पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सुरण आणि कच्च्या केळ्याची मिक्स भाजी करायची आहे.>>>>:मी कधी अशी मिक्स भाजी केली नाही.तरीही या भाज्या अशाप्रकारे करू शकता.
१.हिंग राईच्या फोडणीत वरील भाज्या चिरुन पाणी घालून /वाफेवर शिजवाव्या.शिजल्यावर मीठ,साखर घालावी.ओले खोबरे,जरासा कांदा,३-४ मिरी,ओली मिरची यांचे कोरडे वाटण घालावे व कोकम घालावे.वाटण नको असल्यास फोडणीत हि.मि.घालून भाजीत ओले खोबरे शिवरावे. हि.मि. नको असेल तर तिखट घालावे.
२.जरा जास्त तेलात कांद्यावर हळद,मसाला/तिखट घालून वरील भाजीचे पातळ काप घालावे.वाफेवर शिजली की २-३ कोकम घालून ओले खोबरे वरून घालावे.

देवकी मस्त झाली भाजी! मी वाटणात छोटासा आल्याचा तुकडा add केला. परत एकदा तुमचे आभार.
(फोटो टाकायचा प्रयत्न केला पण फाइल साइज मोठी असल्याने upload होत नाहीये)

(फोटो टाकायचा प्रयत्न केला पण फाइल साइज मोठी असल्याने upload होत नाहीये) >>> मग त्याचा स्क्रिन शॉट घेवुन तो टाका. (मी असेच करते)

खजूरी म्हणजे काय? कशी करतात?
माझी आई करते खजूरी. ती खजू-या म्हणते. म्हणजे आम्हीपण तेच म्हणतो.
शंकरपाळ्याच की त्या पण गव्हाच्या पीठाच्या असतात,

घरी झाडाला भरपूर मलबेरीज ( सैतूत, शहतूत अथवा तुती) आल्या आहेत. त्याच्या रेसिपीज सांगा ना प्लीज!
धन्यवाद!

Mahabaleshwar special mulberry with cream and mulberry ice cream topped with mulberry preserve. Baki YouTube var khup sarya recipe aahet, jam, milkshake te wine, cough syrup Happy

इडलीचा रवा आहे.
त्यापासून पटकन होईल असं काय बनवता येईल ?
मी अगदीच नवशिकी आहे इडली डोसा ह्या बाबतीत Happy

छान माहिती
धन्यु साक्षी , VB , anjalee
करून पाहते

भजी सारख्या टेक्षचर मध्ये भिजवायचे, भिजवताना त्यात मीठ, चिमूटभर साखर, लाल पूड, सोडा घालायचा. काही काही ढोकळा पिठात हे सगळं असतं, त्यामुळे घालायची गरज नसते, कुकरच्या भांड्याला आतून तेलाचा हात लावून घ्यायचा, त्यात हे पीठ ओतायचं.या
कुकर मध्ये डबा ठरवायचा, शिट्टी काढून कुकर गॅस वर 10 मिन ठेवायचा.
झालं की डबा उलटा करून ताटात ढोकळ्याचा केक काढून घायचा, त्याला वरून तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता याची फोडणी द्यायची आणि मग तुकडे कापायचे

सोडा डायरेक्ट पिठात न घालता, पाणी तेल यांच्या मिश्रणात घालून ते मिक्स करून भराभर ढवळून वाफवायला ठेवायचं.
कुकरमध्ये पाणी ओतून तो आधीच तापत ठेवायचा.

ढोकळ्याचं पीठ सापडलंय म्हणजे रेडिमिक्स असणार. नाहीतर बेसन सापडलं असतं Wink
मुद्दा हा, की पाकिटावर काय रेस्पी लिवलीय?

खोके पॅकबंद आहे ना? आमच्या कडे दिसल्या खोक्याचा /पिशवीचा सदुपयोग करतात. कशात काय निघेल सांगता येत नाही. Rofl
मागे एकदा पिठीसाखर लिहीलेल्या पिशवीत मीठ निघाले होते.

इथे अमेरिकेत ढोकळ्याचं पीठ म्हणून सरसरीत बेसन विकायला ठेवलेलं असतं इन्डियन दुकानांत. रेडी मिक्स नव्हे. एरवी जे सुपरफाइन बेसन मिळतं ते सोडाच काय, जीव ओतला तरी फुलत नाही. Proud

Pages