Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शितल, फारच भारी. भाजी मस्तं
शितल, फारच भारी. भाजी मस्तं दिसतेय. एवढ्या लोकांचा मोठा कार्यक्रम, रोजची कामे करून फक्त दोघींनी मस्तं पार पाडणे खूपच कौतुकास्पद आहे.
तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
एक वेगळाच प्रश्न पडलाय. विचारू का?
तुम्ही wfh करताय म्हणजे पुण्यामुंबई सारख्या शहरात राहत असाल ना? मग 80-90 लोकांना कुठे बोलावलं होतं? बनवलेले पदार्थ तिथपर्यंत कसे घेऊन गेला? आजकाल सगळ्या हॉलना केटरर घ्यावेच लागतात असा अनुभव आहे म्हणून उत्सुकता वाटली.
की एवढे लोक घरी एकावेळी येऊ, बसू, जेवू शकले?
की एवढे लोक घरी एकावेळी येऊ,
की एवढे लोक घरी एकावेळी येऊ, बसू, जेवू शकले?>>> गच्चीत पण कार्यक्रम करता येईल ना.
शीतल सांगतीलच त्यांनी काय
शीतल सांगतीलच त्यांनी काय केलं ते, पण अंगण, गच्ची, सोसायटी चा पार्टी हॉल, घर मोठे असणे, पाहुण्यांना वेगवेगळ्या वेळा देऊन crowd management यापैकी कसेही 80-90 लोकांना manage करता येतं.
शीतल, डिटेल वर्णन लिहिलं मस्त
शीतल, डिटेल वर्णन लिहिलं मस्त केलं.छोटीला वाढदिवस या शुभेच्छा.
शेजारणीने 'जमणार नाही' लिहिलं असतं तरी चाललं असतं.बाकी गोष्टींची गरम नव्हती.कदाचित आणि काही जुनं भांडण आठवून वचपा काढला असेल.
मंजुताई, मी निःशब्द आहे.तोहफो कुबुल करो.पुढच्या वर्षी माझी पण ऑर्डर.
भाजी सुरेख दिसते आहे. सगळं
भाजी सुरेख दिसते आहे. सगळं मस्त मॅनेज केलत की! मुलीला वाधदिवसाबद्दल शुभेच्छा!
पावभाजीचा रंग मस्त आला आहे.
पावभाजीचा रंग मस्त आला आहे. तुमच्या लेकीला शुभेच्छा.
मला आजकाल अशा मोठ्या पार्ट्यांनंतर येणारी शारिरीक दुखणी आधीच दिसायला लागतात. त्यामुळे जी लोकं इतके कष्ट उपसतात त्यांचं फारच कौतुक वाटतं.
शीतल, सर्व काही नीट झाल्याचे
शीतल, सर्व काही नीट झाल्याचे इथे आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद. आणि इतका मोठा घाट घालून सर्व नीट निभवून नेल्याबद्दल अभिनंदन .
लेकीला वाढदिवसानिमित्त आशीर्वाद.
https://www.maayboli.com/node/57552 या बाफ वर किती सामान घेतले होते, किती पुरले / उरले याचा अंदाज लिहून ठेवाल का ?
सगळयांना धन्यवाद,
सगळयांना धन्यवाद,
लोकांची arrangement management करण्याचा मी टेन्शन नव्हता घेतला. 20 खुर्च्या भाडयाने आणल्या होत्या.
माझा flat 800sq फूट आहे, 2bhk, plus dry बाल्कनी, main terrace/ galary, child bedroom छोटी आहे.
मास्टर बेडरूम, हॉल आणि open terrace जवळ जवळ सारखंच आहे. शिवाय main दरवाजा बाहेर च common corridor specious आहे म्हणजे अगदी duplex flat ला असतो तसं नाही, flat पण डुप्लेक्स नाहीये. आम्ही नवीन घेतलाय, मे मध्ये राहायला आलोय.
So open टेरर्स मध्ये, हॉल मध्ये, बाहेर corridor मध्ये arranged झाला.
शिवाय लोकं थोडीच एकसाथ येतात. आणि मी पण जसे येतील तसें सर्व्ह करत गेले, म्हणजे 7-8 एका वेळी.
तळेगाव ला राहते. चिंचवड पासून 18-20km असेल
@मेधा, धन्यवाद.
@मेधा, धन्यवाद.
नक्की लिहिते त्या धाग्यावर
@mi_anu, <<शेजारणीने 'जमणार
@mi_anu, <<शेजारणीने 'जमणार नाही' लिहिलं असतं तरी चाललं असतं.बाकी गोष्टींची गरम नव्हती.>>हेच म्हणायचा होता मला.
लोकांची arrangement
लोकांची arrangement management करण्याचा मी टेन्शन नव्हता घेतला.>>>>> असं काही वाचलं की प्रचंड न्यूनगंड येतो.असो . एलियन ची गोष्ट!
केळफुलाची भाजी कशी करतात?
केळफुलाची भाजी कशी करतात?
शीतल तुमच खुप खुप कौतुक..
शीतल तुमच खुप खुप कौतुक...मस्त दिसते आहे पाव भाजी.
मंजुताई ---/\---
शीतल, सर्व काही नीट झाल्याचे
शीतल, सर्व काही नीट झाल्याचे इथे आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद. आणि इतका मोठा घाट घालून सर्व नीट निभवून नेल्याबद्दल अभिनंदन .>>>>>+१११११
मंजू ताई तुमचंही खूप कौतूक
केळफुलाची भाजी कशी करतात?....
केळफुलाची भाजी कशी करतात?......... आं गो, केलफुल नीट करता येत असेल तर भाजी सोपी आहे.केळफूल चिरून पाण्यात घालून रात्रभर ठेवावे.म्हणजे कडवटपणा कमी होतो.तसेच त्यात एखाददुसरा कोकम घाला.
काळे वाटाणे भिजत घाला.
दुसऱ्या दिवशी के.फू.पाण्यातून उपसून गच्च पिळून घ्या.आठवणीने कोकम काढून टाका.कुकरला काळे vaataane ani के.फू.वेगवेगळ्या भांड्यात ठेऊन शिजवून घ्या.दुसऱ्या भांड्यात थोड्या तेलावर राई+ लसूण यांची फोडणी करून शिजवलेले कवा के फू घालावे.मीठ,तिखट घालावे.2 मिनिटे शिजू द्यावे.मिक्सर मध्ये थोडस्सा कांदा + ओले खोबरे पाणी न घालता वाटून घ्यावे .भाजीत घालावे साखर घालावी.
तुम्हाला हवे असल्यास हिंग राईची फोडणी घाला.कांद्याखोबर्याच्या vatanaaivaji ओले खोबरे वरतून शिवरा.
देवकी धन्यवाद!
देवकी धन्यवाद!
कुकर ला शिजवावे लागते का ? गाळ नाही ना होत?
मला वाटले कोबीच्या भाजी सारखी कराअयची!
तसेच केळफूल नीट करणे म्हणजे काय? मधला दांडा काढून बारीक चिरणे ना?
हाताला तेल लावावे लागते काय?
मला वाटले कोबीच्या भाजी सारखी
मला वाटले कोबीच्या भाजी सारखी कराअयची! >> माझी आई करते अशीच भिजवलेली चणाडाळ घालून. डाळ शिजेपर्यंत पाण्याचा हबका देते. केळफूल मात्र आदल्या रात्रीच बारीक चिरुन पाण्यात घालून ठेवते.
मला फक्त आई केळफूल निवडायचे
मला फक्त आई केळफूल निवडायचे किचकट काम द्यायची हेच आठवतं, आम्ही जरा मोठे झाल्यावर ही भाजी केली गेली नाही. आता निवडलेली मिळते बहुतेक ओगले products ची असावी, ती आणून एकदा करेन. त्यावर कृतीही असते. त्यांची फणसाची एक दोनदा केलेली, छान झालेली.
केळफूल पण मिळत का ओगले च ?
केळफूल पण मिळत का ओगले च ? चांगलं आहे मग.
अंजू ओगले च्या धर्तीवर आम्ही ही ह्या वर्षी चिरलेला कोवळा फणस पॅक केला होता. मी लंडनला मुलांना दिले होते दोन पॅक . मस्त भाजी झाली विना त्रास. लंडन मध्ये घरच्या कोवळ्या फणसाची भाजी ..खुश होते फारच
केळफूल पण मिळत का ओगले च ?
केळफूल पण मिळत का ओगले च ? चांगलं आहे मग. >>> बहुतेक वाटतंय, एका स्कूलफ्रेंडने दुकानात त्याच्या ठेवलेलं मागे तेव्हा add बघितलेली फेसबुकवर. तुमचे नातेवाईक आहेत ना ओगले, मला वाटतंय तुम्ही कुठेतरी लिहिल्याचं.
अंजू ओगले च्या धर्तीवर आम्ही ही ह्या वर्षी चिरलेला कोवळा फणस पॅक केला होता. मी लंडनला मुलांना दिले होते दोन पॅक . मस्त भाजी झाली विना त्रास. लंडन मध्ये घरच्या कोवळ्या फणसाची भाजी ..खुश होते फारच >>> भारीच की एकदम.
होय जाउबाईंचे मामे भाऊ
होय जाउबाईंचे मामे भाऊ लागतात ते
पावभाजी चे updates रोज वाचत
पावभाजी चे updates रोज वाचत होते, आता प्रतिसाद देतेय.. भारी आहात शीतल... तुम्ही आणि मंजुताई माझा सलाम घ्या बरं...
सविस्तर कृती, प्रमाण आलं तर मजा येईल
काल रात्री फारच गंमत झाली.
काल रात्री फारच गंमत झाली. आम्ही पार जेवणे उरकून घर अंधार करून अर्धवट झोपेत होतो. तर बेल वाजली जोरात. तिथे धडपडत दिवे लावत पोह्चून दार उघडून जाळीतुन बघितले तर एक डिलिव्हरी बॉय अमूल बटर चे पाकीट आणि सहा पावभाजीचे पाव घेउन उभा!!!! मी अर्धवट झोपेत असल्याने मला पहिले वाटले शीतल ने उरलेले पाव व बटर पाठवले वाटतं मग लक्षात आले असे कसे होईल... तो फ्लॅट नंबर चुकीचा वाचून बेल वाजवत होता. त्याला करेक्ट रस्ता दाखवला व हसत दार बंद केले. पावभाजी गाजली तुमची माबोवर.
कुकर ला शिजवावे लागते का ?
कुकर ला शिजवावे लागते का ? गाळ नाही ना होत?.........ajibat naahee. कुकरमध्ये shijavataanaa के.फू मध्ये थोडेसेच पाणी घालायचे.
तुम्हाला कुकरमध्ये घालायचे नसेल तर नका घालू.पण भाजी शिजवताना थोडे पाणी घालावे लागेल.
मधला दांडा काढून बारीक चिरणे ना?
हाताला तेल लावावे लागते काय?>>>>> हो.
दांडा काढायचा आणि पकळीसारखा कव्हर असते तेही काढायचे.बाकी चिरून घ्यायचे.नंतरचा भाग काकडीसारखा चोचावयाचा.
अमा,मस्त!
मी अर्धवट झोपेत असल्याने मला
मी अर्धवट झोपेत असल्याने मला पहिले वाटले शीतल ने उरलेले पाव व बटर पाठवले वाटतं >
अमा
अमा
अमा , भारीच
अमा , भारीच
शीतल, पावभाजी खूप छान दिसतेय.
शीतल, पावभाजी खूप छान दिसतेय. रंग अगदी लालगाळू आलाय गं.
मंजुताई, लेख पाडाच!!!
अंजु, कुठे मिळतील हे ओगलेंचे
अंजु, कुठे मिळतील हे ओगलेंचे प्रोडक्ट्स? गुगल केल्यावर लिस्ट दिसली पण कुठे मिळतील ते नाही. ऑनलाईन असेल तर आईला मागवायला सांगेन.
@देवकी, <<<असं काही वाचलं की
@देवकी, <<<असं काही वाचलं की प्रचंड न्यूनगंड येतो.असो . एलियन ची गोष्ट!>>>असं काही नाही हो.
लोकं वेळेवर येत नाहीत. ते पथ्यावर पडत. शिवाय 6 ची वेळ दिली होती, केक 7.15 ला कापला बच्चे कपंनी जमली कि. So पहिल्यांदा त्यांना वाढला. वर सांगितलंच मी माझ्या फ्लॅट च structure. माझी बेडरूम एवढी बाल्कनी पूर्ण रिकामी आहे फक्त chairs, कॉफी table आणि cloth drying stand एवढंच आहे. मग table केक कटिंग ला घेतला, stand फोल्ड करून ठेवलं. आणि मुलांची पंगत तिथेच बसवली सतरंजी टाकून. बाकी सोफा होताच, हॉल, corridor मध्ये rented chairs ठेवल्या होत्याच.
@अंकु, @धनुडी धन्यवाद
@किल्ली, धन्यवाद, सविस्तर कृती, प्रमाण लिहिली आहे इथे परंतु प्रतिसादांमध्ये विखरला आहे. एकत्र करून लिहते.
@अमा, <<मी अर्धवट झोपेत असल्याने मला पहिले वाटले शीतल ने उरलेले पाव व बटर पाठवले वाटतं>> लय भारी हॅहॅहॅ, जवळ असता तर पाठवलं असतं.
<<पावभाजी गाजली तुमची माबोवर.>> खुप खुप खुप धन्यवाद
@साधना, <<शीतल, पावभाजी खूप छान दिसतेय. रंग अगदी लालगाळू आलाय गं.>>खुप खुप धन्यवाद
सगळ्यांनी एवढं कौतुक केलं इथे अगदी 'दिल बाग बाग हो गया'
एक आवडता इंग्लिश वाक्य खुप आनंद व्यक्त करायचा.. 'if something happens like cloud9, I am on cloud99999999999'
Pages