पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घरी करण्यापेक्षा क्रोगरचं घ्यावं व प्यावं, जेवण होऊन जातं!>>> Happy बरोबर. फक्त क्रोगर ऐवजी मी कॉस्टो मध्ये पनेरा ब्रेडच मिळत ते आणते कारण बेस व्हेजीटेरिअन असतो. क्रोगरच पण बघते.

आदू , मीरा .. या माय्बोलीकरणीने मला रेसिपी दिली होती ती खाली कॉपी केल्ये. मी तेव्हा खूप वेळा केली होती. आणि छान आणि झट्पट झाली होती.

" बटण मश्रुम्स ( मोठे असतील तर एकाचे दोन/चार तुकडे), स्वच्छ धुवुन ड्राय करुन घ्यायचे. हिरवी मिरची आणि लसुण पेस्ट करुन ती ऑऑमधे टाकायची. त्यातच आख्खे जिरे ( किंवा आवडत नसतील तर मिरची-लसुणबरोबर ग्राइंड करुन घ्यायचे) टाकुन मश्रुम्स टाकायचे. थोडा वेळ सॉटे केल्यावर मीठ टाकुन जे पाणी सुटतं त्यावर शिजवायचे. पॅनवर झाकण घालायचं नाही. पाणी पुर्ण सुकल्यावर गरम गरम खायचे. ब्रेड स्लाइसमधे घालुन किंवा स्टार्टर म्हणुन खाता येतात. ( ऑऑ नसेल तर साध्या तेलातही छान होतात. मीठ मात्र कमीच घालायचं कारण मश्रुममधे कदाचित नॅचरल खारटपणा असावा. थोडं जरी जास्त घातलं गेलं तरी खारट होतात. ) एन्जॉय ! Happy "

ऋ च्या खाऊगल्ली आजचा मेनू काय या धाग्यावर मी मश्रूम मंचुरियन चा फोटो टाकला होता मागच्या महिन्यात. तो प्रकार चालत असल्यास,...
चिंगचा मंचुरियन मसाला वापरून १५ मिनिटे मॅरीनेट करून ठेवणे. आणि उरलेला मसाला वापरून मंचुरियन करणे.

तळटीप: चांगले मॅरीनेट होण्यासाठी, मश्रूम ला डोक्याच्या साईडला काप देऊन बॅटर हलक्या हाताने आत भरणे. भरल्या वांग्याप्रमाणे.
फार नाजूक प्रकार असतो हाताळायला.

ज्याच्या इवलुश्या बाटलीची किंमत भारतात स्टोअर शेल्फ वर वाचून तोंड उघडं पडून तोंडातून फक्त ऑ, ऑ इतकेच आवाज फुटतात असं ते ऑलिव्ह ऑईल ☺️☺️

ज्याच्या इवलुश्या बाटलीची किंमत भारतात स्टोअर शेल्फ वर वाचून तोंड उघडं पडून तोंडातून फक्त ऑ, ऑ इतकेच आवाज फुटतात असं ते ऑलिव्ह ऑईल ☺️☺️ >> अगदी अगदी अनु

अनु Rofl

ज्याच्या इवलुश्या बाटलीची किंमत भारतात स्टोअर शेल्फ वर वाचून तोंड उघडं पडून तोंडातून फक्त ऑ, ऑ इतकेच आवाज फुटतात असं ते ऑलिव्ह ऑईल >>> सही Lol

दही इडली करा. दही वड्याला करतो तस दही करायचं आणि त्यात इडल्या मुरवायच्या वरून आवडेल अशी सजावट.

एकदा आम्ही सारे खववय्ये मध्ये शेजवान इडल्या पण दाखवल्या होत्या पण रेसिपी नाही लक्षात.

सॉफिस्तिकेटेड लोक आणि हुचच शेफ लोक ऑलिव्ह ऑइल ची इतकी लाल कशासाठी करतात हेच समजत नाही.

आपण हुच्च आहोत हे दाखवण्याचा कायम प्रयत्न त्यांची नंतर जीवनशैलीचा होऊन जाते.

पौष्टिक गुणात तिळाचे तेल करडई तेल तुअपेक्षा किती तरी वरच्या दर्जाला आहेत.

तांबे आहार भुवनात कोथिंबीर वडी घेतली तर 75 रुपयाला 4 मोठ्या घसघशीत वड्या येतात.
तेच गोल गोल छोट्या वड्या तळून पुदिन्याच्या चटणी बरोबर वे साईड इन मध्ये "ड्रिंक्स" बरोबर घेतल्या तर "धनिया कबाब विथ टॅनजी मिंट चटनी " म्हणून 350 रुपये अधिक GST द्यावा लागतो.

डॉ. साहेब, प्रत्येक तेलाची एक चव असते. नुसतेच पौष्टीक दृष्टीने सगळ्या गोष्टींचा विचार नाही ना करत आपण. आणि शेफ वगैरे पाश्चात्य देशांतील असले तर ते तिथे मिळणार्या वेजिटेबल ऑइल, कॅनोला ऑइल पेक्षा पौष्टीक म्हणून ऑ ऑ घ्या असे म्हणतात. आपल्याकडचे शेफ तेल , तूप खा असेच म्हणतात. रणवीर ब्रार चे व्हिडीओ बघा जरा. जिथला पदार्थ तिथे मिळणार्‍या तेलात केला तर त्याची चव अधिक खुलून येते - आपल्याकडचे पदार्थ गोडे तेल/ तुपात, कोरियन पदार्थ तिळाच्या तेलात, मेडीटेरियन पदार्थ ऑऑ मध्ये वगैरे. उगीच जिथेतिथे शिव्या घालायची काय गरज.

चिली इडली पण चांगली लागते.
सुशीला/फोभा करतो त्याच रेसीपीने फोडणीची इडली

माझ्या mallu मै च्या आईने इडली ची भाजी करून stuffing करून पराठे केले होते, ते मला आवडले नाहीत, तुम्ही try करून बघा

त्यांनी इडलीची भजी पण केलेली

आमच्याकडे दोन पाकिटे नूडल्स शिल्लक आहेत, चायनीज रेसिपी करायची नाहीये, सो चायनीज वस्तू न वापरता काय करता येईल सुचवा प्लिज☺️

Pesto kiva white sauce madhe noodles banvu shakta, masta lagtat.. nahitr simple, Olive oil kiva butter var bharpur lasun khamanga partun boiled noodles partaychya masta lagtat burnt garlic fried noodles!

कांदा, लसूण, मस्त तेलावर परतून घ्या. त्यात पाहिजे तर इतर भाज्या घाला मग नुडल्स तोडून घाला. अगदी बेताचे पाणी आणि गरम मसाला घाला. उकळून पाणी संपले आणि नुडल्स शिजले की मस्त मसाला नुडल्स खा.

एक नंबर लागतात अशा रितीने केलेल्या नुडल्स!

तांबे आहार भुवनात कोथिंबीर वडी घेतली तर 75 रुपयाला 4 मोठ्या घसघशीत वड्या येतात.
तेच गोल गोल छोट्या वड्या तळून पुदिन्याच्या चटणी बरोबर वे साईड इन मध्ये "ड्रिंक्स" बरोबर घेतल्या तर "धनिया कबाब विथ टॅनजी मिंट चटनी " म्हणून 350 रुपये अधिक GST द्यावा लागतो.
<<
तांबे आहार भुवनात ड्रिंक्स किंवा गेला बाजार सोमरस तरी मिळतो का? 106.gif

धन्यवाद

आता करून बघेन नूडल्स उपमा अन कांदा लसूण मसाला घालून☺️

साध्या रव्याच्या उपम्यात पण थोड्या प्लेन नूडल्स घालून मस्त होतो मिक्स उपमा. फोडणीत कांदा, कोबी वगैरे परतला की गरम पाणी घालून उकळी आली की लहान तुकडे करून नूडल्स घालायच्या, शिजल्या की भाजलेला रवा.

VB-- आलं लसूण पेस्ट, चिलि फ्लेक्स आणि आवडीच्या भाज्या.. कोबी, पात, फरसबी, कांदा, लाल पिवळी मिरची, गाजर ई. आँँ.आॉ. वर छान शिजवून त्या त नुडल्स घालून परतून घ्या.. like Aglio olio pasta.

almond milk आणले आहे प्रथमच. ते उकळलेलं चालतं का कॉफीसाठी? नेटवर दूध फाटतं असंही वाचलं. तुम्ही कोणी वापरत असाल तर कॉफी कशी करता?

मी ते थंडच घालते कॉफीमध्ये पण मी काळी कॉफी ब्रु करते. कॉफी नंतर गरम केली गेली आहे तेव्हा फाटले नाही पण एकदा सॉय मिल्क मावे मध्ये काही सेकंद ठेवले तेव्हा फाटले होते. आमंड मिल्क कधी गरम करून पाहिले नाही. हवं तर थोडंसं करुन पहा आणि आम्हालाच सांगा Happy

Pages