Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वालडाळ आणतो कधीतरी क्वचित,
वालडाळ आणतो कधीतरी क्वचित, डाळींब्यांच्या आमटीसारखीच आमटी करतो. चांगली लागते.
वेका,
वेका,
आमच्याकडे वालाच्या डाळीचे फोडणीचे वरण /आमटी करतात.
१/२ कप डाळ हिंग-हळद घालून कुकरमधे शिजवून घ्यायची. एकीकडे ५-६ लसूण पाकळ्या, १ टी स्पून धणे, १/२ टी स्पून जीरे, १ टे. स्पून सुके खोबरे कीस याचे वाटण करावे. लाल सुक्या मिरच्या असतील तर ३-४ सुक्या मिरच्या यातच वाटून घ्याव्यात किंवा नंतर सोसेल इतपत लाल तिखट घालावे. शिजलेली डाळ घोटून त्यात वाटण घालावे. चवी प्रमाणे मीठ आणि साखर. पळीत १ टे स्पून तेल तापवावे आणि त्यात ३-४ लसूण पाकळ्या सालासह ठेचून घालाव्या. तांबूस झाल्या की हिंग घालून ही फोडणी वरणात घालावी.
वेका, वालाची डाळ २ तास भिजत
वेका, वालाची डाळ २ तास भिजत ठेवावी. तेलात ओवा घालून तो तडतडला की हिन्ग घालून त्यावर भिजलेली डाळ घालावी. थोडी परतावी. मग त्यात हळद, तिखट घालून पाणि घालून नीट शिजू द्यावी. ही डाळ शिजायला जरा वेळ घेते. डाळ शिजली की त्यात मीठ, थोडा गुळ घालून सारखी करावी. वरून कोथिन्बीर. गुळ घातल्यावर डाळ आक्रसते थोडी.. तेव्हा डाळ नीट शिजली की मगच गुळ घालावा. ही डाळ आमटीसारखी नसते. जरा कोरडीच असते. सो पाण्याचे प्रमाण हात राखून.
अरे वा. मस्त टीपा आहेत. मेनली
अरे वा. मस्त टीपा आहेत. मेनली ओवा घालायचं माहित पडलं नसतं पण उपयोगी आहे. आता गरम पाण्यात भिजत घातली आहे पण मी बहुतेक छोट्या कुकरमध्ये करेन असा विचार आहे. धन्यवाद लोक्स. वाल पण होते इंग्रोमध्ये पण पांढर्ञा रंगाचे दिसल्यामुळे आणले नाहीत. नेहमीचे कडवे वाल तसे दिसत नाहीत. सो दुधाची तहान ताकावर म्हणून वालडाळ आणली. मला वाटतं याचा एक भाताचा प्रकार पण करतात. रेसिपी शोधावी लागेल. तुर्तास हे प्रकार आहेतच.
अवल, एकदम सोपी आहे तू दिलेली
अवल, एकदम सोपी आहे तू दिलेली पाकृ! नक्की करुन बघेन.
गुजराथी स्टाईल आहे.
इथे वाचून आरती कडुन ओगले
इथे वाचून आरती कडुन ओगले प्रोडक्टस आणि तिच्याकडचे कडचे पदार्थ मागविले. भरपुर व्हरायटी होती त्यामुळ काय मागु आणि काय नको अस झालेल. उत्कृष्ट पदार्थ आहेत. जांभळाची पोळी सर्वोत्कृष्ट आहे म्हणुन सांगत होते आई/पप्पा. मी डिसेंबर मध्ये जाणार म्हणुन मागविलेले पण जाऊ शकले नाही . पण आई पप्पानी अतिशय रेव्ह रिव्युज दिले आहेत. आरती बरोबर ऑर्डर वगैरे करण तर इतक सोप आहे. पैसे पेपाल/झुम ने ट्रांसफर करता येतात अगदी पटकन. त्यामुळ इथुन ऑर्डर करण आणि भारतात घरी मागवण एकदम सोप वाटल. कैरी केचप,पन्हं आणि करवंदाच लोणच ,आवळा पोळी,केळफुलाची भाजी ,लोणची इत्यादी पदार्थ ऑर्डर केले मी. एकदम रिझनेबल दर आणि खुप छान कस्टमर सर्व्हिस.
एक मैत्रिण मिळाली कोकणातली या निमित्ताने. आता घरी जाईन तेव्हा आणखी ऑर्डर करेन .
हा रिव्यु पेड वगैरे नाही. खरोखर खुप छान अनुभव आला म्हणुन लिहिला.
आम्ही फक्त साधी फोडणी आणि गूळ
आम्ही फक्त साधी फोडणी आणि गूळ खोबरं घालून वालाच्या डाळीची उसळ करतो. एकदम टेस्टी होते.
ओगले प्रोड्क्ट लिंक मिळेल का?
ओगले प्रोड्क्ट लिंक मिळेल का?
सीमा, काका आणि काकू ना आमचे
सीमा, काका आणि काकू ना आमचे प्रोडक्ट्स आवडले हे ईथे ही आठवणी ने आणि आवर्जून लिहिले त्यासाठी मनापासुन धन्यवाद __/\__ .
झंपी, tropicana साईट बद्दल मागच्या पानावर मी लिंक आहे, पण त्यात सगळे प्रोडक्ट्स नाही आहेत.
माबो जाहिरातीमध्ये मी ओगलें आणि आमच्या प्रोडक्ट बद्दल जाहीरात दिली आहे. तसेच सीमा ने ज्या लोणच्या चा उल्लेख केला आहे ती चंद्रराज ची 50 वर्ष जुनी परंपरा असलेली 12 प्रकार ची लोणची आहेत आणि त्यात माईंन मूळा लोणच ही आहे.
जाहिराती विभाग कुठे आहे?
जाहिराती विभाग कुठे आहे?
धन्यवाद
झंपी पेज च्या खाली जाहिराती
झंपी पेज च्या खाली जाहिराती म्हणून आहे, तिथे खाद्य पदार्थ विभागात बघा. तसेच तुमची विपू बघा.
संपुर्ण भारतात, छोट्या गावात ही आम्ही प्रोड्क्ट्स डिलिव्हरी देतो, पण त्यासाठी शिपिंग charges आकारतो.
ठिक आहे. धन्यवाद. अक्खा ताज
ठिक आहे. धन्यवाद. अक्खा ताज फणस मिळेल नंतर मौसमात?
अक्खा ताज फणस मिळेल नंतर
अक्खा ताज फणस मिळेल नंतर मौसमात? <<<< हो, प्लीज विपू बघा.
ओला हरभरा सोलण्याची काही
ओला हरभरा सोलण्याची काही युक्ती/ टिप्स आहे का?
खूप पूर्वी इथे कोणीतरी
खूप पूर्वी इथे कोणीतरी रोजच्या स्वयंपाकाचे कॅलेंडर टाकले होते, ते कुठे आहे काही कल्पना?
मी पण वालाच्या डाळीची आमटीच
मी पण वालाच्या डाळीची आमटीच करते. सरळ नेहेमीप्रमाणे कुकरात शिजवून घेते. फोडणीत भरपूर लसूण ठेचून घालते. डाळ घोटून घालते, व्यवस्थित पाणी पण घालते. तिखट मीठ घालून नीट उकळी आल्याव्र शेवटी गूळ घालते. वर मस्त कोथिंबीर.
एकदम आवडीची आमटी आहे ही माझ्या.
पनीर मटार किंवा आलू मटारसाठी
पनीर मटार किंवा आलू मटारसाठी जी आपण नेहमीची ग्रेव्ही करतो कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, गरम मसाला इ. त्यात नारळ दूध घातले तर छान चव येते असे वाचले आहे तिकडे पावभाजीच्या धाग्यावरही कोणीतरी लिहिलेले की नारळ दुधनी छान चव येते.
मला हे विचारायचं की कांदा, टोमॅटो इ. सोबत नारळाचं दुध घातलेले पदार्थ खाल्ल्यावर त्यामध्ये काही रासायनिक प्रक्रिया वगैरे होतं नाही ना? आणि ते खाऊन काही अपाय होतं नाही ना? मी कधी वापरलं नाही म्हणून विचारतीये.
Narlachya dudhane काहीही
Narlachya dudhane काहीही अपायकारक रासायनिक
प्रक्रिया होत नाही.आमचे नेहमीचे नारळाच्या वाटणाचे जेवण असते.
देवकी धन्यवाद.
देवकी धन्यवाद.
मी लेकाच्या वाढदिवसाला साधारण 20 जनांसाठी आलू मटार बनवला होता. नेहमीची ग्रेव्ही आणि नंतर नारळाचं दूध घातलं.ग्रेव्ही छान झाली होती.
टेक्सतचर मस्त आलं होतं.
एकदम स्मूथ.
प्रतिसाद द्यायला उशीर झाला.
ब्रोकोली चे नक्की काय काय
ब्रोकोली चे नक्की काय काय पदार्थ करता येतात? अर्थात चांगले टेस्टी हवेत.....
रेसिपी ही द्यावी.
ब्रोकोली, कॉर्न , गाजर अशी स्टर फ्राय भाजी बरी लागेल का?
मी सुपर ट्राय केलय, पण बघून
मी सुपच ट्राय केलय, पण बघून बघूनच केलय. रेसिपी शोधावी लागेल
नुकतीच नवर्याने भारतातून
नुकतीच नवर्याने भारतातून गाभुळलेली चिंच आणली आहे. आत्ता फ्रिझमधे ठेवली आहे.
तिचे काय काय करता येईल? २००-२५० ग्रॅम असेल.
>>ब्रोकोली चे नक्की काय काय
>>ब्रोकोली चे नक्की काय काय पदार्थ करता येतात?
ब्रोकोली जास्त शिजवली की बेचव होते. मऊ न होऊ देता करकरीत चांगली लागते.
१. तुरे भजीच्या पीठात बुडवून तळणे
२. खिसून उकडलेला बटाटा मिसळून पराठे. मसाले बदलून चव बदलता येते. धणे-जीरे, सांबार, लोणचं, करी पावडर
३. मांचुरियन.
४. स्टिर-फ्राय करून किंवा ओवनमधे थोड्या तेलावर बेक करून वर भाजलेल्या/तळलेल्या शेंगदाण्याची भरड
५. वाफवलेले तुरे, उकडलेला बटाटा, मटार, कोथिंबीर, पुदिना घालून कबाब / पॅटिस
कढई/ग्रिल पॅन चांगलं कडकडीत
कढई/ग्रिल पॅन चांगलं कडकडीत तापवून अगदी छोटा चमचाभर तेलावर ब्रोकोलीचे तुरे अगदी १-२ मिनिट परतून घ्यायचे आणि नुसतेच मीठ-मिरपूड घालून खायचे.
Thank you, chioo and
Thank you, chioo and Cinderella...
Good suggestions!
>>ब्रोकोली चे नक्की काय काय
>>ब्रोकोली चे नक्की काय काय पदार्थ करता येतात?>>>>>>>>>>> ब्रोकोली चेडर चीज सूप
>>ब्रोकोली चे नक्की काय काय
>>ब्रोकोली चे नक्की काय काय पदार्थ करता येतात?>>>>>>>>>>> ब्रोकोली चेडर चीज सूप
हे घरी करण्यापेक्षा क्रोगरचं घ्यावं व प्यावं, जेवण होऊन जातं!
घरी करायला ब्रॉकली आमंड सूप हा कमी क्यालर्या असलेला पर्याय.
नूडल्स (चायनिज स्टाईल) किंवा पास्त्यातही रोस्टेड ब्रॉकली आवडतात. हेल्दी म्हणून खायचं.
ब्रोकोली फार आवडत नाही,
ब्रोकोली फार आवडत नाही, क्वचित आणते पण बटरवर खरपुस परतून छान लागते, मिरपुड, चीज, मीठ आणि ओवा घालायचा. आलं लसूण मिरची कोथिंबीर ठेचा घातला तरी छान लागतो त्यात, वरुन थोडी नुसती कोथिंबीर पण टेस्टी लागते.
ब्रोकोलीची कांदा लसूण घालून
ब्रोकोलीची कांदा लसूण घालून आणि थोडा मॅगी मसाला घालून मस्त भाजी होते. फक्त अगदी गाळ शिजवायची नाही.
Pages