पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाफा,
ते वरून घातलेलं तेल आहे, कालवायच्या आधी. माझं अन तेलाचं साटं लोटं तुम्हाला ठावं न्हाई का?

अरे पण तुम्ही लोकं चीक बनवून खाऊ शकता/खाताय नं? तसंही मला लोकांना कामाला लावायला आवडतं सो ज्यांच्याकडे ती पावडर असेल त्यांना रिमांयडर Wink

अरे पण तुम्ही लोकं चीक बनवून खाऊ शकता/खाताय नं? तसंही मला लोकांना कामाला लावायला आवडतं सो ज्यांच्याकडे ती पावडर असेल त्यांना रिमांयडर>> नाही ना माझ्याकडे काही , आता रव्याचाच करते

म्हणजे आमच्याकडे तरी मिळते>> मै ! तुमच्याकडे काय मिळत नाही ग? तुम्ही मिनिइडियातच राहता, आम्ही म्हणायला कॅलीफोर्नियात पण इकडे व्हॅलित तेवढी चैन नाही म्हणजे बेसीक सगळ मिळत, आर्टेशिया वैगरे एल ए भागात तर वॉलमार्ट साइझची दुकान आहेत पण तिकडे सगला प्रभाव गुज्जुचा आहे. असो! बे एरियात चक्कर झाली तर शोधते.

मैत्रैयी, तुम्हाला यन्जेच्या फारिनात रियलिस्टिकली राहाणं कठीणच आहे. मी तर जनरली इथले देशी स्नॅक आयटम घेणॅ पसंत करत नाही. फार जुनं असतं असं वाटतं. वर्षातून दोन वेळा इंड्यावरूनच काही गोष्टी आल्या की पुरवून वापरायची सवय लागली आहे. अपुन पुर्वी से कोरोना स्टइल में इच रहते है असं मला वाटतं.
आता (सगळं नीट झालं की) कामधेनू तिकडून मागवावी म्हणते Wink

काय बै त्या घोळाच्या इतका व्याप लागणाऱ्या आंबलेल्या फरमेंटेड कणकेवर इतके प्रतिसाद ☺️☺️(यावर लोक xxxला गुळाची चव काय वगैरे म्हणतील.)
सिरियसली, चीक खाऊन किमान 25 वर्षं झाली.चव आठवत नाही.पण एकंदर पोत पतंगाला लावायची खळ खाल्यासारखा असल्याचे आठवतेय.

मी अनु अगदी अगदी
तो फोटो बघून पण कसं तरीच झालं Sad
माझीच आवड नतद्रष्ट असेल असं वाटून गप्प बसते

चीक खाण्याचा एकदाच प्रयत्न केला होता. ताटलीत थोडासा घेतलेलाही संपला नाही. चव डेव्हलप व्हायला लागते हेच खरं. नवऱ्याला खूप आवडतो.

तो फोटो बघून पण कसं तरीच झालं>>>+१११११

पाफांचा फोटो बघूनच कसेतरी झाले होते. पण इतक्या लोकांना आवडते बघून काही बोलली नव्हते.

हा पावटा(म्हणजे वाल चे कोवळे शेंग स्वरूप व्हर्जन) वाटतेय
तेल हिंग मोहरी फोडणीत परतून थोडा वेळ झाकण ठेवून मग 5 मिनिट(किंवा शिजेपर्यंत) तिखट मीठ गोडा मसाला टाकून उकळून आमटी छान बनेल.पोळीबरोबर हाताने खाता येत नाही.पण भाताबरोबर मस्त लागते.

त्या हिरव्या बियांची भाजी संकरांतीला करतात , वांगे , गाजर व त्या बिया घालून मिक्स भाजी करतात, एकदम पातळ रस्सा असतो,

एकदा असेही केले होते , वांगे घालून

https://www.maayboli.com/node/51971

me_anu सोप्पी आहे की! उद्याच करते.
BLACKCAT त्या या बिया असतात माहित नव्हते. प्रचंड आवडते ती भाजी, पण आईच्या हातची.

या बीन्सची भाजी कशी करतात? >> गावरान एक खरी चव ह्या यु ट्यूब चॅनेलवर त्या काकींनी हा पावटा प्लस वांग्याची रेसिपी दाखवली आहे एका एपिसोड मध्ये.

तो फोटो बघून पण कसं तरीच झालं>>>+१११११

पाफांचा फोटो बघूनच कसेतरी झाले होते. पण इतक्या लोकांना आवडते बघून काही बोलली नव्हते.

नवीन Submitted by VB on 5 April, 2020 - 09:28

>>>>>

वयाच्या विशीपर्यंत मलाही हा प्रकार आवडत नव्हता. तो आंबूस शुध्द ग्लुटेन दूध आणि साखरेच्या गिचक्यात खायला. नंतर एकदा तिखट मीठ आणि तेल घालून खाल्ला. तो प्रकार आवडला.

कुरडई साठी आंबलेला चिक आवश्यक असतो. त्यामुळे ५~६ दिवस गहू भिजवावा लागतो. आम्ही घरी कुरडई बनवत नाही फक्त खाण्यासाठी १ किलो करतो. त्यासाठी ३ दिवस पुरतात. आंबूसपणा न येण्यासाठी रोजच्या रोज पाणी बदलायचे. बाकी सोपस्कार नेहमी प्रमाणे. Happy

गव्हाचा चीक, नाचणी पापड पीठ एकदम यम्मी आठवण. लहानपण आठवलं आजी, वाड्यातील इतर बायका सगळ्या मिळून चुलीवर चीक शिजवत असायच्या आणि आम्ही मूल तिखटचा सट, शेंगदाणा तेलचा कावळा अस सगळं घेऊन तिथेच बसून रहायचो.
रच्याकने - खान्देशी लोकांना पदार्थावर वरतून घेतल्याला तेलावरून बोलू नये कारण कितीही सांगितलं, समजावलं तरी आमची ही सवय नाहीच जाणार. भाकरी कुस्करून त्यावर भाजी, शेंगदाणे तेलाची थोडी धार आणि चिमूटभर मीठ टाकून कालवून खायच एकदम जगात भारी लागत.

बटाटेवडा कव्हर बनवताना कधीच मनासारखं बनत नाही.थोडं तांदूळ पीठ ही टाकून बघितलं पण कधीच गुबगुबीत कव्हर बनत नाही तर कृपया कुणी नीट प्रमाण सांगेल का?
धन्यवाद.

पिन्की, सोडा टाकून बघ
गव्हाचा चिक करणार त्यादिवशी जेवणच चीक असायचं. आई गहू भिजवून करायची. तिला मदत करायचो दोन्ही कुरडया पिळायला व चीक खायला पण. मला तेलापेक्षा दूध टाकूनच आवडायचं. मी मात्र शाॅर्टकटवाली रव्याच्या करते.

अरे हो, कात्रीने खरंच पाव चांगले कापले जातात. Lol मी गेल्या वेळी पावभाजी केली तेव्हा कात्रीने कापले. फास्ट झालं काम.

गव्हाचा चीक ही एका विशिष्ट प्रांताची खासियत आहे व दुसऱ्या विशिष्ट प्रांताला तो अजिबात आवडत नाही हे माझे निरीक्षण आहे.

मला एका माबो मैत्रिणीने चिकाची पावडर दिली होती. मी खाल्ला चीक पण नाही आवडला. मुळात माझ्याकडे त्याचा नॉस्टॅल्जिया नाही, त्यामुळे तो कितीही चांगला असला तरी खाताना वास व तोंडात चिकट च्युनगम ही फिलिंग गेली नाही.

असो. याचा अर्थ तो वाईट आहे असे नाही. बस, माझ्याकडे त्याचा नॉस्टॅल्जिया नाही इतकेच.

तांदूळाची उकड सुद्धा एक त्यातलाच चिकट पदार्थ खुप आवडीने खाताना पाहिलय लोकांना...
आणि त्या चकोल्या एक त्यातल्यच...
कुरडया बाकी तळून कितीही खाउ शकते...
———
(एकंदरीत काहीच बुळबुळीत , चिकट तसेही आवडत नाही अशी मी एकटीच आहे असे नाही)

माझी आई खाण्यासाठी गव्हाचा चिक (त्याला आम्ही गव्हाची ठुली म्हणतो) करायची , तेव्हा गहू दोनच दिवस भिजवायची. त्यामुळे आंबुस वास येत नसे. दुधात शिजवून मस्त साखर वेलीची टाकून गरम गरम खायला द्यायची. कुरडईचा चीक गहू जास्त दिवस भिजवल्याने जरा आंबूस असतो. 'कुरडईसाठी आहे खाऊ नका' असे सांगितल्याने की काय पण तो खावासा वाटे. पण १-२ मोठे चमचे इतपतच जात असे.

ट्युलिप,
मी लायमा बिन्स आणि दलिया अशी खिचडी करते.

Pages