पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढोकल्याचे पीठ म्हटले की सरसरीत बेसन हे बरोबरच आहे. रेडिमिक्स ढोकळा म्हटले असेल तर त्यात सगळे काही येईल.

सगळ्या साहित्याबरोबर सोडा घातला तर अजिबात फुलत नाही, स्वानुभव. त्यामुळे तो भरत म्हणतात तसा मी8क्स करून अगदी तापल्या मोदकपात्रात किंवा कुकरमध्ये ठेवायचा वेळेस घालून, मिश्रण चांगले फेटून मग भांड्यात ओतून ठेवले तर चांगला फुलतो.

थँक्स सगळ्याच चर्चेसाठी. हे पीठ एका गुज्जु का.ना. कडून आलं होतं. नुसतं बेसन नाही. थोडा वेळ भिजवून मग दुसर्ञा भांड्याला तेल लावून आयत्यावेळेवर इनो घालून मग कुकरला शिटी न लावता वाफवलं. नंतर फोडणी. चांगलं झालं. भिजवून ठेवायची स्टेप आवश्यक होती का नक्की माहित नाही. पण इतर कामांत थोडा वेळ गेलाच. मस्त ढोकळा झाला यम्म… Happy

हिरवी सिमला मिरची खूप आहेत त्यांचं काय करता येईल?
मी टिपिकल बेसन पेरून भाजी करते किंवा थोडी चिरून तवा राईस/सॅन्डविचमध्ये ढकलते.
खूप green capsicum का आणल्या याचं उत्तर नवऱ्याला ग्रोसरी आणायला सांगणे, त्याने यादीमधला or हा शब्द न वाचणे, इत्यादी.
भारतात चिंटुकल्या कॅप्सिकम मिळतात तशा या नाहीत, मोठ्या आहेत सो भरवा मिरची करता येणार नाही असं वाटतंय.

https://www.maayboli.com/node/6414 मिरची का सालन
मिरच्यांचे तुकडे हिंग मोहरी सुकी मिरची कढीपत्त्याच्या फोडणीवर जरासेच परतायचे. थोडे कुरकुरीत रहायला हवे. त्यात मीठ आणि दही घालून मस्त रायतं होईल.

फ्राइड राइस, स्टर फ्राय व्हेज + हाका नूडल्स ,
चकत्या करुन हळद तिखट मीठ लावून तव्यावर थोड्या तेलात शॅलो फ्राय करता येईल.
सॅलड मधे घालता येतील

यु एस मधल्या पद्धतीची भरली मिर्ची करायची. त्यात भात , चिकन वगैरे सगळे भरायचे. वरती मस्त चीज घालायचे आणि चांगली बेक करायची. मस्त होते अगदी - वन डीश मिल सारखी

ढोबळी मिरचीच भरीत.
तेलाचा हात लावून मिरच्या भाजुन घ्या. काळि साल काढून टाका. (मिरच्या भाजल्यावर झाकून ठेवल्या कि लगेच साल निघते.) बीया काढून घ्या. आता कुस्करुन त्यात बारीक हिरवी मिरची (ह्याही भाजुन घेता आल्या तर चांगलच), दही, साखर, जिर्‍याची पावडर आणि कोथिंबीर घालून घ्या. मिक्स केल्यावर भरीत/रायते तयार.
बारीक लसुन किंवा लसणाची पात जर मिळाली तर घातली तरी सुरेख लागते.

मसाला पावः टोमॅटो,कांदा, सिमला मिरची बारीक कापून , पावभाजीसारखे बटरवर परतून घ्या. त्यात लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, मीठ घालुन आणखी परता. मिश्रण पावाच्या आत लावून पाव भरपुर बटर लावून भाजून घ्या. (साग्र संगीत रेसीपी नंतर लिहिन कधीतरी.)

सीमा, भरीत रेसीपी एक नंबर. इतकी आवडली की माझ्याकडे मागच्या आठवड्यातली उरलेल्या दोन मोठ्या मिरच्या होत्या. मावशींना त्या लगेच भाजायला ठेवायला सांगून मगच रिप्लाय टाइप करायला घेतला.

https://www.maayboli.com/node/14420 रुचा, वरच्या लिंक मधली लाजोची कुल्फी ट्राय कर. नाहीतर https://hebbarskitchen.com/matka-kulfi-recipe-malai-kulfi-recipe/ किंवा मराठीत मधुराज रेसेपी किंवा मधुलीका च्या रेसेपी बघ.

पाक क्रुती हवी आहे.. सोपी..>>> पाकातले छोटेलाडू केलेत तर ३ वर्षांचे मूल सहज खाऊ शकेल.
त्याहीपेक्षा गूळपापडी किंवा कणकेचे/मूगडाळीचे, गुळातले लाडू हे जास्त पौष्टिक होतील.

कुणी नियमीत गुळाचा चहा घेतं का इथे? नेहेमी हमखास जमण्याची काही कृती असेल तर सांगा.
मी दोन तीनदा वेगवेगळ्या पद्धतींनी करून पाहीला पण नेहेमी नासला.

धागा चुकला वाट्टं पण आता टाईपलंय इतक तर द्या उत्तरं इथेच... Sad

दुध असलेल्या कुठल्याही पदार्थात गूळ वापरला की ते माझ्या अनुभवात तरी हमखास curdle होतं.
गूळात असलेल्या केमिकल्स मुळे तसं होतं अशी थियरी ऐकली होती. ऑर्गॅनीक गूळाने फरक पडू शकेल कदाचीत पण स्वानुभव नाही.

गावी आम्ही गुळाचाच चहा प्यायचो पण तेव्हा तो घरच्या पाहुण्याने खास कोल्हापुरहून आणलेला गुळ असायचा आणि ताजा म्हणून असेल पण कधीच नासला नाही.

आमची पद्धतः माझी आजी चुलीजवळ बसुन प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे पातेल्यात पाण्याचं प्रमाण घेवून चहा करायची. एक कप चहाचं प्रमाणः पेरभर आलं कुटुन गुळाबरोबर एक कपाच्या पाण्यात घालाय्चं. चांगलं उकळलं पाणी की मगच चहा पूड घालूनच लगेच दोन तीन मिनिटात चहा उतरवून चिनटीभर वेलची घालून झाकण ठेवायची. तोवर वेगळे घरचेच दूध उकळवून ठेवायची. चहा कपात ओतुन मग दूध ओताय्ची.

हजार वेळा चहा तिच्यासारखा ( ती हयात नसताना गुळाचा चहा प्यायची आठवण आली की) कराय्चहा प्रयत्न केला तेव्हा मला कळलेली थियरी.
मी गुळाचे आणि आल्याचे पाणी उकळुन गाळोन्न घेवून झाकून ठेवते. दूधही तितकेच उकळावे( दोन्ह्वेंचे तापमान बर्‍यापैकी सारखे असावे).
आणि चहात दूध ओतावे ; दूधात चहा नाही. नक्कीच फाटते.
तसेच थंड दूध, गरम चहा = फाटलेला चहा
थंड चहा, गरम दूध= फाटलेले पाणी. दोन्ही थंड अति पांचट पाणी.
खुपच मोठे सायन्स आहे पण गावच्या मुळात हुशार बायका करत ब्बा!

बर्‍याच वर्षांपूर्वी,ऑफिसला जाताना गुळाचा चहा करून पित असे.कारण काय ते माहित नाही पण पोट भरल्यासारखे वाटायचे.नंतर दूध फाटायला लागल्यावर बंद केले.

आणि चहात दूध ओतावे ; दूधात चहा नाही. नक्कीच फाटते.>>>> चहातच गरम दूध घालत असे,(गॅसवर असताना नाही) तरीही दूध फाटत असे.

दूध, चहा पावडर, पाणी एकत्र उकळा. Gas ची बंध करून मग गूळ खिसुन घाला, आले घाला. हलवून झाकण ठेऊन मुरू द्या. 1 मिनिट ने घ्या गाळून काहीच प्रॉब्लेम नाही होत. टेस्टटेड आहे. करून बघा.

आमचे शेजारी गावाला जाताना 1/2 किलो चेरी tomato उदार मनाने देऊन गेलेत. मी कधीच हे वापरले नाहीत. खास चेरी tomatos चा काही पदार्थ आहे का ?

Pages