काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही लिंक आधी शेयर केली आहे का नाही ते आठवत नाही. पण काही दिवसांपूर्वी परत एकदा ' शाकुंतल ते मानापमान' हा वसंतराव देशपांडे यांचा नाट्यसंगीतावरचा कार्यक्रम पाहिला. फार मस्त बोललेत आणि गाण्याबाबतीत तर प्रश्नच नाही.
जरुर पहा...

https://www.youtube.com/watch?v=27T21Vy9zTY

रूपे सुंदर सावळा गे माये.

सुरेश वाडकर यांची गाणी चालू आहेत एकापाठोपाठ एक.

https://www.youtube.com/watch?v=ZX3uTdHUKCs

मालिनी राजूरकरांच्या यू ट्यूबवर ज्या क्लीप्स आहेत त्या बहुतेक फक्त ऑडीओ आहेत. वरच्या लिंकवर त्यांचा अलिकडचा व्हीडीओ आहे. बाईंना गाताना बघणे म्हणजे पर्वणी असते. जे काय सांगायचे ते स्वरातून, त्यासाठी चेहरा वेडावाकडा करायची गरज नाही कि हातवार्‍यांची.

नेहमीसारखे जोरकस गाणे. यमन कल्याणमधली बंदीश खुप अर्थपूर्ण आहे ( मी आधी ऐकलेली नव्हती ) काफी टप्प्याला जोडून स्वरमालिका गायल्यात. पहिल्यांदा गळ्याने थोडा त्रास दिलाय पण शेवटी त्या मालिनी राजूरकर आहेत, असले त्रास त्यांना काय त्रासदायक नसतात. पावणेदोन तासाचा निखळ स्वरानंद !

शकिराचं ' जिप्सी '...

अहाहा. शकीरा काय चीज आहे हे अनुभवायचं असेल तर वक्क वक्का आणि हे जिप्सी ( लाईव) बघावं ( आणि ऐकावंही ;))

आपण शाळेत वंदे मातरम म्हणायचो तो राग झिंझोटी, गाईड मधल्या, मोसे छल किये जाय या गाण्यातही तो आहे, पण सहसा हा राग कंठसंगीतात ऐकायला मिळत नाही. मी फक्त अश्विनी भिडेंचा ऐकलाय पण आता यू ट्यूबवर विदुषी मालिनी राजूरकरांचा पण आलाय. त्यांचाच बसंत मुखारी चक्क लाईव्ह आलाय.

सवाई महोत्सवातले गौड सारंग, चारुकेशी पण लाईव्ह आलेत. बाई फक्त शरीराने वयस्कर झाल्यात म्हणायचे.. बाकी गायनातला रुबाब तोच.

वक्क वक्का आणि हे जिप्सी>>> महान आहेत दोन्ही.
रच्याकने, वक्का वक्का ला १ अब्ज हिट्स मिळालेत.

http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/shakiras-waka-waka-hits...

काय वळतो आवाज तिचा. आवाजात जादू आहे. नशा आहे, गोडवा आहे.. जाऊदे भा.पो. असतील... Happy
बाईंची आवडलेली गाणी.. whenever wherever, wakka wakka, she wolf, get it started (ft. pitbull)

बाई कहर आहेत

मित बाईंचे जिप्सी ऐका. ( किंवा स्पॅनिश मधले गिताना) वाह. शकिरा पाच भाषा चांगल्या बोलू शकते. कोलंबियन असलेल्या शकिराचे मूळ अरेबिक असल्याने बेली डान्सचा वापरही ती उत्तम करते.

जिप्सी /गिताना . यात काही स्पॅनिश फ्लॅमेन्को नृत्याचाही भाग आहे
https://www.youtube.com/watch?v=ZTB6IfUxjxk

हा गितानाचा स्टुडिओ आल्बम . यात चक्क रादेफ नदाल आहे तिच्या बरोबर. यात चक्क तबल्याचा वापर आहे

https://www.youtube.com/watch?v=QL8-8badzks

टीना मस्त गाणं.

मी आत्ता किशोरकुमार ऐकतेय एकापाठोपाठ एक. आत्ता 'मेरे नैना सावनभादो', चालू आहे.

Pages