काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खांसाहेबांच्या भूमिकेत सुबोध जोशी ह्यातच लोच्या होणार असे वाटतेय...>>> पिळगाव्कर आहेत.

सुबोध भावे दिग्दर्शक आहेत आणि कवीराजच्या भूमिकेत आहेत.

वाहत्या धाग्यावर मागे एकदा लिहिलं होतं. राहुल देशपांडेच्या आवाजातलं निर्गुणी भजन "सुनता है गुरु ग्यानी". कानात हेडफोन घालून डोळे मिटून ऐकल्यास ब्रह्मानंदी टाळी लागण्याची खात्री Happy या पेक्षा छान दिवसाची सुरुवात होणे अवघड आहे.

https://youtu.be/NMLBq2I3Fzc

सुनता है गुरु ग्यानी
आत्ता ऐकले...

एकदम ब्रह्मानंदी टाळी छान.

हे गाताना
राहुल देशपांडेच्या आवाजात एकप्रकारची आश्वासकता आहे.

पंडित भीमसेन जोशी, अनेक भजनांपैकी एक आवडते भजन.
शब्द, अर्थ आणि गायन सगळेच आवडते.

जो भजे हरि को सदा
जो भजे हरि को सदा सो परम पद पायेगा|

देह के माला तिलक और भस्म नहिं कुछ काम के
प्रेम भक्ति के बिना नहिं नाथ के मन भायेगा|

दिल के दर्पण को सफ़ा कर दूर कर अभिमान को
खाक हो गुरु के चरण की तो प्रभु मिल जायेगा|

छोड़ दुनिया के मज़े और बैठ कर एकांत में .
ध्यान धर हरि के चरण का फिर जनम नहीं पायेगा|

दृढ़ भरोसा मन में रख कर जो भजे हरि नाम को
कहत ब्रह्मानंद ब्रह्मानंद में ही समायेगा|

जो भजे हरि को सदा
जो भजे हरि को सदा सो परम पद पायेगा|

https://www.youtube.com/watch?v=TMpRu8yYjTA

https://youtu.be/K0CXNZyGVeU

ऋणानुबंधाच्या, लहानपणापासून आवडतं गाणं. रेडीयोवर लागायचं बहुतेकदा. (कुमारजी आणि वाणी जयराम).

डेव्ह स्ट्रिंगर
तुकाराम महाराजांवर बोलतो आणि पुढे जय विठ्ठले हे भजन.
डेव्ह स्ट्रिंगर हा ऑस्ट्रेलियन किर्तनकार आहे.
(गाण्याच्या पद्धतीमुळे त्याचे वर्णन व्हेअर इस्ट मिटस वेस्ट असे करतात.)

अगदी हळू सुरुवात करून पुढे ठेका वाढत जातो.
याच्या प्रत्येक भजनावर स्थानिक ऑस्ट्रेलियन प्रेक्षकवर्ग डोलतो नाचतो!

या माणसाने ऑस्ट्रेलिया मध्ये भारतीय तत्वज्ञानाची जवळपास चळवळच चालवली आहे.

इथे पाहा ऐका
https://www.youtube.com/watch?v=N9jGCK5F84k

धलता सुरज धिरे धिरे ढल जायेगा.

https://www.youtube.com/watch?v=XkwUsRQ9OuE

९.४४ आहे म्हणजे बहुदा पुर्ण आहे गाणे. मी पुर्ण ऐकलेले नाही य दुव्यावर.

कारण डेव्ह स्ट्रिंगर ऐकतो आहे...
नमो दुर्गे काली दुर्गे नमो नमः
https://www.youtube.com/watch?v=EgGJM1NJS2s

हरे क्रिष्णा हरे क्रिष्णा
क्रिष्णा.. क्रिष्णा...
हरे हरे

हरे रामा हरे क्रिष्णा
क्रिष्णा... क्रिष्णा...
हरे हरे

हरे रामा हरे रामा
रामा... रामा
हरे हरे

माधवा या आंतरराष्ट्रिय ख्यातीच्या किर्तनकाराने केलेल्या दीर्घ भजनाचा आनंद येथे -
https://www.youtube.com/watch?v=Ibzxrcj7Acg

संथ पणे सुरू झालेले हे भजन वेग घेत जाते. छत्तीसाव्या मिनिटापासून पुढे ताल वेगवान होतो...
तो मृदुंगम वाजवणारा तरुण कलाकार एकदम दमदार आहे.
दिड तासाचे भजन... अगदी घामाघुम झाला आहे. पण शेवटपर्यंत त्याच उत्साहाने वादन करतो.

मखमली हे प्रश्न थोडे,
रेशमाची उत्तरे.

पाय-या थोड्या सुखाच्या,
अन अबोली अंतरे.

सावल्या फुलांच्या,
पावलेही फुलांची,

वाट हळवी वेचतांना,
सावर रे, सावर रे मना.

मला ह्यातल्या काही ओळी खुप आवडतात त्या वर लिहील्यात. पुर्ण गाणंच सुंदर आहे.

https://youtu.be/dkEiYeWbFQs

सुबोध भावे कविराज नाही , सदाशिव आहे.

सचिन ... खानसाहेब ( खानसाहेबाना आवाज राहूल देशपांडेंचा आहे. नाटकातही ते चांगला रोल करतात. सचिनला जमेल का ? )

पंडितजी ... शंकर महादेवन

कविराज म्हणजे प्रधानजी ना ? ते कोण आहे?

आज ही दोन गाणी

सावन बितो जाये पिहरवा.. मन मेरा घबराये रे...
एसो गये परदेस पिया तुम.. चैन हमे नही आये रे...
मोरा सय्या मोसे बोले ना...... Happy मस्त गाण आहे हे एक.

माझ्या आवडत्या गाण्यापैकी अजुन एक
आशा - जगजीत च हे एक गाण
जब सामने तुम आ जाते हो...क्या जानिए क्या हो जाता है .... Happy

https://www.youtube.com/watch?v=hfL9V1PLMjs

आज लावणी, त्यातही सवल जबाब

जयश्री गडकर
इथे ऐका
https://www.youtube.com/watch?v=yzO9-3n9VtY

केला इशारा जाता
उषा चव्हाण
यातली सुरवातीची ढोलकी एकदम कडक!
https://www.youtube.com/watch?v=lGPxSiu1jkM

तमाशातील सवाल जबाब ही एक निराळीच गोष्ट आहे.
त्यात जेव्हढा अहंकार दिसतो, डिवचणे दिसते तेव्हढेच शेवटी अध्यात्माकडे जाणेही दिसते.
खुप पुराणांचे दाखले यात येतात. त्यातले कोडी घालणे आणि त्याची उत्तरे.
मजेशीर प्रकार आहे खरा.

हे पाहा यातली
सुरुवातीची ढोलकी ची जुगलबन्दी भारी आहे.

https://www.youtube.com/watch?v=TY0rVdgXeTE

'अंतहीन ' या बंगाली सिनेमा मधली ही दोन गाणी ,खूप आवडती गाणी
गाण्यांचा अर्थ समजत नाही पण सुरेख चाल आणि श्रेया घोषालचा आवाज यामुळे असंख्य वेळा ऐकलीत
एकदा तरी नक्कीच ऐका तुम्ही पण

जाओ पाखी बोलो
https://youtu.be/b09HPjMsFT8

शोकाल अशे ना
https://youtu.be/nK7aYK2U780

निनाद, गदीमांनी काही अप्रतिम सवाल जबाब लिहिले आहेत.. एक नमुना पहा.

तीरकमठ्यासह दोन पारधी, गोरा पर्वत चढले गं
तीळास बघूनी, नखाएवढ्या तळ्यात दोघे बुडले गं
बुडले ते ना वरी निघाले, रमले त्या ठायी,
अशी कशी ही सांग बाई गं झाली नवलाई ?

दोन चोरटे पुरुषी डोळे, न्याहाळिते नवलाई
पायापासून तिला न्याहाळीत वरी पोचले बाई
हनुवटीवरती तीळ तियेच्या, गालावरती खळी
तीळास भुलूनी, खळीत बुडले, भान न त्यांना मुळी..

_मनाली_ छान गाणी आहेत...

आकाशवाणीवर

अब तो बडी देर

ऐकतोय

भक्तीपुर्ण भीमपलासी रागातले

जा जा रे अपने मंदिरवा
जा जा रे अपने मंदिरवा

जा जा रे अपने मंदिरवा
सुन पावे मोरी सास नंदनीया

जा जा रे अपने मंदिरवा

हम तो सदारंग तुमको चाहत है
तुम हमसे का छल न किया

जा जा रे अपने मंदिरवा
जा जा रे अपने मंदिरवा

बहुदा मीरा म्हणते ही माझी सासू आणि नणंदा ऐकतील, अरे कृष्णा, जा तुझ्या मंदिरात परत जा.
मी तर सदैव तुझ्या आवडीत तुझ्या रंगात बुडाले आहे. आता तू माझ्याशी असे वागून मला संकटात टाकू नकोस!
अरे कृष्णा, जा तुझ्या मंदिरात परत जा.
जा तुझ्या मंदिरात परत जा.

येथे ऐका
अश्विनी भिडे यांचे गंभीरपणे केले सादरीकरण
https://www.youtube.com/watch?v=Cp-u9mdk2jQ

आणि येथे पं.जसराज यांचे वेगवान गायन
https://www.youtube.com/watch?v=-f2LGUzlmNA

सतारीवर राग भीमपलासी
https://www.youtube.com/watch?v=X0pKnZ0xfy4

हा राग आवडला असल्यास अधिक माहिती आणि खजिना
तरंगवर आहे
http://www.tanarang.com/hindi/bheempalasi_hindi.htm

Pages