काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

९०च्या दशकात एक गाणं आलेलं शब्द असे होते

देखा जो तुझे, दिल ये खो गया
पेहली नजर में हमें प्यार हो गया
हम है तेरे दिवाने सनम
ओ जानां है तेरे दिवाने सनम

कोणाला हे गाणं आठवतंय का? कोणत्या चित्रपटातलं होत? नेटवर कुठे मिळेल?

बर्कली कॉलेज ऑफ म्युजिकमध्ये २०१४साली अल्ला रखाँ रेहमानच्या गाण्यांची मेहेफील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. या मैफिलीचे विडिओ विद्यापीठातर्फे युट्युबवर प्रदर्शित होत आहेत. अत्यंत श्रवणीय कार्यक्रम आहे हा.
https://youtu.be/fgjjJOZkXbQ हा पहिला भाग आहे, इथून पुढे इतर भाग मिळतील.

मोहिनी डे या आजच्या आघाडीच्या बासिस्टचा हा एक अप्रतिम विडिओ: https://youtu.be/hbcW7nxcP3E

त्या दिसा वडाकडेन गडद तिणसणा
मन्द मन्द वाजत तुझी आयली गो पायजणा
बा भ बोरकर यानी लिहिलेले हे गीत जितेन्द्र अभिषेकी, सुरेश वाडकर, अजित करकरे , अभिजित दळवी आणि पु.ल. देशपाण्डे इतक्या सगळ्यानी गायले आहे . पु ल नी हे कुठल्यातरी मैफिलीत म्हटले असावे असे वाटते.
अर्थातच जितेन्द्र अभिषेकीन्ची सर कुणालाही नाही. पार मनाला भिडतात शब्द आणि स्वर दोन्ही.
गाणे कोकणी असले तरी कोकणी मराठीला खूप जवळची भाषा असल्याने अर्थ सहज कळतो .
ऐकले नसेल तर जरूर ऐका आणि अभिप्राय कळवा.

कोई ये कैसे बता ये के वो तन्हा क्यों है ?
वो जो अपना था वोही और किसी का क्यों है ?
यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है ?
यही होता हैं तो आखिर यही होता क्यों है ? ----जगजीत सिंग

https://www.youtube.com/watch?v=UByuXScv3CA

<<कोई ये कैसे बता ये के वो तन्हा क्यों है ?
वो जो अपना था वोही और किसी का क्यों है ?>>
त्यांचीच याच चालीत गाइलेली आणखी एक गझल मला आवडते
तेरे खुषबू मे बसे खत मै जलाता कैसे
प्यार मे डूबे हुए खत मै जलाता कैसे
तेरे हांथों से लिखे खत मै जलाता कैसे

https://www.youtube.com/watch?v=-wYHpYGXyew

किसी नजर को तेरा इंतजार आज भी है।
कहा हो तुम के दिल बेकरार आज भी है।

आहिस्ता आहिस्ता किजीए बातें..धडकने कोई सुन रहा होगा...... हे खूप आवडीचे गाणं
स्पेशली या ओळी.. लफ्ज गिरने ना पाए होठोसे, वक्त के हिथ इनको चुन लेंगे.........

You don't have a clue , What it is like to be next to you
I'm here to tell you
That it is good
That it is true
....
cute cute song

सध्या प्राईम वर वेब सिरिज "चक" बघतेय .
एका एपिसोड च्या शेवटी हे गाणं ऐकलं , तिथे एकदम फीट्ट आहे .
रिपीट मोडवर टाकलयं सध्या .

इम्रान अब्बास नकवीने गायलेलं रंगीलामधलं गाणं
https://www.facebook.com/watch?v=625476138768358

पाकिस्तानी अभिनेते बर्‍यापैकी सुरेल आणि गंभीरपणे गातात. फवाद खानने तर बँड बनवला होता.

परवा प. वसंतराव देशपांडेंचं बगळ्यांची माळ फुले ऐकावसं वाटलं म्हणून यु ट्यूबवर ऐकत होतो. तर सजेशनमध्ये देवकी पंडितची हे सुरांनो चंद्र व्हा, लागी करेजवॉ कटार, रंगुनी रंगात सार्‍या ही समोर आली. ती ऐकून झाल्यावर पं जितेंद्र अभिषेकींच्या आवाजात पहिली दोन ऐकली.

दादा कोंडकेंची जुनी गाणी ऐकतोय.

गंगू तारुण्य तुझं बेफाम
म्होरं हो गंगूबाय तुझ्या मागून आलो
पंढरपूरचं कुलूप लावलंय माझ्या पेटीला
बाई मी केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभंल काय
माळ्याच्या माळ्यामंदी कोण गं उभी

आत्ताच माझा दिवस उजाडलाय ..दिवसाला ५० गाणी तरी ऐकत असेन .. आत्ताशी तिसरंच सुरू आहे Happy
जब हॅरी मेट सेजल मधलं “हवाए”

Pages