रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वच्छी =ढालगज भवानी.आण्णाला अशी बायको मिळाली असती तरसगळ्या बायकांकडुन राखी बांधून घ्यायाची वेळ आली असती त्याला.>> माझ्या मनात नेम्कं हेच आलं होतं.. लिहिणार इतक्यात तुमची कॉमेंट पाहिलि

तरसगळ्या बायकांकडुन राखी बांधून घ्यायाची वेळ आली असती त्याला.माई म्हणजे 'मेणाहूनी मऊ आम्ही विष्णूदास' चा पूर्वार्ध फक्त.>>>> Biggrin

कालचो भागात माई आण्णावांगडा झीलाच्या आधी चेडुचं लगीन करतंलं तां बरा आसां सांगत असतंली तवा छाया दारामागुन त्यांका बोलणा ऐकुचा असां. ते बघान आण्णा दरवाजाकडं बघात माईक सांगतलंय.."चेडु लगीन करायचो म्हनुन लय उड्या मारत असां तर तिकां गळ्यात धोंड बांधुक बावेत ढकलांन"

त्यां ऐकुन छायाची जाम चरफड होतली Proud

शेवंता ड्यांजर बाई हा... नवर्‍यासमोर आण्णाक फेफर आणित. किती सुचक बोली होती काल ज्या फक्त तिका आणि आण्णांकव कळत होता. सुषमा आण्णांची चेडू आसंय काय माका शन्का हा. शेवंता आण्णाक धरून ठेवक (त्याच्ये नाड्ये) आवळूक सांगत अशाल.

>>आणी आधी भिवरीच्या झिंज्या उपटल्या असत्या म्हणजे अण्णांना पुढे शेवंता मिळालीच नसती.

भिवरीसुद्धा येऊ दिली नसती तिने आण्णांच्या आयुष्यात. कसली मुलुखमैदान तोफ आहे नुसती.

पाहिला एपिसोड झी५ वर. मला वाटतं पाटणकर दोन दिवस नाही म्हणून आण्णा पहारेकरी न ठेवताच शेवंताकडे जाणार. पाटणकर लवकर येणार, दोघांना रंगेहाथ पकडणार. मग एक तर आण्णा तेका गोळ्यो घालतलंय किंवा पाटणकर शेवंता आणि मुलीला घराबाहेर काढणार. मग शेवंता वाड्यात घुसायचा प्रयत्न करणार. त्यात ती असफल होणार. मग एक तर ती जीव देणार किंवा आण्णा तिला संपवणार. मला तर दुसरी शक्यता जास्त दिसते ह्या प्रकारामुळे माधवाचं लग्न मोडणार. आणि तो मुंबैस निघून येणार. एकूणात काय वच्छी आणि कंपनीसाठी 'मोगँबो खुश हुआ' मोमेंट.

बिचारा दत्ता मात्र नुसता काम करायला आहे. Sad

>>त्यां ऐकुन छायाची जाम चरफड होतली

बरं झालं सोनारानेच कान टोचले. मी आण्णांची लाडकी लेक आहे म्हणत होती. वैताग आहे नुसती. काय लग्न करून दिवे लावणार आहे काय माहित. अगदीच निर्लज्ज आहे. त्या शेवंताची लेक शोभली असती. माईंच्या पोटी कशी आली काय माहित. :रागः

>>त्यां ऐकुन छायाची जाम चरफड होतली

जाम चरफड झाल्यान असं पाहिजे ना वाक्य? भूतकाळ आहे.

वच्छी =ढालगज भवानी.आण्णाला अशी बायको मिळाली असती तरसगळ्या बायकांकडुन राखी बांधून घ्यायाची वेळ आली असती त्याला >>>> त्याच्याही आधी, आण्णा भिंतीवरच्या फोटोत लटकले असते ....... Happy

बाकी वच्छीतै, डान्स मस्त करतात..

पाहिला एपिसोड झी५ वर. मला वाटतं पाटणकर दोन दिवस नाही म्हणून आण्णा पहारेकरी न ठेवताच शेवंताकडे जाणार. पाटणकर लवकर येणार, दोघांना रंगेहाथ पकडणार. मग एक तर आण्णा तेका गोळ्यो घालतलंय किंवा पाटणकर शेवंता आणि मुलीला घराबाहेर काढणार. मग शेवंता वाड्यात घुसायचा प्रयत्न करणार. त्यात ती असफल होणार. मग एक तर ती जीव देणार किंवा आण्णा तिला संपवणार. मला तर दुसरी शक्यता जास्त दिसते ह्या प्रकारामुळे माधवाचं लग्न मोडणार. आणि तो मुंबैस निघून येणार. एकूणात काय वच्छी आणि कंपनीसाठी 'मोगँबो खुश हुआ' मोमेंट. >>>>
स्वप्ना: माका नाव वाटत, पांडू इतक्यात शेवंताक मारतला.

अमावास्या आणि राखेचे बंधन यामुळे अण्णाना शेवंताच्या जागी भिवरीचे भूत दिसते . त्यामुळे त्यांचा हिरमोड होतो आणि रात्र फुकट जाते असं दाखवलंय प्रोमो मध्ये

आणखी काही गाणी:

माई - रैना बीती जाये, अण्णा ना आये, निंदिया न आये
शेवंता - रात बाकी, बात बाकी, होना है जो हो जाने दो
पांडू - दुनिया पागल है, या फिर मै दिवाना
नाना - ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यो हुआ
वच्छी - आ देखे जरा किसमे कितना है दम
काशीची बायको - दय्या मै ये कहा आ फसी, हाय रे फसी, रोना आवे ना आवे हसी, काशी बचा लो तुसी
माधव - राज की बात कह दू तो जाने महफिलमे फिर क्या हो
छाया पंटरला - अच्छा तो हम चलते है
चोंगट्या - मेरे नाल तू व्हिसल बजा

स्वप्ना Proud मस्त गाणी आहेत.

सुसल्या :- ए दादा आवार ये

आता सुना - नातवंडे आलेले अण्णा आणी माई व पुढील सदस्य गातायत नवीन गाणी !

अण्णा : दिल तो बच्चा है

माई : अजीब दास्ता है कहां शुरु कहां खतम

दत्ता : बाय गो बाय गो विलायती नाय गो

माधव : तु कहां ये बतां इस नशिली रातमें

सरीता: माझ्या नवर्‍याने सोडलीया दारु, गं बाई मला देव पावलाय

पांडु : अकेले अकेले कहां जा रहे हो, हमे साथ ले लो

अभिराम : ये गो ये मैना, पिंजरा बनाया चांदीका

देविका: आ जाने जा, आ मेरा ये हुस्न जवां

छाया : हम थे जिनके सहारे, वो हुए ना हमारे, डुबी जब दिलकी नैय्या सामने थे किनारे

नाथा : गोलमाल है भई सब गोलमल है

निलीमा : रात बाकी, बात बाकी होना है जो, हो जाने दो

शेवंता भुतनी : आ जा ओ मेरे हमदम TV Ghost

भिवरी भुतनी : गुमनाम है कोई, बदनाम है कोई Zombie mummy

तातु : एक रस्ता अहा अहा, दो राही आहा आहा Glitter Devil

रश्मी :फिदी:.....अरुण.....पांडू काय करतला ते ब्रह्मदेवाक पण सान्गुचो यायचो नाय...आपण फक्त बगत रवाचं.....

अर्रर्र....शेवन्ताने ती lateral pose द्यायला नको होती.......इन्द्राच्या दरबारात एव्हध्या वजनदार अप्सरा असल्या तर त्या नाचल्या की स्वर्ग खरंच धरतीवर येउन पडेल त्या इंद्रासकट....

काय तो आण्णाचा तमाशा.....आणि एव्हढा आरडाओरडा ऐकून कोणी येत नाही काय चाललंय ते बघायला????

सगळे दिवे विझल्यावर माई काय खच्चून बोंबलल्या......गे बाय सगले दिवे इझले.....जाम हसले मी.

माईसाठी नवं गाणं-रात अकेली है बुझ गये दिये आके मेरे पास कानोमे मेरे जो भी चाहे कहिये
आण्णा -थोडी सी जो पी ली है चोरी तो नही की है. गो भिवरी गो शेवंता गो इंदू जमालो,कोई हमको रोको कोई तो सम्भालो,कही हम गिर ना पडे

स्वप्ना_राज, रश्मी, गाणी मस्त Lol

माईसाठी नवं गाणं-रात अकेली है बुझ गये दिये आके मेरे पास कानोमे मेरे जो भी चाहे कहिये >>>>>>>>> पण हे गाण शेवन्तासाठी असायला हव ना.

सूलू_८२, हो ना. पण शेवंताच्या घरात दिवे विझले नाहीत की Happy आणि माईच्या वाटयाला आण्णा येत नाहीत आजकाल Wink

योग, तीव्र निषेध!! जॉन माझा लाडका आहे. आण्णाशी त्याची तुलना म्हणजे खंय राजा भोज खंय गंगू तेली Happy

आता पाटणकर दोन दिवसांनंतर परत येतात का पहायचं नाहीतर त्यांच्या अपघाती निधनाची वार्ताच येऊन थडकायची. पांडगो काय लिहिल अन काय नाही काय माहित.

आण्णाशी त्याची तुलना म्हणजे खंय राजा भोज खंय गंगू तेली >>>> स्वप्ना: तू जॉन ला गंगू तेली म्हणत्येस का??? Lol

व्हय, ह्यो पांडग्योचो काय पन भरौसा नाय .... Happy

अरुण...जॉनबद्दल असं काहीऐकून घेवचो नाय मी हा सांगून ठेवतंय:-)माका माहित आसा तुम्ही gentlemen लोक तेच्यावर खार खाऊन आसा.इतको handsome दिसता ता.

माधवची होणारी बायको तुमच्यासारखा घोव पाहिजे होता म्हणते म्हणजे काय?हिने कोकणात मिस्टर बिनचे पिक्चर पाहिले का काय गावच्या जत्रेत?आता माधव घर सोडून मुंबईला पळतो का पौर्णिमेच्या आधी शेवंता प्रकरण होउन अपोआप त्याचं लग्न मोडतं देव जाणे.बाकी मुलगी आणि नारळ द्या म्हटल्यावर माझ्या मनात आलंआता छायाच्या पंटरच्या डोक्यात मारायला नारळाची सोय झाली.

प्रोमोत पाठमोरी शेवंता पाटणकरला आण्णा समजुन बोलतेय असं दाखवलंय पण पांडूचा एकंदर कल बघता हाही बार फुसकाच निघेलबहुधा.

स्वप्ना तुझंच ऐकून पांडोबा कथा लिहितात हे अनेकदा पाहिले आहे तर शेवंता आणि पाटणकर यांच्यात काही घडणार नाही हे तर उघडच आहे

बाकी मुलगी आणि नारळ द्या म्हटल्यावर माझ्या मनात आलंआता छायाच्या पंटरच्या डोक्यात मारायला नारळाची सोय झाली.>>>>> Lol

बाकी मुलगी आणि नारळ द्या म्हटल्यावर माझ्या मनात आलंआता छायाच्या पंटरच्या डोक्यात मारायला नारळाची सोय झाली.>>>>> काय भन्नाट सुचतं हिला!

Pages