मालवणी-कोकणी शब्दार्थ

Submitted by नीलू on 14 January, 2009 - 12:40

'मालवणी शिकायचय?' या बाफला मिळालेला प्रतिसाद बघून कोकणी/मालवणी शब्द आणि त्यांचे अर्थ यांचे संकलन ईथे नवीन हितगुजच्या विभागात करावे असे वाटले. काही सोप्या मालवणी शब्दांपासून मी सुरुवात करतेय पण मालवणी/कोकणी जाणकारांनी कृपया त्यात भर टाकावी. जेणेकरून नवीन-जुन्या सर्वच गजालीकरांना ईथे पाहिजे त्या शब्दांचे दुवे मिळणे सोपे जाईल. बाकी शब्दरचना वगैरे तिथे 'मालवणी शिकायचय?' या बाफवर कळेलच. पण शक्यतो ईथे गप्पा न मारता फक्त माहितीच पोस्ट करण्यात यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुका-तुका,
माका-मला,
तुमका-तुम्हाला,
आमका-आम्हाला,
हयसर/हय-ईथे,
थयसर/थय-तिथे,
खयसर/खय-कुठे,
झिल-मुलगा,
बायेल-बायको,
घो-नवरा,
बापुस्-वडील,
आऊस-आई,
चेडू-मुलगी,
रे-अरे,
गो-अग,
अगे/गे=अग(आदरार्थी),
कित्या-कशाला,
कोणाक-कोणाला,
ह्याका-ह्याला,
त्याका-त्याला,
आसा-आहे,
वांगडा-सोबत,
बेगीना-लवकर,
वायच-थोडेसं,
भुतुर-आत,
भायेर-बाहेर,
ईले-आले,
भगल-थट्टा,
फाटफट-सकाळ,
दोंपार-दुपार

केदार, शैलू, ललिताताई तुम्ही यासगळ्यांचे गोवन कोकणी भाषेतीलही शब्द ईथे द्याल तर आम्हालाही गोवन भाषा पण शिकता येईल. Happy

गोवन नाही गं नीलू, गोव्याची कोकणी किंवा कारवारी कोकणी. साधारण सारख्या आहेत, थोडंफार इकडे तिकडे. मला जमतात तेवढे लिहिते हं. शेवटचा शब्द गोव्याच्या/ कारवारी कोकणीचा आहे.

तुका-तुला-तुका,
माका-मला - माका,
तुमका-तुम्हाला- तुमका,*
आमका-आम्हाला - आमका,*
हयसर/हय-ईथे - हांगा,
थयसर/थय-तिथे- थय,
खयसर/खय-कुठे - खय,
झिल-मुलगा - चलो (उच्चारी चलॉ),
बायेल-बायको - बायल,
घो-नवरा- घोव,
बापुस्-वडील -बापुल्लो, (नक्की नाही आठवत.. :(, ललिताताईना माहित असणार नक्की )
आऊस-आई - आवय,
चेडू-मुलगी - चली,
रे-अरे - रे, अरे, (दोन्हीही चलतील)
गो-अग- अगो (उच्चारी अगॉ),
अगे/गे -अग(आदरार्थी) - अगे,
कित्या-कशाला - कित्या,
कोणाक-कोणाला- कोणांक (उच्चारी -कोणॉक),
ह्याका-ह्याला - हाका,
त्याका-त्याला - ताका,
आसा-आहे - आसा,
वांगडा-सोबत- बरोबर (उदा. - ताजेबरोबर - तिच्या/त्याच्या बरोबर),
बेगीना-लवकर- बेगीन,
रव-रहा - रांव,
वायच-थोडेसं - मातशे,
भुतुर-आत -भीतर,
भायेर-बाहेर- हायेर,
ईले-आले- आयलो (पुल्लिंगी), आयले (स्रीलिंगी),
भगल-थट्टा - मस्करी (अजूनपण एक शब्द आहे, आठवत नाही :()

* कोकणीत खरे तर आदरार्थी अहो जाहो करायची पद्धत नाही. वडिलधार्‍यांनाही तू च म्हणायचे. आदर असतोच Happy पण अगदीच कोणी परकी व्यक्ती असेल तर, कदाचित आदरार्थी अहो जाहो करत असावेत.

शैलू छान Happy अजून काय वेगळे शब्द आसतीत तेव टाक.
विनयानू हीच लिंक मी पण थय मालवणी शिकायचय बाफच्या सुरुवातीक दिलय पण एक दोनजणा सोडता कोण थयसर फिराकलो नाय असा वाटता. आणि शिवाय काय काय शब्द सुरुवातीक मिंग्लिशात आसत म्हणून ह्यो प्रपंच Happy आणि मालवणीच्या जोडीन गोव्याचे कोकणी शब्दपण बगूक मिळतीत.

रव-रहा
हाड-आण
जाय-जा
बग-बघ
खेतूर-कशात
शाप-पूर्ण
व्हरणे-नेणे

रव-रहा -रांव
हाड-आण -हाड
जाय-जा -वच
बग-बघ -पळय/ पळैं
खेतूर-कशात - आठवत नाही .. Sad
शाप-पूर्ण - पुराय
व्हरणे-नेणे -व्हर

बापूस - वडील - बापूय (कारवारी) ... हांव मगेल्या बापायगेर वता (जाते/जातो)
बापुल्यो म्हळ्यार (म्हणजे) काका
खेतूर - कशात - कित्यात, कसल्यात

गो आयटे मात्शे म्हणजे काय??

मातशे म्हळ्यार जराशे, उलीक. थोडं, जरासच.
गाण्याचा भाषांतर करतय काय? Happy

व्हकाल - नवरी
(बाईल म्हणजे बायको)

ह्या मातशे चुलीम्होरचा...
होवरो-स्वयंपाकघर
आडाळो - विळी
काविलता-उलातणं
भानशेरां - फडकं
आडसार्-शहाळं
चिटकं - गवार
न्हेवरी - करंजी
तिकला- माशाची जाडसर आमटी
कुवळ- पातळ आमटी

बरोबर आसय काय गो आय टी ?

गो निलू ताय Happy
हांगा येवन कॉपी करून गेलय काय Proud

डॅफोडील्स कोंकणी बरी उलयता गो तू Happy
.
ललिताबाय घट मगे Happy

डॅफो, मस्त. २ -३ शब्द माकाय नवीनच कळले. घराक विचारुक व्हया Happy
आणि २ शब्दांत मातसो फरक गो Happy ह्या बघ,

आडाळो - विळी - आडोळी
भानशेरां - फडकं - भानचिरां

केदारा
अरे म्या हयसर वाचन वाचन शिकलंय... Happy
नाय्तर माका खय येउक मालवणी.. आमच्या पुण्याक नाय बा असं बोलत कुनी... Happy

चार पाच वर्षापारतो... हय.. मायबोलीकर गजाली करत .. काय ते म्हण्यो ईचारू नकोस.. हसान हसान पोट दुखतले.. Biggrin

...

रे माका पन जरा काय ता सान्गा मरे

स्वागत !
ये बाय ये गौरि, सांगतले हा सगळे सगळा सांगतले.
ईचार काय ता...

........... सुन्या आंबोलकर

मंडळी,
कोंकणीतल्या शब्दार्थांचा एक मुक्त सामायिक शब्दकोश असावा, म्हणून मी कोंकणी विक्शनरीच्या निर्मितीकरता विकिमीडिया फाउंडेशनाला विनंती केली आहे. या विनंतीवर विकिमीडिया फाउंडेशनाचे प्रशासक निर्णय घेतील. त्यांचा होकार आल्यास इंग्लिश विक्शनरीमराठी विक्शनरीप्रमाणे कोंकणी विक्शनरी प्रकल्पही सुरू करता येईल. त्यांची निर्णयप्रक्रिया अशी असते.

निर्णयप्रक्रियेबद्दल हालहवाल मी कळवत राहीनच. पण तुमच्याकडून एक सहकार्य अपेक्षित आहे : लॉगिन होऊन कोंकणी विक्शनरीच्या विनंतीपत्रावर "Arguments in favour" विभागात सकारात्मक टिप्पणी नोंदवा (अर्थातच, मनापासून वाटत असल्यास; वाटत नसल्यास "Arguments agains" विभागातही टिप्पणी नोंदवावयास हरकत नाही. Wink ). तुमच्या टिप्पण्यांचा फाउंडेशनाच्या निर्णयावर थेट परिणाम होणार नसला, तरी अनुकूल प्रतिसादावरून त्यांना संभाव्य विक्शनरी प्रकल्पाच्या भवितव्याबद्दल आश्वासक परिस्थिती जाणवू शकेल.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

हो घेवा कारवारी कोंकणी शब्दकोश . हेच्या आधारान सगळ्यांच्या मदतीन मालवणी शब्दकोश तयार करूक येयात. चला तर लगा कामाक.
http://www.savemylanguage.org/konkani/wordindex.php

गोवन कोकणी नी कारवारी कोकणी फरक असतो तसा. उच्चारात सुद्धा फरक असतो. इथे लिहून दखवू शकत नाही. पण तेच शब्द जसा तुमका एकदम अश्या पदध्तीने उच्चारतील ना कारवारी की एक मिनीटे लागेल समजायला. (हा माझा अनुभव). आणखी एक, तुगेल नाव कसं नै? असे मी बर्‍याचदा मँगलोर मध्ये एकलय आईच्या नातेवाईक म्हणताना.

एक कोकणी म्हण कोणाला आठवते का? माझी चुलत आजी म्हणायची,
सुरुवात अशी होती,

वाघ बसलोय झाळीत... नाळीत.. असेच काहीतरी. Happy

वाघ पडलो घाळी, केडलां वाजयता नळी...

विनय Wink

हा हा बरोबर विनय. तिला ही म्हण सारखी म्हणायची सवय होती. तिला तशाही बर्‍याचदा म्हणीतच बोलायची सवय होती. आम्ही मुले हसायचो. मग ती एक टीपीकल कोकणी शीवी हासडायची.(इथे देवू शकत नाही):)

>> कसं नै? >> कसं नै नाही ते मनुस्विनी, कसंलैं? असं असत ते. लैं अनुनासिक असतो म्हणून प्रथमच ऐकताना तो नैं सारखा वाटतो. कोकणी शिकायचा बाफ आहे गं हा, वेगवेगळ्या ठिकाणच्या कोकणी उच्चारांना, भाषेच्या लहेज्याला माझं मत म्हणत नावं ठेवायचा नाही! Happy दिवे घे!

मी कुठे नाव ठेवले ,उच्चाराचा फरक सांगत होते. तुला का तसे वाटले बाई? Happy

>>तेच शब्द जसा तुमका एकदम अश्या पदध्तीने उच्चारतील ना कारवारी की एक मिनीटे लागेल समजायला. (हा माझा अनुभव).

ह्यावरुन वाटले ग मला Happy मी कोकणी -कारवारी, गोव्याची आणि मालवणी बोलू शकते. मंगलोरी मला समजते. गोव्याच्या आणि कारवारी पद्धतीच्या उच्चारांमध्ये फरक हा आहेच, पण तू जरा अतिरंजित विधान करते आहेस, समजायला १ मिनिट लागते वगैरे. Happy

हा बहुधा एकण्याच्या सरावाचा प्रश्ण असेल मग. मी कारवारला गेले की आईचे तिथे वाढलेले नातलग बोलत ते मला तरी वेळ लागे कळायला. तुला सवय असेल तर नसेल वाटत बहुधा. Happy असो.

मनु, शैलजा, दोघांचाय बरोबर. सरावाचो प्रश्न .

नमस्कार मित्रानु. खंयचीय भाशा बोलुचो पयलो नेम म्हंजे तिचां व्याकरान समजावन घेंवक व्होयां. कोंकणीचाय तसांच आसां. उदा. कित्या म्हंजे मराठित "का". म्हणान "तु कित्या हय इलं?" चो अर्थ मरठित "तु इथे का आलास?" आसो जातलों.
तेका फुडे "क" जोडलो काय "कित्याक" आसो शब्द जालो जेचों मरठि अर्थ "कशाला" आसो जातां.
माज्या कडसुन कांय कोंकणि/मालवणी शब्द -
१. फाल्यां - उद्या
२. व्हर (मालवणि कोंकणितय) - ने
३. येदोळ(मालवणि कोंकणितय) - थोड्या वेळापुर्वि/मगाशी
४. दबाज्यान (मालवणि कोंकणितय) - धुमधडाक्यात
५. सामको (मालवणि कोंकणितय आसा पण तेचो अर्थ माका वाट्टा सरळ आसो जातां)- अगदी
६. येदो/तेदो/केदो/जेदो (मालवणि कोंकणितय) - येवढा/तेवढा/केवढा/जेवढा
आजच्याक इतक्याच पुरे. Happy

Pages