Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पावभाजी मोठ्या प्रमाणात
पावभाजी मोठ्या प्रमाणात करायची तर 3-4 घाण्यांत करा. पाच साडेपाच किलोची भाजी एका वेळेस ढवळायला बरी पडेल. पातेली पण पुरतील. आदल्या दिवशी फक्त सि. मी आणि फ्लाॅवर फु. प्रो मधे चिरून ठेवा..हवं तर कांद्यांची सालं काढून ठेवा, आलं लसणीचा ठेचा करून ठेवा, मोठी पातेली, झाकणं, डाव व भांडी चढा-उतरायची फडकी वगैरे जमवून ठेवा. सकाळी उठल्या उठल्या दोन तीन कुकर मधे बटाटे भरपूर शिजवून घ्या. (थोडा कांदा फु. प्रो मधून काढा. थोडा बारीक वरून घालायला चिरून ठेवा. हा कमी पुरतो.) 10 -12 कि. बटाटे असतील तरी पटकन सोलून होतात. ते सोलता सोलता हाताने मॅश करत करतच 3-4 पातेल्यांमधे विभागा . मग मोठ्या कढईत भरपूर लोण्यावर सगळी आलं लसूण मि. पेस्ट, कांदा, टो. सि मी व सगळा मटार परता. हे सर्व प्रकरण दोनतीन किलोचं असल्यानं एकाच मोठ्या भांड्यात मावेल. पा . भा. मसालाही त्या लोण्यात चांगला तळसवून घ्या. मग हे सगळं इतर पातेल्यांतल्या मॅश केलेल्या बटाट्यांच्य् डोक्यावर विभागून घाला. मग टाॅमेटो फू प्रो मधून काढून विभागून घाला. मग तीनही पातेल्यांत मीठ व पाणी घालून, हातानेच एकत्र करून, चव पाहून बारीक गॅसवर खाली तवा ठेऊन भरपूर रटरटू द्या. नंतर वरून परत बटर व पा.भा मसाला एकत्र करून , गरम करून वरून ओता. होईल नीट.
पाव मात्र 400 असतील. मोठे तवे शोधून ठेवा. चार बर्नरचा गॅस असेल तर एका वेळेस चार लाद्या म्हणजे 24 पाव होतील भाजून. ते स्टीलच्या मोठ्या डब्यात काढून ठेवा. पाव भाजायला मदतनीस आधीच तयार ठेवा. लोणी फ्रीजबाहेर काढून ठेवा.
अॅमी, तुमची पोस्ट्स फारच
अॅमी, तुमची पोस्ट्स फारच प्रेडिक्टेबल असतात
आपण सोडून जगात इतर सर्व बायका नवर्यावर डिपेन्डन्ट आणि फक्त चूल मूल करणार्याच आहेत हा एक चमत्कारीक समज तुमचे ओवरऑल जजमेन्ट इम्पेअर करत असू शकतो असे तुम्हाला नाही का वाटत? बघा ओपन माइंड ठेवून आणि विचार करून.
तर तुमच्या मूळ प्रश्नाबद्दल - परदेशात अनेकदा, विशेषतः लहान गावात रहात असाल तर देशी केटरर (चांगला) मिळणे इतके सोपे नसते. त्यातही देसी लोकांचा परदेशात सण उत्सव साजरा करण्याचा उत्साह प्रचंड, भारतात रहाताना पेक्षाही काकणभर जास्तच असतो. त्यमुळे कुटुंबे असे मोठ्या प्रमाणात कुकिंग बर्याचदा करताना पाहिलेय. पहिल्या दोनेक वर्षात या सगळ्याचे अनुभव, अंदाज येऊन जातात. घरे, स्वयपाकघरे भरपूर मोठी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बनवताना ६-७ लोकांनी एका वेळी किचन मधे काम करणे, मोठी भांडी घेऊन ठेवणे आणि नंतर ती स्टोअर करायला जागा हे शक्य असते. घरात दोन भले मोठे फ्रीझ, पार्टीचे साहित्य -२५-३० खुर्च्या, ७-८ टेबल,कॅरिओकी सिस्टिम पासून ते सर्व्हिंग ची मोठी भांडी, वार्मर्स, इ. सर्व घेऊन ठेवणे कॉमन असते. थोडक्यात सांगायचे तर लोकांची हौस आणि करण्याचा उत्साह प्रचंड असतो. करणारे मजबुरीने करताना कधी पाहिले नाहीत तर उत्साहाने करतात. आणि हो बहुसंख्य घरात दोघेही व्यवस्थित जॉब्स करणारे असतात आणि अशा मोठ्या कुकिंग साठी नवरा , मुले तर असतातच सोबत पण इतर फ्रेन्ड्स वगैरेही असतात मदतीला. त्यामुळे ज्यांना हे करायची हौस आहे त्यांना जमते सगळे.
अॅमी, ८०/९० लोकांकरता घरी
अॅमी, ८०/९० लोकांकरता घरी स्वैपाक करणार्या परदेशातल्या बायका अर्थार्जन करतात की नाही ह्याचा काहीही संबंध नाही. एखादीला जेन्युईनली स्वैपाकाची आवड असू शकते, ते जिथे रहातात तिथे केंटरींगचा पर्याय नाही किंवा असल्यास परवडत नाही/त्यांचं जेवण पसंत पडत नाही असं काहीही कारण असू शकतं. रोजच कुणी इतक्या लोकांचं जेवण घरी करत नसावं केटरींगचा बिझनेस असल्याशिवाय, नाही का?
आणि भारतातही हौसेनं हे सगळं
आणि भारतातही हौसेनं हे सगळं करणा-या असतात की.
मैत्रेयी, सायो,
मैत्रेयी, सायो,
त्यांना शून्य कुतुहल आहे म्हटल्यावर तुम्ही कशाला स्पष्टीकरण देत बसलाय ? शून्य कुतुहुल आहे तर तसं. ज्यांना कुतुहल आहे ते लोक विचारतील, शिकायचं आहे ते लोक शिकून घेतील , ज्यांना काही सल्ले, आधार द्यायचा आहे ते देतील. कुतुहल नसणार्यांना शिकवत बसायची काय गरज ?
शीतल, तुम्हाला बरेच सल्ले मिळालेत अगोदरच. तुमची सुद्धा बरीच तयारी झालेली दिसते. सगळं नीट पार पडो आणि पावभाजी एकदम हिट व्हावी याकरता शुभेच्छा. पदार्थ किती घेतले होते , किती पुरले/ उरले याची नीट नोंद करून ठेवा.
>>एकटीने ८०-९०-१०० माणसांसाठी
>>एकटीने ८०-९०-१०० माणसांसाठी खायला बनवणार्या देश/परदेशातल्या या ज्याकोणी बायका आहेत त्या रोज घराबाहेर पडून (किंवा घरातूनच पण) दिवसातले ७-८ तास काम करून अर्थार्जन करणाऱ्या आहेत का?
असतील तर वर्षातून किती वेळा करतात हे इतक्यांसाठी स्वैपाक?>>
व्यक्ती घराबाहेर नोकरी करत नाही म्हणजे दिवसभर काही वर्थवाईल करत नाही आणि फक्त बायकाच असा स्वयंपाक करतात हे गृहितक बघून गंमत वाटली. स्वयंपाक आणि तत्सम गोष्टीत एखाद्याला रुची नसणे मी समजू शकते पण त्यात रुची असणे, स्वतः करुन खाऊ घालायची हौस असणे याकडे असे पूर्वग्रह ठेवून बघणे मला नाही झेपत. चौकटीबाहेर आहोत असे दाखवताना विचार चौकटीतलेच?
परदेशात भारतीय केटरिंगची सोय नसलेल्या ठिकाणी हे कॉमन आहे. गणपती, दिवाळी निमित्ताने हे असे केले जाते. अमेरीकेत अगदी १० तास कामाचे + १ तास कम्यूट असतानाही हे केले जाते. फक्त स्त्रीयाच नाही तर बरेच पुरुषही करतात. लहान-मोठ्या गावातून अमेरीकन फॅमिलीजही करतात. ३५-४० जणांसाठी अमेरीकन पद्धतीचे जेवण (अपेटाईझर्स, मेन, साईड, डेझर्ट) किंवा ब्रंचसाठीचे पदार्थ , चर्च/ क्लब्जच्या दर महिन्याच्या मिटिंग्जच्या निमित्ताने टर्न असेल त्याप्रमाणे नेणे हे फार कॉमन आहे. यातही स्त्री-पुरुष दोन्ही सहभागी असतात. हौस असेल तर मार्ग मिळतो. कौतुकाने सिग्नेचर डिशची फर्माईश केली जाते. पाकृंची देवाण घेवाण होते. त्यातही एक मजा असते. यात व्यक्ती स्त्री की पुरुष , बाहेर काम करणारी की घर सांभाळणारी यामुळे फारसा फरक पडत नाही. माझ्या लेकाकडे आणि त्याच्या मित्रमैत्रीणींत ३० -३५ जण ब्रंच किंवा प्रीथॅक्सगिविंग लंचला नेहमीच असतात. २-३ जण मिळून करतात. हे सगळी मंडळी अर्ली ट्वेंटिजमधली, फुलटाईम जॉब+ पार्टटाईम मास्टर्स करणारी आहेत.
मेधा, त्यांचं कुतुहल लिमिटेड
मेधा, त्यांचं कुतुहल लिमिटेड आहे. जर घरुन्/बाहेर पडून नोकरै करुन कमवणार्या स्त्रिया जर इतक्यांचं जेवण घरी करत असतील तर का? असा प्रश्न आहे त्यांचा.
अर्थार्जन न करणार्या स्त्रियांच्या बाबतीत त्यांना इंटरेस्ट नाहीये.
आणि स्पष्टीकरण नाही दिलेलं. त्यांच्या नेहमीच झापडं लावून वाचणाच्या सवयीपलिकडेही काही जग आहे हे त्यांना कुणी सांगितलं नाही तर कसं कळणार? नाही का?
VB, तुमच्या आई ला विचारून
VB, तुमच्या आई ला विचारून भाज्या किती घ्याव्यात याचा एक अंदाज सांगता का 80 लोकांचा त्यात 30 मुलं असणार आहेत.
Submitted by ShitalKrishna on 31 October, 2019 - 01:57>>>.
मम्मीने तिचा अंदाज सांगितला आहे, तो खाली देतेय.
फ्लॉवर - ६ मोठे गड्डे/नग (आमच्याकडे फ्लॉवर किलोत विकत नाहीत म्हणजे अंदाजे ५ किलो)
बटाटे - ५ किलो
सिमला मिरची- ३ किलो
टोमॅटो - ३ किलो
काबुली चणे - १ किलो ( ह्याने ग्रेव्ही थिक होते अन चवही छान येते, पण बरेच जण हे चणे पावभाजीत घालत नाही , सो आवडत नसल्यास वगळावे)
दोन मोठ्या नारळाचे दूध ( आम्ही चवीसाठी पाण्याऐवजी नारळाचे दूध घालतो, सो हे ही ऐच्छिक आहे)
कोथिंबीर - २ मोठ्या जुड्या ( एक जुडीची पेस्ट करून फोडणीत घ्यावी अन एक वरून पेरायला)
एक मोठी वाटी आले लसूण पेस्ट
३०० ग्रॅम पावभाजी मसाला ( थोडा मसाला भाज्या उकडताना घालायचा, अर्धा फोडणीत अन उरलेला जर गरज असेल तर वरून घालून नीट शिजवून घ्यावा)
मैत्रेयी, सायो, मेधा, स्वाती२
मैत्रेयी, सायो, मेधा, स्वाती२ मस्त पोस्ट्स.
मैत्रेयी मस्त पोस्ट.
मैत्रेयी मस्त पोस्ट.
स्वयपाकघरे भरपूर मोठी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बनवताना ६-७ लोकांनी एका वेळी किचन मधे काम करणे, मोठी भांडी घेऊन ठेवणे आणि नंतर ती स्टोअर करायला जागा हे शक्य असते. घरात दोन भले मोठे फ्रीझ, पार्टीचे साहित्य -२५-३० खुर्च्या, ७-८ टेबल,कॅरिओकी सिस्टिम पासून ते सर्व्हिंग ची मोठी भांडी, वार्मर्स, इ. सर्व घेऊन ठेवणे कॉमन असते.>>>>> वा! मस्तच.
पाव भाजीत नारळ दूध? आणी एक
पाव भाजीत नारळ दूध? आणी एक गड्डी कोथिंबीर वाटून... आणि काबुली चणे एक किलो....? स्ट्रिक्टली नो नो....!

रंग बदलेल.... पांढरट हिरवट असा काहीतरी विचित्र येईल !
फ्लॉवरही इतका नको..........
नाही, रंगही खुप छान येतो
नाही, रंगही खुप छान येतो अन चवही.
असो, आपली आपली आवड
नारळी दूध नको !
नारळी दूध नको !
काबुली चण्याऐवजी हिरवे वाटाणे!!
पाव भाजीत नारळ दूध? आणी एक
पाव भाजीत नारळ दूध? आणी एक गड्डी कोथिंबीर वाटून... आणि काबुली चणे एक किलो....? स्ट्रिक्टली नो नो....!>> हो हे मला पण विचित्र वाटले. हे एक व्हेरिएशन आहे पण ओरिजिनल नाही. इथे यशस्वी पावभाजीच्या टिप्स व ट्रिक्स असा एक धागा आहे. तो वाचून घ्या.
पार्ले बेगम्स पोस्ट्स ना अनुमोदन. शिवाय कसे आहे ना ही एक संसारातली फेज आहे. त्या मुलांना किती मजा वाटेल. पुढे मोठी होउन कॉले जात बिझी झाली की आहेच दोन मुठीचा भात दोन पोळ्या आणी अर्धा कांदा एक बटाट्याची भाजी. रग्गड होतंय.
बरं एक सांगा , टाटा टेस्को मधून चुकून बदकाची सहा अंडी घेउन आले आहे. कधीच खाल्ली नाहीत. घरी कोणी खायला तयारच नाही.
विचित्रच वाट्ते, आता ती उकडून कावळ्याला खायला देता येइल पण इतर कोणास अनुभव आहे काय?
इथले वाचून काल मी एक प्लेट पावभाजी माग वली. त्यातली अर्धी वाचली आहे. आज रात्री खाईन.
हे एक व्हेरिएशन आहे पण
हे एक व्हेरिएशन आहे पण ओरिजिनल नाही. >>> हो अमा, पण हा प्रकार अत्यंत आवडीचा आहे, ओरीजिनल पावभाजीपेक्षा अशिच जास्त आवडते. अन हो एक जुडी कोथींबीर म्हणजे काही खुप होत नाही, त्याची पेस्ट एका लहान वाटी एवढीच होते अन ती ईतक्या सार्या भाज्यात कळत सुद्धा नाही, सो हिरवी होण्याचा प्रश्नच नाही.
काबुली चणे अन नारळाचे दुध सुद्धा ऐच्छिक असे लिहीलेय मी कारण ते सगळ्यांना आवडणार नाही याची कल्पना होतीच.
आम्ही काबुली चणे अन नारळाचे दुध घालतो सो फ्लॉवरचा ऊग्र वास येत नाही, जर हे घालणार नसाल तर फ्लॉवर कमी करुन त्याप्रमाणात बटाटे वाढवायला लागतील.
काबुली चणे अन नारळाचे दुध>> >
काबुली चणे अन नारळाचे दुध>> >>>>वेगळीच रेसीपी आहे.
मटार नाही का घालत पाभात? मी मटार पण घालते.
बाकी यजमान बाईंचा उत्साह दांडगा आहे. बेस्ट ऑफ लक. इथे अपडेट द्या नक्की.
नारळी दूध नको !
नारळी दूध नको !
काबुली चण्याऐवजी हिरवे वाटाणे!!>>>> + 1
मटार नाही का घालत पाभात? मी मटार पण घालते.
बाकी यजमान बाईंचा उत्साह दांडगा आहे. बेस्ट ऑफ लक. इथे अपडेट द्या नक्की.>>>>>+ 1
अमा, तुमच्याकडे कुत्रा आहे ना
अमा, तुमच्याकडे कुत्रा आहे ना? मग त्याला द्या की ती बदकाची अंडी! हा का ना का
घरी कोणी खायला तयारच नाही.
घरी कोणी खायला तयारच नाही.
Ggharachyanmadhe कुत्रा पण आला असेल.

इथे मूळ विषय पाकृचा सुरू आहे
इथे मूळ विषय पाकृचा सुरू आहे पण वर काही पोस्ट्स आल्यात त्या अनुषंगाने मला एक प्रश्न नेहमी पडतो जो आज विचारायचे धाडस करून टाकते
.
एखादीला चूल मूल करणेच आवडत असेल; रांधा, वाढा, उष्टी काढा यातच मन रमत असेल तर ते आता चालणार नाही का? बाहेर पडून नोकरी करणारी, 'रांधा वाढा उष्टी काढा' औटसोर्स करणारी स्त्रीच उत्तम स्त्री समजावी का? गृहिणी म्हणून जगायची इच्छा असणार्या स्त्रिया आता जन्माला येणे बंद झाले की त्या जन्माला यायच्या आधीच सामाजिक दबावामुळे त्यांचा गळा दाबला जातो?
कधीच खाल्ली नाहीत. घरी कोणी
कधीच खाल्ली नाहीत. घरी कोणी खायला तयारच नाही.
विचित्रच वाट्ते, आता ती उकडून कावळ्याला खायला देता येइल पण इतर कोणास अनुभव आहे काय?>>>>
मी खाल्लीत. मस्त ऑम्लेट बनवले तर छान लागते, काहीही कळत नाही, बदक की कोंबडी ते. बिनदास खा... अंडी खाण्यासाठीच आणली होती ना, मग काय फरक पडतो, बदक की कोंबडे याने.
साधना एक बाफ उघडून चर्चा
साधना
एक बाफ उघडून चर्चा करायला हवी यावर 
एखादीला चूल मूल करणेच आवडत
एखादीला चूल मूल करणेच आवडत असेल; रांधा, वाढा, उष्टी काढा यातच मन रमत असेल तर ते आता चालणार नाही का? >> माझ्या पाहण्यात अशा देशी / अमेरिकन / इतर देशातील स्त्रिया तर आहेतच पण गेल्या पाच सात वर्षात पुरुष सुद्धा स्वेच्छेने घरकाम , मुलांची जबाबदारी बघणारे आहेत - देशी बाबा आहेत, अमेरिकन, इतर देशातले बाबा आहेत आणि भारतात देखील १-२ कुटुम्बे आहेत जिथे स्त्री सोल ब्रेड विनर आहे आणि बाबा बाकी सगळे बघतात. कोणाला चालणार नसेल तर त्यांनी करू नये .
औटसोर्स करणारी स्त्रीच उत्तम स्त्री समजावी का? >> हे जजमेंट किंवा बरोबर / चुकीचे हे जजमेंट करावेच कशाला .
बदकाच्या आम्लेट ची चव छान
बदकाच्या आम्लेट ची चव छान लागते. खाऊन बघा
गम्मत म्हणून धागा उघडला.
गम्मत म्हणून धागा उघडला.
------------
पावभाजी ८०-९० जण, त्यात ३० मुले. मला वाटतं यासाठी गणित उपयोगी पडेल. सहा मोठे आणि तीन लहान असे पाहुण्यांसाठी एक छोटा पाभा कार्यक्रम ठेवल्यास अंदाज येईल. मग गुणीले दहाचा हिशोब करायचा. कसं?
एखादीला चूल मूल करणेच आवडत
एखादीला चूल मूल करणेच आवडत असेल; रांधा, वाढा, उष्टी काढा यातच मन रमत असेल तर ते आता चालणार नाही का? बाहेर पडून नोकरी करणारी, 'रांधा वाढा उष्टी काढा' औटसोर्स करणारी स्त्रीच उत्तम स्त्री समजावी का? गृहिणी म्हणून जगायची इच्छा असणार्या स्त्रिया आता जन्माला येणे बंद झाले की त्या जन्माला यायच्या आधीच सामाजिक दबावामुळे त्यांचा गळा दाबला जातो?>>>>
साधना , मला इथे काही पोस्ट्स वाचून नेहमीच हा प्रश्न पडतो.
नोकरी करणे आणि स्वयंपाक करण याच काहीतरी कनेक्शन करुन टाकलय सो कॉल्ड फेमिनिस्ट लोकांनी. आणि ते वाचून वैताग येतो.
कुणी नोकरी न करता मुलाबाळांच्यात मन रमवल, विणकाम केल, स्वयंपाक मस्तपैकी करून नवर्याला पोराला घातलं , आनंदी आहे त्यात ती तर इशु काय आहे अस वाटत.
समजा असं गृहित धरू कि नाईलाजाने करती आहे ती तरी , आहे त्या सर्कमस्टान्सेस मध्ये पुढे जाण्यासाठी ती तडजोड करती आहे कारण तिला घरच्यांच मत बदलण्यात उत्साह नाही. वाद घालण्यात रस नाही. तिच्या त्या प्रायोरिटीज नाहीत. प्रायॉरिटी आहे कि , पुढे जाणे, आहे ती परिस्थिती कशी फिक्स करता येईल ते पहाणे. जग बदलायचे वगैरे इतके मोठे प्लॅन नाहीत तिचे. पण नाही. ती घरात स्वयंपाक करते कारण तिला नोकरी नाही वगैरे फॉर्म्युले फिक्स झालेत सोशल मिडीयामध्ये आजकाल.
मुळात कशाकडेच लक्ष द्यायला नको .कुणीच. आपल्या कुटुंबासाठी जे बेस्ट वर्क होईल ते कराव आणि गप्प बसाव. जमल तर वाचुच नयेत अशा कमेंटी किंवा त्यावर लिहून वेळ घालवू नये इथपर्यंत प्रवास झालाय आता. वय झाल्यामुळ असेल.
एखादीला चूल मूल करणेच आवडत
एखादीला चूल मूल करणेच आवडत असेल; रांधा, वाढा, उष्टी काढा यातच मन रमत असेल तर ते आता चालणार नाही का? बाहेर पडून नोकरी करणारी, 'रांधा वाढा उष्टी काढा' औटसोर्स करणारी स्त्रीच उत्तम स्त्री समजावी का? गृहिणी म्हणून जगायची इच्छा असणार्या स्त्रिया आता जन्माला येणे बंद झाले की त्या जन्माला यायच्या आधीच सामाजिक दबावामुळे त्यांचा गळा दाबला जातो?>>>> कॉलेज मध्ये माझी एक मारवाडी मैत्रीण होती, तिचे स्वप्न होते housewife व्हायचे. ती नेहमी म्हणायची की तगडा कमानेवाला तो माँ बापही धुंड लेंगे मुझे कुछ करने की जरूरतही नई, अन अगदी तसेच झाले, आमचा बी कॉम चा result लागायच्या आत तिचे लग्न झाले पण. तिची आठवण आली
माझं वैयक्तिक मत -
माझं वैयक्तिक मत -
घरातली बेसिक कामं, कामापुरता स्वयंपाक, सगळ्या प्रकारची स्वच्छता, लॉन्ड्री, नेहेमीचे पैश्यांचे व्यवहार हे काम सगळ्यांनाच यायला हवेत.
याउपर पुढे कामं वाटून घ्यावीत. हाउसवाईफ/हजबंड आहे म्हणून तिनीच किंवा त्यानीच 'सगळी' कामं करावीत अस शक्यतो होऊ देऊ नये.
>>>घरातली बेसिक कामं,
>>>घरातली बेसिक कामं, कामापुरता स्वयंपाक, सगळ्या प्रकारची स्वच्छता, लॉन्ड्री, नेहेमीचे पैश्यांचे व्यवहार हे काम सगळ्यांनाच यायला हवेत.
याउपर पुढे कामं वाटून घ्यावीत. हाउसवाईफ/हजबंड आहे म्हणून तिनीच किंवा त्यानीच 'सगळी' कामं करावीत अस शक्यतो होऊ देऊ नये.<<<<<
+१
वरील परीछेदात माझी एडिशन हि की, प्रत्येकाने आपल्या घरापुरतं बघावं हे कसे मॅनेज करावे, उगीच समाज सुधाराय्ला बसलोय ह्या मोड मध्ये राहु नये किंवा सुपरवूमन ह्या असल्या मोड मध्ये राहून इतरांना कमी लेखु नये.
ओळ्खीतल्या एक बाई, मी कसे वीकेंडला तयारी करते, माझं प्लँनिंग कस असतं ह्याच्ग्या गप्पा ( अगदी न विचारता डिटेल मेनू लिस्ट ) सांगून वीट आणायच्या. नंतर नंतर तर , कस्काय वर लिस्ट टाकत आज ह्यांव चटण्या, त्यांव मुरवले आणि मी आले बघा तयार होवून. सुपरवूमन कॉम्प्लेक्स दाखवायच्ग्या. वर, अपेक्षा हि तारीफ करा ह्यांची.
कॅनडात असताना उत्साह आणि हे
कॅनडात असताना उत्साह आणि हे_करुन_बघायचं_ आहे_एकदा या हौसेपोटी एक दोन वेळा मी आणि बायकोने २५-३० माणसांचं दोन भाज्या, पोळ्या, मोदक, तूप, मसालेभात आणि ताक असं जेवण करुन विकलं होतं.
टिप पण मस्त मिळालेली आम्हाला 
उत्साह आणि इच्छा असली की होतं सगळं.
Pages