पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिम्याऊ - oven roasted cherry tomatoes are really yummy, Its a time consuming and energy intensive job but results are really yummy. Cut those tomatoes in half and arrange on over tray in single layer, cut side facing up. Now sprinkle sea salt flakes, add dash of olive oil and bake on low temperature till they start to shrink. These tomatoes are now ready to be added to salads, cheese boards, pasta salads or pizza toppings!

Really sorry for typing in English but I simply can't seem to be able to use the Marathi typing tool on Maayboli. Have gone through all the help pages too! Have given up now!
Thanks!

आमचे शेजारी गावाला जाताना 1/2 किलो चेरी tomato उदार मनाने देऊन गेलेत>>>उफ्फ! tomato वाचलेच नाही.म्हटलं चेरी दिल्या असतील तर हा प्र्श्न का पडावा?

सॅलड मधे नाहीतरी नुसतेच खा. मी मसालेभात, वगैरे काही केले तर त्यात अर्धे चिरुन टाकते ते. चार फोडी करुन आमटी मधे पण वापरतायेइइल.

सुपरफाईन बेसनचा पण ढोकळा होतो.
एक ग्लास पाणी घ्यायचे त्यात मीठ, साखर आणि सायट्रिक अ‍ॅसिड टाकायचे. सगळ विरघळले कि मग त्यात मावेल एवढे पीठ टाकायचे. मिक्स करायचे. एक मोठा चमचा तेल घेउन त्यात सोडा मिक्स करायचा आणि ते तेल टाकायचे पिठात. एकाच बाजुने हलवायचे मग छान फुगते पीठ.

कुणी नियमीत गुळाचा चहा घेतं का इथे? नेहेमी हमखास जमण्याची काही कृती असेल तर सांगा.>>
योकु जमला का चहा? माझे आई वडील गुळाचाच चहा पितात दोन वर्षांपासून. स्पेशल रेसिपी काही नाही, दूध वेगळं उकळवून घ्यायचं, कोरा चहा वेगळा बनवायचा - जो काही चहा मसाला तुम्हाला आवडतो तो टाकून - आणि कपामध्ये तुमच्या आवडी प्रमाणे कोरा चहा आणि दूध मिक्स करायचे.
गॅस वर त्यांना एकत्र करायचं नाहीच. फाटतं ते मिश्रण.

सॅलड मधे नाहीतरी नुसतेच खा. मी मसालेभात, वगैरे काही केले तर त्यात अर्धे चिरुन टाकते ते. चार फोडी करुन आमटी मधे पण वापरतायेइइल.>> हो पण करते असच ...

मोझरेला चीज आणि बेसिल ची पान (ऑपशनल ) मिळू शकतील का सहज ? तर मग टोमॅटो अर्धे अर्धे चिरा आणि मोझरेला चीज पण साधारण त्या आकारात कापा .. आणि टूथपिक ला एक टोमॅटो एक मोझरेला आणि एक बेसिल चं पान (आपल्या तुळशीचं पान ही चालेल जरा चव वेगळी लागेल पण वाईट नाही लागत ) असं खोचा आणि त्यावर मीठ मिरपूड भुरभुरवा असेल तर ऑलिव्ह ऑइल चे थेंब सोडा आणि गट्टम करून टाका ..

पेन्ने पास्ता बॉइल करा(किंवा कोणताही पण शक्यतो बाईट साईझ आकार असेलेला ) , काकडी ,भोपळीमिरची(रंगीत असतील तर अजून चांगलं ) ,मोझरेला चीझ ,या सगळ्याचे बाईट साईझ तुकडे करा ,आणि हे चेरी टोमॅटो अर्धे कापून असं सगळं एकत्र करा
एका बाउल मध्ये २ लहान चमचे लिंबाचा रस, त्यात छोटी लसूण पाकळी किसून , थोडं मीठ , असेल तर चिमूटभर ओरेगानो /बेसिल किंवा कोणतेही ड्राईड हर्ब्स , मिरपूड असं एकत्र करून घुसळा त्याचवेळी एकीकडे ऑलिव्ह ऑइल वरून ओतत राहा (साधारण मोठे २ चमचे ) हे असं चांगलं फेटा आणि वरच्या सलाड वर ओता , छान मिक्स करा आणि खा !

बेसिक दडपे पोहे कसे करायचे>> २ मुठी पात्तळ पोहे त्यात खोवलेलं ओलं खोबरं (जेवढ्यास तेवढं थोडक्यात भरपूsss र ), १ कांदा बारीक चिरून ,मीठ साखर असं घालून चांगलं मिक्स करायचं आणि दाबून ठेवायचे .
एकीकडे फोडणीत हिंग हळद जिरा मोहरी कढीपत्ता, १ चमचा किसलेले आले,मिरच्या (हवं तर शेंगदाणे ) अशी फोडणी द्यायची ती या दाबून ठेवलेल्या पोह्यांवर घालायची आणि परत मिक्स करून पोहे थोडावेळ दाबून झाकून ठेवायचे ... आणि मग खायचे

(मी सगळ्या फोडण्या अश्याच करते सगळ्यात हिंग हळद जिर मोहरी कढीपत्ता घालून,, दडपे पोहे करताना कदाचित हिंग घालत नसावेत... मला नाही आठवत आहे )

त्याने acidity वाढते का>> ते नाही ग माहिती ..

जेव्हा आम्ही नारळ उतारवतो ना झाडावरून तेव्हा काही काही फुटतात .. मा त्या फुटलेल्या नारळात असे पात्तळ पोहे दाबून दाबून भरायचे मग ते त्यातला सगळं रस शोषून घेतात .. आणि फुगतात .. असे दडपून भरलेले पोहे म्हणून ते दडपे पोहे .. Happy

खूप धन्यवाद अंजली.. भरपूर खोबरं का, बरं
एकांकडे खाल्ले होते दडपे पोहे, त्यांनी काकडी सुद्धा घातली होती

भरपूर खोबरं का, बरं>> नसेल तर असेल तेवढं घाल ... मला आवडतं म्हणून मी जाम घालते .. ओलसरपणा गोडवा येण्यापुरतं घातलं तरी चालेल..
इथे नसेल खोबरं तेव्हा मी टोमॅटो घालते सरळ.. आणि लिंबू पिळते थोडं
बहुतेक कोल्हापूर ला टोमॅटो घालत असावेत ..

आणि कोथिंबिरीची सजावट विसरू नकोस किल्ली.
अवांतर - बेसिक पोहे तयार झाल्यावर वाटल्यास पातळ ताक त्यावर घालून आणखी मस्त लागतात.

बेसिक पोहे तयार झाल्यावर वाटल्यास पातळ ताक त्यावर घालून आणखी मस्त लागतात.>> येस्स्स ! खूप भारी लागतात .. असे ताक घातलेले दडपे पोहे आमच्याकडची एक मांजर पण आवडीने खायची .. Lol

दडप्या पोह्यात पातळ पोहे + खोवलेला नारळ, त्याचं पाणी, हिरवी मिरची, टमाटे, काकडी, कांदा, खारे दाणे, कोथिंबीर.
वरतून थोडी साखर, मीठ. हवं असेल तर आलं किसून.

जिरं मोहोरीची (आवडत असेल तर हिंग व) कढीपत्ते घालून चरचरीत फोडणी वरतून. हळद नसते. पांढरेच असतात पोहे.

हे सगळं प्रकरण दाबून ठेवायचं धीर धरवे पर्यंत (अर्थात सगळे पोहे ओलसर होईपर्यंत.) ओलसरपणा कमी असेल तर वर सांगितल्याप्रमाणे ताक किंवा सरळ पाण्याचा शिपका दिलात तरी चालेल.

महत्वाची टीप : भरपूर ओला नारळ नसेल तर दडपे पोहे करायच्या फंदात पडू नये.
टीप क्र. २. : बारीक चिरलेले टमाटे + काकडी चोचून तिला मीठ लावून ठेवलं की भरपूर पाणी सुटतं. हे पोह्यात मिक्स केलं की ओलसरपणा वाढतो.

चहा हमखास नासवायचा असेल, तर "ऑर्गॅनिक" गूळ त्यात घालावा. नासवायचा नसेल, तर भरपूर केमिकलयुक्त पिवळा धम्मक गूळ तोही थोडासाच घालायचा. दूध खूऽप कमी घालायचे. "कमी दूध" ही गुळाच्या चहाची महत्वाची गरज आहे.

दडपे म्हणजे दडपून. नारळ खवून, त्याचं नारळाचे पाणी वापरून त्यात मावतील तेवढे पोहे दाबून दाबून एका भांड्यात दडपणे. वरून जास्तीचे पाणी नाही घालायचे. पाण्याने बेचव लागतात. पोहे नारळ पाण्यात भिजवताना साखर मीठ घालणे. 15-20 मिनिट दडपल्यावर मोकळे करून खारे शेंगदाणे घालणे. हिरवी मिरची हिंग कडीपत्ता मोहरी जिरे ची फोडणी वरून घालणे. हवे असल्यास लिंबू पिळणे. ही आमच्या गावाकडची ओरिजिनल रेसिपीए.
नारळ नसेल तर दही, ताकात पण दडपून करतात.

दडपे पोहे करण्यापूर्वी पातळ पोहे किंचित भाजून कुरकुरीत केले की मस्त लागतात. पण आक्रसले नाही पाहिजेत.
ज्या दुकानात पापड, अमृत कोकम, फणसाचे तळलेले गरे इत्यादी वस्तू विकत मिळतात तिथे मिरगुंडं नक्की मिळतील Happy
हमखास ठसका लावणारा पोह्यांचा तिखट पापड असतो तो.>> येस. डायमंड शेपचा. छोटा.

Pages