त्याच्या कानामागच्या मळाचा वास आवडीने का घेत असतो, असा प्रश्न पडला होता>> ईईईईईई Uhoh

परवा वच्छीच्या घरासमोर माईने dance करायला हवाहोता >> माई कधी डान्स करेल का..? शक्यच नाही हे.

ईईईईईई Uhoh > हीच माझीही reaction होती Lol

नष्टर/ नाट = पनवती

Submitted by Ajnabi on 26 March, 2019 - 15:06

नवीन Submitted by रश्मी.. on 26 March, 2019 - 16:20
> धन्यवाद Happy

माई कधी डान्स करेल का..? शक्यच नाही हे.> केलेला ना.... माझ्या स्वप्नात.. अण्णा - माई गिटारच्या धूनीवर भूतांना लाजवेल असा भयानक dance करत होते आणि शेवंता रागाने बघत होती Proud ही serial बघून पुढच्या भागाचा विचार करताना झोपण्याचे परिणाम Lol

>>त्या विशिष्ट विषारी झाडाच्या तुकड्यावर ( जे वच्छि ने तिथे टाकलेले असते ) चिकन कापल्यामुळे रस्सा विषारी होऊन त्याला फेस सुटला.

ओह....असं आहे होय....मी फक्त शेवट शेवट पाहिला कालचा भाग. त्यामुळे ही भानगड माहितच नव्हती. धन्यवाद!

>>ह्या मालिकेत खरंतर करणी, भानामती, अंधश्रद्धा काही नाही.

पण मग ती वच्छीची सून काहीतरी करणी करते आणि इथे सरिताच्या अंगावर मेलेली पाल पडते ती बोलाफुलाला गाठ असते का? तसंच सरिता त्या वाफ्याकडून कोणीतरी शुकशुक करतं असं का म्हणते? तिला तर भिवरी वगैरे भानगड माहित नसते ना? माई दत्ताच्या वेळी प्रेग्नंट असताना त्यांचं अ‍ॅबॉर्शन होतं तेव्हा गर्भ काळा पडला होता असं त्या बायका नानांना सांगतात. ते कशामुळे? प्रेग्नंसीमध्ये कॉम्प्लिकेशन होऊन बाळ पोटात गेलं तर गर्भ काळा पडू शकतो का?

>>छाया माझ्या खूप डोक्यात जाते...तिचं तोंड बघून च 2 सटासट कानफडात द्यायची इच्छा होते तिला

माझ्याही. पहिल्या सिझनमध्ये ती एव्हढी अशक्य नव्हती. ह्या वेळी जास्तच स्वार्थी वाटतेय. माई सरिताला ती माळ देतात तेव्हा मी इथून जाताना सगळे दागिने घेऊन जाणार आहे आणि दिले नाहीत तर गळे चिरून घेऊन जाईन असं म्हणते ती. अगदीच अगोचर कार्टी आहे.

सरिताच्या अंगावर मेलेली पाल पडते>>> असं होऊ शकतं.
सरिता त्या वाफ्याकडून कोणीतरी शुकशुक करतं असं का म्हणते?>>> नंतर दाखवलं ना पांडु कोंबड्यांचं डालगं डोक्यात अडकवुन शुक्शुक आवाज करत येतो म्हणुन.
प्रेग्नंसीमध्ये कॉम्प्लिकेशन होऊन बाळ पोटात गेलं तर गर्भ काळा पडू शकतो का?>>>> हो.
ह्या आणि बर्‍याच गोष्टी नॉरमली होऊ शकतात. पण ही माण्सं त्याचा करणी भानामतीशी संबंध लावतात.

>>माई कधी डान्स करेल का..?

दरोडेखोरांनी अण्णांच्या डोक्याला बंदूक लावून 'गोळ्यो घालीन' अशी धमकी दिली तरच शोलेतल्या बसंती स्टाईल मध्ये घोवाचो जीव वाचवायला माई नाचतील फुटलेल्या कंदिलाच्या काचांवर. जोवर जीव हा तोवर घोवासाठी नाचतला म्हणत.

Biggrin

जोवर जीव हा.. तंवर नाचतंलंय म्या... नाचतंलंय म्या.. नाचतंलंय म्या...

Mai1.JPG

धन्यवाद सस्मित......एपिसोड मधून मधून बघते त्यामुळे हा घोळ होतोय. अण्णा, शेवंता आणि सरिता अर्धा तास सहन करणं माझ्या शक्तीच्या पलिकडलं आहे Happy

चला हवा येऊ द्या मध्ये spoof आल्यापसून माईचं चाय घेवा चाय घेवा कमी झालेय Lol नाहीतर आधी पूर्ण episode मधे तो एकच dialogue असायचा माईचा

जोवर जीव हा.. तंवर नाचतंलंय म्या... नाचतंलंय म्या.. नाचतंलंय म्या... माईंचा असल्या अवतारातला डान्स बघून तो दरोडेखोर स्वतःच पोलिसांच्या स्वाधीन होईल. >>>>>>> Rofl

खरेतर शेवंता नाचली तर show चा TRP वाढेल >>>>>>>> झी मराठी चित्र गौरवच्या प्रोमोमध्ये शेवन्ताला रेन डान्स करताना दाखवलय. सिनियर सोनाली कुलकर्णी तिच्या डान्सवर टाळया वाजवत होती. नक्की ती शेवन्ताच होती ना? की नेहा पेन्डसे? Uhoh

लसुण, आले, सगळ्या प्रकारच्या मिर्च्या, सगळा तिखट खडा मसाला, कोरडी तिखटाची पावडर व आसाम मधील सुप्रसिद्ध जहाल मिर्ची भूत ढोलकीया हे सर्व एकत्र वाटावे, त्याचा अर्क एका रांजणभर पाण्यात कालवावा. आणी मग त्या अण्णाला त्या रांजणात खाली डोके वर पाय करुन बुचकळुन काढावा असे मला तीव्रतेने वाटु लागले आहे. >>>>>>>> मस्त! पुढचा नम्बर गुरु उर्फ गॅरीचा. >>>>>>>> आणि आत्ता पुढचा नम्बर विक्रान्त सरन्जामेचा.

नवी सरिता घावल्यां... नवी सरिता घावल्यां..

गेल्या टायमाक ठोकळीक अटक करुक नेतला तवा ठोकळीक हातात बेडी घालुक तिका पोलिस स्टेशनाक जी पोलिशीन बाय घेउक जातला तीच आपल्या दत्ताचो नवी सरिता असां... ह्ये पाह्य तिचो फोटो :

Sarita1.JPG

Pages