पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा, अजंल_12 एकदा tropicakonkan site प्लीज check करा, आता site सुरु आहे. पुन्हा काही प्रोब्लेम आला तर मला सांगा.

आत्ताच चेक केलं पण अजूनही नो शिपिंग असाच ऑप्शन दाखवतोय.

पुण्यातील 55 पिनकोड नंबर ना होम डिलिव्हरी सुरु केली आहे, काही area कव्हर झाला नाही आहे. मला तुमचा पिनकोड मेसेज करा, मी आमची डिलिव्हरी पिनकोड लिस्ट चेक करून बघते की त्यात तुमचा पिनकोड आहे का.

रोजच्या नाष्ट्याच्या रेसिपीज सुचवा ना. आधी चा धागा असेल तर लिंक द्या ना प्लीज. आमच्या कडे रोजच गरम नाष्टा लागतो. रोज नवीन काय करावे??

>>> . आमच्या कडे रोजच गरम नाष्टा लागतो. रोज नवीन काय करावे??<<
तरुण असतील तर त्यांचा त्यांना गरम गरम करायला सांगावा. फु. स. ( ह. घ्या.)

जाहीरात विभागात ओगले प्रॉडक्ट्स आणि आमच्या प्रॉडक्ट्स ची जाहीरात दिली आहे.

सध्या माझे बाबा एकटे राहात आहेत, आई असताना चहा,ऑम्लेट सोडुन काही बनवले नाही पण आता ती नाही तर माझे मी बनवतो असे म्हणत आहेत.
तर त्यांना रोज नाष्टा साठी काही झटपट मेनु सुचवा ना.
त्यांना इन्स्टंट रेडीमिक्स करुन द्यायचे डोक्यात आहे जसे की उपमा, शिरा, मुगाची खिचडी.
इन्स्टंट उपमा करतात तसं इन्स्टंट पोहे करता येणं शक्य आहे का ?
अग्रज मधे कुठेतरी असे पाकीट पाहिल्याचं आठवतंय.
अजुन काही इन्स्टंट खाण्याचे ऑप्शन असतील तर प्लीज सांगा.
तसेच हे पदार्थ बनवण्याच्या काही टीप्स असतील तर त्या पण सांगा प्लीज.

इन्स्टंट पोहे करता येणं शक्य आहे का ? > हो. खूप ठिकाणी उपलब्ध आहे. फ्रोजन पोळ्या मिळतात. आणि शिरा, खीर, सा.खि. , आळूची भाजी, डाळ-पालक, पीठलं अशा ही गोष्टी मिळतात. परदेशी शिकायला जाणार्‍या एका नात्यातल्या मुलासाठी ही खरेदी केली होती.

Hebbars kitchen मध्ये youtube वर तिनी इन्स्टंट पोहे ची कृती दिली आहे (फक्त गरम पाणी घालायचे) . उपमा पण असणार. MTR चे कप इन्स्टंट ब्रेकफास्ट मिक्स मिळतात चांगली चव असते, फक्त गरम पाणी घालायचे. गरम पाण्याची kettle घेतली तर गॅस पण ऑन करायला नको. गिरनार चे इन्स्टंट tea pre-मिक्स मिळतात, छान चहा होतो. Gits च्या रेडी टू ईट भाज्या छान असतात.

मला या सगळ्या गोष्टी विकत नाही घ्यायच्या.
उपमा, शिरा, पोहे , खिचडी हे बल्क मधे बनवुन द्यायचे आहे.
तर त्या साठी रेसिपी शोधते आहे. ट्राईड आणि टेस्टेड.
बाकी पोळी भाजी साठी डबा मिळाला आहे. त्यामुळे तो प्रश्ण नाही.

Hebbars kitchen मध्ये youtube वर तिनी इन्स्टंट पोहे ची कृती दिली आहे (फक्त गरम पाणी घालायचे) . उपमा पण असणार. >> हे बघते.

He is an adult can't he cook for himself? Unless really old and needs support.

बाकी पोळी भाजी साठी डबा मिळाला आहे. त्यामुळे तो प्रश्ण नाही.>>>> हे चांगलं आहे.तरीही मला वाटतं की एखादी पोळीभाजी करणारी मावशी मिळाल्यास अधिक चांगले होईल.

इन्स्टंट पोहे मिक्स रेसिपी
मिक्स तयार करताना पोहे धुवून घेतलेले नाहीत. बाकी पद्धत सेम. फोडणीवर पोहे कुरकुरीत करून घ्यायचे. तेलही जास्त लागावं. खायला करताना पाणी घालून शिजवायचे आहेत.

स्मिता श्रीपाद, सा खि बद्दल सांगू शकते. पूर्ण खिचडी तयार करुन छोटे पोर्शन करुन झिपलॉक मधे भरुन फ्रीज करायची. लागेल तेव्हा काचेच्या भांड्यात पाण्याचा किंचीत हबका मारुन मायक्रोवेव्ह करायची. मऊसूत, लुसलुशीत साखि तयार होते.

स्मिता, ओटमिल, कॉर्न फ्लेक्स वगैरे खाऊ शकतील का? सकाळी व्होल व्हीट ब्रेडचा टोस्ट करुन.
जेष्ठ नागरिकांना थोड अवघड जात हे पदार्थ खायला जर रोजच्या पोह्याची वगैरे सवय असेल तर पण अधुन मधुन थोडा चेंज वाटेल.

शिरा, शेवयाचा उपमा किंवा शेवया शिजवून त्यात तुप साखर घालुण, शेंगदाण्याच्या पोळ्या इत्यादी पण खाता येईल.

हे चांगलं आहे.तरीही मला वाटतं की एखादी पोळीभाजी करणारी मावशी मिळाल्यास अधिक चांगले होईल. >> शोधते आहे मी बाई सुद्धा. पण कणीक, रोजच्या भाज्या, बाकी मीठ मसाले हे सगळं सामान , inventory management नीट जमेल याबद्दल खात्री नाहिये अजुन तरी.
त्यामुळे घरगुती डबा मिळाला आहे तो पर्याय चांगला वाटतोय.

He is an adult can't he cook for himself? Unless really old and needs support. >> नाही. त्यांना नाही जमत स्वयंपाक करायला. चहा , ऑम्लेट येतं फक्त. मी लिहिलय तसं वर आधीच Happy

भरत, शुगोल, धन्यवाद. करुन बघते हे दोन प्रयोग.

सीमा, ओट वगैरे नाही ग आवडत.पण बाकी घरात राजगीरा लाडु, खजुर वगैरे नेहेमी आणुन ठेवतात. दुध घालुन राजगीरा लाडु खाल्ला की भरतं पोट लगेच. शेंगदाणा पोळी वरुन आठवलं. साटोर्या, भोपळा घारगे वगैरे पण जरा आणून ठेवेन आता.

बाकी आता त्यांना बेसिक रेसिपी चं पुस्तक आणुन दिलय Happy ते बघुन करयचा प्रयत्न करत आहेत. शिकतील हळुहळु.
पण तोवर घरात रेडीमिक्स चे डबे भरलेले असुदेत. म्हणजे मला काळजी नाही.

धन्यवाद सर्वांना __/\__

स्मिता, तू प्रत्येक विकेंडला पुढच्या आठवड्याची ब्रेकफास्टची तयारी करणार असं गृहीत धरते आहे. एखाद्या विकेंडला स्वतःच्या कामामुळे किंवा इतर काही कारणाने तुला तयारी करून ठेवण जमलं नाही तर डेक्कनला R P वैद्य किंवा P Y वैद्य दुकानांमध्ये चक्कर मार. रेडीमिक्स / इन्स्टंट पदार्थाची भरपूर व्हरायटी आहे. रोजचा ब्रेकफास्ट आणि कधी तरी मधल्या वेळेस खाणं याच्या हेल्दी व्हरायटी मिळतील.

@मीरा, हो ग..अग्रज मधे पण खुप काही पाहिलं काल. तिथुन बर्याच गोष्टी आणत असतात बाबा. ते बघुनच सुचलं की हे पदार्थ घरी करुन बघावेत.
कारण तसे ते महाग पडतात बर्यापैकी. शिवाय आता बाबांचा सेल्फ कुकींग क्लास पण चालु आहे ;-). त्यामुळे फार दिवस नाही पडणार गरज असे वाटतेय.

१. पोहे धूवून त्यात दूध साखर घालायची.
२.पोहे भिजवून त्यात गूळ,साजूक तूप ,वेलची घालायची.शक्य असल्यास वरून ओले खोबरे घालायचे.
३.इडलीचे तयार पीठ आणून एक दिवस डोसा/उथप्पा/ आप्पे करणे.
४.सँडविच आवडत असल्यास ते करणे.
५.केळी+गूळ तांदळाच्या/ गव्हाच्या पीठात मिक्स करून भजी काढणे.
६. शिरा (पहिल्यांदा शिकवावा लागेल.)

आता इतकेच आठवतेय.

आमच्याकडे कामाला येणार्या काकुंनी त्यांच्या शेतातली किलोभर ताजी ओली हळद (हळकुंड) दिली आहे, त्याची काही वेगळी पाकृ आहे की माईनमुळाच्या लोणाच्या सारखेच करायचे?

इथे कुणी वालडाळ वापरली आहे का? नेहमीची वालाची उसळ करतो तशीच करतात की आणखी काही वेगळी पद्धत आहे? मी कदाचीत घरातील दूधी वापरून (ढकलून) करुन पाहणार आहे. इतर कृती असल्यास द्याल का? धन्यवाद Happy

माझ्यामते नेहेमीची डाळींब्यांची रेस्पी जमेल.
ह, ति, मी, गूळ, गोडा मसाला, नादू, को. हवं तर आलं, लसूण, कांदा

Pages