पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, अमच्याकडे काळे वाटाणे नसले तर संपलेच की सगळे Happy Happy गावी भजनात काळ्या वाटाण्याची सुक्की उसळ हा आवडीचा मेन्यू असतो. दर कृष्णाष्टमीला रात्री शेगलाची भाजी, आंबोळ्या व काळ्या वाटाण्याची उसळ हा ठरलेला मेन्यू (चुकून कधी) नसला की माझ्या बाबांचे पित्तच उसळायचे Happy Happy

आरतीने दिलेली ओगले यांची साईट मी आत्ता बघितली, खूप भन्नाट products आहेत त्यावर.>>>>>>>>>> हो मी पण पाहिले. पण पुण्यात शिपिंगचा ऑप्शन का नाहीये?. Sad

अंजु , आरती धन्यवाद.
साईट खुप छान आहे . मी कोल्हापुरला शिप करण्यासाठी (घरी गेले कि मग तिथून इथे घेवून येईन) बराच प्रयत्न केला. पण चेक आउट करायला गेल कि कार्ट एम्टी मेसेज येतो. काय माहित काय इशु आहे.

काही कमेंट्स वाचून वाटतय की, काळा वाटाणा शिजवायचा कसा माहित नाहिये. ह्यात भरपूर प्रोटीन( बाकी कडधान्यापेक्षा) असते, ज्यास्त शिजवले तरी दडदडीत होतात आणि लोकं आधीच आंबट टाकतात.
अमीरेकेत बहुधा नाही मिळत( मला तरी तेव्हा नाही मिळाले) पण युकेला असताना सरार्स मिळायचे. ब्रिटिश लोकं आपल्याकडून घेवुन गेले.
अन्जू, बरोबर, सिंधूदुर्ग पट्ट्यात ज्यास्तच खातात, खास करून मालवण वगैर. बांदा वगैरे मग पुढे गोवा.
नाव सांगते आणि ऑनलाईन मिळतील आता.
अमेरीकेत जबरदस्त फाईन आहे एअरपोर्ट वर पकडले तर.. लोकं काय आणतात म्हणा लपवून.. पण $४८० का काय एकीला पडलेला फाईन. ती तर तांदूळ वगैरे घेवून जायची . तेव्हा तांदूळाला वेगळा. अशी सजा झालेली.

पण पुण्यात शिपिंगचा ऑप्शन का नाहीये?. >>> नाहीये का, मी ते काही बघितलंच नाही, फक्त products बघत राहिले .

अन्जू, बरोबर, सिंधूदुर्ग पट्ट्यात ज्यास्तच खातात, खास करून मालवण वगैर. बांदा वगैरे मग पुढे गोवा. >>> तळकोकणात जास्त करतात. मालवणी मसाला पण थोडा वेगळा असेल ना, गरम मसाल्यापेक्षा, मला आमच्या वरच्या म्हणत होत्या एकदा तुम्ही मालवणी मसाला घालून करून बघा, अजून छान लागेल गरम मसाल्यापेक्षा.

brussels sprouts रेसिपी हवी आहे.भाजी करता येते का? जुनं हितगुज नाहीसं झालेलं दिसतंय.

सीमा, अजंली_12 मी त्यानां आज कळवते त्यांच्या site issue बद्दल. ही site नविनच सुरु केली आहे.

त्यांच्या site वरील सगळे प्रोड्क्ट्स आणि त्याहुन काही वेगळे प्रॉडक्ट्स आमच्याकडे विक्री साठी उपलब्ध आहेत. लवकरच माबो जाहीरात विभागात देईंन.

स्वाती ताई धन्यवाद, इंग्रो हे नेक्स्ट मिशन आहे आमच्यासाठी. सध्या कुरियर करत आहोत individual ऑर्डर साठी.

साधना, कोरडी मसालेदार (चाट प्रकारची) काळ्या वाटाण्याची उसळ नुसती खायला मस्तच लागेल. पण पोळीशी तोंडीलावणं म्हणून मला ती अजीबात जमत नाही. नुसता घास तोंडात फिरत राहतो. Wink

भरत, दालबाटीबद्दल एकदम सहमत. पण हल्लीच मिळालेली एक नवीन टीप - 'दाल बाटीपे चटनी नही डाला तो मजा नही आता' तेंव्हा आता एकदा शेवटचा प्रयत्न करणार आहे चटण्या घालून खायचा. ही टीप पटली आहे कारण दाल पक्वान, रगडा पॅटीस अशा प्रकारांची लज्जत चटण्यांमुळेच येते नुसते खायला अगदीच सपक लागतात. (रच्याकने मला दाल बाटी खिलवणार्‍यांनी त्यावर नुसते तुपच ऑफर केले होते, चटण्या नाही. तेंव्हा चटण्या असतात का दालबाटीबरोबर याबाबत जरा साशंकच आहे)

दालबाटी सोबत बटाट्याची सुकी भाजी, चटणी, चुरमे के लड्डू आणि कढी असा पूर्ण बेत असतो. त्यामुळे दालबाटी सुसह्य होते.

 कोरडी मसालेदार (चाट प्रकारची) काळ्या वाटाण्याची उसळ नुसती खायला मस्तच लागेल. पण पोळीशी तोंडीलावणं म्हणून मला ती अजीबात जमत नाही. नुसता घास तोंडात फिरत राहतो. --- +1 , सुंदल आवडते.

इंदोरला मामाकडे गेले होते तेव्हा एका जेवणाला दाल बाफले केले होते घरीच. आमटीची चव छान होती आणि भरपूर घेतली त्यामुळे आवडली. चटणी, कोशिंबीर काही नव्हते. पण बरोबर खूप जण होते आणि कित्येक वर्षांपासून pending असलेल्या गप्पा Happy

आरती, साईट बघते .... नागपूरला डीलर मीळाले का?
साधना, शेगलाची भाजी पहिल्यांदाच ऐकली... रेसिपी फोटोसहित टाक ना ...
दालबाटी खाण्याची पध्दत आहे... बाटी छान कुस्करायची त्यात दाल टाकून खायची... दाल त्यासाठी मात्र टेस्टी पाहिजे.

दर कृष्णाष्टमीला रात्री शेगलाची भाजी, आंबोळ्या व काळ्या वाटाण्याची उसळ हा ठरलेला मेन्यू >>>> नको नको साधनाताई ! Sad
एकतर बाहेर सकाळपासून पाउस पडतोय , काहीतरी गरम गरम खावस वाटतयं त्यात का जीवाला त्रास ! Happy

डाळ बाटी मला मध्य प्रदेशमध्ये नागदा इथे मावशी राहायची तेव्हा तिथल्या एकानी जेवायला बोलावले होते, मराठीच होते. अगदी चुलीवर बाट्या केलेल्या. तिथली आवडलेली, जाम टेस्टी होती. नंतर श्रीरामपुरमध्ये राजस्थानी लोक करायचे, दुकान होतं एक तिथली अजिबात आवडली नाही डाळ पण नाही, बाटी पण नाही, ओवन मध्ये केलेल्या बाट्या . मी घरीही केलेली, तीही नाही आवडली मला Wink .

साधना, शेगलाची भाजी पहिल्यांदाच ऐकली... >>>> मंजूताई, शेगूल म्हणजे शेवगा.त्याच्या पानांची भाजी करतात.

साधना,कृष्णाष्टमीला तुम्ही सांगितलेला मेन्यू आजोळी असायचा अजून एक म्हणजे सांजोर्‍यापण असायच्या.

त्यांच्या site वरील सगळे प्रोड्क्ट्स आणि त्याहुन काही वेगळे प्रॉडक्ट्स आमच्याकडे विक्री साठी उपलब्ध आहेत. लवकरच माबो जाहीरात विभागात देईंन. >>> अरे वा, अभिनंदन आरती.

brussels sprouts >> आर्धे कापून त्याला तेल, तिखट मीठ आणि मीरेपूड लावून मस्त ओव्हन मध्ये टाकायचे. वरतून थोडे चीज भुरभुरायचे. खरपूस झाले की खायला तयार. बरोबर मेल्टेड चीज भन्नाट लागते.

शेगला म्हणजे शेवग्याचा पाला.. बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण यांची फोडणी करून, बारीक चिरलेला कांदा परतून शिजवून घेऊन मग शेवग्याचा पाला धुवून टाकणे. वाफवून मीठ टाकून खवलेला ओला खोबरं घालणे. नणंद मेथीची भाजी पण अशीच करते. आणि समुद्री मेथीची भाजी पण अशीच.
नणंदेला कोकणात दिला आहे. त्यांच्या कडे पाचवी पुजताना ही भाजी लागते..
देवकी तुमच्या आई ची रेसिपी ही सांगा विचारून.

Pages