पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@देवकी, पाककृती छान आहे. परंतु काही शंका..
<<कुकरला काळे vaataane ani के.फू.वेगवेगळ्या भांड्यात ठेऊन शिजवून घ्या>>
1. काळ्या वाटण्याची उसळ केली होती एकदा मोड आणून एकदा रात्रभर भिजवून.. पण 5-6 शिट्ट्या करूनही, अर्धा पाऊण तसा gas वर ठेऊन ही नीट शिजतं नाहीत वाटाणे.. काय चुकला असेल.
अगदी मालवणी कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीरीचे वाटणं, कोकम घालून केले होते, मग फक्त रस्साच खाल्ला.
2. केळफूल एकदा नांदोबानी आणून दिला होता, ते कणकवली चे आहेत, so एकदम फ्रेश आणि भाजी ही करून दाखवली, छान झाली होती, काळे वाटणे नव्हते घातले, तसेच थोडा वेळच ठेवले होते पाण्यात, रात्रभर नाही.
नंतर मी भाजी मंडई मधून आणले सगळी त्यांनी दाखवलेली प्रोसेस follow केली परंतु कडू झाली भाजी.
केळफुलावर पण असतं का? कसं आणावा केळफूल?

अंजु, कुठे मिळतील हे ओगलेंचे प्रोडक्ट्स? >>> माझ्या नवऱ्याने फणसाची भाजी एकदा ठाण्यातून आणलेली, कुठून ते विचारेन आणि सांगेन. इथे डोंबिवलीत माझ्या एका शाळेतल्या मित्राचे दुकान आहे, राजाजी पथ वर, मागे त्याच्याकडे होती असं मी फेसबुकवर वाचलं होतं. पण ते दुकान लांब आहे मला म्हणून मी तिकडे गेले नाहीये अजून. त्याच्याकडे आहे का ते विचारू शकेन त्याला.

>> केळफुलावर पण असतं का? कसं आणावा केळफूल?> हो, केळफूल कडू निघू शकतं. आमच्याकडे निवडून चिरून रात्रभर थोडं ताक घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवतात.

काळ्या वाटण्याची उसळ केली होती एकदा मोड आणून एकदा रात्रभर भिजवून.. पण 5-6 शिट्ट्या करूनही, अर्धा पाऊण तसा gas वर ठेऊन ही नीट शिजतं नाहीत वाटाणे.. काय चुकला असेल.
अगदी मालवणी कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीरीचे वाटणं, कोकम घालून केले होते >>> शिजताना कोकम घातलं हेच चुकलं. कडधान्य शिजली की कोकम किंवा कुठलंही आंबट घालायचं. फक्त मुग अपवाद.
नाहीतर काळे वाटणे सारखी कडधान्य सरळ पहिले कुकराला शिजवून घ्यावीत. नंतर फोडणी करायची.

काळ्या वाटण्याची उसळ किंवा कशातही काळा वाटाणा घालणं ही अजून एक over-hyped dish आहे. सगळ्या उसळी, छोले प्रचंड आवडणारी मी, काळे वाटाणे अजिबातच आवडत नाहीत. Acquired टेस्ट असावी झालं!

@पूर्वाविवेक, <<शिजताना कोकम घातलं हेच चुकलं. >> नाही शिजताना नाही, आधी शिजवून घेतले मग हे वाटणं कोकम, मसाला घातला.

@सायो, <<हो, केळफूल कडू निघू शकतं.>> कसं ओळखायचा मग मंडईतुन आणताना?

@सायो, <<हो, केळफूल कडू निघू शकतं.>> कसं ओळखायचा मग मंडईतुन आणताना?

नवीन Submitted by ShitalKrishna on 6 November, 2019 - 21:15
>>>
कोळंबीतला धागा काढतात. तसा प्रत्येक (बाल)केळात काळा धागा असतो तो कडू असतो. तो काढला की भाजी कडू होत नाही. हे साफ करायचे काम फार किचकट असते. फार खेळावे लागते.
हे धागे म्हणजे केळफुलाचे स्त्री आणि पुंकेसर. माझी आजी त्याला चिमणी अन कावळे (काळा केसर) म्हणायची.

>>> केळफुलावर पण असतं का? कसं आणावा केळफूल?
केळफुलाचं देठ कापलेल्या ठिकाणी लालजांभळं झालं असेल तर केळफूल जून झालेलं असतं आणि भाजी कडवट होते. ते पांढरट बघून घ्यायचं. तसंच त्याच्या 'पाकळ्या' घट्ट दिसायला हव्यात. जर त्या उघडत चालल्या असतील तर त्याचा अर्थ ते जून व्हायला लागलेलं आहे.

माझ्या नणंदेची डिलिव्हरी डेट जवळ आली आहे. तर नंतर बाळंतिणीसाठी काही स्पेशल पाककृती सांगाल का? जुन्या लिंक दिल्या तरी चालेल.

आभा, तुम्हांला ज्या पदार्था ची कृती हवी असेल, त्याचे नाव कोणत्याही धाग्यावर प्रतिसादात टाइप करा . शब्द कॉपी करा. उजवीकडे वर मायबोलीवर शोधा ही सोय दिसते आहे. त्या चौ कटीत शब्द पेस्ट करा . एंटर की प्रेस करा.
मला मोबाइलवरून डायरेक्ट त्या चौक टीत देवनागरीत टाइप करता येतं. वर लिहिलंय ते डेस्क टॉपसाठी.
मला सापडलेल्या धपाट्याच्या तीन कृती
https://www.maayboli.com/node/67053 दुधीचे धपाटे
https://www.maayboli.com/node/67048 ज्वारीचे धपाटे
https://www.maayboli.com/node/54472 पपईचे धपाटे.

धपाटे = थालिपीठ असेल तर थालिपीठ शोधून तुम्हांला आणखी कृती मिळतील.

काळ्या वाटण्याची उसळ किंवा कशातही काळा वाटाणा घालणं ही अजून एक over-hyped dish आहे. >>> मला वाटायचं मीच एकटा आहे की काय! ते दडदडीत वाटाणे खाणे म्हणजे शिक्षा वाटायची मला.

@स्वाती_आंबोळे, धन्यवाद

@पाथफाइंडर, <<कोळंबीतला धागा काढतात. तसा प्रत्येक (बाल)केळात काळा धागा असतो तो कडू असतो. तो काढला की भाजी कडू होत नाही. हे साफ करायचे काम फार किचकट असते. फार खेळावे लागते.>> असच करते तरीही..

काळे वाटाणे शिजतात चांगले. रात्रभर भिजत ठेवुन सकाळी थोडं मीठ घालुन कुकरला लावावे. ४ शिट्ट्यात छान शिजतात. मग फोड्णी करुन वाटणात घातल्यावर जास्त वेळ शिजवायचे नाहीत. नाहीतर दडदडीत होतात.

त्या त्या पदार्थाला विशिष्ट नेपथ्याची गरज असते.
नोस्टाल्जिया हा एक भाग झालाच.
प्रसंग विशेष हाही.
कोकणबाहेरच्या लोकांना टाळल्या वाटाण्याबद्दल जसं वाटतं तसंच मला दालबाटीबद्लल वाटायचं.
इंदूरला कोणत्याही खास प्रसंगी दालबाटी असे. आणि हे काय उकडलेले / भाजलेले कणकेचे गोळे खातात असं वाटे.

टोटली मला एकतर डाळ वरण प्रकारच बोअर वाट्ता त प्लस कणकीचे गोळे!!! अगदी अगदी.

कोकणात तर थपंथपं , दबदबीत असे सरार्स काळ्या वाटाण्याचे प्रकार करतात; कधीच नाही प्रॉबलेम एकला आजीकडून.
आंबोळी आणि दबदबं हे काळ्या वाटाण्याचच.
हात मारून खायचो. वाटाणे वेगळे शिजवून वाटपात घालाय्चे, कोकम टाकून उतरवाय्चे.

डाळ ढोकली का वरण्फळं हा तर माझा नावडता प्रकार आहे.
बुळबुळीत झालेली चपाती असे वाटते मला.
तांदूळाची उकड खाताना पाहून सुद्धा तेच वाटते, कसे खातात?
आ. आ.

भरत , दाल बाटीबद्दल अनुमोदन . Happy
आम्हालाही कधीही काळे वाटाणे शिजवायाचा प्रोब्लेम नाही आला . नेहमी दबदबित शिजते.

आमच्याकडे जास्त खातच नाहीत. >>> माहेरी आम्ही खात नव्हतोच, पांढरा किंवा हिरवा वाटाणा उसळ असायची, ती पण वाटण वगैरे नाही, एरवी आम्ही उसळी करतो गोडा मसाला, गुळ वगैरे त्याच पद्धतीने. सासरी माहिती नाही actually, सासूबाईना तर गरम मसाला, वाटण आवडत नाही, त्यांना गरम मसाला आमटी पण आवडत नाही त्यामुळे त्या नाहीच करत पण नवऱ्याला आवडते म्हणून मी करायला लागले वाटण आणि गरम मसाला घालून, वर्षातून दोनदा वगैरेच करतो खरंतर, आवडते मला कधीतरी.

माझ्या भाजीच्या छोट्या कुकरमध्ये सगळे एकत्र घालून आमटी करते, अगदी कोकम घालते आणि तीन शिट्यात चांगला शिजतो वाटाणा, अगदी गाळ नाही आवडत नाहीतर पाच शिट्या केल्या असत्या.

कोकणात सरसकट काळा वाटाणा खातात असं नाहीये. माहेरी संगमेश्वर तालुक्यात आणि सासरी देवगड तालुक्यात आमच्या घरी नसतो.

डाळढोकली किंवा वरणफळे कोकणात नाही करत. पण मला आवडतात, आई गुजराथमध्ये वाढली आहे म्हणून करतात आमच्याकडे. उकड मात्र कोकणातला प्रकार, मला आवडतो.

>>> डाळढोकली किंवा वरणफळे कोकणात नाही करत. <<

अरे, अन्जू कोकणात नाहीच करत डाळ ढोकळी वगैरे पण इंदोरचा विषय आला वरती म्हणून लिहिले.

Pages