ब्रेकफास्टसाठी काय करू?

Submitted by मेघना भुस्कुटे on 19 February, 2010 - 06:53

मला सकाळी सव्वाआठच्या सुमारास घराबाहेर पडावं लागतं. बाहेर पडण्याआधी काहीतरी खाऊन बाहेर पडलं तर दिवस एकंदर बरा जातो (http://www.maayboli.com/node/14081)! पण रोज तेच पोहे / उपमा / पोहे खाऊन कंटाळा येतो. रोज नवीन काय करायचं (आणि त्यातला न्याहारीकरता आदर्श असा कॅलरी काउण्ट + घटकपदार्थांचा समतोल कसा राखायचा) असा प्रश्न पडतो. तर -

१) ब्रेकफास्टला आदर्श असे पदार्थ (किंवा पदार्थांची कॉम्बिनेशन्स)
२) त्यांच्या कृती
३) इतर सूचना - जसं की अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यास सकाळी सकाळी आंबट संत्रे खाऊ नये
इथे सुचवता येतील काय?

(@अ‍ॅडमिनः असाच धागा आधीच अस्तित्वात असल्यास हा धागा त्यात जरूर विलीन करावा. शिवाय मलाही त्या धाग्याची लिंक द्यावी! :))

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओटमिल + एक फळ
सिरीयल्स +दुध/ज्युस+ एक फळ
ब्रेड/क्रोसेंट ऑमलेट + ज्युस
उकडलेलं अंडं सोबत व्हिट ब्रेड
मुग दाळपिठ + तांदुळाचं पिठ ढोकळा किंवा धिरडे
ईडलीचं पिठ करुन एक दिवस उत्तपा, एक दिवस दोसा, एकद दिवस आप्पे, एक दिवस ईडली
कणकेचा शिरा
पोह्याची उकड
बॉंबिनो शेवयाच उपमा
मिल्क शेक ब्लुबेरी+केळ, स्ट्रॉबेरी+केळ
मोड आलेली कडधान्य
सारण रात्री करुन कुठला पण स्टफ्ड पराठा (आलु/मिक्स व्हेज/गोबी/मुळा)
मी सहसा ठरवुन ठेवते आठवड्यात काय काय करायचं, मग प्रश्न पडत नाही.

छान धागा. मला नेहमी हा प्रश्न पडतो. ब्रेकफास्ट ला काय?

प्रीती ने छान पर्याय सुचवलेयत. मी थोडे माझे सांगते.

सध्या तरी मी मनःस्विनीने दिलेला ग्रनोला तयार करुन ठेवलाय. तो छान. सकाळी नुसते ओटमील खाण्याचा कंटाळा येत असेल तर. त्याची कृती इथे आहे

http://www.maayboli.com/node/13691

यामधुन अ‍ॅंटी ऑक्सीडंटस ही मिळतात बेरीज वगैरे अस्ल्याने आणि नट्स ही पोटात जातात. नाहीतर विसरायला होते. आणि एकदा करुन ठेवले की काम झाले.

अजुन एक तीनेच लिहीलेला बनाना ब्रेड तो पण हेल्दी पर्याय आहे.एकदा बनवला की तीन चार दिवस पुरतो मला. दुध घ्यायच त्याबरोबर. कृती मला सापडत नाहीए आत्ता.

दलियाचा उपमा पण चांगला तब्येतीला.

अल्पना यांनी दिलेली खिचडी पण छान आहे.

http://www.maayboli.com/node/12209

अंडी खात असाल तर एग व्हाईटचे ऑमलेट त्यात हव्या भाज्या टाकता येतात. शेपु चांगली वाटते आवडत असेल तर व व्हीट ब्रेड. फळ एखादे. गव्हाची किंवा नाचणीची बिस्कीट्स चहा बरोबर काही लगत असेल तर आणुन ठेवता येतील.

सकाळच्या आहारात अ‍ॅंटी ऑक्सीडंटस जास्त ठेवावेत असे म्हणतात. ते पपइ, संत्री, बेरीज इ. डार्क कलर च्या पदार्थांमध्ये जास्त असतात. आठवणीत रहात असेल तर बदाम रात्री भिजवुन ठेवावेत सकाळी खायला. पित्ताचा त्रास असेल तर सुके अंजीर , काळ्या मनुका रात्री भिजवुन सकाळी खाव्यात बाकीच्या पदार्थांबरोबर. Happy

अ‍ॅसिडीटी असेल सकाळी संत्र्याचा ज्युस शक्यतो टाळावा.
आता न्याहारीचे पदार्थ..
मुगाची खिचडी ( कुकरला फार वेळ घेत नाही परत पौष्टीक वेळ ,अगदीच वेळ वाचवायचा असेल तर आदल्या दिवशीची :स्मित:)
रवा उतप्पा(पटकन होतो)
थालीपीठ्(आधी पीठ तयार करुन ठेवावे )
फोड्णीची पोळी /भात
मेथीचा ठेपला
सातुच पीठ( मला आजीबात आवड्त नाही ,पण आवड्णारे पण आहेत, तु ट्राय करुन बघ )
ज्वारीच्या लाह्या + ताक + मीठ+ साखर+ मीरची(तुझ मीरची प्रेम वाचुन माहीती आहे. Happy हवी तर फोड्णी( पोटाला उत्तंम)
टोमॅटो ऑमलेट
राजगीर्‍याचा लाडु( राजगीरा खाण्यात आसावा अस आई सांगते :स्मित:)

तुच बनवणार आहेस असं समजुन लिहिल आहे . नुसती ऑर्डर सोड्णार असशील तर मग काय यादी लई वाढ्वता येइल.अजुन एक अंबवलेले पदार्थ टाळावेत किंवा कमी खावेत अ‍ॅसिडीटी असेल तर

नाचणीचं सत्त्वं - गोड किंवा आंबिल. आरोग्यदायी आणि बराच वेळ पोट शांत राहतं त्यानंतर असा अनुभव आहे.
cracked wheatची लापशी. (नाव पथ्यकर वाटत असेल तर खीर म्हणून खावी. Happy ) कुठल्याही लापशीत, सत्वात बेदाणे आणि बदाम घातले की अ‍ॅडेड न्यूट्रिशन!
मऊ भात+तूप+मीठ. किंवा मऊभात + दही. आवडत असेल तर मेतकूट.
गार दुधात कॉर्नफ्लेक्स

या पदार्थांसोबत एखादं सफरचंद / केळं / अंजीर / खजूर

अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर :
चहा पिऊ नये. प्यायचाच असेल तर साखर पाण्यात उकळू नये. नंतर घालावी.
दही खाणार असाल तर अधमुरं खावं.
चिडचिड होणारं काहीच करू नये. Proud

मिरचीचं प्रेम... Proud
मीच बनवणार, म्हणून तर डोक्याला इतका ताप, नाहीतर काय!
काय पटापट पदार्थ सुचवताय तुम्ही लोक! आभार!

बाय दी वे, कसलेही घावन / धिरडी / आंबोळ्या करायला घेतल्या, की त्या तव्यावरून सुटण्याचं टेन्शन असतं. तवा नीट-पुरता तापवून घेणे, पिठात थोडा रवा मिसळणे, तव्याला तेल लावणे याखेरीज अजून काही टिप्स आहेत का? (माझ्याकडे नॉनस्टिक पॅन नाहीये) जर का पहिलंच धिरडं तव्याला चिकटलं, तर सकाळी सकाळी ते सोडवायची खटपट करताना सगळी सकाळ फुकट जाते. चिडचिड होते ती निराळीच.

माझ्याकडे नॉनस्टिक पॅन नाहीये) विकत घे त्या शिवाय घावन / धिरडी / आंबोळ्या यांच्या वाटेला पण जावु नकोस (सुगर्णीचा सल्ला) Happy
नॉनस्टिक पॅन मस्ट आहे

हे खरयं घावन / धिरडी / आंबोळ्या करायला वेळ लागतो. आधी तयारी करता येईल असं काही बघुन तयारी केलेली बरी मगं. अंडी उकडुन फ्रिजमधे ठेऊन द्यायची, कडधान्य मोड आणुन ठेऊन द्यायची, एक दिवस सिरीयल्स, व्हीट ब्रेड्चं सँडविच. सीमा म्हणतेय तसं अ‍ॅंटीऑक्सीडंटस असलेली फळं, नाही मिळाली तर कोणतही एक फळ.

घावन / धिरडी / आंबोळ्या >>> इथे कोणाकडे इलेक्ट्रिक स्टोव्ह असेल तर चहा झाला की त्याच बंद कॉइलवर तवा ठेऊन द्यायचा. तो बर्‍यापैकी वॉर्म होतो. मग धिरडी करायला घेतली की पहिल्या धिरड्याला हाय ठेवायचा आणि मग कमी केला तरी चालतो. तवा तापवण्यात वेळ जात नाही.

अजुन एक अंबवलेले पदार्थ टाळावेत किंवा कमी खावेत अ‍ॅसिडीटी असेल तर << इडली, डोसे ब्रेकफास्ट ला खाल्ल्याने वाढेल का अ‍ॅसिडीटी?

इडली, डोसे ब्रेकफास्ट ला खाल्ल्याने वाढेल का अ‍ॅसिडीटी?>>> हो कधीही खालले तरी वाढते. सकाळी खालले तर नक्कीच.

अ‍ॅसिडिटी होणार्‍यांनी सकाळी काहीही खाल्ले तरी त्यानंतर कोरडे चिरिओ/साळीच्या लाह्या/मुरमुरे खावेत. हे खाल्ल्यावर पाणी पिऊ नये.

एक ग्लासभर दूध + एखादं फळ + उकडलेलं अंड
>> सिंडरेला ला अनुमोदन! रोज खाणार असाल तर अंड्याचा पिवळा भाग खाणं टाळावं मात्र - प्रोटिन्स मेजरली कमी होतील, पण कोलेस्टरॉल अन कॅलरिजही होतील.

धिरड्यांच्या पिठाची कन्सिस्टन्सी योग्य झाली आणि तवा छान तापला असेल तर धिरडी पटापट निघतात.
धिरड्याच्या पीठात थोडीशी कणीक/ ज्वारीचं पीठ टाकल्यानंही फायदा होतो.

सगळ्यात महत्वाच म्हणजे वरती झाकण ठेवायच... धिरडी अज्जिबात चिकटत नाहीत आणि मस्त मउ होतात.
अगदी तेल नाही लावल तरी चालत. करुन बघ.
नॉनस्टीक पेक्षा साध्या तव्यावरची धिरडी, डोसे आणि थालिपीठ खमंग लागतात अस मला वाटत. Happy

वीकडेजमध्ये ब्रेकफास्ट सकाळी 'बनवणे' फारसे होत नाही. तेव्हा- कॉफी/दूध हे कॉमन त्याबरोबर भारतीय टोस्ट, कुकीज. बाकी-

वेगवेगळ्या फ्लेवरचे ओटमील
प्लेन ओटमील + फळे (केळं, बेरी वर्गातली, मेलन्स)
ब्रेकफास्ट बार + फळ
मफिन्स
सिरियल्स
फ्रेन्च टोस्ट
बेगल्स + क्रीम चीज
डोनट्स

झटपट बनवता येणारे-
सनी साईड अप ( अंडे फ्राय) + ब्रेड
ऑम्लेट (भाज्या, चीज घालू शकता), ब्रेड
स्क्रॅम्बल्ड एग्ज
पॅनकेक + सिरप + फळ
वॉफल्स+ सिरप + फळ
ब्रेकफास्ट सॉसेजेस + ब्रेड + फळ
ब्रेकफास्ट सँडविच + फळ
ब्रेकफास्ट कॅसरोल (अंडी, सॉसेजेस, ब्रेड, दूध)

भारतीय-
उपमा
कांदेपोहे
टोमॅटो ऑम्लेट
शेवयाचा उपमा
धिरडी
इडली
मुगाची खिचडी (वर स्वाती आणि अर्चनाने लिहिलेच आहे. साउथमध्ये ब्रेकफास्ट्ला खातात, तिथे एकूणच न्याहरीचे पदार्थ खूप जास्त असतात आणि जेवणासारखी न्याहरी करतात. जे बरोबर आहे. Happy )

अर्रर काहीतरी अ‍ॅड करायला गेले नी अक्खी एक तास घेवून लिहिलेली पोस्ट डिलीटली गेली चूकून... चच्च्च...

त्यावेळी एकटी असल्याने काम काय असते घरी आल्यावर? मला डॉकटरची औष्धे घ्यायची न्हवती.

डायजिन, प्रेलोसेक, नेक्स्सियम काय बेकार औषधे आहेत हे खूप कमी लोकाना माहीती असते.

अ‍ॅसीडीटी म्हणून antacid देतात व पोटाची पचनशक्तीच खराब करतात ही औषधे. असो.

नाचणीच्या पिठाची उकड नावाचा एक पदार्थ सौ. करते व मुलीला तो फार आवडतो. सध्या माझी मुलगी डाएटच्या बाबतीत फार जागरूक आहे (नसती फॅडं एकेक). त्यातून तिच्या मैत्रिणी कुणी डॉक्टर, कुणि डाएटिशिअन. त्यांच्या मते, 'तुला हे कसे काय आवडते माहित नाही. पण आहे अगदी उत्तम.'

मग मी पण ब्रेड ऑम्लेट, सिरियल नंतर, थोडी उकड खातो! चांगली म्हणतात ना!

होल ग्रेन सिरियल, केळ्याच्या चकत्या किंवा स्ट्रॉबेरीचे तुकडे, लो फॅट दूध, दोन-तीन बदाम किंवा अक्रोड

इडल्या अन सुकी चटणी पावडर

होल व्हीट ब्रेड अन पीनट बटर

एग व्हाईट चे स्क्रॅम्बल्ड अन होल व्हीट ब्रेड

सफरचंदाच्या पातळ स्लाइसेस वर पीनट बटर

लो फॅट दही , ग्रॅनोला व बदामाचे काप

छोटे बेगल व क्रीम चीझ

इंग्लिश मफिनवर क्रीम चीझ किंवा पीनट बटर

पॅनकेक मिक्स मिळत असेल तर पॅनकेक्स अन सिरप

दही पोहे , दडपे पोहे,

उसळ करून ठेवलेली असेल तर उसळ पाव , किंवा उसळीवर कांदा टोमेटो चिरुन

ब्रेड , हि चटणी , टॉमेटो काकडी सॅन्डविच

बटाट्याचे पराठे ( सारण करुन ठेवले असेल तर एकदम सोपे) . हेच सारण ब्रेड स्लाइसवर एका बाजुने लावून तव्यावर परतून घ्यायचे. सॉस बरोबर मस्त लागते.

मेथिचे ठेपले किंवा पराठे करुन ठेवले तर दोन तीन दिवस चालतात.

उष्ण प्रदेशात असाल, तर दहिभात हा एक चांगला प्रकार आहे. यात आवडीप्रमाणे दाणे, काकडी वगैरे घालता येते. सकाळी सर्वप्रथम एखादे फळ खाणे चांगले. (ज्यूसपेक्षा ) मग अर्ध्या तासाने, बाकिचा आहार.
टोस्ट ऑलिव्ह ऑईल बरोबर (त्यात लसुण, लिंबूरस व मिरी घालून )
दहिपोहे हा पण एक चांगला प्रकार आहे.

मस्त धागा आहे, अतिशय उपयोगी. मी सुध्दा आठ वाजता घराबाहेर पडते. एखादा आठवडा अगदी आखुन ठरवुन ब्रेकफास्ट करते, मग परत येरे माझ्या मागल्या. ( मग भाजीपोळीच खायला लागते सगळ्यांना सकाळी, परत तीच भाजीपोळी दुपारी खायचा कंटाळा येतो माझ्या नवर्‍याला आणि मुलाला)
पण आता हे वाचुन परत नेटाने सुरुबात करेन. थँक्स सगळ्यांना.

अग काय सांगतेस नी? दुध आणि च्यवनप्राश माझे वडिल रोज खातात, चांगलं नसतं का? मग त्यांना सांगायला पाहिजे.

नीरजा इज राईट... दूध आणि फळे(आंबा सोडून) विरुद्धान्न आयुर्देवाप्रमाणे.. मी आजवर कधीही मिल्कशेक घेतलेला नाहीय आणि माझ्यासमोर कोणी घेत असेल तर त्याला थांबवते Happy

उत्तम धागा,

झक्की, नाचणीची उकड ची पाकक्रुती टाका ना क्रुपया.

१) केलॉग्स के सीरीअल व दूध, फळ.
२) मेथी पालक पराठे
३) पोंगल व वडा, खोबर्‍याची चट्णी. ( हा खरेतर रविवारचा आयट्म आहे) पण वड्याचे पीठ भिजविले रात्री तर पोंगल शिजेपरेन्त ४ वडे तळून होतील.
४) दलिया उपमा.
५) टोमॅटो ज्यूस( चिल्ड) ब्राउन/ मल्टिग्रेन ब्रेड व त्यात कोलस्लॉ फिलिन्ग.
६) रवा इडली, आप्पे.
७) अगदी उत्तर भारतीय हवे असेल तर बटाटा रस्सा भाजी रात्री करायची. व ४-५ पुरी/ पोळी.

हा भारतात असतानाचा आईचा नाश्ता, आता इथे आल्यापासून बदल आहे करण्याच्या पद्ध्तीत व मेनूत. Happy

आईचा ठरलेला नाश्ता त्यावेळी:
इडली चटणी
वेगवेगळे(मेथी,पालक्,बटाटा,डाळ) पराठे चटणी
डोसा चटणी
उपमा
धिरडी
कांदा पोहे(ईक्स! मला नाही आवडायचे)
ढोकळा चटणी
अंड्याचे सँडविच्(पोळी करून),
नुसती अंडा पोळी,
बुरुजी मस्त वाटायची,
आम्हाला ब्रेड + जाम,
हिरवी पुदीना चटणी सॅवि.
काकडी सॅवि,
एखादे फळ असायचेच, सफरचंद, केळ ,आंबा(मौसमाप्रमाणे), चिक्कू, मौसंबी वगैरे.
घरी ज्युसरने कधी मधी ज्युस आईला वेळ असेलच तर.
रविवारी आईला सुट्टी असल्याने राजेशाही ब्रेक्फास्ट वेजी कटलेट्स, थालीपिठं,वेजी सॅवि,अंड्याचे सॅवि,गूळाची लापशी, बोम्बिनो उपमा,कधी डोसा +शिरा वगैरे. मस्त तिखट अप्पे,मालपोवा केळ्+गूळ घालून, गूळाचा टोपसांजा, अढाई, धोणस, घावनं+चटणी.
शेजार मद्रासी,पंजाबी असल्याने आईवर तो प्रभाव होता डिशेस मधे व घरात बरीच नाटकी मुले होतो आम्ही तेव्हा आईला वरायटी ठेवावी लागेच.
बरेच पदार्थाची तयारी करून ठेवू शकतो जसे धिरडीचे पिठ, उडदाची डाळ भिजवून अलगद वाळवून दळून आणली की त्यात इडली रवा मिक्स केला की झाले. आंबोळीची पिठ एकदा दळून आणायची. इथे लिहिले इथे तो रवा कसा काढून आणून आयत्यावेळी मस्त आंबोळी वगैरे होते ते. पराठ्याची मिश्रण रात्री करून ठेवायची आई. बरीच मेहनत घ्यायची पण. मला सकाळच नुसते गोड जमत नाही. इथे तर काही लोकं एवढा मोठा चॉकलेट डोनट व कॉफी कसे पितात सकाळच कळत नाही.

आमच्या घरचा इथला नाश्त्यात थोडा फरक नक्कीच झालाय. Happy सकाळी मोठी पोस्ट लिहिली डिलीटली गेली चुकून.. लिहिते आता.

धनुडी,
दूध आणि च्यवनप्राश एकत्र कधी खाऊ नये. च्यवनप्राशचा बेस आवळा असतो. आवळ्याबरोबर दूध योग्य नाही.
च्यवनप्राश खाऊन मग किमान तासाभराने दूध प्यावे.

Pages