पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी ईंटरनेटवरच्या आवडत्या फूड ब्लॉग्ज् बद्दल एक नवीन धागा कोणीतरी काढला होता, मी शोधायचा प्रयत्न केला पण सापडला नाही. कोणाकडे लिंक आहे का?

हा नाही, तिथे शेवटचा प्रतिसाद २०१५ चा आहे, माझ्या आठवणीप्रमाणे फार फार तर २०१८ ला शेवटचा प्रतिसाद आलेला तो धागा आहे.

मला आठवतंय त्यानुसार सई केसकर यांनी तो धागा काढला होता. जिथे फापटपसारा नसून फक्त रेसिपी असतील, अशा लिंक्स. पण त्यांच्या लेखनात दिसत नाहीए.

Vaccum seal करायची सोय असेल तर जास्त शेल्फ life मिळेल. नाहीतर आपण भारतात ट्रेन प्रवासासाठी कसं दोन- तीन दिवस टिकणारे पराठे करुन नेतो तसे टिकतील. परदेशात फ्रिज करायच्या आधी quality चेक करुन फ्रिज करायचा. एकदा फ्रिजर मध्ये गेले की आठ दिवस प्रॉब्लेम नसावा.

घरी केलेलं पराठे परदेशात जाऊन फ्रीझ केले तर चांगले राहतील का? आणि किती दिवस चांगले राहतील ?>> घर कुठे आहे आणि परदेश कुठला ह्यावर अवलंबून आहे. फ्लाइट चा वेळ किती. १४ तास कमित कमी धरा. व्हेक्युम फ्रीज करून मिळत असतील तर नीट राहतील. एका वेळचे सर्व्हिन्ग असे अलग अलग पॅक करून घ्या. खाकरे ठेपले बेस्ट.

डिहायड्रेट करुन इथून पदार्थ न्यायची नवीन पद्धत आहे. पाव भाजी, मटकीची उसळ वगैरे घरी करुन मग डिहायड्रेट पावडर स्वरुपात करुन मिळतात!
पण चवीवबद्दल खात्री नाही कितपत चांगले लागते ते!

बटाट्याला कच्ची केळी हा पर्याय का?

न्यूट्रिशन facts पाहिले तर बटाटा केल्यापेक्षा बरा आहे. अर्थात चव सुद्धा. (म्हणजे बटाटा वडा काय किंवा पावभाजी काय, कच्ची केळी पेक्षा बटाटा चवीला चांगला )

बटाट्याला कच्ची केळी हा पर्याय का?

न्यूट्रिशन facts पाहिले तर बटाटा केल्यापेक्षा बरा आहे. अर्थात चव सुद्धा. (म्हणजे बटाटा वडा काय किंवा पावभाजी काय, कच्ची केळी पेक्षा बटाटा चवीला चांगला )

श्रीखंड फ्रीजशिवाय किती काळ टिकते? चितळ्यांचे आता आणलेले श्रीखंड उद्या दुपारपर्यंत चांगले राहील का?

कुठे विचारावे ठाऊक नसल्याने इथे पृच्छा!

पुंबा थंड हवेत टिकेल की. कुठे रहाता आणि कोणता मौसम आहे, त्यावर सर्व काही आहे.
_____________
देवकी यांचा सल्लाही मस्त!

फ्रेश काळ्या मिरीचे लोणचे कसे करायचे कोणाला माहिती आहे का? नेटवर जेनरलं लिंबु आणि मीठ मिक्स करून ठेवायचं असा लिहिलय.

P.s.

मला साधा दिवाली चा फराल सुद्धा बनवण्याचा अनुभव नाहीय. लाडू रेसिपी बरहूकुम करूनही प्रत्येक वेलेस वेगलेच होतात. त्यामुळे बेसिक प्रकार सांगितले तरी चालेल.
आगाउ धन्यवाद

बटाट्याला कच्ची केळी हा पर्याय का?)))))))))

मला बटाट्याची अँलर्जी झाल्यामुळे हा पर्याय करून बघायची इच्छा होतेय.

बटाट्याला कच्ची केळी हा पर्याय का?))))))))) >> हो . जैन कलिग कडून ऐकल होत . आणि कान्द्याला कोबी

बटाटेवड्यांसारखे नाही पण कच्च्या केळ्याचे रोल करते मी, कच्ची केळी चार पाच असतील तर बटाटे मध्यम आकाराचे पाच -सहा
घ्यायचे. दोन्ही उकडायचे कुकरमध्ये. केळी गरम असतानाच सोलून स्मॅश करायची (मी सालासकट उकडते) कारण थंड झाल्यावर ती दगडासारखी कडक होतात. मग स्मॅश केलेली केळी आणि बटाटे ह्यात आलं मिरची कोथिंबीर जिरं वाटून घालायचं मिठ साखर, चवीपुरते, लिंबाचा रस थोडा, मग छोटे छोटे लोडासारखे वळून तांदळाच्या पिठात घोळवून तळायचे. चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर यम्मी लागतात.
मी न विचारता च कृती दिलीये , आगाउपणे.

Pages