पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही भाड्याने आणली..
एक मोठं डब्बा आहे माझ्याकडे,
त्यात बटाटे शिजवलेले सोलून टाकले, smash केले लगेच,
दुसऱ्या कुकर मध्ये फ्लॉवर शिजवला होता, तो बटाट्यावर घालून smash केला,
फ्रोझन मटार आणि बारीक चिरलेली शिमला मिर्च पातेल्यात थोडी वाफवून घेतली, कुकर ला नाही लावली कारण खुप शिजते कुकर ला, मटार शिमला मिर्च पूर्ण smash नाही झालेली चांगली दिसते म्हणून.
आता हे फ्लॉवर बटाटा smash केलेल्या डब्यात ओतलं. पाणी गाळून अर्थात. आणि पुन्हा एकदा सगळा एकत्र हलवताना पावभाजी मसाला घातला थोडा,
बटाटा smash करताना थोडा मीठ घेतला,
फ्लॉवर smash करताना थोडं मीठ घातला,
तसेच शिमला मिर्च मटार वाफवताना मीठ घातला.
प्रत्येक स्टेप ला थोडे थोडं मीठ घालत गेले, चवीत फरक पडतो. (माझ्या वाहिनीची idea)
आता वरील पैकी एक जाड बुडाचा पातेलं ठेवून,
पाऊण लिटर सूर्यफूल तेल टाकून थोडा खडा मसाला टाकला.
त्यात 1.5kg कांद्याची पेस्ट घातली, ती शिजतं आली कि हळद मीठ आलं लसूण पेस्ट घातली,
मग टोमॉटो टोमॉटो puree घातली त्याबरोबर बीट खिसुन घातले. हे शिजतं आलं कि एव्हरेस्ट काश्मीरी लाल घेतला, पाऊण पावभाजी मसाला घातला, मीठ घातला थोडा. हे सगळा पुन्हा झाकण ठेवून शिजू दिला. एका बाजूला अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवला, plus मटार शिमला मिर्च गाळून ठेवलेलें पाणी होतेच.
आता फोडणीचे मिश्रण (वरील पाऊण पातेले झाले होते ) डब्यातला मिश्रणावर ओतले, सगळे पातेलं नाही बरं, दांड्याचा पातेले घेऊन त्याने हळू हळू ओतलं.
एकजीव केला, उकळत पाणी ओतला. सगळा एकसारखा केला. मिठाची चव पाहिली.
सगळा झाल्यवर मग वरील दोन पातेल्यात समान मिश्रण ओतलं. 5 मिनिट उकळी येई पर्यंत high flame वर ठेवला, मग low flame करून 1 तास रटरटू दिला. Gas बंद केल्यावर अर्धा किलो अमूल butter दोन्ही पातेल्यात घातला.
सकाळी आठ ला बटाटा कुकर लावला होता, आमचा सकाळचा स्वयंपाक पोळी भाजी, plus झाडू, कपडे जेवणे, ओटा आवरणे, भांडी हे सगळे simultaneously चालू होता. बटर टाकले तेव्हा 4 वाजले होते. वाहिनीची मुलगी 5 वर्षाची आहे, तिला घेऊन आली होती, so या दोन मुलींचा शी सु, जेवन भरवणे, पाणी, कपडे घालणे, मध्ये मध्ये काहीतरी मागणे चालू होते, त्यांना झोपवताना आम्ही दोघीनी 15-20 मिनिटाचा पॉवर नॅप घेतली.
नवऱ्यला तंबी दिली होती कि मी पावभाजी करतेय तुम्ही डेकोरेशन च बघा.

अरे वाह, छान झाला की सगळा कार्यक्रम तुमचा. लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा☺️

माझ्या मम्मी ला सुद्धा स्वतः सगळे करायची हौस आहे, परवडत नाही असे नाही पण हौस खूप. तिने तर यासाठी मोठं मोठी भांडी पण विकत घेतलेत. या नवरात्रीला सप्तमीचे जेवण केले होते तेव्हा वापरली ही भांडी, किमान १०० जण ज्यात अंदाजे ३० मुले होती , या वेळी एकटीने नाही केले तिने बिल्डिंगच्या बायका आल्या होत्या मदतीला.
भांड्यांचा फोटो खाली देतेय, यात एक सगळ्यात मोठा टोप नाहीये.

Screenshot_2019-11-04-13-11-41-605_com.miui_.gallery.png

Sahich Sheetal. Congratulations.
Happy birthday to your daughter .

तरी गडबडीत मुलांना birthday कॅप द्यायचे राहिला. मुलगी काही आणलं कि लेगच उघडून नासधूस करते म्हूणन आम्ही काही आणलं कि कपाटात टाकतो ते तसच राहिला.
आता उद्या तिझ्या school मध्ये त्या कॅप, cadbury, plus 1kg केक देणार आहोत.

@VB, धन्यवाद. तुमच्या आई चा collection छान आहे भांड्याचे. कुठे राहतात त्या, मला आवडेल त्यांना भेटायला.
आणि तुम्ही प्रमाण लिहिला त्याबद्दल ही धन्यवाद. पण मी कधीच छोले नारळ दूध घालून भाजी केली नाही म्हूणन आता एवढे मोठे करायचा म्हणून नाही केली.
नंतर नक्की थोडी करून पाहीन या पद्धतीने.

अगदी पहिल्या पासून वाचत होते शीतल , त्यामुळे लिहिलं नव्हतं पण मला ही धनुडी सारखी उत्सुकता वाटत होती खूप.

मस्त च मॅनेज केलंत सगळं . अभिनंदन तुमचं.

तुमच्या लेकी ला ही खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मी पण वाचत होते....
शितल, तुझं खूप कौतुक व शाबासकी
लेकीला अनेक आशीर्वाद!
मी ह्यावर्षी पन्नास किलो अनारश्याच पीठ करून विकलं (निव्वळ हौस)
लेख पाडावा का? :विचारात पडलेली बाहुली:

मी पण वाचत होते.... >> +1
शीतल.. मस्त मॅनेज केलंत..लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मंजूताई.. हॅट्स ऑफ! लवकर लेख लिहा

मी ह्यावर्षी पन्नास किलो अनारश्याच पीठ करून विकलं.......मुजरा स्वीकार व्हावा मंजुताई!
हो आणि समजा कोणी उत्पन्नासाठी हे करत असेल तर इतरांची पर्वा का बाळगावी?

@मनीमोहोर, @सस्मित खुप खुप धन्यवाद. इथे साद प्रतिसाद करायला खुप छान वाटलं मला, गप्पा मारल्याचा फीलिंग.
@मंजूताई, धन्यवाद. लेख लिहा तुम्ही, पावभाजी भाज्या चिरणे smash करणे होते फक्त.
अनारसे पीठ त्यातही 50kg not जोक, I can understand the hard work behind the scenes.
पीठ आणि गूळ खुप चुरावा लागतो ना. तेही 4 दिवस ठेवून पुन्हा गोळा फोडून पुन्हा चुरून एकजीव करणे, पुन्हा ही प्रोसेस रिपीट करणे. By the way तुम्ही कुठे असता, हे असं काही करताना मला बोलवत जा मला पण खुप हौस आहे आणि शिकायला पण मिळेल. हौसेला मोल नाही म्हणतात ते उगाच नाही.

मी ह्यावर्षी पन्नास किलो अनारश्याच पीठ करून विकलं (निव्वळ हौस) >> मंजू ग्रेट आहेस. अनुभव लिही नक्की. मजा येईल वाचताना.

असं काही करताना मला बोलवत जा मला....किस मिट्टी के बने हो Wink >> अगदी अगदी. एवढया पावभाजी मुळे तिचा उत्साह आणि confidence वाढलाय .

@देवकी, <<हो आणि समजा कोणी उत्पन्नासाठी हे करत असेल तर इतरांची पर्वा का बाळगावी?>>
खरय, लोकं manipulate करतात तरी ही.
मी माझ्या शेजारणीला म्हणाले कि माझ्याकडे तासभर येऊन जाशील भाज्या cut करायला तर, मला तोंडावर काही नाही बोलली नंतर watsup msg करते कि "we are friends not maid, please call maid and u have such good package then u can afford maid, u eat outside food so u can afford this. Please dont depend on me etc etc" आणि मला maid चा नंबर पाठवला.
आणि हो मी डॉक्टर आहे, मला तु vegetables cut करायला बोलवते वैगेरे.
बाकी शेजारील wing मधील माझ्या मैत्रीणि दिवाळी सुट्टी साठी माहेरी गेल्या होत्या, त्या मला बोलल्या कि आम्ही असतो तर आलो असतो, तुला मदतीला आहेच कि शेजारीण.

कौतुकाबद्दल धन्यवाद!
शितल, अग अनप्लान्ड झालं. एवढी मागणी असेल अशी अजिबात कल्पना नव्हती.... कुणाला नाराजही करवत नव्हते... हा उद्योग पुण्यात केला ... पुढच्या वर्षी करूयात आपण दोघी मिळून तयारीनिशी...

@देवकी, <<असं काही करताना मला बोलवत जा मला....किस मिट्टी के बने हो विंक >> शिकायला मिळते हो.
मागच्या वर्षी मी, सासूबाई आणि एक मैत्रीण मिळून 50 जणांचा पुरणाचा स्वयंपाक केला होता, माझ्या जावेच्या भावाला मुलगी आली होती पाहायला. तर जाऊ बाई वरील सर्व पाहत होत्या. मी सासूबाई आणि मैत्रीण स्वयंपाक. आणि हो त्यावेळी disposible प्लेट्स नव्हते बरं आणले, जावेने शेजारील चार जणांकडून त्यांचे ठेवणीतील ताट वाटी चमचे पेले वगैरे जमवले होते.
त्यावेळी, बटाटा भाजी, मेथीची भाजी, कुरडई भजी पापड, कटाची आमटी, पुरणपोळी, साधा वरण भात. असं बेत होता.
पण आमच्या कडे नेहमी काहीतरी राहून जाते त्यावेळी पुरुषांच्या पंगतीला भजीच नाही वाढली.

@मंजूताई,
<<< हा उद्योग पुण्यात केला ... पुढच्या वर्षी करूयात आपण दोघी मिळून तयारीनिशी...>>> नक्कीच. I am interested

वॉव मस्तच किती उरक आहे तुम्हा दोघींना. ग्रेट. वाचून छान वाटले. इथली चर्चा बघून मी घरी पथ्याची पावभाजी बनवलेली. नो बटर व्हेरी लिटिल सॉल्ट व तेल. आणि दोन स्लाइस भाजून घेतले. छोटीस वाढदिवसाची पार्टी लक्षात राहील.

व्वा! शितल, खूप खूप कौतुक! लेकीला वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा! इथे सगळी प्रोसेस डिटेलमधे लिहीलीत त्याबद्दल धन्यवाद!
मंजूताई, सहीच! खरच एक लेख लिहा या अनुभवावर!
वीबी, तुमच्या आईकडची भांडी किती छान आहेत.

>>डॉक्टर म्हणजे BAMS आयुर्वेद बरं.>>
म्हणजे त्यांचे स्टेटस कमी असते का?
तुम्हाला मदत केली नाही म्हणून त्यांना तुच्छ लेखणे योग्य नव्हे

स्टेटस कमी म्हणून नाही, तिझा अविर्भाव तसा होता कि, तसं बोलली कि मी डॉक्टर आहे तर तू मला भाज्या कट करायला सांगते. आणि बाकीचा सगळं msg नीट वाचा काय लिहिलंत ते.
इथे मी स्टेटस बद्दल लिहीत नाहीये, ती मला काय बोलली ते लिहला आहे ते डायरेक्ट नाही वॉट्सअँप वर.
फक्त नाही म्हणून सांगायचं ना, maid चा नंबर dependency आणि आम्ही बाहेर खातो, package आहे एव्हडा हे काय बोलायचं होता?

तुम्हाला मदत केली नाही म्हणून त्यांना तुच्छ लेखणे योग्य नव्हे>> + ११ मदत करावी न करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. तुमच्याच अशा पोस्ट मुळे तुमच्याच छान झालेल्या कार्यक्रमाला गालबोट लावू नका.

पावभाजीला मस्त रंग आला आहे. बराच उरका पाडलात तुम्ही. अभिनंदन Happy तुमच्या मुलीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

Pages