काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

९x जलवावर एकसे एक गाणी बघतेय.

खिलते है गुल यहा.
एहसान तेरा होगा मुझपर.
दिल ऐसा किसीने मेरा तोडा.
चुपके चुपके रातदिन आसू बहाना याद है.

लेकीन चित्रपटातली मधली सगळीच गाणी छान होती.

दिनेशदा, खुप छान गाण्यांची आठवण करून दिलीत.
तुम्ही दिलेले दुवे ऐकायला अजून जमले नाही.
या आठवड्यात तो कार्यक्रम करणार आहे...

अन्जू ९x जलवा काय आहे?
गाणी तर सगळी छान आहेत...

- खिलते है गुल यहा.
- एहसान तेरा होगा मुझपर.

ही दोन इतक्यातच एका घरगुती कार्यक्रमात झाली आहेत त्यामुळे मनात अगदी ताजी आहेत.

चुपके चुपके रातदिन आसू बहाना याद है
आता परत ऐकावे लागेल... Happy

"शांताबाई" च्या निमित्ताने.... मराठी "ध" गाणी
http://www.maayboli.com/node/55881#comment-3679266
हा ट्ग्या यांचा धागा
वाहता असल्याने त्यावर्ची यादी वाहून गेली. पण कधी कधी अशीही यादी हवी असते.
विविध रसिकांनी दिलेली धमाल गाणी, नाचायला गाणी वाहून जाऊ नयेत म्हणून येथे चिकटवतोय

दिसला ग बाई दिसला (पिंजरा)
नाच रे मोरा (बालगीत असलं तरी सुद्धा भल्या भल्याचा पिसारा फुलतो ह्या गाण्यावर )
ये गो ये मैना पिंजरा बनाया सोनेका-- याच्यावर जाखडी डान्स. लईभारी जमतो.
ऐका दाजिबा-
तुझे देख के मेरी मधुबाला
येऊ कशी तशी मी नांदायला (रिमिक्स)
चिमणी उडाली भुर्र..
डोकं फिरलंया बयेचं
कोंबडी पळाली
तुझा झगा ग वार्यावर उडतो
मी बाबुराव बोलतोय
मी सखूबाई बोलतीय
बाबा लगीन
हुंडा नको मामा फक्त पोरगी दया
पप्पी दे पप्पी दे पारुला
जव्हा या आंटीची घंटी मी वाजवली
बघ बघ अगं सखे कसं बुगु बुगु वाजतय
चला जेजुरीला जाऊ
तुझा गं पापलेट बारीक हाय हात लावताच ब्वॉट
काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर
भारुनि लिंबू मला मारीला
जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलाया
(https://www.youtube.com/watch?v=sg3EB4XtXOw)
बिलनशी नागीन निगाली, नागोबा डूलाया लागला
(रिमिक्स : https://www.youtube.com/watch?v=dioSgASlRCI)
रेतीवाला नवरा पाहिजे
(https://www.youtube.com/watch?v=4mF6Wp20lvA)
धनगर वाड्यात घुसला
(https://www.youtube.com/watch?v=Q1haEG_zf-0)
नवरी नटली सुपारी फुटली
(https://www.youtube.com/watch?v=ROLKFIAqM9M)
बग बग अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय
(https://www.youtube.com/watch?v=iDoKEov5DAM)
नाखवा बोटीने फिरवाल का
(https://www.youtube.com/watch?v=87ygaAYCWqY)
बाबा लगिन, ढिंच्याक ढिच्याक
(https://www.youtube.com/watch?v=ig7vvhfgLKY)
ये ग ये, ये मैना... पिंजरा बनाया सोनेका
(https://www.youtube.com/watch?v=0FBzaGdtzCs)
ही पोरी साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद
(https://www.youtube.com/watch?v=pYV19ENqDgs)
वाट माजी बगतोय रिक्षावाला
(https://www.youtube.com/watch?v=PE1crsM2WkY)
पोरी जरा जपून दांडा धर
(https://www.youtube.com/watch?v=VYq4GRO2A5Y)
कल्लूळाचे पानी कशाला ढवळीलं... नागाच्या पिल्याला तू का ग खवळीलं
(https://www.youtube.com/watch?v=xBHJZrb1ito)
शांताबाई
(https://www.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM)

ती 'ध' गाणी बीबी धावता नको होता, माहिती वाहून जाते.

गुड तुम्ही इथे काही दिलीत. पिकनिकसाठी मस्त. एरवी ऐकायला भावगीतं,मेलडी गाणी, सेमी क्लासिकल जास्त आवडतात.

भुईकमळ,

हर्पेन ,सहेला रे...ऐकताना जीव हल्लख होऊन उडू लागतो पाकोळीगत... पण मला पं.रघुनंदन पणशीकरांनी गायलेला थोडा हळव्या आवाजातला जास्त आवडतो लिंकसाठी धन्यवाद!

दुवा द्या ना प्लिज...

https://www.youtube.com/watch?v=0gVnmvthFIk

हि फक्त ऐकण्याची नव्हे तर बघण्याची पण गोष्ट आहे. कौशिकिच्या सखी ग्रुपचा हा कार्यक्रम ( रादर त्याची झलक )

तिच्यासोबत व्हायोलिनवर - नंदीनी शंकर, बासरीवर देबोप्रिया चॅटर्जी, पखवाज वर महिमा उपाध्याय, तबल्यावर सावनी तळवलकर आणि कथ्थक - भक्ती देशपांडे आहेत

प्रत्येक कलाकाराचा आत्मविश्वास आणि कला, दोन्ही दाद देण्याजोगे आहेत.

( कौशिकीचे गायन मला बेहद्द आवडते. सध्या तिच्यावर गिमिक्सचा आरोप होतोय खरा, पण तिचा उत्साह, पाण्यासारखा कुठेही सहज जाणारा आवाज, सादरीकरणातला ताजेपणा याला तोड नाही. लहान आहे अजून, वयानुसार काही बदल होतीलही. )

बोल बोलना साजणा, का अबोला ?

सूरपंचम हा विळखा घाली
ओढी तुजला हृदया जवळी
जिवलगा रंग भरेना
बोल बोलना, जिवलगा रंग भरेना

मोहक सुंदर यौवनाचे
फूल पहिले चंपकाचे
का फुलेना, हसेना
बोल बोलना, का फुलेना हसेना ?

स्वर : लता, गीत : शांता शेळके, संगीत : उषा मंगेशकर, चित्रपट : आई मी कुठे जाऊ ?

हे गाणे माझ्याकडे आहे, नेटवर सापडले नाही, कुणाला मिळाले तर जरुर सांगा.. अगदी वेगळी आणि लताचाही कस लावणारी चाल आहे.

https://youtu.be/syM5yXci6mA

युगा युगांचे नाते आपुले , नको दुरावा

' तू तिथे मी ' मधली सगळीच गाणी फार सुरेख आहेत .
आनंद मोडकांनी खूप छान संगीत दिलयं

इतना ना मुझसे तू प्यार बढा , कि मै एक बादल आवारा
कैसे किसीका सहारा बनू कि मै खुद बेघर बेचारा

इसलिये तुझसे मै प्यार करू , कि तू एक बादल आवारा
जनम जनम से हूँ साथ तेरे ,की नाम मेरा जल की धारा

'छाया ' सिनेमातल गाण

तलत मेहमूद आणि लता मंगेशकर

https://youtu.be/m4zAWM6ks6o

आज जाने की झिद ना करो..प्रत्यक्ष फरीदा खातूम यांच्या तोंडून..डोळ्यात पाणी आलं ऐकताना..totally divine! And the visuals are killing Sad What an end to the season..Strings, you did a great job! Thank you!

https://www.youtube.com/watch?v=KDJL2FyRDeA

जिज्ञासा, आता तेच ऐकतेय.

काय म्हटलंय हे गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी "जी अभी भरा नही"

ते ऐअक्तानाच हे ही वर्जन आठवलं. https://www.youtube.com/watch?v=gwcCgYiO2Qs

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती...(आशा भोसले)
https://www.youtube.com/watch?v=mHV60y_fhz8

अवघा रंग एक झाला..(किशोरी आमोणकर)
https://www.youtube.com/watch?v=5p5hy-2AjTA

कोणीतरी असे संगीत परत बनवा रे... Sad

Pages