Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योकु,योक,,योकु !!!!
योकु,योकु,योकु !!!!
पावभाजी चा बेत आणि उत्साह
पावभाजी चा बेत आणि उत्साह दान्डगा आहे , पहिल्यादाच करणार असाल तर एखादी मैत्रिण .नातेवाइक्/मित्र अस कुणि मदतिला यायला तयार असेल तर बघा, अन्दाज घ्यायला,चव -प्रमाण ठरवायला , पाव भाजायला मदतिला कुणी असल तर बर होत.
कान्दा कापायला भरपुर वेळ लागेल पण तो कापुन फ्रिज मधे ठेवु नका त्यापेक्षा रात्री बटाटे उकडुन सोलुन फ्रिजात ठेवता येइल, दहि भात आबन्ट होतोच तेव्हा जिरा राइस + बुदी रायता इझी असेल.
मला स्वैपाक करायला प्रचंड
मला स्वैपाक करायला आणि स्वतः बनवून लोकांना खायला घालायला प्रचंड आवडतं. मी ते हौसेहौसेनं करते. मला मजा येते त्यात. कुणा नातेवाईकांकडे किंवा मैत्रिणीकडे गेले तरी एखादा पदार्थ करते. पण मी पूर्णवेळाची नोकरीही करते. पण त्यामुळे होतं कसं माहितिये? मी कधी काही कार्यक्रमासाठी घरी करायचं ठरवलं ना, की लोक असे बघतात की मी पैसे वाचवतेय. बरं..वाचवले पैसे तरी ह्यांना काय प्राॅब्लेम आहे? मी पन्नास साठ जणांचा स्वैपाक व्यवस्थित नियोजन आणि पूर्वतयारी करून, स्वैपाकघर तितकंच नीटनेटकं व स्वच्छ ठेऊन व "आनंदाने" करू शकते. घरचे पदार्थ उत्तम प्रतीचे तेल, भाज्या व धान्य वापरून केलेलं असतं आणि आग्रह करकरून भरपूर वाढता येतं. केटररनं दिलेलं कायम भांड्याकडे बघत बघत वाढावं लागतं. पण तरी, घरी केलंय म्हटल्यावर लोक इतक्या विचित्र प्रतिक्रीया देतात की हल्ली घरीच स्वैपाक करणार आहे किंवा केलाय हे सांगताना दडपण यायला लागलंय.
एकेकाच्या उत्साहाचा प्रश्न
एकेकाच्या उत्साहाचा प्रश्न आहे.ज्याला/जिला आवडतं झेपतं त्याने/तिने करावं, ज्यांना आऊटसोर्स करणं शक्य आहे त्याने करावं(फक्त एकमेकांना घेतलेल्या निर्णयाबद्दल जज करू नये.)
मला स्वतःला कोणी सगळा घाट स्वतः एकटी बाई/पुरुष करणार असेल,मदत ऑफर करून घेणार नसेल अश्या घरी जेवायला जायला टेंशन येतं.(because I won't be able to return the favour with same quality and user experience) अश्या ठिकाणी शक्यतो अनुपस्थित किंवा मग अगदी कमी वेळासाठी आधी सांगून.परदेशात, जिथे सर्व्हिसेस महाग आहेत, लोक हौसेने करतात तिथली गोष्ट वेगळी असावी.
एखादी मैत्रिण .नातेवाइक्
एखादी मैत्रिण .नातेवाइक्/मित्र अस कुणि मदतिला यायला तयार असेल तर बघा, अन्दाज घ्यायला,चव -प्रमाण ठरवायला ,
म्हणजे भयानकच. श्रेय कुणाला दोष कुणाला यात पदार्थाची वाट नक्की.
प्रत्येकाने आपल्या घरापुरतं
प्रत्येकाने आपल्या घरापुरतं बघावं हे कसे मॅनेज करावे, उगीच समाज सुधाराय्ला बसलोय ह्या मोड मध्ये राहु नये किंवा सुपरवूमन ह्या असल्या मोड मध्ये राहून इतरांना कमी लेखु नये.>>>
काहीजण व्यक्तीगतरीत्या कुठल्या मोडमध्ये आहेत ते कधीही जाहीर करत नाहीत पण इतरांवर सतत आसूड ओढत राहतात. त्यांच्या आधुनिक स्त्रीच्या कल्पनेत समस्त स्त्रियांनी वावरावे, ज्या वावरत नाहीत त्यां पृथ्वीतलावर नाहीतच असे इतरांनी वागावे असेच ह्या स्त्रीवादी मंडळींचे म्हणणे असते.. कुणी एखाद्या कथेत तशी स्त्री चितारली तरी टीकेचे आसूड ओढले जातात. कथेतली पात्रे अशी आहेत म्हणून तर कथा घडतेय, यांनी सूचना केल्या तशी पात्रे वागली असती तर कथा घडलीच नसती हेही विचारात घेतले जात नाही. ह्या खोट्या लोकांच्या खोट्या स्त्रीवादाचा कंटाळा आलाय. वर सीमाने म्हटलंय तसे आपण दुर्लक्ष करावे हे उत्तमच.. पण मला जसे वाटते तसे इतर कुणाला वाटते का हे बघण्यासाठी मी भीत भीत या विषयाला तोंड फोडले.

पण मला जसे वाटते तसे इतर
पण मला जसे वाटते तसे इतर कुणाला वाटते का हे बघण्यासाठी मी भीत भीत या विषयाला तोंड फोडले>>अगदी अगदी अनुमोदन,
खरं तर बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आले आहेत त्यामुळे बहुतेक आपलंच मत जरा मागास आहे का असा विचार पक्का होत होता,
अर्थात मी स्वतः 7 ते8 माणसांच्यावर स्वयंपाक करू शकत नाही आणि मला ती आवड सुद्धा नाही पण मोठ्या प्रमाणात जेवण घरी करणाऱ्या व्यक्तीबद्दल खरंच भारी वाटतं पण अशा व्यक्ती सोसायटी साठी गॉसिप बनून राहतात हे सुद्धा खरय,
मी दिवाळी साठी मोजकेच 4 प्रकार घरी करते नेहमी,माझी ती आवड आहे पण ,"वर्किंग वूमन असूनही घरी करते दिवाळी/मोठ्या रांगोळ्या/ " असा तुक मी याची देही झेलला आहे,उत्तर दिलेच पण मी आवडी पेक्षा पैसे वाचवते असेच वाटते लोकांना
So इग्नोर करणेच चालते अशा लोकांना,मी सणाला चारिठव स्वयंपाक करेन किंवा कंटाळा आला म्हणून पार्सल आणेन तो माझा प्रश्न आहे असा बाणा घेतलाय सध्या
असो जरा जास्तच विषयांतर झाले,
आता जरा त्या पावभाजीचे अपडेट द्या
पण मला जसे वाटते तसे इतर
पण मला जसे वाटते तसे इतर कुणाला वाटते का हे बघण्यासाठी मी भीत भीत या विषयाला तोंड फोडले>>अगदी अगदी वाटतेच. +१
मागे कुणीतरी भांडी घासायला आवडतं, गरम पोळ्या करुन घालायला आवडतं असे लेख लिहिले होते तिथेही ह्याच गंजक्या फेमिनिस्ट पोस्टी वाचायला मिळाल्या.
मग त्याचा उटांगा काढते मुलांना आवडतील ते पदार्थ बनवून. आम्हा दोघांना काय चालतं काहीही.
)
कुणा बाईला आवडत असेल कुटुंबाला गरम जेवण गरम पोळ्या करुन वाढायला तर?
एखादीला कधी बिझी शेडुलमुळे वेळेवर मुलांना व्यवस्थित जेवण घालता आलं नाही की येत असेल गिल्ट. (मला दोन दिवस नीट जेवण करुन गेले नाही की तिसर्या दिवशी गिल्ट येतोच.
शिवाय गृहिणीला सगळं फुकट मिळतं तर बदल्यात तिने घरकाम जेवण वेगेरे करावं अशा आशयाच्या पोस्टीही वाचुन धन्य झालेय.
शिवाय गृहिणीला सगळं फुकट
शिवाय गृहिणीला सगळं फुकट मिळतं तर बदल्यात तिने घरकाम जेवण वेगेरे करावं >>> ही मानसिकता तर सगळ्यात सिक आहे.
शीतल , तुमचा 80-90 लोकांच्या
शीतल , तुमचा 80-90 लोकांच्या पाभा साठी तुम्हाला बर्याच टिप्स मिळाल्या आहेत तरी अजून एक टीप सांगते.
पाभा करताना कांदा भाजी मध्ये घालू नका. तुमचं निम्मं काम कमी होईल. फक्त वरून घालायला घ्यायचा.
भाजीत कांदा ना घालणे ही एका पाभा गाडी वाल्याने दिलेली टीप आहे.या मुळे कांदा कच्चा परतला जाणे, किंवा जास्त परतला जाऊन भाजी गोडसर होणे ( कांदा जास्त परतला की कधी कधी गोडसर लागतो ) किंवा बर्याच वेळ आधी चिरलेला कांदा कडवट लागणे ई ई प्रॉब्लेम्स येत नाहीत.
मी 40 लोकांची पाभा केली आहे. 80 करणं फार अवघड असेल असं वाटत नाही त्यामुळे करा मस्त बिनधास्त फक्त शक्य झाले तर एकच मोठं पातेलं वापरून एकदम च करा भाजी . 2- 3 वेगळ्या वेगळ्या पातेल्यात केलं की चवीत फरक पडेल. मोठं पातेलं भांडी टेबल खुर्च्या ई भाड्याने देणाऱ्या दुकानात सहज मिळून जाईल .
All the best पावभाजी कशी झाली ते नक्की कळवा.
मनीमोहोरनी आकाशकंदिल घरी
मनीमोहोरनी आकाशकंदिल घरी केलाय तो बघ. का केलाय ? विचार केलास तर तुला तुझ्या ह्या प्रश्नाची उत्तर मिळतील.>>>>> सीमा थँक्यू, ह्या वाक्यामुळे मी ममोचा आकाशकंदील शोधू शकले.
सीमा थँक्यू, ह्या वाक्यामुळे
सीमा थँक्यू, ह्या वाक्यामुळे मी ममोचा आकाशकंदील शोधू शकले......+१.
आता चर्चेची नोकरी करत असूनही
आता चर्चेची गाडी नोकरी करत असूनही बघ घरच , दारच किती करते, किती उरक आहे याकडे वळली नाही म्हणजे झालं .
आपल्याकडे सगळ्याच गोष्टीच टोक / सुलभकरणं करायची प्रथा आहे. ज्याने त्याने स्वतःची सोय पहावी हे खरे .
शीतल झाला का वाढदिवस तुमच्या
शीतल झाला का वाढदिवस तुमच्या मुलीचा? पावभाजी चा बेत कसा झाला ? (मला फारच इंटरेस्ट, मी सारखं ह्या पानावर काही अपडेट्स आहेत का ते बघतेय)
वाढदिवस खूपच छान झाला. माझी
..
वाढदिवस खूपच छान झाला. माझी
वाढदिवस खूपच छान झाला. माझी मावस वहिनी आली होती मदतीला. मी आदल्या दिवशी फ्लॉवर साफ करून ठेवला होता. फ्रोझन मटार आणले होते. आलं लसूण पेस्ट करून ठेवली होती. शिमला मिर्च बटाटे धुवून ठेवले होते. मोठे मोठे पातेले आणून ठेवले होते. सर्विंग साठी बाउल्स काढून ठेवले होते.
सकाळी उठून बटाटे लावले कुकर ला, टमाटो puree करण्या साठी पाणी उकळून त्यात 5 मिनिट टोमॉटो चिरा देऊन ठेवले होते...
पावभाजी प्रोसेस चे फोटो काढता काढता राहिले. एक फायनल काढला आहे.. तो टाकते.. या फोटो मध्ये एक पातेलं संपला आहे एक अर्धा उरला आहे. तसेच 5 लादी पाव उरलेत.. एक लादी पाव जळाले पाव भाजनारीकडून. Total 45 लादी पाव सांगितले होते.
तसेच या पातेल्यातील पावभाजी उरली आहे. थोडीच संपली मग. Cake 3kg होता. तो पण राहिला आहे अर्धा kg.
जिलेबी 2.5kg आणली होती. त्यातील 1kg उरली आहे.
लोकांनी भरपूर खाल्लं मी स्वतः प्रत्येक व्यक्ती कडे जाऊन काही हवा नको ते पाहून आले.
केक जवळ जवळ सगळ्यांना डबल piece वाढला त्यामुळे जिलेबी राहिली वाटत.
टोटल 75 प्लेट्स आणल्या होत्या त्यातील 4 हे ते ठेवायला घेतल्या आणि 7-8 शिल्लक आहेत. 6 fix लोकं होते ते पुण्यात पाऊस पडत असल्या कारणाने आले नाहीत.
नशीब भात अर्धा kg चा लावला.. जीरा rice केला होता. कुकर उघडलेच नाही. वहिनी जाताना डब्यात थोडा घेऊन गेली. आता आम्ही खातो उद्या तवा पुलाव करून. कारण पावभाजी साठी आणलेल्या भाज्या थोड्या काढून ठेवल्या होत्या. फोटो उद्या टाकते. प्रमाण उद्या लिहते
वावा, झालं ना सगळं नीट?
वावा, झालं ना सगळं नीट?
जमेल तसे फोटो टाका.
मस्तच. कौतुक तुमचं आणि
मस्तच. कौतुक तुमचं आणि तुमच्या वहीनीचं.
मस्तच. कौतुक तुमचं आणि
मस्तच. कौतुक तुमचं आणि तुमच्या वहीनीचं.>>+१
Great. Thanks fo rthe update.
Great. Thanks fo rthe update.
मस्तच. कौतुक तुमचं आणि
मस्तच. कौतुक तुमचं आणि तुमच्या वहीनीचं.>....... +1.
Mukhya mhanaje तुमच्या लेकीला वाढदिवसाच्या belated हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या लेकीला happy birthday
तुमच्या लेकीला happy birthday.
मस्तच. कौतुक तुमचं आणि
मस्तच. कौतुक तुमचं आणि तुमच्या वहीनीचं.>....... +१११११११
Mukhya mhanaje तुमच्या लेकीला वाढदिवसाच्या belated हार्दिक शुभेच्छा!>>>>++१११११११११११ खरंच की हे राहीलं सांगायचं, तुमच्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
गूड! सगळं व्यवस्थित झालं
गूड! सगळं व्यवस्थित झालं म्हणजे.
साहित्याचं प्रमाण लिहा जमल्यास.
अभिनंदन . ळेकीला शुभेच्छा !
अभिनंदन . ळेकीला शुभेच्छा !
साहित्याचं प्रमाण लिहा जमल्यास.
(No subject)
या फोटो मधील दुसऱ्या
या फोटो मधील दुसऱ्या पातेल्यात आहे त्याच्या अजून निम्मी शिल्लक राहिली, शेजारील दोन फॅमिली breakfast ला बोलवले, so संपली आता. जिलेबो अजून पाऊण किलो आहे.
तसेच अर्धा किलो तांदुळाचा जीरा rice केला होता, तो जवळ जवळ सगळाच आहे कोणी घेतलाच नाही.
सगळ्यांना खुप खुप धन्यवाद,
सगळ्यांना खुप खुप धन्यवाद, प्रतिसादा बद्दल. रोज वाचत होते परंतु रिप्लाय द्यायला जमले नाही.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
तसेच इथे काही वाद झाले त्याला रिप्लाय द्यायचा होता.
तर..
मी स्वतः 8yrs experience software developer आहे. I can totally afford outdoor food.
But me n my husband are working from home since last 4yrs. And we are truly foody.. so most of time I am cooking at home. My mother in law and my mom are experienced cook(सुगरण). I am watching their entire process of kitchen arrangement n grocery management.
As I am working from home I get few hrs extra than women who goes to office.
Its matter of choice to make food at home or order outside, its not all about money. Its about food love, taste love, hygiene etc etc.
पावभाजी प्रमाण. ही खरं तर 90
पावभाजी प्रमाण. ही खरं तर 90 लोकांसाठी बरोबर झाली होता. अर्थात 25-30 लहान मुलं पकडून...
बटाटे - 5kg (4 काढून ठेवले कारण एकाच मोठ्या कुकर मध्ये लावले होते 4 बसत नव्हते )
फ्लॉवर - 2kg
शिमला मिर्च - 1.25kg (एकदम बारीक कापली) (1.5kg होती थोडी काढून ठेवली)
टोमॉटो -2.5kg (puree)
कांदा 3kg - (फोडणी मध्ये 1.5kg ची पेस्ट , वरून 1.5kg)
मटार फ्रोझन - 1.5kg
बीट - 0.25kg (खिसुन)
आले लसूण पेस्ट - 2 वाटी
एव्हरेस्ट काश्मिरीलाल 50gm (तिखलाल वेगळे हा ते नाही वापरले)
एवरेस्ट पावभाजी मसाला 200gm (थोडा राहिलाय 10gm असेल)
मीठ चवीनुसार (खरंतर एवढ्या भाजी ला चवीनुसार नाही प्रमाण ठरवून टाकले पाहिजे - जवळ जवळ आपण रोज भाजी साठी जी वाटी घेतो ती पाऊण घातली असेल)
कोथिंबीर लिंबू गरजे नुसार
शीतल, तुमचं कौतुक.
शीतल, तुमचं कौतुक. एवढ्याजनांचं करणं म्हणजे खाण्याचं काम नव्हे.
चला.. सगळं व्यवस्थित पार पडलं...
तुम्ही भांडी भाड्याने आणली का?
Pages