काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवा बंदानम्मा, स्वामी बंदानो --- चाल अगदी ओळखीची वाटते आहे.
>>

मह्वेश हीच आहे ना ती ओळखीची चाल ?

आधी गणाला रणी आणला ...नाही तर रंग पुन्हा सुना सुना ....
https://www.youtube.com/watch?v=tXAToLYQzrM

नाही रॉहू, या दोन्ही चाली वेगळ्या आहेत. "देवा बंदानम्मा"ची चाल म्हणजे आपला टिपिकल भजनी ठेका वाटतो मला.

https://youtu.be/Ofopo3YlN8w

हे गाणं मला अतिशय आवडतं. ऐकायला आणि बघायलाही. ही मूवीपण खूप आवडते. (प्रेमाची गोष्ट).

पठ्ठे बापूराव असा एक जूना चित्रपट होता, त्यातली छोटा गंधर्वांची दोन गाणी..

मंगलचरणी गण नाचला, नाचला कसा तरी, पाहू चला...

आणि

मुंबई नगरी ग बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका, वाजतो ग डंका...

अगदी वेगळीच चाल, कोरसची अगदीच अनोखी पद्धत.. कुठेही ऐकायला मिळाली तर सोडू नका.

साम channel वर, कल्याणजी आनंदजी गाणी चालू आहेत.

सुरेश वाडकर, साधना सरगम, वैशाली सामंत गातायेत.

सुरेशजी यांनी आत्ताच १) और इस दिलमे क्या रखा है आणि २) मै तो एक ख्वाब हु, इस ख्वाबसे तू प्यार ना कर ही दोन गाणी गायली.

आमिर खान यांनी गायलेला
राग - मारवा
आरोह - सा ,ध ,नि रे१ ग म् ध नि सा'
अवरोह - सा' नि ध म् ग रे१ सा ; ,नि ,ध सा ,नि रे१ सा ;

गुरु बीन ग्यान मै ना पाऊ
https://www.youtube.com/watch?v=XMtNGJlaKMs

त्यातच पुढे किन बैरन कान भरे
मोरा पिया मोसे बोलत नाही

हे ही आहे..

कीचकवध चित्रपटातले

भूप राग
आरोह- सा रे ग प ध सां
अवरोह- सां ध प ग रे सा

धुंद मधुमती रात रे
तनमन नाचे, यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे

जललहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येइ प्रियकरा, येइ मंदिरा, अलि रमले कमलांत रे, नाथ रे

ये रे ये का मग दूर उभा ? ही घटिकाहि निसटुनी जायची
फुलतील लाखो तारा परि ही रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि कटिभंवती धरि हात रे, नाथ रे

https://www.youtube.com/watch?v=0SIOaIbL84E

याच भूप रागतले
सुहासिनी मुळगावकर यांचे
द्रौपदी या नाटकातले पद

लाजविले वैर्‍याला

https://www.youtube.com/watch?v=un5HTJTV3RY

ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे किस तरह गिरह ये सुलझे
है रोम रोम एक तारा जो बादलों में से गुज़रे .... मस्त आहे .....

राकेश चौसरीया- बासरी ऐकतेय. धन्यवाद मानव.

इथे आता मस्त लिंक्स दिल्यात वेगवेगळ्या ब-याच जणांनी, सध्या त्याच एकेक ऐकणार आहे :).

जय गुरु ओंकारा, सद्गुरु ओंकारा ओम..
गायि़का: गायत्री

शब्दांना महत्व नाही, हे भजन ऐकायला आवडतं एवढच.
( आर्ट ऑफ लिव्हिंगवाल्यांच आहे.)

https://www.youtube.com/watch?v=86kEEszLdeQ

अनुप जलोटा यांचे भजन

तन के तंबुरे में दो
सांसोंके दो तार बोले
जय सिया राम राम
जय राधे शाम शाम

तन के तम्बूरे में दो
तन के तम्बूरे में दो साँसों के तार बोले -
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
तन के तम्बूरे में दो

तन के तम्बूरे में दो साँसों के तार बोले -
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
जय सिया राम राम जय राधे शाम शाम

अब तो इस मन के मंदिर में
अब तो इस मन के मंदिर में
प्रभु का हुआ बसेरा,
प्रभु का हुआ बसेरा
अब तो इस मन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा
मगन हुआ मन मेरा छूटा
जनम जनम का फेरा,
जनम जनम का फेरा
मन की मुरलिया में ... हो
मन की मुरलिया में
मन की मुरलिया में सुर का सिंगार बोले -
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
तन के तम्बूरे में दो
तन के तम्बूरे में दो साँसों के तार बोले -
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
जय सिया राम राम जय राधे शाम शाम

लगन लगी लीलाधारी से
लगन लगी लीलाधारी से जगी रे जगमग ज्योति, जगी रे जगमग ज्योति
लगन लगी लीलाधारी से जगी रे जगमग ज्योति, जगी रे जगमग ज्योति
राम नाम का हिरा पाया, श्याम नाम का मोती, जगी रे जगमग ज्योति
प्यासी दो अंखियो में ... हो
प्यासी दो अंखियो में
प्यासी दो अंखियो में आसुओं की धार बोले -
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
तन के तम्बूरे में दो
तन के तम्बूरे में दो साँसों के तार बोले -
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
जय सिया राम राम जय राधे शाम शाम
जय सिया राम राम जय राधे शाम शाम

अनुप जलोटा
दुवा
https://www.youtube.com/watch?v=32Ijk1b0Mfw

आणि मन्ना डे यांच्या आवाजात
हीच रचना
https://www.youtube.com/watch?v=XZ-VV-25gWE
यातली सतार जास्त सुंदर आहे.

कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ,
पिया जाने ना

नेहा लगा के मैं पछताई
सारी सारी रैना निंदिया ना आई
जानके देखो, मेरे जी की बतियां
पिया जाने ना

रुत मतवाली आ के चली जाए
मन में ही मेरे मन की रही जाए
खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियाँ
पिया जाने ना

कजरा ना सोहे, गजरा ना सोहे
बरखा ना भाए, बदरा ना सोहे
क्या कहू जो पूछे, मोसे मोरी सखियाँ
पिया जाने ना

गीतकार : शैलेन्द्र
गायक : लता मंगेशकर
संगीत : पंडित रवी शंकर
चित्रपट : अनुराधा

https://www.youtube.com/watch?v=TAb9IktpLGY

शान्‍ता शेळके यांनी नितांत सुंदर शब्दात लिहिलेले
आणि सुधीर फडके यांच्या तरल सुरातील

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

नीरवता ती तशीच, धूंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहीनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे
मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरातुनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

सोनु निगम चे ब्रर्दस मधल गाण>>> मस्त जमंलय हे गाणं. वाहत्या धाग्यावर एकदा लिहिलं होतं.
अजय-अतुल-सोनु निगम यांचं 'अग्निपथ' मधलं 'अभी मुझमें कहीं' नंतरचं हे अजून एक जबरदस्त गाणं !
दोन्ही गाणी आठवड्यातून आवर्जुन ऐकलीच जातात Happy

अजय-अतुल-सोनु निगम यांचं 'अग्निपथ' मधलं 'अभी मुझमें कहीं' नंतरचं हे अजून एक जबरदस्त गाणं !>>+१.

सोनू निगमची सेकंड इनिंग अधिक कसदार होत चालली आहे.

वाजपेयी यांची रचना
आणि पद्मजांचा स्वर

गीत नया गाता हूँ|
गीत नया गाता हूँ|
गीत नया गाता हूँ|

गीत नया गाता हूँ|

टूटे हुए तारों से, फूटे वासंती स्वर
पत्थर की छाती में उग आया नव अंकुर
झड़े सब पीले पात, कोयल की कुहुक रात,
प्राची में अरुणिमा की रेख देख पता हूँ,
गीत नया गाता हूँ|
गीत नया गाता हूँ|

टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी,
अन्तर की चीर व्यथा पलको पर ठिठकी
हार नही मानूंगा, रार नयी ठानुंगा,
कल के कपाल पर लिखता, मिटाता हूँ|
गीत नया गाता हूँ|
गीत नया गाता हूँ|

या गीताचा शेवट फार आवडतो मला.
हार नही मानूंगा, रार नयी ठानुंगा,
कल के कपाल पर लिखता, मिटाता हूँ|
गीत नया गाता हूँ|

https://www.youtube.com/watch?v=EvqGIC0CHPc

नंदिनी स्पेशल... Happy

मुत्तु कोडी कव्वाडी हडा....
हे मूळ गाणे ऐका तमिळमधले ...
हिंदीतल्या गाण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे. आणि तो अभिनेता ही मस्त आहे.
https://www.youtube.com/watch?v=BiD6xmKQcwg
संगीतकार एम एस विश्वनाथन. गायिका ईश्वरि गायक माहीत नाही

रॉहू Happy

आता चांद केवड्याची रात ऐकत होते. गाण्याचा नक्की कंटेक्स्ट काय आहे. बरेचसे शब्द आणि सिच्युएशन यांचा मला अर्थ लागत नाही.

(रच्याकने, ते बरेच दिवस चांद केवढ्याची रात समजत होते. आता लिरिक्स गूगल करताना ज्ञानदीप उजळला.)

Pages