पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या निम्मिताने अंदाजे 80-90 लोकांसाठी पावभाजी करायची आहे. बरोबर जिलेबी असेल. भाज्या किती घ्याव्यात? आदल्या दिवशी चिरून ठेवल्या तर चालेल का?
अंदाज सांगावा. टिप्स द्या.

तुम्ही फ्लॉवर व बटाटे निम्मे निम्मे घेत असाल तर चार किलो फ्लॉवर आणि माणशी एक मोठा बटाटा.. इतर भाज्या सोयीस्कर पाऊण किलो वापरा. अर्थात हा सुगरणीचा सल्ला नाही :स्मित :त्यामुळे माबो सुगरणीच्या सल्ल्यास प्राधान्य द्यावे.
आणि बटाटे सोडून इतर भाज्या आधी चिरून ठेवू शकता.

80-90 लोकांसाठी पावभाजी घरी करायची आहे??? बापरे!!! >> माझीही प्रतिक्रिया हीच होती . Happy
पावाचा अंदाज काय घेतलाय ? सहज एक शंका .

80 -90 लोकांसाठी पावभाजी म्हणजे खुप उरका पडेल कामाचा. शिवाय बरोबर जिलबी सारखं हलकच पक्वान्न आहे. अंदाज नाही देता येणार पण एक सजेशन आहे. पाव भाजी आणि बरोबर अजून एक दोन पोटभरीचे आणि करायला सोपे प्रकार (इडली चटणी, रवा इडली, दही भात) हे पण ठेवा. म्हणजे पावभाजीवरची डिपेन्डन्सी कमी होईल.
भाज्या आदल्या दिवशी चिरून ठेवता येतील. फ्रिज मध्ये जागा असेल तर कांदा कोथिंबीर हे पण आदल्या दिवशी चिरून ठेवा. शक्यतो टोमॅटो प्युरी वापरा. लागेल तसा पॅक फोडता येईल. परदेशात असाल आणि फ्रेश इडली पीठ मिळत नसेल तर चक्क गिट्सचे पॅक वापरा. पसारा कमी होतो. पॉसिबल आहे फक्त धावपळ / दगदग होईल. मदतीला मित्र मैत्रिणी असतील तर उत्तम. नंतर मेनु काय केला आणि किती लागला तर इथे नक्की लिहा. बेस्ट लक.

माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या निम्मिताने अंदाजे 80-90 लोकांसाठी पावभाजी करायची आहे. बरोबर जिलेबी असेल.

<<

जिगर है बॉस!

लहान मोठे पावभाजी दुकानवाले देखिल एकावेळी एवढ्या प्लेट्सचा अंदाज घेत असतील का ही शंका आहे मला.

जिलबी देखिल घरीच करणार आहात का? :घाबरलेला बाहुला:

८९-९० लोकांकरता घरी पाभा किंवा काहीही मेन्यू न करता सरळ केटरर ला सांगा. साधारणपणे पाभा चा रेट १२०/- वगैरे असतो; अर्थात पब्लिक जास्त असल्यानी रेट्स बदलतील रीड - कमी होईल.
नुसत्या पाभा पेक्षा सोबत तवा पुलाव + रायता + असेल तर पूर्ण जेवण होईल. आणि इतक्या लोकांकरता हे आयटम्स लागतीलच किंबहुना अजून जरा हवेत.

तुमच्या कडे जर 'कामं करणारी' मॅनपॉवर असेल तर अर्थातच बरेच गणितं बदलतील.

घरी जास्तीत जास्त ८-१० लोकांचं करणं ठीक त्यापेक्षा जास्त असतील आणि सोहळ्याचे यजमान आपणच असू तर सगळा वेळ किचन मध्येच मोडतो. केटरर बेस्ट राहील हे माझं मत.

८०-९० लोकांसाठी पावभाजी घरी बनवायची वाचून लोक इतके आश्चर्यचकित का झाले. करतात की कितीतरी लोक घरी जेवण. माझी मम्मी स्वतः १०० लोकांचे जेवण बनवायची, तेही वरण भात, दोन भाज्या, अन पुऱ्या. फक्त हौस लागते असे तिचे म्हणणे आहे. तरीही दमछाक होते हे खरे म्हणून आता असा काही कार्यक्रम असेल तर आम्ही सरळ कॅटरर कडे ऑर्डर देतो.
गेल्याच महिन्यात आमच्या विंगच्या जवळपास ४० बायका अन मुलांसाठी पावभाजी केली होती तिने. फक्त भाज्या साफ करून चिरायला माझी मदत घेतली. भाज्या चिरून पावभाजी करायला साधारण तास सव्वातास लागला होता.

सोहळ्याचे यजमान आपणच असू तर सगळा वेळ किचन मध्येच मोडतो. केटरर बेस्ट राहील हे माझं मत.>>>>>>>
योकु, अगदी हेच लिहायला आले होते.

सगळ्यांना खुप खुप धन्यवाद.. सामूहिक उत्तर देते कि 80-90 लोकांसाठी घरी करायची तर त्यातले 30- बच्चे कंपनी असणार आहे.
पावाचा अंदाज मी प्रत्येकी 4 average, लहान मुले 2 2 खातील. आज पुन्हा अंदाज काढला 80लोकं maximum असतील. दहीभाताचा प्लॅन होता, परंतु खपेल का पावभाजी पुढे? चिप्स आणि 5kg केक असणारे.
भाज्या आदल्या दिवशी वाफवून ठेवणारे, कांदा शिमला मिर्च टोमाटोची फोडणी करून दोन वेगळ्या पातेल्यात smash केलेल्या भाज्यांवर घालेन, वरून उकळत पाणी, दोन पातेले वेगळे वेगळे ठेवेन gas वर, आदल्या दिवशी सगळं चिरून वाफवून, तसेच आला लसूण पेस्ट करून ठेवते, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट फोडणी त्याला कांदा टोमॉटो शिमला मिर्च चिरेल फ्रेश. भाजी सकाळीच करून ठेवेन. मला दुपारी 12 पर्यंत भाजी करून मोकळा व्हायचा आहे.
अजून काही टिप्स असतील तर द्या. तसेच मी तळेगाव मध्ये राहतेय. इथे कोणी असेल तर मदतीला आलात तरी चालेल धावेल माझ्यासाठी.

शिवाय पावभाजी राहिली तर पुढचा दिवस खाऊ शकतो परंतु दहीभात जास्त आंबट होईल ना? अजून काही सोपा सांगा जे करून ठेवता येईल आधीच...

माझ्या मैत्रिणींचा काहींचा असंच म्हणणं पडला कि घरी जमेल का, आणि काही बोलल्या जमेल. तसेच youtube वर एक video पाहिला त्यात प्रत्येकी दीड किलो भाज्या घेतल्या होत्या तिने 50-60 लोकांचा अंदाज सांगितलं होता.. मी 5kg बटाटे घ्यायचे म्हणतेय बाकी भाज्या 3 3 kg. टोटल 18-20kg भाज्या घेणारे. एका अनुभवी काकू बोलल्या कि 1kg vegetables ची पावभाजी 4 लोकांना पुरते, so मॅक्स 80 लोकं धरले (30मुले) तर मला 17-18kg भाजी लागेल.
उद्या पर्यंत अजून काही टिप्स असतील तर द्या. आधी करून ठेवता येण्या सारखा जोड पदार्थ सांगा.
हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद देव मला देवो ही प्रार्थना कराल का माझ्यासाठी.. update देईल नेक्स्ट week मध्ये. कसं कसं झाले त्याचे.

@VB, तुमच्या आई ला विचारून भाज्या किती घ्याव्यात याचा एक अंदाज सांगता का 80 लोकांचा त्यात 30 मुलं असणार आहेत.

कौतुक तुमचं आणि शुभेच्छा.

एकटीने करू शकतो, ठरवलं तर काहीही पण दमणूक फार होईल, मदत असावी अशा वेळी असं वाटतं. कोकणात गावी असं सर्व घरी करतो बरेचदा पण जेवढी घरं असतील आमंत्रण दिलेली, त्यातले बरेच जण मदतीला असतात. त्यामुळे फार एकावर पडत नाही. इथे मात्र दहा जण असतील तरी बाहेरून आणतो.

पावभाजीबरोबर जीरा राईस पाहिजे , दही भाता ऐवजी अस मला वाटत. आणि त्याबरोबर बुंदी रायता.
भाज्या शिजवून आदल्या दिवशी ठवल्या तर नाही जास्त वेळ लागणार.
तसच जिलेबी पेक्षा गुलाब्जाम किंवा गाजर हलवा.

मी पाव भाजी मध्ये नुपुरच्या ब्लॉग वर वाचल्यापासून कांदा परतून घालत नाही. फक्त वरून वापरायला.

अन्जु, बरोबर. इथे अमेरिकेत पण भरपुर जण मैत्रिणींच्या मदतीने करतात १०० जणांच जेवण. इथे आमच्या गावी सर्व प्रकारच केटरिंग अव्हाईलेबल आहे त्यामुळ आम्हाला कराव लागत नाही घरी पण माझ्या बहिणीकडे गाव छोट असल्यान नव्हते केटर्र्स. तिचा मैत्रिणींचा ग्रुप करायचा १००/१५० लोकांच जेवण. मोठी भांडी पण आणवलेली त्यांनी.

पण एक कुतुहल,
घरीच करायचा 'पण' का? आवड असली तरी उगाच लोकांना हाताशी धरा, गोळा करा, शोधा मदतीला. जरा मजा करावी.(अ. आ. म.)

झंपी, अगं कितीतरी कारण असु शकतील ना.
अ‍ॅलर्जीज असु शकतील.
घरी मनुष्यबळ असेल.
घरी करून पैसे वाचविता येत असु शकतील.
वापरायचे जिन्नस उत्तम प्रतिचेच असावेत अस वाटत असेल.
आपल्या बाळासाठी आपणच काहीतरी करावे असे वाटत असेल.
स्वयंपाकाची आवड असेल आणि चार लोकांच्यात स्वयंपाक करण्यात जास्त मज्जा येत असेल.

मनीमोहोरनी आकाशकंदिल घरी केलाय तो बघ. का केलाय ? विचार केलास तर तुला तुझ्या ह्या प्रश्नाची उत्तर मिळतील.

उपक्रमाला शुभेच्छा!

भाजी चं रिव्हर्स एंजिनिअरिंग टाईप प्रकरण आवडलं!
दही भात आंबट नाही होत. दूध घालून भातालाच विरजण लावायचं दह्याचं. शक्य असेल तर फ्रिजात ठेवता आला तर पाहा.

झंपी, अगं कितीतरी कारण असु शकतील ना.
अ‍ॅलर्जीज असु शकतील.
घरी मनुष्यबळ असेल.
घरी करून पैसे वाचविता येत असु शकतील.
वापरायचे जिन्नस उत्तम प्रतिचेच असावेत अस वाटत असेल.
आपल्या बाळासाठी आपणच काहीतरी करावे असे वाटत असेल.
स्वयंपाकाची आवड असेल आणि चार लोकांच्यात स्वयंपाक करण्यात जास्त मज्जा येत असेल.

मनीमोहोरनी आकाशकंदिल घरी केलाय तो बघ. का केलाय ? विचार केलास तर तुला तुझ्या ह्या प्रश्नाची उत्तर मिळतील. > +१११११

अरे, सीमा, मी सहजच कुतुहलाने विचारले. आजकाल जीवन इतकं धावपळीचं आहे, सतत धावपळ, गडबड असं आहे , म्हणून.

दहीभात केलात तर साधारण 25 30 लोकांसाठीच करा. सगळे खातील आणि खुप खातील असं नाही. थोडा भात साधा ठेवा. थोडी जास्तीची फोडणी ठेवा. म्हणजे लागलाच अजुन तर दहीभात 5 मिनिटात मिक्स करता येईल किंवा उरलाच तर साधा भात वेगळे प्रकार करून संपवता येईल. शुभेच्छा!

एकटीने ८०-९०-१०० माणसांसाठी खायला बनवणार्या देश/परदेशातल्या या ज्याकोणी बायका आहेत त्या रोज घराबाहेर पडून (किंवा घरातूनच पण) दिवसातले ७-८ तास काम करून अर्थार्जन करणाऱ्या आहेत का?
असतील तर वर्षातून किती वेळा करतात हे इतक्यांसाठी स्वैपाक?
नसतील तर मला शून्य कुतूहल/रुची आहे Wink

ज घराबाहेर पडून (किंवा घरातूनच पण) दिवसातले ७-८ तास काम करून अर्थार्जन करणाऱ्या आहेत का?>>>>> आहेत. १५०-२०० माणसांचा स्वयंपाक करणार्‍या परदेशातल्या बायका माहित आहेत.फक्त त्याची तयारी खूप आधीपासून होते,त्यांचे फ्रीजर दणकट असतात(माहितीवरून).कधी त्यांच्या ग्रूपमधल्या दोघी-तिघी २-३ पदार्थ करून आणतात.

Pages